मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
एकक्रियेचा निर्णय

तृतीयपरिच्छेद - एकक्रियेचा निर्णय

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां एकक्रियेचा निर्णय सांगतो -

अथैकक्रियानिर्णयः ज्योतिर्निबंधेवृद्धमनुः एकमातृजयोरेकवत्सरेपुरुषस्त्रियोः नसमानक्रियांकुर्यान्मातृभेदेविधीयते एतेनएकस्यपुंसोविवाहद्वयमेकदिनेनिषिद्धं मातृभेदाभावात् ‍ नारदः पुत्रोद्वाहात्परंपुत्रीविवाहोनऋतुत्रये नतयोर्व्रतमुद्वाहान्मंडनादपिमुंडनं वराहः विवाहस्त्वेकजातानांषण्मासाभ्यंतरेयदि असंशयंत्रिभिर्वर्षैस्तत्रैकाविधवाभवेत् ‍ मदनरत्नेवसिष्ठः नपुंविवाहोर्ध्वमृतुत्रयेपिविवाहकार्यंदुहितुः प्रकुर्यात् ‍ नमंडनाच्चापिहिमुंडनंचगोत्रैकतायांयदिनाब्दभेदः एकोदरभ्रातृविवाहकृत्यंस्वसुर्नपाणिग्रहणंविधेयं षण्मासमध्येमुनयः समूचुर्नमुंडनंमंडनतोपिकार्यं एतदपवादस्तत्रैव ऋतुत्रयस्यमध्येचेदन्याब्दस्यप्रवेशनं तदाह्येकोदरस्यापिविवाहस्तुप्रशस्यते सारावल्याम् ‍ फाल्गुनेचैत्रमासेतुपुत्रोद्वाहोपनायने भेदादब्दस्यकुर्वीतनर्तुत्रयविलंघनं संहिताप्रदीपे ऊर्ध्वंविवाहात्तनयस्यनैवकार्योविवाहोदुहितुः समार्धं अप्राप्यकन्यांश्वशुरालयंचवधूः प्रवेश्यास्वगृहंचनादौ मदनरत्नेवसिष्ठः द्विशोभनंत्वेकगृहेपिनेष्टंशुभंतुपश्चान्नवभिर्दिनैस्तु आवश्यकंशोभनमुत्सवोवाद्वारेथवाचार्यविभेदतोवा एकोदरप्रसूतानांनाग्निकार्यत्रयंभवेत् ‍ भिन्नोदरप्रसूतानांनेतिशातातपोब्रवीत् ‍ ज्योतिर्निबंधेकात्यायनः कुलेऋतुत्रयादर्वाग्मंडनान्नतुमुंडनं प्रवेशान्निर्गमोनेष्टोनकुर्यान्मंगलत्रयम् ‍ कुर्वेतिमुनयः केचिदन्यस्मिन्वत्सरेलघु लघुवागुरुवाकार्यंप्राप्तंनैमित्तिकंतुयत् ‍ पुत्रोद्वाहः प्रवेशाख्यः कन्योद्वाहस्तुनिर्गमः मुंडनंचौलमित्युक्तंव्रतोद्वाहौतुमंगलं चौलंमुंडनमेवोक्तंवर्जयेन्मंडनात्परम् ‍ मौंजीचोभयतः कार्यायतोमौंजीनमुंडनम् ‍ अभिन्नवत्सरेपिस्यात्तदहस्तत्रभेदयेत् ‍ अभेदेतुविनाशः स्यान्नकुर्यादेकमंडपे ।

ज्योतिर्निबंधांत वृद्धमनु - " एका मातेपासून उत्पन्न अशा पुत्र व कन्या यांचे समान संस्कार एका संवत्सरांत करुं नयेत . त्या दोघांच्या माता भिन्न असतील तर करावे . " यावरुन एका पुरुषाचे दोन विवाह एका दिवशीं निषिद्ध आहेत . कारण , भिन्न माता नाहींत . नारद - " पुत्राच्या विवाहानंतर सहा महिन्यांच्या आंत कन्येचा विवाह करुं नये . पुत्राच्या किंवा कन्येच्या विवाहानंतर सहा महिन्यांच्या आंत मौंजीबंधन करुं नये . मंडन ( मौंजी किंवा विवाह ) केल्यावर सहा महिन्यांच्या आंत मुंडन ( चौलादि ) करुं नये . " वराह - " एकापासून झालेल्या अपत्यांचा एक विवाह झाल्यावर सहा महिन्यांच्या आंत दुसरा विवाह होईल तर त्यांपैकीं एक स्त्री तीन वर्षांत विधवा होईल , यांत संशय नाहीं . " मदनरत्नांत वसिष्ठ - " एका गोत्रांत ( त्रिपुरुषांत ) पुरुषाचा विवाह झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आंत कन्येचा विवाह करुं नये . आणि मंडनानंतर सहा महिन्यांत मुंडन करुं नये , हा निषेध वर्षभेद झाला नसेल तर समजावा . एका उदरांत उत्पन्न झालेल्या भ्रात्याचा विवाह केल्यावर सहा मासांचे आंत भगिनीचा विवाह करुं नये . आणि मंडन ( मौंजी , विवाह ) झाल्यावर मुंडनही करुं नये , असें मुनि सांगतात . " याचा अपवाद सांगतो तेथेंच - " एक विवाह केल्यावर सहा महिन्यांच्या आंत जर दुसरें संवत्सर प्राप्त होईल , तर सहोदराचा देखील सहा महिन्यांच्या आंत दुसरा विवाह प्रशस्त आहे . " सारावलींत - " फाल्गुनमासांत पुत्राचा विवाह केल्यावर चैत्रमासांत वर्षभेद झाल्यामुळें दुसर्‍या पुत्राचें उपनयन करावें . या ठिकाणीं तीन ऋतु ( सहा महिने ) टाकावे , असें नाहीं . " संहिताप्रदीपांत - " पुत्राचा विवाह झाल्यावर सहा महिन्यांच्या आंत कन्येचा विवाह करुं नये . कन्या श्वशुरगृहीं पोंचविण्याचे पूर्वीं आपल्या घरांत वधूप्रवेश करुं नये . " मदनरत्नांत वसिष्ठ - " एका घरांत दोन मंगल कार्यै इष्ट नाहींत . एक मंगल कार्य झाल्यावर नऊ दिवस गेल्यानंतर दुसरें मंगल कार्य करावें . आवश्यक मंगल कार्य किंवा उत्सव कर्तव्य असेल तर द्वारभेदानें किंवा आचार्यभेदानें करावें . सहा महिन्यांच्या आंत सहोदरांचीं अग्निकार्यै ( अग्निप्रापक कार्यै म्हणजे मौंजी आणि विवाह हीं ) तीन करुं नयेत . भिन्नोदरांचीं तीन अग्निकार्यै सहा महिन्यांच्या आंत करुं नयेत , असें शातातप सांगत . " ज्योतिर्निबंधांत कात्यायन - " त्रिपुरुषात्मक कुलांत मंडन झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आंत मुंडन करुं नये . प्रवेश ( पुत्रविवाह ) झाल्यावर सहामासांत निर्गम ( कन्याविवाह ) इष्ट नाहीं . आणि सहा महिन्यांच्या आंत तीन मंगलें करुं नयेत . त्रिपुरुषात्मक कुलांत ज्येष्ठ मंगल झाल्यावर सहा महिन्यांच्या आंत लघुमंगल करुं नये . कितीएक मुनि ज्येष्ठ मंगल झाल्यानंतर वर्षभेद झाला असतां लघु मंगल करितात . लघुमंगल किंवा गुरुमंगल जें नैमित्तिक प्राप्त असेल तें करावें . ( बाहेर मंडपांत जें विहित तें ज्येष्ठ मंगल होय . त्यावांचून इतर तें लघुमंगल होय ). प्रवेश म्हणजे पुत्रविवाह . निर्गम म्हणजे कन्याविवाह . मुंडन म्हणजे चौल . आणि मंडन म्हणजे उपनयन आणि विवाह होत . मुंडन म्हणजे चौल तें मंडनानंतर वर्ज्य करावें . मौंजीबंधन हें विवाहाच्या पूर्वी व पश्चातही करावें . कारण , मौंजीबंधन हें मुंडन होत नाहीं . संकट असेल तर सोदरांचेही समानसंस्कार एका वर्षांतही करावे . दिवस मात्र भिन्न असावा . एका दिवशीं सोदरांचे समान संस्कार होतील तर त्या एकाचा विनाश होईल . तसेंच सोदरांचे समान संस्कार एका मंडपांत करुं नयेत . "

संकटेतु कपर्दिकारिका वराहमिहिरश्च उद्वाह्यपुत्रींनपिताविदध्यात्पुत्र्यंतरस्योद्वहनंकदाचित् ‍ यावच्चतुर्थंदिनमत्रपूर्वंसमाप्यचान्योद्वहनंविदध्यात् ‍ कश्यपः मौंजीबंधस्तथोद्वाहः षण्मासाभ्यंतरेपिवा पुत्र्युद्वाहंनकुर्वीतविभक्तानांनदोषकृत् ‍ ज्योतिर्निबंधे विवाहमारभ्यचतुर्थिमध्येश्राद्धंदिनंदर्शदिनंयदिस्यात् ‍ वैधव्यमाप्नोतितदाशुकन्याजीवेत्पतिश्चेदनपत्यतास्यात् ‍ तथा विवाहमध्येयदिचेत्क्षयाहस्तत्रस्वमुख्याः पितरोनयांति वृत्तेविवाहेपरतस्तुकुर्याच्छ्राद्धंस्वधाभिर्नतुदूषयेत्तम् ‍ येवाभद्रंदूषयंतिस्वधाभिरितिश्रुतेश्च मासिकविषयेकालहेमाद्रौशाठ्यायनिः प्रेतश्राद्धानिसर्वाणिसपिंडीकरणंतथा अपकृष्यापिकुर्वीतकर्तुंनांदीमुखंद्विजः वृद्धिंविनापकर्षेदोषमाहतत्रैवोशनाः वृद्धिश्राद्धविहीनस्तुप्रेतश्राद्धानियश्चरेत् ‍ सश्राद्धीनरके घोरेपितृभिः सहमज्जतीति मेधातिथिः प्रेतकर्माण्यनिर्वर्त्यचरेन्नाभ्युदयक्रियां आचतुर्थंततः पुंसिपंचमेशुभदंभवेत् ‍ स्मृत्यंतरे सपिंडीकरणादर्वागपकृष्यकृतान्यपि पुनरप्यपकृष्यंतेवृद्ध्युत्तरनिषेधनात् ‍ ।

संकट असेल तर सांगतो कपर्दिकारिका आणि वराहमिहिर - " पित्यानें एका कन्येचा विवाह करुन चार दिवसांचे आंत दुसर्‍या कन्येचा विवाह कधींही करुं नये . पूर्वींचें विवाहकृत्य समाप्त करुन दुसरा विवाह करावा . " कश्यप - " त्रिपुरुषात्मक कुलांत विवाह केल्यावर सहा मासांचे आंत मौंजीबंधन होत नाहीं . तसाच पुरुषविवाह केल्यावर सहा महिन्यांच्या आंत कन्याविवाह करुं नये . हा निषेध एकत्र असतील तर समजावा . विभक्तांना नाहीं . " ज्योतिर्निबंधांत - " विवाहाचा आरंभ ( नांदीश्राद्ध ) केल्यावर चतुर्थीकर्म ( मंडपोद्वासन ) होईपर्यंत मध्यें श्राद्धदिवस किंवा अमावास्या जर प्राप्त होईल तर त्या कन्येचा पति लवकर मरेल . जर कदाचित् ‍ पति वांचेल तर तिला अपत्य होणार नाहीं . " तसेंच - " विवाहकर्मामध्यें जर वडिलांचे सांवत्सरिक श्राद्धाचा दिवस प्राप्त असेल तर त्या दिवशीं स्वधामुख पितर येत नाहींत . विवाहादि मंगल कर्म समाप्त झाल्यावर त्रिपुरुषसपिंडांनीं श्राद्ध करावें . कारण , तें मंगल कार्य स्वधा शब्दांनीं दूषित करुं नये . " आणि " जे राक्षस मंगलास स्वधांनीं दूषित करितात त्या सर्व राक्षसांस सोमदेव सर्पाकारणें देवो . अथवा निऋतीच्या ( पापदेवतेच्या ) उत्संगावर त्यांना टाको . " अशी श्रुतिही ( ऋ . सं . अष्ट . ५ अ . ७ व . ६ ) आहे . मासिकाविषयीं सांगतो कालहेमाद्रींत शाठ्यायनि - " नांदीश्राद्ध करावयाचें असेल तर सारीं प्रेतश्राद्धें आणि सपिंडीकरणश्राद्ध हीं अपकर्ष करुन देखील करावीं . " वृद्धिश्राद्ध करावयाचें नसतां प्रेतश्राद्धांचा अपकर्ष केला तर दोष सांगतो तेथेंच उशना - " जो मनुष्य वृद्धिश्राद्ध करावयाचें नसतां प्रेतश्राद्धें अपकर्षानें करील तो श्राद्ध करणारा पितरांसह घोर नरकांत पडतो . " मेधातिथि - " चार पुरुषांच्या सपिंडांत प्रेतकर्मै केल्यावांचून वृद्धिश्राद्ध करुं नये . पांचव्या पुरुषांत केलें असेल तर शुभदायक होईल . " स्मृत्यंतरांत - " सपिंडीकरणाच्या पूर्वीं मासिकश्राद्धें अपकर्ष करुन केलेलीं असलीं तरी तीं पुनः आपआपल्या कालीं करावयाचीं असल्यामुळें व त्यांचा वृद्धिश्राद्ध झाल्यावर निषेध असल्याकारणानें वृद्धिश्राद्धाच्या पूर्वीं पुनः देखील अपकर्ष करुन तीं करावीं .

स्मृतिसारावल्याम् ‍ भ्रातृयुगेस्वसृयुगेभ्रातृस्वसृयुगेतथा एकस्मिन्मंडपेचैवनकुर्यान्मंडनद्वयं सोदरविषयमेतत् ‍ यमः एकोदरप्रसूतानामेकस्मिन् ‍ वासरेपुनः विवाहौनैवकुर्वीतमंडनोपरिमुंडनं गार्ग्यः भ्रातृयुगेस्वसृयुगेभ्रातृस्वसृयुगेतथा नकुर्यान्मंगलंकिंचिदेकस्मिन्मंडपेहनि एकस्मिन्वासरेप्राप्तंकुर्याद्यमलजातयोः क्षौरंचैवविवाहंचमौंजीबंधनमेवच ज्योतिर्विवरणे एकोदरयोरेकदिनोद्वहनेभवेन्नाशः नद्यंतर एकदिनेकेप्याहुः संकटेचशुभं ऊर्ध्वंविवाहाच्छुभदोनरस्यनारीविवाहोनऋतुत्रयेस्यात् ‍ नारीविवाहात्तदहेपिशस्तं नरस्यपाणिग्रहमाहुरार्याः भिन्नमातृजयोस्तुएकवासरेविवाहमाहमेधातिथिः पृथड्मातृजयोः कार्योविवाहस्त्वेकवासरे एकस्मिन्मंडपेकार्यः पृथग्वेदिकयोस्तथा पुष्पपट्टिकयोः कार्यंदर्शनंनशिरस्थयोः भगिनीभ्यामुभाभ्यांचयावत्सप्तपदीभवेत् ‍ यमयोस्तुविशेषः भट्टकारिकायाम् ‍ एकस्मिन् ‍ वत्सरेचैकवासरेमंडपेतथा कर्तव्यंमंगलंस्वस्त्रोर्भ्रात्रोर्यमलजातयोः ज्योतिर्निबंधेनारदः प्रत्युद्वाहोनैवकार्योनैकस्मैदुहितृद्वयं नचैकजन्ययोः पुंसोरेकजन्येतुकन्यके नैवंकदाचिदुद्वाहोनैकदामुंडनद्वयं नैकजन्येतुकन्येद्वेपुत्रयोरेकजन्ययोः नपुत्रीद्वयमेकस्मैप्रदद्यात्तुकदाचनेति ।

स्मृतिसारावलींत - " दोन भ्राते , दोन भगिनी , किंवा भ्राता व भगिनी यांचीं दोन मंडनें ( विवाह व उपनयन ) एका मंडपांत करुं नयेत . " हा निषेध सहोदरांविषयीं आहे . यम - " सहोदर अपत्यांचे एक दिवशीं विवाह करुं नयेत . तसेंच मंडनानंतर मुंडन करुं नये . " गार्ग्य - " दोन भ्राते , दोन भगिनी , आणि भ्राता व भगिनी यांचीं कोणतींही मंगल कार्यै एका मंडपांत एक दिवशीं करुं नयेत . जुंवळ अपत्यांचें चौल , विवाह , आणि मौंजीबंधन हें एकदिवशीं करावें . " ज्योतिर्विवरणांत - " एक दिवशीं सहोदरांचे विवाह झाले असतां नाश होईल . दोघांच्या मध्यें नदीचें अंतर असेल व संकटसमय असेल तर सहोदरांचे एक दिवशीं विवाह शुभ होतील , असें कितीएक आचार्य सांगतात . पुरुषाच्या विवाहानंतर तीन ऋतूंच्या आंत कन्येचा विवाह शुभदायक होत नाहीं . कन्याविवाह झाल्यानंतर त्या दिवशीं देखील पुरुषाचा विवाह प्रशस्त आहे , असें आर्य सांगतात . " भिन्नमातेच्या अपत्यांचे विवाह एक दिवशीं सांगतो मेधातिथि - " वेगवेगळ्या स्त्रियांपासून झालेल्या अपत्यांचे विवाह एक दिवशीं एका मंडपांत वेगवेगळ्या वेदींवर करावे . दोन भगिनींनीं परस्परांच्या मस्तकावर असलेल्या पुष्पपट्टिका ( मंडावळ्या ) सप्तपदीक्रमण होईपर्यंत परस्परांनीं पाहूं नयेत . " जुंवळांना तर विशेष सांगतो भट्टकारिकेंत - " जुंवळ झालेल्या दोन भगिनींचीं किंवा दोन भ्रात्यांचीं मंगल कार्यै एका वर्षांत एकदिवशीं एका मंडपांत करावीं . ज्योतिर्निबंधांत नारद - " प्रत्युद्वाह ( ह्याची कन्या त्याच्या पुत्राला व त्याची कन्या ह्याच्या पुत्राला देणें तो ) करुं नयेच . एका पुरुषाला दोन कन्या देऊं नयेत . सहोदर दोन भ्रात्यांना सहोदर दोन कन्या देऊं नयेत . तसेंच एकापासून उत्पन्न अशा दोघांचे विवाह एक कालीं करुं नयेत . दोघांचें मुंडन ( चौलादि ) एक कालीं करुं नये . एकापासून झालेल्या दोन कन्या एकापासून झालेल्या दोन पुत्रांस देऊं नयेत . दोन कन्या एका पुरुषाला कधींही देऊं नयेत . "

कन्यायारजोदर्शनेतुअपरार्केसंवर्तः माताचैवपिताचैवज्येष्ठभ्रातातथैवच त्रयस्तेनरकंयांतिदृष्ट्वा कन्यांरजस्वलां हारीतः पितुर्गेहेतुयाकन्यारजः पश्यत्यसंस्कृता साकन्यावृषलीज्ञेयातत्पतिर्वृषलीपतिः देवलात्रिकश्यपाः पूर्वार्धंतदेव भ्रूणहत्यापितुस्तस्याः साकन्यावृषलीस्मृता यस्तांसमुद्वहेत्कन्यांब्राह्मणो ज्ञानदुर्बलः अश्राद्धेयमपांक्तेयंतंविद्याद्वृषलीपतिम् ‍ माधवीयेबौधायनः त्रीणिवर्षाण्यृतुमतीकांक्षेतपितृशासनम् ‍ विष्णुः ऋतुत्रयमुपास्यैवकन्याकुर्यात्स्वयंवरम् ‍ अत्रवरस्यदोषाभावमाह यमः कन्याद्वादशवर्षाणियाप्रदत्तावसेद्गृहे भ्रूणहत्यापितुस्तस्याः साकन्यावरयेत्स्वयं एवंचोपनतांपत्नींनावमन्येत्कदाचन नतुतांबंधकींविद्यान्मनुः स्वायंभुवोब्रवीत् ‍ मनुः अलंकारंनाददीतपितृदत्तंस्वयंवरे भ्रातृदत्तंमातृदत्तंस्तेयीस्याद्यदितं हरेत् ‍ वरंप्रत्याह पित्रेनदद्याच्छुल्कंतुकन्यामृतुमतींहरन् ‍ सहिस्वाम्यादतिक्रामेदृतूनांप्रतिरोधनात् ‍ ।

कन्येला रजोदर्शन प्राप्त झालें असेल तर सांगतो - अपरार्कांत संवर्त - " माता , पिता आणि ज्येष्ठ भ्राता हे तिघे विवाहाच्या पूर्वीं कन्या रजस्वला झालेली पाहतील तर नरकास जातील . " हारीत - " पित्याच्या घरीं अविवाहित कन्या रजस्वला होईल तर ती वृषली ( शूद्रा ) जाणावी . आणि तिचा पति तो वृषलीपति होय . " देवल अत्रि व कश्यप - " पित्याच्या घरीं अविवाहित कन्या ऋतुमती होईल तर तिच्या पित्याला भ्रूणहत्यादोष प्राप्त होईल . आणि ती कन्या वृषली म्हटली आहे . जो ज्ञानशून्य ब्राह्मण त्या कन्येशीं विवाह करील तो ब्राह्मण वृषलीपति झाल्यामुळें अपांक्तेय ( पंक्तीस बसल्याला अयोग्य ) व श्राद्धास अयोग्य जाणावा . " माधवीयांत बौधायन - " ऋतुमती झालेल्या कन्येनें पित्याच्या आज्ञेची तीन वर्षैपर्यंत प्रतीक्षा करावी . " विष्णु - " ऋतुमती झालेल्या कन्येनें तीन ऋतूंपर्यंत वाट पाहून नंतर कन्येनें आपणास योग्य स्वयंवर करावा . " ऋतुमतीकन्येच्या वराला हारीतादिकांनीं सांगितलेला जो वृषलीपतित्वरुप दोष तो दोष स्वयंवराला नाहीं , असें सांगतो यम - " जी कन्या बारा वर्षैपर्यंत अविवाहित असून पित्याच्या घरीं राहते , तिच्या पित्याला भ्रूणहत्या दोष प्राप्त होतो . त्या कन्येनें स्वतः योग्य वराला वरावें , याप्रमाणें अविवाहित असून स्वतः वरण्याला आलेली जी पत्नी तिचा वरानें अपमान करुं नये . ती स्वतः आल्यामुळें स्वैरिणी आहे , असें समजूं नये . असें स्वायंभुव मनु सांगता झाला . " मनु - " स्वयंवर करणार्‍या कन्येनें ; पित्यानें , मातेनें , किंवा भ्रात्यानें पूर्वीं दिलेला अलंकार असेल तो ग्रहण करुं नये ; तो अलंकार ग्रहण करील तर ती चोर होईल . " वराला सांगतो मनु - " ऋतु प्राप्त झालेल्या कन्येला हरण करणारानें तिच्या पित्याला शुल्क ( तिचें मूल्य ) देऊं नये . कारण , तिच्या ऋतूंचा प्रतिबंध केल्यामुळें ( म्ह० ऋतुकालीं योग्य वराचा संयोग करुन न दिल्यामुळें ) पित्याची तिच्यावरची सत्ता नष्ट होते . "

अत्रप्रायश्चित्तमुक्तमाश्वलायनेन कन्यामृतुमतींशुद्धांकृत्वानिष्कृतिमात्मनः शुद्धिंचकारयित्वातामुद्वहेदानृशंस्यधीः पिताऋतून्स्वपुत्र्यास्तुगणयेदादितः सुधीः दानावधिगृहेयत्नात्पालयेच्चरजोवतीं दद्यात्तदृतुसंख्यागाः शक्तः कन्यापितायदि दातव्यैकापिनिः स्वेनदानेतस्यायथाविधि दद्याद्वाब्राह्मणेष्वन्नमतिनिः स्वः सदक्षिणं तस्यातीतर्तुसंख्येषुवरायप्रतिपादयेत् ‍ उपोष्यत्रिदिनंकन्यारात्रौपीत्वागवांपयः अदृष्टरजसेदद्यात्कन्यायैरत्नभूषणम् ‍ तामुद्वहन्वरश्चापिकूष्मांडैर्जुहुयाद्दिजइति मदनपारिजाते यज्ञपार्श्वः विवाहेविततेतंत्रेहोमकालउपस्थिते कन्यामृतुमतींदृष्ट्वाकथंकुर्वंतियाज्ञिकाः स्नापयित्वातुतांकन्यामर्चयित्वायथाविधि युंजानामाहुतिंहुत्वाततस्तंत्रंप्रवर्तयेत् ‍ बौधायनसूत्रे अथयदिकन्योपसाद्यमानाचोह्यमानावारजस्वलास्यात्तामनुमंत्रयेत् ‍ पुमांसौमित्रावरुणौपुमांसावश्विनावुभौ पुमानिंद्रश्चसूर्यश्चपुमांसंचदधात्वियमिति अथद्वादशरात्रमलंकृत्यप्राशयेत्पंचगव्यमथशुद्धांकृत्वाविवहेत् ‍ ।

अविवाहित कन्या ऋतुमती झाली असतां प्रायश्चित्त सांगतो आश्वलायन - " कन्यादात्यानें ऋतुमती कन्येची शुद्धि करुन आपण प्रायश्चित्त करावें , म्हणजे तो कन्यादानाला योग्य होतो . वरानें , कन्यादात्याकडून कन्येची शुद्धि करवून तिच्यावर कोणताही दोषारोप न करितां तिच्याशीं विवाह करावा . तो शुद्धिप्रकार येणेंप्रमाणें - पित्यानें ऋतुमती झालेल्या कन्येचा विवाह होईपर्यंत आपल्या घरांत तिचें प्रयत्नानें रक्षण करावें . आणि पहिल्यापासून त्या कन्येला किती ऋतु प्राप्त झाले यांची गणना करावी . कन्येचा पिता समर्थ असेल तर कन्येला जितके ऋतु प्राप्त झाले असतील तितक्या गाई त्यानें ब्राह्मणांस द्याव्या . दरिद्री पिता असल्यास तिचें यथाविधि दान करण्याकरितां एक गाई तरी ब्राह्मणास द्यावी , अथवा फार दरिद्री असल्यास त्या कन्येचे जितके ऋतु गेले असतील तितक्या ब्राह्मणांस दक्षिणासहित भोजन द्यावें . नंतर ती कन्या वराला द्यावी . ही कन्यादात्याची निष्कृति ( प्रायश्चित्त ) होय . आतां कन्येची शुद्धि अशी - कन्येनें तीन दिवस उपवास करुन रात्रौ गाईचें दूध प्राशन करुन जिला रजोदर्शन झालें नसेल अशा ब्राह्मणकुमारीला रत्नें व भूषणें द्यावीं , असें केल्यावर ती कन्या विवाहाला योग्य होते . वरानें कूष्मांडमंत्रांनीं होम करुन तिच्याशीं विवाह करावा , म्हणजे तो दोषी होत नाहीं . " मदनपारिजातांत यज्ञपार्श्व - " विवाहाचें तंत्र ( प्रयोग ) चाललें असून त्यांत होमकाल प्राप्त झाला असतां त्यासमयीं कन्येला रजोदर्शन झालें तर याज्ञिकांनीं कसें करावें ? त्या कन्येला स्नान घालून यथाविधि अलंकृत करुन ‘ युंजाना० ’ ह्या तैत्तिरीय शाखेच्या मंत्रानें प्रायश्चित्तहोम करुन तदनंतर होमतंत्र चालवावें . " बौधायनसूत्रांत - " आतां विवाहांत कन्या वराचे जवळ बसविलेली असतां किंवा तिजकडून विवाहप्रापक सप्तपदीक्रमणादि कर्म करवीत असतां ती जर रजस्वला होईल तर तिला अनुमंत्रण करावें . अनुमंत्रणाचा मंत्र - ‘ पुमांसौ मित्रावरुणौ पुमांसावश्विनावुभौ ॥ पुमानिंद्र्श्च सूर्यश्च पुमांसं च दधात्वियम् ‍ ॥ ’ याप्रमाणें अनुमंत्रण केल्यावर बारा दिवस तिला अलंकृत करुन पंचगव्य प्राशन करवावें . याप्रमाणें शुद्ध करुन तिच्याशीं विवाह करावा . "

अत्रगांधर्वाद्यष्टौविवाहास्तद्वयवस्थाचाकरेज्ञेया मनुः षडानुपूर्व्याविप्रस्यक्षत्रस्यचतुरोवरान् ‍ विट्शूद्रयोस्तुतानेवविद्याद्धर्म्यानराक्षसान् ‍ चतुरः आसुरगांधर्वराक्षसपैशाचान् ‍ तान् ‍ राक्षसवर्ज्यान् ‍ वैश्यशूद्रयोः सएव आसुरंवैश्यशूद्रयोः हेमाद्रौपैठीनसिः राक्षसोवैश्यस्य पैशाचः शूद्रस्य प्रचेताः पैशाचोसंस्कृतप्रसूतानांप्रतिलोमजानांच मनुः राज्ञस्तथासुरोवैश्येशूद्रेचांत्यस्तुगर्हितः क्षत्रियादेः संकटेपैशाचमाहमाधवीये वत्सः सर्वोपायैरसाध्यास्यात्सुकन्यापुरुषस्यया चौर्येणापिविवाहेनसाविवाह्यारहः स्थिता गांधर्वादिविवाहेष्वप्युदकपूर्वकंदानमाहतत्रैवयमः नोदकेननवावाचाकन्यायाः पतिरुच्यते पाणिग्रहणसंस्कारात्पतित्वंसप्तमेपदे पराशरमाधवीयेदेवलोपि गांधर्वादिविवाहेषुपुनर्वैवाहिकोविधिः कर्तव्यश्चत्रिभिर्वर्णैः समर्थेनाग्निसाक्षिकः त्रैवर्णोक्तेर्गांधर्वादौविप्रवर्जमधिकारउक्तः तत्रैवपरिशिष्टे गांधर्वासुरपैशाचाविवाहाराक्षसश्चयः पूर्वंपरिश्रयस्तेषुपश्चाद्धोमोविधीयते अतोहोमादावकृतेभार्यात्वाभावाद्वरांतरायदेया तथाचतत्रैव वसिष्ठबौधायनौ बलादपह्रताकन्यामंत्रैर्यदिनसंस्कृता अन्यस्मैविधिवद्देयायथाकन्यातथैवसेति अत्रमंत्रसंस्काराभावेऽन्यस्मैदानस्यसर्वविवाहेषुसाम्याद्वलादपहारेराक्षसपैशाचयोर्विशेषवचनंव्यर्थं तेनतयोर्यदिनसंस्कृतासंस्कृतावेत्यावृत्यकन्यानुमत्यभावेन्यस्मैदेयेतिव्याख्येयं मदनपारिजातेनारदः पाणिग्रहणिकामंत्रानियतंदारलक्षणं तेषांचनिष्ठाविज्ञेयाविद्वद्भिः सप्तमेपदे स्मृतिचंद्रिकायामपरार्केचैवं ।

ब्राह्मादिक आठ विवाह आणि ते कोणाकोणाला उक्त इत्यादिक त्यांची व्यवस्था आकरांतून पाहावी . थोडीशी येथें सांगतो - मनु - " पहिल्यापासून अनुक्रमानें सहा विवाह ब्राह्मणाला उक्त आहेत . क्षत्रियाला शेवटचे चार ( गांधर्व , आसुर , पैशाच , राक्षस हे ) उक्त आहेत . वैश्य आणि शूद्र यांना तेच चार विवाह राक्षस वर्ज्य करुन उक्त आहेत . " मनुच सांगतो - " वैश्य व शूद्र यांना आसुरविवाह श्रेष्ठ आहे . " हेमाद्रींत पैठीनसि - " राक्षस विवाह वैश्याला सांगितला आहे . आणि पैशाच शूद्राला सांगितला आहे . " प्रचेता - " विवाहादि संस्कारावांचून स्त्रीचे ठायीं उत्पन्न आणि प्रतिलोमज ( उत्तम वर्णाचे स्त्रीचे ठायीं कनिष्ठ वर्णाच्या पुरुषापासून उत्पन्न ) यांना पैशाच विवाह उक्त आहे . " मनु - " क्षत्रियांना आसुर विवाह निंद्य आहे . आणि वैश्य व शूद्र यांना राक्षस विवाह निंद्य आहे . " क्षत्रियादिकांना संकटसमयीं पैशाच विवाह सांगतो - माधवीयांत वत्स - " जी चांगली कन्या सर्व उपायांनीं पुरुषास साध्य होत नसेल , ती चोरुन आणूनही एकांतीं तिच्याशीं विवाह करावा . " गांधर्वादिक जे पुढचे चार विवाह सांगितले , त्यांमध्यें देखील कन्येचे उदकपूर्वक दानादिसंस्कार सांगतो तेथेंच यम - " केवळ उदकानें किंवा केवळ वाणीनें कन्येचा पति होतो , असें सांगितलें नाहीं . सातव्या पदाचेठायीं पाणिग्रहणरुप संस्कार झाल्यानें कन्येचा पति होतो . " पराशरमाधवीयांत देवलही - " ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य या तीन वर्णांनीं गांधर्वादि विवाहानें कन्या ग्रहण केली असतां पुनः अग्नीच्या समक्ष पाणिग्रहणादि विवाहविधि करावा . " तेथेंच परिशिष्टांत - " गांधर्व , आसुर , पैशाच आणि राक्षस ह्या चार विवाहांमध्यें पूर्वीं कन्येचा स्वीकार करुन पश्चात् ‍ होम करावा , असें सांगितलें आहे . " यावरुन होमादि विवाहविधि झाला नसेल तर तिच्याठिकाणीं भार्यात्व झालेलें नसल्यामुळें ती कन्या इतर वराला द्यावी . तसेंच सांगतात तेथेंच वसिष्ठ आणि बौधायन - " एकाद्या पुरुषानें बलात्कारानें कन्या हरण केलेली असून जर मंत्रांनीं संस्कार केलेली नसेल , तर ती कन्या दुसर्‍या वराला यथाविधि द्यावी . कारण , जशी कन्या ( अविवाहित ) तशीच ती आहे . " या ठिकाणीं मंत्रांनीं संस्कार झालेली नसतां ती कन्या इतर योग्यवराला देणें , हा प्रकार सर्व विवाहांमध्यें समान असल्यामुळें , बलात्कारानें अपह्रत केलेली ( अर्थात् ‍ राक्षस व पैशाच विवाहांतील ) कन्या मंत्रांनीं संस्कार झालेली नसेल तर इतर वराला द्यावी असें विशेष सांगणें व्यर्थ होईल . म्हणून या वचनांतील ‘ संस्कृता ’ या पदाची आवृत्ति करुन राक्षस व पैशाच विवाहांत संस्कार झालेली नसली किंवा संस्कार झालेली असली तरी त्या कन्येची अनुमति नसेल तर ती कन्या इतराला द्यावी , अशी व्याख्या करावी . मदनपारिजातांत नारद - " पाणिग्रहनाचे मंत्र ( मंत्रांनीं केलेला संस्कार ) हें भार्यात्वाचें निश्चित लक्षण होय . म्हणजे पाणिग्रहणाच्या मंत्राचा संस्कार जिच्यावर झाला आहे , ती भार्या समजावी . त्या मंत्रांचा संस्कार स्थिर केव्हां होतो , असें म्हटलें तर सातव्या पदाचे ठायीं तो संस्कार स्थिर होतो , असें विद्वानांनीं समजावें . " स्मृतिचंद्रिकेंत आणि अपरार्कांतही असेंच सांगितलें आहे .

आशौचेतुयाज्ञवल्क्यः दानेविवाहेयज्ञेचसंग्रामेदेशविप्लवे आपद्यपिचकष्टायांसद्यः शौचंविधीयते केषामित्यपेक्षितेब्रह्मपुराणेउक्तं दातुः प्रतिग्रहीतुश्चकन्यादानेचनोभवेत् ‍ विवाहयिष्णोः कन्यायालाजहोमादिकर्मणीति व्रतयज्ञविवाहेषुश्राद्धेहोमेर्चनेजपे आरब्धेसूतकंनस्यादनारब्धेतुसूतकमितिविष्णुवचनाच्च प्रारंभस्तेनैवोक्तः प्रारंभोवरणंयज्ञेसंकल्पोव्रतसत्रयोः नांदीमुखंविवाहादौश्राद्धेपाकपरिक्रियेति वरणमितिमधुपर्कपरं गृहीतमधुपर्कस्ययजमानाच्चऋत्विजः पश्चादशौचेपतितेनभवेदितिनिश्चयइति ब्राह्मोक्तेः मधुपर्कात्पूर्वंतुभवत्येवाशौचमितिशुद्धिविवेकः रामांडारभाष्येऽप्येवम् ‍ नांदीमुखावधिश्चस्मृत्यंतरे एकविंशत्यहर्यज्ञेविवाहेदशवासराः त्रिषटचौलोपनयनेनांदीश्राद्धंविधीयते आरंभाभावेपिलग्नांतराभावेगद्यविष्णुः नदेवप्रतिष्ठाविवाहयोः पूर्वसंभृतयोरपीति अत्रप्रायश्चित्तमाहमदनपारिजातेविष्णुः अनारब्धविशुद्ध्यर्थंकूष्मांडैर्जुहुयाद्धृतम् ‍ गांदद्यात्पंचगव्याशीततः शुध्यतिसूतकी संग्रहेपि संकटेसमनुप्राप्तेसूतकेसमुपागते कूष्मांडीभिर्घृतंहुत्वागांचदद्यात्पयस्विनीम् ‍ चूडोपनयनोद्वाहप्रतिष्ठादिकमाचरेत् ‍ यदैवसूतकप्राप्तिस्तदैवाभ्युदयक्रिया ।

विवाहांत आशौच उत्पन्न झालें असतां सांगतो याज्ञवल्क्य - " दान , विवाह , यज्ञ , युद्ध , देशाचा विध्वंस , आणि दुःख देणारी आपत्ति यांमध्यें आशौच प्राप्त असतां सद्यः ( तत्काल ) शुद्धि सांगितली आहे . " कोणाची सद्यः शुद्धि म्हटली तर सांगतो ब्रह्मपुराणांत - " कन्यादानाचे ठायीं कन्यादाता , आणि प्रतिग्रहीता यांना आशौच नाहीं . आणि विवाहित होणार्‍या कन्येला लाजहोमादि कर्माचेठायीं आशौच नाहीं . " आणि " व्रत , यज्ञ , विवाह , श्राद्ध , होम , पूजा , जप , यांचे ठायीं आरंभ झाल्यावर सूतक प्राप्त असलें तरी तें सूतक नाहीं . आरंभ होण्याच्या पूर्वीं प्राप्त असेल तर सूतक आहे " असें विष्णुवचनही आहे . प्रारंभ कोणता तें तोच ( विष्णुच ) सांगतो - " यज्ञाचा प्रारंभ ऋत्विग्वरण , व्रत आणि सत्र यांचा प्रारंभ संकल्प होय , विवाहादिकांचा प्रारंभ नांदीश्राद्ध , आणि श्राद्धाचा प्रारंभ पाकप्रोक्षण . " ऋत्विजांचें वरण म्हणजे मधुपर्क समजावा . कारण , " यजमानापासून ऋत्विजांनीं मधुपर्कपूजा घेतल्यावर पश्चात् ‍ आशौच प्राप्त असतां तें आशौच त्या ऋत्विजांना नाहीं , असा निश्चय आहे . " असें ब्राह्मवचन आहे . मधुपर्काच्या पूर्वीं आशौच होतच आहे , असें शुद्धिविवेक सांगतो . रामांडारभाष्यांतही असेंच सांगितलें आहे . नांदीश्राद्धाचा अवधि सांगतो स्मृत्यंतरांत - " अहर्यज्ञामध्यें एकवीस दिवस पूर्वीं नांदीश्राद्ध होतें . विवाहांत दहा दिवस होतें . चौलांत तीन दिवस . आणि उपनयनांत सहा दिवस पूर्वीं नांदीश्राद्ध होतें . " आरंभ झालेला नसला तरी दुसरा मुहूर्त नसेल तर गद्यरुपानें सांगतो विष्णु - " देवप्रतिष्ठा आणि विवाह यांचें सर्व साहित्य संपादन केलें असतां जर सूतक प्राप्त असेल तर तें सूतक नाहीं . " आरंभ नसून सूतक प्राप्त असेल तर प्रायश्चित्त सांगतो मदनपारिजातांत विष्णु - " आरंभ झालेला नसून सूतक प्राप्त असेल तर शुद्धीसाठीं कूष्मांडमंत्रांनीं घृताचा होम करुन गोप्रदान करावें , आणि पंचगव्य प्राशन करावें , म्हणजे सूतकी शुद्ध होतो . " संग्रहांतही - " संकट ( मृताशौच ) प्राप्त झालें किंवा जननाशौच प्राप्त झालें असतां तैत्तिरीयशाखेंतील कूष्मांडी ऋचांनीं घृताचा होम करुन दूध देणारी गाई ब्राह्मणास द्यावी , नंतर चौल , उपनयन , विवाह , देवप्रतिष्ठा इत्यादि कार्यै करावीं . मात्र ज्या दिवशीं सूतक प्राप्त असेल त्याच दिवशीं वृद्धिश्राद्धादिक आभ्युदयिक कर्म करावें . "

अन्नादिषुविशेषः षटत्रिंशन्मते विवाहोत्सवयज्ञेषुत्वंतरामृतसूतके परैरन्नंप्रदातव्यंभोक्तव्यंचद्विजोत्तमैः परैरसगोत्रैः भुंजानेषुतुविप्रेषुत्वंतरामृतसूतके अन्यगेहोदकाचांताः सर्वेतेशुचयः स्मृताः एतदाशौचात्पूर्वमपृथक्कृतान्नविषयं तत्रशेषमन्नंत्याज्यमित्यर्थः पृथक्कृतेषुतुबृहस्पतिराह विवाहोत्सवयज्ञेषुत्वंतरामृतसूतके पूर्वसंकल्पितान्नेषुनदोषः परिकीर्तितइति ।

ह्या आशौचांत अन्नादिकांविषयीं विशेष सांगतो षटत्रिंशन्मतांत - " विवाह , उत्सव , यज्ञ या कर्मांमध्यें मृताशौच प्राप्त होईल तर असगोत्रांनीं अन्न द्यावें , तें अन्न ब्राह्मणश्रेष्ठांनीं भोजन करावें . ब्राह्मण भोजन करीत असतां मध्यें यजमानाला मृताशौच प्राप्त होईल तर ब्राह्मणांनीं उठून दुसर्‍याच्या घरांतील उदकानें आचमन करावें , म्हणजे ते सारे ब्राह्मण शुद्धच आहेत . " हें वचन आशौचाच्या पूर्वीं वेगळें न केलेल्या अन्नाविषयीं समजावें . या ठिकाणीं शेष अन्न असेल तें ब्राह्मणांनीं टाकावें , असा भाव . आशौचाच्या पूर्वीं पृथक् ‍ केलेलें अन्न असेल तर सांगतो बृहस्पति - " विवाह , उत्सव , यज्ञ , या कर्मांचे ठायीं मध्यें मृताशौच प्राप्त होईल तर पूर्वीं संकल्पित असलेल्या अन्नाविषयीं दोष नाहीं , असें सांगितलें आहे . "

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP