TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
तुलसीग्रहणाचा प्रकार

तृतीयपरिच्छेद - तुलसीग्रहणाचा प्रकार

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


तुलसीग्रहणाचा प्रकार

आतां तुलसीग्रहणाचा प्रकार सांगतो -

अथतुलसीग्रहणम् ‍ देवयाज्ञिककृते स्मृतिसारे वैधृतौचव्यतीपातेभौमभार्गवभानुषु पर्वद्वयेचसंक्रांतौद्वादश्यांसूतकद्वये तुलसींयेविचिन्वंतितेछिंदंतिहरेः शिरः विष्णुधर्मोत्तरे रविवारंविनादूर्वांतुलसींद्वादशींविना जीवितस्याविनाशायप्रविचिन्वीतधर्मवित् ‍ तथा संक्रांतावर्कपक्षांतेद्वादश्यांनिशिसंध्ययोः यैश्छिन्नंतुलसीपत्रंतैश्छिन्नंहरिमस्तकम् ‍ पाद्मे द्वादश्यांतुलसीपत्रंधात्रीपत्रंचकार्तिके लुनातिसनरोगच्छेन्निरयानतिगर्हितान् ‍ रुद्रयामले द्वादश्यांचदिवास्वापस्तुलस्यवचयस्तथा विष्णोश्चैवदिवास्नानंवर्जनीयंसदाबुधैः विष्णुधर्मे नछिंद्यात्तुलसींविप्रोद्वादश्यांवैष्णवः क्कचित् ‍ देवार्थेतुलसीच्छेदोहोमार्थेसमिधांतथा इंदुक्षयेनदुष्येतगवार्थेतुतृणस्यच ग्रहणमंत्रस्तुपाद्मे तुलस्यमृतजन्मासिसदात्वंकेशवप्रिये केशवार्थंविचिन्वामिवरदाभवशोभने इति पारिजातेदक्षः समित्पुष्पकुशादीनांद्वितीयः प्रहरोमतः ॥

देवयाज्ञिककृत स्मृतिसारांत - " वैधृति , व्यतीपात , भौमवार , भृगुवार , रविवार , अमावास्या , पौर्णिमा , संक्रांति , द्वादशी , जननाशौच , मृताशौच यांपैकीं कोणतेंही असतां जे मनुष्य तुलसीचा छेद करितात ते भगवंताचें मस्तक तोडतात . " विष्णुधर्मोत्तरांत - " रविवारीं दूर्वा तोडली , आणि द्वादशीस तुळस तोडली तर आयुष्याचा नाश होतो , म्हणून धर्मवेत्त्यानें दूर्वा रविवारीं काढूं नये . आणि द्वादशीस तुळस काढूं नये . " तसेंच - " संक्रांति , रविवार , पौर्णिमा , अमावास्या , द्वादशी , रात्र , आणि रात्रिदिवसांचे दोन संध्यासमय यांचे ठायीं ज्यांनीं तुळसीपत्र तोडलें त्यांनी भगवंताचें मस्तक तोडलें म्हणून समजावें . " पाद्मांत - " द्वादशीस तुलसीपत्र , आणि कार्तिकमासांत आंवळीचें पान जो तोडतो , तो मनुष्य अतिनिंद्य अशा नरकांस जातो . " रुद्रयामलांत - " द्वादशीस दिवानिद्रा , तुळशी तोडणें , आणि विष्णूला दिवसा स्नान घालणें हीं तीन कृत्यें विद्वानांनीं सदा वर्ज्य करावीं . " विष्णुधर्मांत - " विष्णुभक्त ब्राह्मणानें द्वादशीस कधींही तुळस काढूं नये . अमावास्येस वनस्पतीची हिंसा निषिद्ध आहे त्याचा अपवाद सांगतो - अमावास्येस देवाकरितां तुळशी तोडणें , होमाकरितां समिधा तोडणें आणि गाईकरितां गवत तोडणें दोषावह होत नाहीं . " तुळसी काढण्याचा मंत्र सांगतो पाद्मांत - ‘ तुलस्यमृतजन्मासि सदा त्वं केशवप्रिये ॥ केशवार्थं विचिन्वामि वरदा भव शोभने ॥ ’ पारिजातांत दक्ष - " समिधा , पुष्पें , कुश इत्यादि काढण्याला दुसरा प्रहर सांगितला आहे . "

आतां पुष्पें , पत्रें हीं किती कालानें पर्युषित ( बाशीं ) होतात तें सांगतो -

अथपुष्पादेः पर्युषितत्वम् ‍ भार्गवार्चनेभविष्ये प्रहरंतिष्ठतेजातीकरवीरमहर्निशम् ‍ तुलस्यांबिल्वपत्रेषुसर्वेषुजलजेषुच नपर्युषितदोषोस्तिमालाकारगृहेपिच बृहन्नारदीये वर्ज्यंपर्युषितंपुष्पंवर्ज्यंपर्युषितंजलम् ‍ नवर्ज्यंतुलसीपत्रंनवर्ज्यंजाह्नवीजलम् ‍ तत्रैवपाद्मे तुलसीपर्युषितानैवबिल्वंतुत्रिदिनावधि पद्मं पंचदिनात्त्याज्यंशेषंपर्युषितंविदुः स्कांदे पालाशंदिनमेकंतुपंकजंचदिनत्रयम् ‍ पंचाहंबिल्वपत्रंचदशाहंतुलसीदलम् ‍ पदार्थादर्शेबोपदेवस्त्वन्यथाह बिल्वापामार्गजातीतुलसिशमिशताकेतकीभृंगदूर्वामंदांभोजाहिदर्भामुनितिलतगरब्रह्मकल्हारमल्ल्यः चंपाश्वारातिकुंभीदमनमरुबकाबिल्वतोहानिशस्तास्त्रिंश ३० त्र्ये ३ का १ र्य ६ री ६ शो ११ दधि ४ निधि ९ वसु ८ भू १ भू १ यमा २ भूयएवम् ‍ अस्यार्थः शताशतावरी मंदः मंदारः अहिर्नागकेशरः मुनिरगस्त्यः अश्वारातिः करवीरः कुंभीपाटलेतिकैदेवनिघंटुः अरयः षट् ‍ ईशाः एकादश उदधयश्चत्वारः निधयोनव वसवोऽष्टौ भूः एकः यमौद्वौ बिल्वमारभ्याऽहिपर्यंतंगणयित्वादर्भमारभ्यपुनस्त्रिंशदादिगणयेदित्यर्थः एतद्दिनोत्तरंपर्युषितानीत्यर्थः टोडरानंदे स्कांदे दमनमुपक्रम्य तस्यमालाभगवतः परमप्रीतिकारिणी शुष्कापर्युषितावापिनदुष्टाभवतिक्कचित् ‍ तिथितत्त्वेमात्स्ये बिल्वपत्रंचमाध्यंचतमालामलकीदले कल्हारंतुलसीचैवपद्मंचमुनिपुष्पकम् ‍ एतत्पर्युषितंनस्यात्कुशाश्चकलिकास्तथा स्मृतिसारावल्याम् ‍ जलजानांचसर्वेषांपत्राणामहतस्यच कुशपुष्पस्यरजतसुवर्णकृतयोरपि नपर्युषितदोषोस्तितीर्थतोयस्यचैवहि मुकुलैर्नार्चयेद्देवंपंकजैर्जलजैर्विना ॥

भार्गवार्चनांत भविष्यांत - " जाईचीं फुलें एक प्रहर राहतात , नंतर पर्युषित होतात . कण्हेरीचीं फुलें अहोरात्रपर्यंत राहतात . तुलसी , बिल्वपत्रें आणि सारीं कमलें यांना पर्युषित दोष नाहीं . आणि माळ्याच्या घरीं असलेल्या पुष्पांना देखील पर्युषित दोष नाहीं . " बृहन्नारदीयांत - " पर्युषित ( बासें ) पुष्प आणि पर्युषित उदक वर्ज्य करावें . पण तुलसीपत्र आणि भागीरथीचें उदक हें पर्युषित असलें तरी वर्ज्य करुं नये . " तेथेंच पाद्मांत - " तुळस पर्युषित होतच नाहीं . बिल्वपत्र तीन दिवस पर्युषित होत नाहीं . कमल पांच दिवस पर्युषित होत नाहीं . इतर पुष्पें वगैरे एकरात्र गेल्यावर पर्युषित होतात . " स्कांदांत - " पळसाचें पुष्प एक दिवस राहतें . कमळ तीन दिवस राहतें . बिल्वपत्र पांच दिवस राहतें . आणि तुलसीपत्र दहा दिवस राहतें . " पदार्थादर्शांत बोपदेव तर वेगळ्याच रीतीनें सांगतो - " बिल्वपत्र ३० दिवस , आघाडा ३ दिवस , जाईचें पुष्प १ दिवस , तुळसी ६ दिवस , शमीपत्र ६ दिवस , शतावरी ११ दिवस , केतकी ४ दिवस , माका ९ दिवस , दूर्वा ८ दिवस , मंदारपुष्प १ दिवस , कमळ १ दिवस , नागचांप्याचें पुष्प २ दिवस , दर्भ ३० दिवस , अगस्त्यपुष्प ३ दिवस , तिलपुष्प १ दिवस , तगर ६ दिवस , पळसाचें पुष्प ६ दिवस , कल्हार ( संध्याविकासी शुक्लकमल ) ११ दिवस , मोगरी ४ दिवस , चांफा ९ दिवस , कण्हेर ८ दिवस , पाटला १ दिवस , दवणा १ दिवस , श्वेतमर्वा २ दिवस , येथपर्यंत पर्युषित होत नाहींत . याच्यापुढें पर्युषित होतात . " टोडरानंदांत स्कांदांत - दवण्याचा उपक्रम करुन सांगतो - " त्या दवण्याची माळा भगवंताला अतिशय आनंद करणारी आहे . ती शुष्क झाली किंवा पर्युषित झाली तरी कधींही दुष्ट होत नाहीं . " तिथितत्त्वांत मात्स्यांत - " बिल्वपत्र , कुंदपुष्प , तमालवृक्षाचें पत्र , आंवळीचें पत्र , कल्हारकमल , तुलसीपत्र , कमल , अगस्त्यपुष्प , कुश आणि पुष्पांच्या कळ्या हीं पूर्वींच्या दिवसाचीं असलीं तरी पर्युषित होत नाहींत . " स्मृतिसारावलींत - " सारीं कमलें , सारीं पत्रें , कुश , पुष्पें हीं कुजलीं किंवा सडलीं नसतील तर त्यांना पर्युषित दोष नाहीं . आणि सोन्यारुप्याचीं केलेलीं असतील त्यांना पर्युषितदोष नाहीं . तसाच तीर्थोदकाला पर्युषितदोष नाहीं . जलकमळांवांचून इतर पुष्पांच्या कळ्यांनीं देवाची पूजा करुं नये . "

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:50:19.8170000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

मगरूरी

 • f  Haughtiness, airs. 
RANDOM WORD

Did you know?

पत्नीला अर्धांगिनी कां म्हणतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Total Pages: 46,537
 • Hindi Pages: 4,555
 • Dictionaries: 44
 • Words in Dictionary: 302,181
 • Marathi Pages: 27,517
 • Tags: 2,685
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,230
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.