मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
अनध्याय

तृतीयपरिच्छेद - अनध्याय

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां अनध्याय सांगतो .

अथानध्यायाः पारिजातेबृहस्पतिः प्रतिपत्सुचतुर्दश्यामष्टम्यांपर्वणोर्द्वयोः श्वोऽनध्यायेद्यशर्वर्यांनाधीयीतकदाचन नारदः अयनेविषुवेचैवशयनेबोधनेहरेः अनध्यायस्तुकर्तव्योमन्वादिषुयुगादिषु निर्णयामृते चातुर्मास्यद्वितीयासुमन्वादिषुयुगादिषु अनध्यायस्तुकर्तव्योयाचसोपपदातिथिः गर्गः शुचावूर्जेतपस्येचयाद्वितीयाविधुक्षये चातुर्मास्यद्वितीयास्ताः प्रवदंतिमनीषिणः स्मृत्यर्थसारेपि आषाढीकार्तिकीफाल्गुनीसमीपस्थद्वितीयासुचेति मनुः उपाकर्मणिचोत्सर्गेत्रिरात्रंक्षपणंस्मृतं अष्टकासुत्वहोरात्रमृत्वंतासुचरात्रिष्विति उत्सर्गेतुमनूक्तपक्षिण्यहोरात्राभ्यांत्र्यहस्यविकल्पइतिविज्ञानेश्वरः अष्टकाशब्देनसप्तम्यादित्रयंज्ञेयं तिस्रोष्टकास्त्रिरात्रमंत्यामेकेइति गौतमोक्तेः ऋत्वंतास्वितिसौरऋत्वंतासु चांद्रांतस्यपर्वत्वेनैवनिषेधसिद्धेरितिसर्वज्ञनारायणः एतेनित्याः ।

पारिजातांत बृहस्पति - " प्रतिपदा , चतुर्दशी , अष्टमी , अमावास्या , पौर्णिमा , या तिथींस कधींही अध्ययन करुं नये . आणि अनध्यायदिवसाचे पूर्व रात्रीं कदापि अध्ययन करुं नये . " नारद - ‘ कर्क , मकर , मेष , तूळ , या संक्रांतींस ; शयनी , बौधिनी या एकादशांस ; मन्वादितिथींस ; युगादितिथींस अनध्याय करावा . " निर्णयामृतांत - " चातुर्मास्यांत द्वितीया , मन्वादि , युगादि , आणि सोपपदा तिथि यांचेठायीं अनध्याय करावा . " चातुर्मास्यद्वितीया सांगतो गर्ग - " आषाढ , कार्तिक , फाल्गुन मासांतील कृष्णपक्षींच्या ज्या द्वितीया त्या चातुर्मास्यद्वितीया होत , असें विद्वान् ‍ सांगतात . " स्मृत्यर्थसारांतही - आषाढी पौर्णिमा , कार्तिकी पौर्णिमा , आणि फाल्गुनी पौर्णिमा ह्यांच्या जवळच्या द्वितीयांसही अनध्याय करावा , असें सांगितलें आहे . मनु - " उपाकर्म व उत्सर्जन यांचे ठायीं त्रिरात्र अनध्याय ; अष्टका आणि ऋतूचे शेवटचे दिवस यांचेठायीं एक अहोरात्र अनध्याय करावा . " मनूच्या मतीं उत्सर्गाचे ठायीं पक्षिणी किंवा अहोरात्र अनध्याय आहे . त्यासह ह्या तीन दिवस अनध्यायाचा विकल्प समजावा , असें विज्ञानेश्वर सांगतो . अष्टका म्ह० मार्गशीर्ष , पौष , माघ यांतील कृष्ण पक्षांतील सप्तमी , अष्टमी , आणि नवमी ह्या तीन तिथि जाणाव्या . कारण , " अष्टका तीन आहेत , म्हणून त्रिरात्र अनध्याय करावा . कितीएक आचार्य शेवटचे अष्टकेला अनध्याय करितात . " असें गौतमवचन आहे . ऋतूचे शेवटचे दिवस म्हणजे सौरऋतूचे शेवटचे दिवस समजावे . कारण , चांद्रऋतूचे शेवटीं पर्वदिवस असल्यामुळें त्यांचा निषेध सिद्धच आहे , असें सर्वज्ञनारायण सांगतो . हे नित्य अनध्याय समजावे .

नैमित्तिकानप्याह याज्ञवल्क्यः त्र्यहंप्रेतेष्वनध्यायः शिष्यर्त्विग्गुरुबंधुषु उपाकर्मणिचोत्सर्गेस्वशाखा श्रोत्रियेतथा संध्यागर्जितनिर्घातभूकंपोल्कानिपातने समाप्यवेदंद्युनिशमारण्यकमधीत्यच पंचदश्यांचतुर्दश्यामष्टम्यांराहुसूतके ऋतुसंधिषुभुक्त्वावाश्राद्धिकंप्रतिगृह्यच पशुमंडूकनकुलश्वाहिमार्जारमूषकैः कृतेंतरेत्वहोरात्रंशक्रपातेतथोच्छ्रये ग्रहणेद्युनिशोक्तावपिग्रस्तास्तेत्र्यहमित्युक्तंप्राक् ‍ ।

नैमित्तिक ( निमित्तानें प्राप्त ) ही अनध्याय सांगतो - याज्ञवल्क्य - " शिष्य , ऋत्विक् ‍, गुरुबंधु , स्वशाखेचा श्रोत्रिय ( वैदिक ) यांतून कोणी मृत असतां तीन दिवस अनध्याय . उपाकर्म व उत्सर्जन यांचे ठायींही तीन दिवस अनध्याय . संध्यासमयीं मेघगर्जना , निर्घात ( वीज पडणें ), भूमिकंप , उल्कापात ( आकाशांतून अग्निरुप तारा पडणें ), आवृत्तीची समाप्ति , अरणांचें अध्ययन , हीं झालीं असतां एक अहोरात्र अनध्याय करावा . पौर्णिमा , अमावास्या , चतुर्दशी , अष्टमी , ग्रहणदिवस , ऋतुसंधि , उत्सवांतील भोजन , श्राद्धीय द्रव्याचा प्रतिग्रह , इतक्या ठिकाणीं एक अहोरात्र अनध्याय . पशु , बेडूक , मुंगुस , कुत्रा , सर्प , मार्जार , उंदीर ह्यांतून एकादें दोघां अध्ययन करणारांचे मधून गेलें असतां एक अहोरात्र अनध्याय . इंद्रध्वज उतरविला किंवा चढविला असतां एक अहोरात्र अनध्याय . " ग्रहणाचे दिवशीं अहोरात्र

अनध्याय असें जरी वर सांगितलें तथापि ग्रस्तास्त असतां त्रिरात्र अनध्याय , असें पूर्वीं सांगितलें आहे .

स्मृत्यर्थसारेतुरात्रौतुग्रहेतिस्त्रोरात्रीः दिवाचत्र्यहमित्युक्तं ऋतुः सौरः भुक्तेत्युत्सवविषयं ऊर्ध्वंभोजनादुत्सवेइति गौतमोक्तेः श्राद्धिकंमहैकोद्दिष्टभिन्नं तत्रतुत्र्यहमितिमनुः स्मृत्यर्थसारेचैवं यत्तु पश्वाद्यंतरायेत्र्यहमुपवासोविप्रवासश्चेतिगौतमोक्तंतत् ‍ प्रथमाध्ययने ।

स्मृत्यर्थसारांत तर - रात्रीं ग्रहण असतां तीन रात्रि आणि दिवसा ग्रहण असतां तीन दिवस अनध्याय , असें सांगितलें आहे . वरील याज्ञवल्क्यवचनांत ऋतुसंधि सांगितले , त्या ठिकाणीं ऋतु म्हणजे सौरऋतु घ्यावा . ‘ भोजन करुन ’ असें जें सांगितलें तें विवाहादि उत्सवांतील भोजन समजावें . कारण , " उत्सवाचे ठायीं भोजनोत्तर अहोरात्र अनध्याय " असें गौतमाचें वचन आहे . ‘ श्राद्धीय द्रव्याचा प्रतिग्रह ’ असें जें वर सांगितलें तें महैकोद्दिष्टभिन्न श्राद्धाविषयीं समजावें . कारण , महैकोद्दिष्ट श्राद्धाचा प्रतिग्रह असतां तीन दिवस अनध्याय , असें मनु सांगतो . स्मृत्यर्थसारांतही असेंच सांगितलें आहे . आतां जें - " पशु इत्यादिकांनीं विघ्न असतां तीन दिवस उपवास करुन तेथून निघून जावें " असें गौतमानें सांगितलें , तें प्रथमाध्ययनाविषयीं समजावें .

तात्कालिक ( तें निमित्त आहे तोंपर्यंत ) अनध्याय सांगतो .

याज्ञवल्क्यः श्वक्रोष्टृगर्दभोलूकसामबाणार्तनिः स्वने अमेध्यशवशूद्रांत्यश्मशानपतितांतिके देशेशुचावात्मनिचविद्युत्स्तनितसंप्लवे भुक्त्वार्द्रपाणिरंभोंतरर्धरात्रेतिमारुते पांसुप्रवर्षेदिग्दाहेसंध्यानीहारभीतिषु धावतः पूतिगंधेचशिष्टेचगृहमागते खरोष्ट्रयानहस्त्यश्वनौवृक्षगिरिरोहणे सप्तत्रिंशदनध्यायानेतांस्तात्कालिकान् ‍ विदुः बाणोवंशः शततंतुर्वीणेतिहरदत्तः अमेध्याः सूतिकादयः स्तनितंगर्जः वर्षातोन्यत्रगर्जवृष्टिविद्युतांयौगपद्येआकालिकः वर्षासुतात्कालिक इतिनारायणः संध्यागर्जेतुहारीतः सायंसंध्यास्तनितेरात्रिः प्रातः संध्यास्तनितेहोरात्रं रात्रौविद्युत्यपररात्र्यवधिः विद्युतिनक्तंचापररात्रादितिगौतमोक्तेः तृतीयदिनांशोत्तरंतुविद्युतिसर्वरात्रमित्याहसएव त्रिभागादिप्रवृत्तौसर्वमिति अर्धरात्रेमध्ययामद्वयमितिविज्ञानेश्वरः मध्यदंडचतुष्टयइतिनिर्णयामृते मनुः नविवादेनकलहेनसेनायांनसंगरे नभुक्तमात्रेनाजीर्णेनवमित्वानसूतके रुधिरेचस्रुतेगात्राच्छस्त्रेणचपरिक्षते कौर्मे श्लेष्मातकस्यच्छायायांशाल्मलेर्मधुकस्यच कदाचिदपिनाध्येयंकोविदारकपित्थयोः मनुः शयानः प्रौढपादश्चकृत्वाचैवावसक्थिकाम् ‍ नाधीयीतामिषंजग्ध्वासूतकान्नाद्यमेवच प्रौढपादः पादोपरिपाददाता आसनारुढपादोवेतिहरदत्तः सोपपदास्वपिप्रागुक्तं स्मृत्यर्थसारे श्रवणद्वादशीमहाभरण्योः प्रेतद्वितीयायांरथसप्तम्यामाकाशेशवदर्शनेचाहोरात्रं असपिंडेगुरौमृतेत्रिरात्रं आचार्येउपाध्यायेचपक्षिणी आचार्यभार्यापुत्रशिष्येष्वहोरात्रम् ‍ अग्न्युत्पातेनगोविप्रमृतौत्रिरात्रम् ‍ अयनेविषुवेचपक्षिणी अकालवृष्टौच आरण्यमार्जारसर्पनकुलपंचनखादेरंतरागमनेत्रिरात्रम् ‍ आरण्यश्वसृगालादिवानररजकादौद्वादशरात्रं खरवराहोष्ट्रचांडालसूतिकोदक्याशवादौमासम् ‍ गोगवयाजानास्तिकादौत्रिमासम् ‍ शशमेषश्वपाकादौषण्मासं गजगंडसारससिंहव्याघ्रमहापापिकृतघ्नादावब्दमनध्यायः शोभनदिनेचानध्यायः विवाहप्रतिष्ठोद्यापनादिष्वासमाप्तेः सगोत्राणामनध्यायः उदयेस्तमयेवापिमुहूर्तत्रयगामियत् ‍ तद्दिनंतदहोरात्रंचानध्यायविदोविदुः केचिदाहुः क्कचिद्देशेयावत्तद्दिननाडिकाः तावदेवत्वनध्यायोनतन्मिश्रेदिनांतरे ।

याज्ञवल्क्य - " कुत्रा , कोल्हा , गाढव , घुबड , सामवेद , वंशवाद्य , आर्त ( दुःखित ) प्राणी यांचा शब्द ऐकूं येत असतां तात्कालिक अनध्याय . अपवित्र ( सूतिकादिक ), शव , शूद्र , अंत्यज , श्मशान , पतित हे संनिध असतां तात्कालिक अनध्याय . अपवित्रप्रदेश , अपवित्र देह , वीज चमकणें , मेघगर्जना , हीं असतां तात्कालिक अनध्याय . भोजन करुन हात ओले आहेत तोंपर्यंत अध्ययन करुं नये . जलामध्यें , मध्यरात्रीं , अति वारा सुटणें , धूळ उडत असतां , दिशा पेटल्या असतां , दोन संध्याकालीं , धुकें असतां , व भीति असतां तात्कालिक अनध्याय . धांवत असतां , दुर्गंध आला असतां तात्कालिक अनध्याय . शिष्ट म्हणजे श्रोत्रियादिक महाविद्वान् ‍ आला असतां तात्कालिक अनध्याय . गाढव , उंट , रथादियान , हत्ती , घोडा , नौका , वृक्ष , पर्वत यांच्यावर आरोहण केलें असतां तात्कालिक अनध्याय . याप्रमाणें हे सदतीस तात्कालिक अनध्याय विद्वानांनीं सांगितले आहेत . " या वचनांतील ‘ बाण ’ याचा अर्थ - वंश ( वेळू ) होय . शंभर तारांची वीणा , असें हरदत्त सांगतो . स्तनित म्हणजे मेघगर्जना . वर्षाकालावांचून अन्यकालीं गर्जना , वृष्टि , वीज हीं एकदम उत्पन्न झालीं असतां आकालिक अनध्याय . आकालिक म्हणजे ज्या वेळीं अनध्यायाचें निमित्त ( गर्जनादिक ) उत्पन्न झालें असेल त्यावेळेपासून दुसर्‍या दिवशीं त्यावेळेपर्यंत जो अनध्याय तो आकालिक अनध्याय होय . वर्षाकालीं गर्जना , वृष्टि हीं उत्पन्न असतां तात्कालिक ( तीं आहेत तोंपर्यंत ) अनध्याय , असें नारायण सांगतो . संध्याकालीं गर्जना असेल तर सांगतो हारीत - " सायंसंध्येचे ठायीं गर्जना झाली असतां रात्रीं अनध्याय . प्रातः संध्येचे ठायीं गर्जना झाली असतां तो दिवस आणि ती रात्र अनध्याय . " रात्रीं वीज उत्पन्न असतां दुसरी रात्र येईपर्यंत अनध्याय . कारण , " रात्रीं वीज उत्पन्न असतां दुसरी रात्र येईपर्यंत अनध्याय " असें गौतमाचें वचन आहे . दिवसाच्या तिसर्‍या भागानंतर वीज उत्पन्न झाली असतां सारी रात्र अनध्याय , असें तोच ( गौतम ) सांगतो - दिवसाच्या तिसर्‍या भागापासून पुढें वीज प्रवृत्त झाली असतां सारी रात्र अनध्याय . " अर्धरात्रीं वीज प्रवृत्त झाली असतां मधले दोन प्रहर अनध्याय , असें विज्ञानेश्वर सांगतो . मधल्या चार घटिका अनध्याय , असें निर्णयामृतांत सांगितलें आहे . मनु - " विवाद चालला असतां , कलह चालला असतां , सेनेमध्यें , युद्धांत , भोजनोत्तर , त्या वेळीं अजीर्ण झालें असतां , वमन झालें असतां , सूतकांत , शरीरापासून रक्तस्त्राव झाला असतां , शस्त्रानें क्षत पडलें असतां , अध्ययन करुं नये . " कूर्मपुराणांत - " श्लेष्मातक ( भोंकर ), सांवरी , मधुक ( मोहाचा वृक्ष ), कांचनवृक्ष , कंवठीचा वृक्ष यांच्या छायेला बसून अध्ययन करुं नये . " मनु - " शयान ( निजलेला ), पायांवर पाय चढवून बसलेला , वस्त्रादिकेंकरुन जानु बंधन करुन बसलेला , अशा अवस्थेंत अध्ययन करुं नये . मांस व सूतकान्न भक्षण करुन वेदाध्ययन करुं नये . " प्रौढपाद म्हणजे पायांवर पाय चढविणारा अथवा आसनावर पाय ठेवणारा असें हरदत्त सांगतो . सोपपदातिथींचेठायींही अनध्याय पूर्वीं सांगितला आहे . स्मृत्यर्थसारांत - श्रवणद्वादशी , महाभरणी , यमद्वितीया , रथसप्तमी , यांचेठायीं अहोरात्र अनध्याय . आकाशांत शवाचें दर्शन असतांही अहोरात्र अनध्याय . असपिंड गुरु मृत असतां त्रिरात्र अनध्याय . आचार्य व उपाध्याय मृत असतां पक्षिणी अनध्याय . आचार्याची भार्या , पुत्र मृत असतां अहोरात्र अनध्याय . शिष्य मृत असतांही अहोरात्र अनध्याय . अग्नीचा उत्पात होऊन गाई , ब्राह्मण मृत असतां त्रिरात्र अनध्याय . अयनसंक्रांति , विषुवसंक्रांति , अकालवृष्टि यांचे ठायीं पक्षिणी अनध्याय . रानमांजर , सर्प , मुंगुस , पंचनखांचे प्राणी वगैरे , हे दोघांच्या मधून गेले असतां तीन दिवस अनध्याय . अरण्यांतील कुत्रा , कोल्हा वगैरे , वानर , रजक इत्यादिक दोघांच्या मधून गेले असतां बारा दिवस अनध्याय . गर्दभ , वराह , उंट , चांडाल , सूतिका , रजस्वला , प्रेत इत्यादिक दोघांच्या मधून गेले असतां एक मासपर्यंत अनध्याय . गाई , गवय , शेळी , नास्तिक इत्यादिक दोघांच्या मधून गेले असतां तीन महिने अनध्याय . ससा , मेंढा , श्वपाक इत्यादिक दोघांच्या मधून गेले असतां सहा मास अनध्याय . हत्ती , गेंडा , सारस , सिंह , व्याघ्र , महापातकी , कृतघ्न इत्यादिक दोघांच्या मधून गेले असतां एक वर्षपर्यंत अनध्याय . शुभदिवशीं अनध्याय . विवाह , देवादिकांची प्रतिष्ठा , व्रतादिकांचीं उद्यापनादि कार्यें यांचेठायीं समाप्तीपर्यंत सगोत्रांना अनध्याय . " जी अनध्यायतिथि सूर्याच्या उदयकालीं व अस्तकालीं त्रिमुहूर्तव्यापिनी असेल त्या दिवशीं तो अहोरात्र अनध्याय आहे , असें अनध्यायवेत्ते सांगतात . " " क्कचित् ‍ देशांत अनध्यायदिवसाच्या जितक्या घटिका असतील तोंपर्यंतच अनध्याय होतो . अनध्यायदिवसानें मिश्रित स्वाध्यायदिवशीं अनध्याय होत नाहीं असें केचित् ‍ सांगतात . "

प्रदोषंत्वाह प्रजापतिः षष्ठीचद्वादशीचैवअर्धरात्रोननाडिका प्रदोषेनत्वधीयीततृतीयानवनाडिका निर्णयामृतेगर्गः रात्रौयामद्वयादर्वाक् ‍ सप्तमीवात्रयोदशी प्रदोषः सतुविज्ञेयः सर्वविद्याविगर्हितः रात्रौनवसुनाडीषुचतुर्थीयदिदृश्यते प्रदोषः सतुविज्ञेयः सर्वविद्याविगर्हितः कौर्मे अनध्यायस्तुनांगेषुनेतिहासपुराणयोः नधर्मशास्त्रेष्वन्येषुपर्वण्येतानिवर्जयेत् ‍ शौनकः नित्येजपेचकाम्येचक्रतौपारायणेपिच नानध्यायोऽस्तिवेदानांग्रहणेग्राहणेस्मृतः इत्यनध्यायाः ।

प्रदोष सांगतो प्रजापति - " षष्ठी , आणि द्वादशी अर्धरात्रीच्या आंत संपली असतां प्रदोष . आणि तृतीया रात्रीं नऊ घटिकांचे आंत संपली असतां प्रदोष . त्या प्रदोषरात्रीं अध्ययन करुं नये . " निर्णयामृतांत गर्ग - " सप्तमी किंवा त्रयोदशी तिथि रात्रीं दोन प्रहरांचे आंत असली म्हणजे तो प्रदोष समजावा . तो वेदाध्ययनाला निंद्य आहे . रात्रीं नऊ घटिकांचे आंत जर चतुर्थी असेल तर तो प्रदोष समजावा . तो सर्व अध्ययनाला निंद्य आहे . " कौर्मांत - " वेदांचीं अंगें , इतिहास ( भारतादिक ), पुराण , धर्मशास्त्रें आणि इतर शास्त्रें यांच्या अध्ययनाविषयीं अनध्याय करुं नये . हीं वेदांगादिक अमावास्या पौर्णिमा पर्वाचे ठायीं वर्ज्य करावीं . " शौनक - " नित्यकर्म , जप , काम्यकर्म , यज्ञकर्म , पारायण , यांविषयीं वेद म्हणणें व वेद सांगणें असतां अनध्याय नाहीं . "

॥ इति अनध्यायाः ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP