TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
लिंगप्रतिष्ठेविषयीं

तृतीयपरिच्छेद - लिंगप्रतिष्ठेविषयीं

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


लिंगप्रतिष्ठेविषयीं

लिंगप्रतिष्ठायांविशेषः हेमाद्रौलक्षणसमुच्चये उत्तराशागतेभानौलिंगस्थापनमुत्तमम् ‍ दक्षिणेत्वयनेपूज्यत्रिवर्षार्धेभयावहम् ‍ स्वगृहेस्थापनंनेष्टंतस्माद्वैदक्षिणायने स्थापनंतुप्रकर्तव्यंशिशिरादावृतुत्रये प्रावृषिस्थापितंलिगंभवेद्वरदयोगदम् ‍ हेमंतेज्ञानदंचैवलिंगस्यारोपणंमतम् ‍ रत्नावल्याम् ‍ माघफाल्गुनवैशाखज्येष्ठाषाढेषुपंचसु मासेषुशुक्लपक्षेषुलिंगस्थापनमुत्तमम् ‍ विष्णोरप्याहतत्रैववैखानसः मार्गशीर्षादिमासौद्वौनिंदितौब्रह्मणापुरा मासेषुफाल्गुनः श्रेष्ठश्चैत्रोवैशाखएवच वृषेवाप्यश्वयुड्मासेश्रावणेमासिवाभवेत् ‍ बौधायनसूत्रेविष्णुप्रतिष्ठामुपक्रम्यद्वादश्यांश्रोणायांवायानिचान्यानिपुण्यनक्षत्राणीति कृत्तिकादिविशाखांतेष्वित्यर्थः सर्वदेवेषुमासविशेषोहेमाद्रौविष्णुधर्मे माघेकर्तुर्विनाशायफाल्गुनेशुभदाभवेत् ‍ लोकानंदकरीचैत्रेवैशाखेवरसंयुता आज्ञायुतासदाज्येष्ठोआषाढेधर्मवृद्धिदा श्रावणेधनहीनास्यात्प्रोष्ठपादेविनश्यति आश्विनेनाशमाप्नोतिवह्निनाकार्तिकेतथा सौम्येसौभाग्यमतुलंपौषेपुष्टिरनुत्तमा दोषान्विताधिमासेस्यात्कर्तुरात्मनएवचेति अत्रश्रावणाश्विनयोर्निषेधोमार्गशीर्षविधिश्चविष्णुव्यतिरिक्तविषयः पूर्वोक्तवचनादितिहेमाद्रिः माघश्रावणभाद्रपदनिषेधः शिवव्यतिरिक्तविषयः तत्रतस्योक्तेः देवीस्थापनेतत्रैवविशेषोदेवीपुराणे देव्यामाघेश्विनेमासेउत्तमासर्वकामदा तथा नतिथिर्नचनक्षत्रंनोपवासोत्रकारणम् ‍ सर्वकालंप्रकर्तव्यंकृष्णपक्षेविशेषतः अन्यश्चात्रविचारोहेमाद्रौज्ञेयः नारदः हंत्यर्थहीनाकर्तारंमंत्रहीनातुऋत्विजम् ‍ स्त्रियंलक्षणहीनातुनप्रतिष्ठासमोरिपुः ॥

लिंगप्रतिष्ठेविषयीं - विशेष सांगतो हेमाद्रींत लक्षणसमुच्चयांत - " सूर्याचे उत्तरायणांत लिंगाचें स्थापन उत्तम आहे . दक्षिणायनांत लिंगाचें स्थापन केलें असतां दीड वर्षाचे आंत भय उत्पन्न करणारें होतें . तस्मात् ‍ कारणात् ‍ दक्षिणायनांत आपल्या घरीं लिंगस्थापना इष्ट नाहीं . शिशिर , वसंत , ग्रीष्म या तीन ऋतूंत लिंगाचें स्थापन करावें . प्रावृड ऋतूंत लिंगस्थापन केलें असतां तें वरदायक आणि योगदायक होतें . आणि हेमंत ऋतूंत लिंगाचें स्थापन ज्ञानदायक होतें . " रत्नावलींत - " माघ , फाल्गुन , वैशाख , ज्येष्ठ , आषाढ , या पांच मासांत शुक्लपक्षीं लिंगाचें स्थापन उत्तम आहे . " विष्णूचेंही स्थापन सांगतो तेथेंच वैखानस - " मार्गशीर्ष आणि पौष हे दोन मास ब्रह्मदेवानें पूर्वीं निंदित केले आहेत . मासांमध्यें फाल्गुन , चैत्र आणि वैशाख हे श्रेष्ठ आहेत . अथवा ज्येष्ठ किंवा आश्विन किंवा श्रावण या मासांत विष्णूची स्थापना करावी . " बौधायनसूत्रांत - विष्णुप्रतिष्ठेचा उपक्रम करुन सांगतो - " द्वादशीस श्रवणावर किंवा जीं इतर पुण्यनक्षत्रें ( कृत्तिकादिक विशाखांपर्यंत ) त्यांजवर विष्णूची स्थापना करावी . सर्व देवांविषयीं विशेष मास सांगतो हेमाद्रींत विष्णुधर्मांत - " माघांत केलेली प्रतिष्ठा कर्त्याचा नाश करणारी होते . फाल्गुनांत शुभदायक होते . चैत्रांत लोकांना आनंद करणारी , वैशाखांत वर देणारी , ज्येष्ठांत आज्ञाधारक , आषाढांत धर्म वाढविणारी , श्रावणांत धनरहिता , भाद्रपदांत विनाश पावणारी , आश्विनांत नाश पावणारी , कार्तिकांत अग्नीच्या योगानें नाश पावणारी , मार्गशीर्षांत अतुल सौभाग्यदायक आणि पौषांत उत्तम पुष्टिदायक अशी होते . अधिक मासांत केलेली प्रतिष्ठा स्वतः दोषयुक्त होऊन कर्त्याला दोषकारक होते . " या वचनांत श्रावण आणि आश्विन यांचा निषेध ( निंद्यत्व ) केला आणि मार्गशीर्ष व पौष यांचा विधि केला तो विष्णूवांचून इतरांविषयीं समजावा . कारण , याविषयीं वर सांगितलेलें वैखानसवचन आहे , असें हेमाद्रि सांगतो . माघ , श्रावण , भाद्रपद यांचा निषेध शिवव्यतिरिक्तविषयक आहे . कारण , त्या मासांत शिवलिंगाची स्थापना सांगितली आहे . देवीस्थापनाविषयीं तेथेंच सांगतो - देवीपुराणांत - " माघांत व आश्विनांत देवीची स्थापना सर्वकाल उत्तम आहे . " तसेंच - " देवीच्या स्थापनाविषयीं तिथि , नक्षत्र , उपवास यांचें कारण नाहीं . सर्वकाल देवीचें स्थापन करावें . कृष्णपक्षांत विशेषेंकरुन करावें , " याविषयींचा इतर विशेष विचार हेमाद्रींतून पाहावा . नारद - " अर्थ ( द्रव्य ) हीन प्रतिष्ठा कर्त्याचा नाश करिते . मंत्रहीन प्रतिष्ठा ऋत्विजांचा नाश करिते . लक्षणहीन प्रतिष्ठा स्त्रियेचा नाश करिते . यास्तव प्रतिष्ठेसारखा दुसरा रिपु नाहीं . "

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:50:19.3500000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

cuboidal lattice design

 • घनाकारी जालक संकल्पन 
RANDOM WORD

Did you know?

’ एकोद्दिष्ट श्राद्ध ’ बद्दल माहिती द्यावी.
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Total Pages: 46,537
 • Hindi Pages: 4,555
 • Dictionaries: 44
 • Words in Dictionary: 302,181
 • Marathi Pages: 27,517
 • Tags: 2,685
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,230
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.