TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
पंचसूत्रीनिर्णय

तृतीयपरिच्छेद - पंचसूत्रीनिर्णय

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


पंचसूत्रीनिर्णय

आतां पंचसूत्रीनिर्णय सांगतो -

अथपंचसूत्रीनिर्णयः गौतमीतंत्रे लिंगमस्तकविस्तारोलिंगोच्छ्रायसमोमतः परिधिस्तत्र्त्रिगुणितस्तद्वत्पीठंव्ययस्थितम् ‍ प्रनालिकातथैवस्यात्पंचसूत्रविनिर्णयः अत्रेदंतत्त्वम् ‍ लिंगमस्तकविस्तारंलिंगोच्चतासमंकृत्वातत्र्त्रिगुणसूत्रवेष्टनार्हंलिंगस्थौल्यंकृत्वातत्समंवृत्तंचतुरस्त्रंवापीठविस्तारमधश्चोर्ध्वंचकुर्यात् ‍ पीठोच्चतातुलिंगोच्चतातोद्विगुणा पीठमध्येलिंगाद्दिगुणस्थूलंपीठोच्चतातृतीयांशेनकंठंकृत्वातस्योर्ध्वंअधश्चसमंवप्रद्वयंत्रयंवाकृत्वालिंगविस्तारषष्ठांशेनपीठोपरिबाह्यमेखलांकृत्वातदंतः संलग्नंतत्समंखातंकृत्वा पीठाद्बहिर्लिंगसमदीर्घांपीठार्धदीर्घांवामूलेदैर्ध्यसमविस्तारांअग्रेतदर्धविस्तारांतृतीयांशेनमध्येखातांपीठवत्समेखलांप्रनालिकांकुर्यादिति अत्रमूलंसिद्धांतशेखरेशैवागमेचज्ञेयम् ‍ ।

गौतमीतंत्रांत - " लिंगाचे मस्तकाचा विस्तार , लिंगाची उंची , लिंगाचें स्थूलत्व , पीठविस्तार आणि प्रणालिका यांच्या मानाचीं पांच सूत्रें म्हटलीं आहेत . लिंगाचे मस्तकाचा विस्तार लिंगाचे उंचीइतका असावा . त्याच्या तिप्पट परिधि ( लिंगस्थौल्य ) असावा . तसेंच पीठ आणि प्रणालिकाही तशीच असावी . हा पंचसूत्रांचा निर्णय होय . " याचें तत्त्व असें आहे कीं , एका सूत्रानें लिंगाचे मस्तकास वेष्टन करावें . त्या सूत्राइतकें उंच लिंग करावें . त्याच्या तिप्पट सूत्राचें वेष्टन होईल इतकें स्थूल लिंग करावें . लिंगाच्या स्थौल्याइतका पीठाचा विस्तार वर्तुल किंवा चतुरस्त्र खालीं आणि वरती करावा . लिंगाचे उंचीचे दुप्पट पीठाची उंची करावी . पीठाच्या मध्यभागीं लिंगाहून दुप्पट स्थूल व पीठाच्या उंचीचे तृतीयांशानें कंठ करावा . कंठाच्या ऊर्ध्वभागीं आणि अधोभागीं समान असे दोन किंवा तीन वप्र करुन पीठावरती लिंगविस्ताराच्या षष्ठांशानें बाह्य मेखला करुन त्याच्या आंत संलग्न असें त्याच्या समान खात करावें . पीठाच्या बाहेर उत्तरेकडे लिंगाचे उंचीइतक्या लांबीची किंवा पीठाच्या उंचीच्या निंमे लांबीची , मुळास लांबीचे समान विस्ताराची , अग्रभागीं त्याच्या निम्मे विस्ताराची , मध्यभागीं खात केलेली , पीठाप्रमाणें मेखलासहित अशी प्रणालिका करावी . याचीं मूलवचनें सिद्धांतशेखरांत आणि शैवागमांत पाहावीं .

तिथितत्त्वेब्राह्मे सर्वत्रैवप्रशस्तोब्जः शिवसूर्यार्चनंविना तत्रैववाराहपाद्मयोः गृहेलिंगद्वयंनार्च्यं शालग्रामद्वयंतथा द्वेचक्रेद्वारकायास्तुनार्च्येसूर्यद्वयंतथा शक्तित्रयंतथानार्च्यंगणेशत्रयमेवच द्वौशंखौनार्चयेचैवभग्नांचप्रतिमांतथा नार्चयेच्चतथामत्स्यकूर्मादिदशकंतथा गृहेग्निदग्धाभग्नाश्चनार्चाः पूज्यावसुंधरे एतासां पूजनान्नित्यमुद्वेगंप्राप्नुयाद्गृही शालग्रामाः समाः पूज्याः समेषुद्वितयंनहि विषमानैवपूज्यास्तुविषमेष्वेकएवहि शालग्रामशिलाभग्नापूजनीयासचक्रका खंडितास्फुटितावापिशालग्रामशिलाशुभा वाराहे दद्याद्भक्ताययो देविशालग्रामशिलांनरः सुवर्णसहितांदिव्यांपृथ्वीदानफलंलभेत् ‍ तत्रैव यः पुनः पूजयेद्भक्त्याशालग्रामशिलाशतम् ‍ तत्फलंनैवशक्तोहंवक्तुंवर्षशतैरपि विष्णुपुराणे ब्राह्मणः क्षत्रियोवैश्यः शूद्रश्चपृथिवीपते स्वधर्मतत्परओ विष्णुमाराधयतिनान्यथा ।

तिथितत्त्वांत ब्राह्मांत - " शिवपूजा आणि सूर्यपूजा यांवाचून इतर सर्वत्र ठिकाणीं पूजासमयीं शंख असणें प्रशस्त आहे . " तेथेंच वराहपुराणांत पद्मपुराणांत - " घरांत दोन लिंगाची पूजा करुं नये . तशीच दोन शालग्रामांची पूजा करुं नये . द्वारकेंतील दोन चक्रांकांची पूजा करुं नये . तशीच दोन सूर्यकांतांची पूजा करुं नये . तशीच तीन शक्तींची ( देवींची ) आणि तीन गणपतींची पूजा करुं नये . दोन शंखांची पूजा करुं नये . भग्न झालेल्या प्रतिमेची पूजा करुं नये . मत्स्य , कूर्म इत्यादिक दहा अवतारांची पूजा करुं नये . अग्नीनें जळालेल्या व भग्न झालेल्या ( फुटलेल्या ) प्रतिमा घरांत पूजूं नयेत . यांच्या पूजनानें गृहस्थाश्रम्याला नित्य उद्वेग प्राप्त होईल . शालग्राम सम पुजावे . समांमध्यें दोन पुजूं नयेत . विषम पुजूं नयेत . पण विषमामध्यें एकच पुजावा . शालग्रामशिला भग्न झालेली असली तरी चक्रयुक्त असली म्हणजे ती पुजावी . शालग्रामशिला तुकडे झालेली किंवा फुटलेली असली तरी ती शुभकारक आहे . " वाराहांत - " जो मनुष्य सुवर्णसहित शालग्रामशिला भक्तास देईल त्याला पृथ्वीदानाचें फळ मिळेल . " तेथेंच - " जो मनुष्य मोठ्या भक्तीनें शंभर शालग्रामांची पूजा करील त्याचें फळ शेंकडों वर्षांनीं देखील सांगण्यास मी समर्थ नाहीं . " विष्णुपुराणांत - " ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य आणि शूद्र हे स्वधर्मतत्पर होऊन विष्णूची आराधना करितात . स्वधर्मविमुख होऊन करीत नाहींत . "

अविभक्तानामपिपृथग्देवपूजामाह प्रयोगपारिजाते आश्वलायनः पृथगप्येकपाकानांब्रह्मयज्ञोद्विजातिनाम् ‍ अग्निहोत्रंसुरार्चाचसंध्यानित्यंभवेत् ‍ पृथक् ‍ तत्रैवविष्णुधर्मे शालग्रामशिलांवापिचक्रांकितशिलांतथा ब्राह्मणः पूजयेन्नित्यंक्षत्रियादिर्नपूजयेत् ‍ इदंस्पर्शसहितपूजाविषयम् ‍ शूद्रोवानुपनीतोवास्त्रियोवापतितोपिवा केशवंवाशिवंवापिस्पृष्ट्वानरकमश्नुते ब्राह्मण्यपिहरंविष्णुंनस्पृशेच्छ्रेयइच्छती सनाथामृतनाथावातस्यानास्तीहनिष्कृतिः स्त्रीणामनुपनीतानांशूद्राणांचजनेश्वर स्पर्शनेनाधिकारोस्तिविष्णोर्वाशंकरस्यचेतिस्कांदात् ‍ स्पर्शरहितातुतयोर्भवत्येव शालग्रामंनस्पृशेत्तुहीनवर्णोवसुंधरे स्त्रीशूद्रकरसंस्पर्शोवज्रस्पर्शाधिकोमतः मोहाद्यः संस्पृशेच्छूद्रोयोषिद्वापिकदाचन स्वपतेनरकेघोरेयावदाभूतसंप्लवम् ‍ यदिभक्तिर्भवेत्तस्यस्त्रीणांवापिवसुंधरे दूरादेवास्पृशन् ‍ पूजांकारयेत्सुसमाहितइति वाराहोक्तेः शालग्रामशिलामात्रेनिर्बंधोनप्रतिमादौ सर्ववर्णैस्तुसंपूज्याः प्रतिमाः सर्वदेवताः लिंगान्यपितुपूज्यानिमणिभिः कल्पितानिचेतितत्रैवोक्तेः चत्वारोब्राह्मणैः पूज्यास्त्रयोराजन्यजातिभिः वैश्यैर्द्वावेवसंपूज्यौतथैकः शूद्रजातिभिरितिस्कांदात् ‍ अन्येतुदीक्षितविषयत्वेनव्यवस्थामाहुः विष्णुधर्मे तयोरसंभवेर्चावैसाचेहनवधास्मृता रत्नजाहेमजाचैवराजतीताम्रजातथा रैतिक्यर्चातथालौहीशैलजाद्रुमजातथा अधमाधमाचविज्ञेयामृन्मयीप्रतिमाचया एषांफलानितत्रैवज्ञेयानि नार्च्यागृहेऽश्मजामूर्तिश्चतुरंगुलतोधिका नवितस्त्यधिकाधातुसंभवाश्रेयइच्छता एवंलक्षणसंपन्नापारंपर्यक्रमागता उत्तमासातुविज्ञेयागुरुदत्तापितत्समा तत्रैवपाद्मे शालग्रामंप्रक्रम्य तत्राप्यामलकीतुल्यापूज्यासूक्ष्मैवयाभवेत् ‍ यथायथाशिलासूक्ष्मातथास्यात्तुमहत्फलम् ‍ तथा यवमात्रंतुगर्तः स्याद्यवार्धंलिंगमुच्यते शिवनाभिरितिख्यातस्त्रिषुलोकेषुदुर्लभः तत्रैव शालग्राममयीमुद्रासंस्थितायत्रकुत्रचित् ‍ वाराणस्यायवाधिक्यंसमंताद्योजनत्रयम् ‍ योमृतस्तत्समीपेतुमृतोवानीयतेंतिकम् ‍ सवैमोक्षमवाप्नोतिसत्यंसत्यंनचान्यथा तत्रैव चक्रांकमिथुनंपूज्यंनैकंचक्रांकमर्चयेत् ‍ चक्रांकमिथुनात्सार्धंशालग्रामंप्रपूजयेत् ‍ तत्रैववाराहे म्लेच्छदेशेशुचौवापिचक्रांकोयत्रतिष्ठति योजनानांतथात्रीणिममक्षेत्रंवसुंधरे तत्रैवशालग्रामंप्रक्रम्य क्रयक्रीतापरिज्ञेयामध्यमायाचिताधमा प्रयोगपारिजाते वाराहे एवंलक्षणसंपन्नापारंपर्यक्रमागता उत्तमासातुविज्ञेयागुरुदत्तापितत्समा ।

अविभक्तांना देखील पृथक् ‍ देवपूजा सांगतो प्रयोगपारिजातांत आश्वलायन - " एकत्र ठिकाणीं पाक करुन भोजन करणार्‍याही द्विजांस ब्रह्मयज्ञ , अग्निहोत्र , देवपूजा , संध्या हीं नित्य वेगवेगळीं सांगितलीं आहेत . " तेथेंच विष्णुधर्मांत - " शालग्रामशिला आणि चक्रांकितशिला यांची पूजा ब्राह्मणानें नित्य करावी . क्षत्रियानें करुं नये . " हा क्षत्रियादिकांस निषेध सांगितला तो स्पर्श करुन पूजेविषयीं समजावा . कारण , " शूद्र , किंवा मुंज न झालेला किंवा स्त्रिया अथवा पतित हे विष्णूला किंवा शिवाला स्पर्श करितील तर नरकास जातील . कल्याण इच्छिणार्‍या ब्राह्मणाच्या स्त्रियेनें देखील शिवाला आणि विष्णूला स्पर्श करुं नये . मग ती सभर्तृका असो किंवा मृतभर्तृका असो , ती जर शिवाला किंवा विष्णूला स्पर्श करील तर त्या पापाची ह्या लोकीं निष्कृति होणार नाहीं . स्त्रिया , मुंज न झालेले , आणि शूद्र यांस विष्णूच्या किंवा शंकराच्या स्पर्शाविषयीं अधिकार नाहीं , " असें स्कांदवचन आहे . विष्णूची व शंकराची स्पर्शरहित पूजा तर स्त्रीशूद्रांना होतच आहे . कारण , " हीनजातीच्या मनुष्यानें शालग्रामास स्पर्श करुं नये . शालग्रामास स्त्रियेच्या किंवा शूद्राच्या हाताचा स्पर्श वज्राच्या स्पर्शाहून अधिक मानला आहे . जो कोणी शूद्र किंवा स्त्री मोहाच्या योग ( अविवेकानें ) जर कधीं स्पर्श करील तर तो प्रलयकालपर्यंत नरकांत पडेल . जर त्या शूद्राची किंवा स्त्रियांची शालग्रामावर भक्ति असेल तर स्पर्श केल्यावांचून दुरुनच समाधान अंतःकरणानें पूजा करावी . " असें वराहवचन आहे . हा स्पर्शाचा निषेध शालग्रामाविषयीं समजावा . प्रतिमादिकांविषयीं स्पर्शाचा निषेध नाहीं . कारण , " सर्व देवतांच्या प्रतिमा सार्‍या वर्णांनीं पुजाव्या . आणि मण्यांचीं केलेलीं लिंगें देखील सार्‍या वर्णांनीं पुजावीं , " असें तेथेंच सांगितलें आहे . आणि " ब्राह्मणांनीं चार पुजावे , क्षत्रियांनीं तीन पुजावे , वैश्यांनीं दोनच पुजावे . आणि शूद्रांनीं एक पुजावा , " असें स्कांदवचन आहे . इतर विद्वान् ‍ तर - ज्यानें दीक्षा घेतली असेल त्या हीनवर्णानेंही पूजा करावी . दीक्षा घेतली नसेल त्यानें पूजा करुं नये . अशी वरील वचनाची व्यवस्था सांगतात . विष्णुधर्मांत - " शालग्राम व बाण यांचा असंभव असेल तर अर्चा ( प्रतिमा ) करावी . ती प्रतिमा नऊ प्रकारची सांगितली आहे , ती अशी - रत्नाची , सुवर्णाची , रुप्याची , तांब्याची , पितळेची , लोहाची , पाषाणाची ,

काष्ठाची , आणि सर्वांत कनिष्ठ मातीची प्रतिमा करावी . " या प्रतिमांचीं फलें तेथेंच जाणावीं . " पाषाणाची मूर्ति चार अंगुळांहून मोठी घरांत पूजूं नये . आणि धातूची मूर्ति वितीहून मोठी घरांत पूजूं नये . " तेथेंच पाद्मांत शालग्रामाचा उपक्रम करुन सांगतो - " त्यांत देखील जी आंवळ्यासारखी सूक्ष्म असेल तीच पूजावी . शालग्रामशिला जशी जशी सूक्ष्म असेल तसें तसें मोठें फल प्राप्त होतें . तसेंच - ज्या शालग्रामास यवाएवढा गर्त ( छिद्र ) असून त्यांत यवार्धाएवढें लिंग असेल तो शालग्राम शिवनाभि म्हटला आहे . तो तीन लोकांत दुर्लभ आहे . " तेथेंच - " जेथें कोठें शालग्रामाची शिला असेल तें स्थळ आसमंतात् ‍ भागीं तीन योजनेंपर्यंत वाराणसीहून अधिक फलदायक आहे . त्या शालग्रामाच्या समीप जो मरेल किंवा मेल्यावर शालग्रामाच्या समीप नेला जाईल , तो मोक्षास जाईल हें सत्य सत्य आहे . असत्य होणार नाहीं . " तेथेंच - " दोन चक्रांकितांची पूजा करावी . एक चक्रांकित पुजूं नये . दोन चक्रांकितांसह शालग्रामाची पूजा करावी . " तेथेंच वाराहांत - " म्लेच्छदेशांत किंवा अशुचि प्रदेशांतही जेथें चक्रांक असेल तें तीन योजनेंपर्यंत माझें ( भगवंताचें ) क्षेत्र आहे . " तेथेंच शालग्रामाचा उपक्रम करुन सांगतो . - " द्रव्य देऊन विकत घेतलेली शालग्रामशिला मध्यम आहे . याचना करुन आणलेली कनिष्ठ आहे . " प्रयोगपारिजातांत वाराहांत - " या लक्षणांनीं युक्त परंपरेनें प्राप्त झालेली ती उत्तम समजावी . आणि गुरुनें दिलेली असेल तर तीही त्याच्यासारखी उत्तम जाणावी . "

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:50:19.5070000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

lamphole

 • न. दीपविवर 
RANDOM WORD

Did you know?

हिंदू धर्मियांत विधवा स्त्रिया कुंकू का लावत नाहीत?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Total Pages: 46,537
 • Hindi Pages: 4,555
 • Dictionaries: 44
 • Words in Dictionary: 302,181
 • Marathi Pages: 27,517
 • Tags: 2,685
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,230
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.