मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
पंचायतनाची मांडणी

तृतीयपरिच्छेद - पंचायतनाची मांडणी

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


पंचायतनाची मांडणी सांगतो -
पंचायतनसन्निवेशमाह बोपदेवः पदार्थादर्शश्च शंभौमध्यगतेहरीनहरभूदेव्योहरौशंकरेभास्येनागसुतारवौहरगणेशाजांबिकाः स्थापिताः देव्यांविष्णुहरेभवक्ररवयोलंबोदरेजेश्वरेनांबाः शंकरभागतोऽतिसुखदाव्यस्तास्तुहानिप्रदाः शंकरभागतः ईशानकोणादारभ्यप्रदक्षिणमित्यर्थः अत्रदिक्‍ स्वरुपमुक्तंप्रयोगपारिजातेमंत्रशास्त्रे देवस्यमुखमारभ्यदिशंप्राचींप्रकल्पयेत् तदादिपरिवाराणामंगाद्यावरणस्थितिः तत्रक्रमः पाद्मे रविर्विनायकश्चंडीईशोविष्णुस्तुपंचमः अनुक्रमेणपूज्यंतेव्युत्क्रमेतुमहद्भयम् तथा पूज्यपूजकयोर्मध्येप्राचीप्रोक्ताविचक्षणैः ।

बोपदेव आणि पदार्थादर्श - “ शिवपंचायतन मध्यभागीं शिव, ईशान्येस विष्णु, अग्नेयीस सूर्य, नैऋतीस गणपति, वायव्येस देवी. विष्णुपंचायतन - मध्यभागीं विष्णु, ईशान्येस शिव, आग्नेयीस गणपति, नैऋतीस सूर्य, वायव्येस देवी. सूर्यपंचायतन - मध्यभागीं सूर्य, ईशान्येस शिव, आग्नेयीस गणपती, नैऋतीस विष्णु, वायव्येस देवी. देवीपंचायतन - मध्यभागीं देवी, ईशान्येस विष्णु, आग्नेयीस शिव, नैऋतीस गणपती, वायव्येस सूर्य. गणपतिपंचायतन - मध्यभागीं गणपति, ईशान्येस विष्णु, आग्नेयीस शिव, नैऋतीस सूर्य, वायव्येस देवी. याप्रमाणें ईशानकोणापासून आरंभ करुन प्रदक्षिण मांडावे, म्हणजे अतिसुखदायक होतात. याच्या विपरीत मांडले असतां हानिदायक होतात. ” येथें दिशेचें स्वरुप सांगतो प्रयोगपारिजातांत मंत्रशास्त्रांत - “ जिकडे देवाचें मुख तिकडे प्राची दिशेची कल्पना करावी. ती प्राची दिशा धरुन तदनुसारानें त्या देवाचे परिवार, अंगदेवता, उपांगदेवता, आवरणदेवता, यांची स्थापना करावी. ” पंचायतन देवतांच्या पूजेचा क्रम सांगतो पाद्मांत - “ सूर्य, गणपति, देवी, शिव आणि पांचवा विष्णु हे अनुक्रमानें पुजावे. विपरीत क्रमानें पूजिले असतां मोठें भय होतें. ” तसेंच - “ पूज्य आणि पूजक यांच्या मध्यें प्राची दिशा विद्वानांनीं सांगितली आहे. ”

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP