मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
द्विगोत्री

तृतीयपरिच्छेद - द्विगोत्री

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां द्विगोत्री सांगतो -

अथद्विगोत्राः शौंगशैशिरीणां आंगिरसबार्हस्पत्यभारद्वाजकात्याक्षीलेतिपंच कात्याक्षीलयोः स्थानेशौंगशैशिरिर्वा आंगिरसकात्याक्षीलेतित्रयोवा एषांभरद्वाजैर्विश्वामित्रैश्चाविवाहः एवंकपिलानांकतानांचसंकृतिपूतिमाषादीनां आंगिरसगौरिवीतिसांकृत्येति शाक्त्यगौरिवीतिसांकृत्येतिवा अंत्ययोर्व्यत्ययोवा एषांस्वगणस्थैर्वसिष्ठैः शौंगशैशिरैर्लौगाक्षिभिश्चाविवाहः कश्यपैरपीतिप्रयोगपारिजाते लौंगाक्षीणांकाश्यपावत्सारवासिष्ठेति काश्यपावत्सारासितेतिवा एतेहर्वसिष्ठानक्तंकश्यपाः एषांवसिष्ठैः कश्यपैः संकृतिभिश्चाविवाहः देवरातस्यजामादग्न्यैर्विश्वामित्रैश्चाविवाहइति प्रयोगपारिजाते तदयुक्तं बह्वृचश्रुतौयथैवांगिरसः सन्नुपेयां तवपुत्रतां आंगिरसोजन्मनास्याजीगर्तिः श्रुतः कविरित्यंगिरोगणस्थत्वेनभार्गवजामदग्न्यत्वस्मृतेर्हरिवंशादिस्मृतेश्चबाधात् ‍ तेनद्वौदेवरातौ एकआंगिरसः श्रुत्युक्तः अन्योभार्गवः तयोः कल्पभेदेप्यांगिरसेनदेवरातेन जामदग्न्यैर्भवत्येवविवाहः भार्गवेणतुनेतितत्त्वम् ‍ धनंजयानांविश्वामित्रैरत्रिभिश्चाविवाहः जातूकर्ण्यानां वसिष्ठैरत्रिभिश्चाविवाहः एवंदत्तक्रीतकृत्रिमस्वयंदत्तपुत्रिकापुत्रादीनांउत्पादकपालकयोः पित्रोर्गोत्रप्रवरावर्ज्या इतिप्रवरमंजरीनारायणवृत्तिप्रयोगपारिजातादयः अत्रसर्वत्रोपपत्तयः मूलंच मत्कृतेप्रवरदर्पणेज्ञेयमितिदिक् ‍ ॥

भरद्वाज गोत्रांतल्या शुंगऋषीपासून विश्वमित्रगोत्री शैशिरऋषीच्या क्षेत्राचे ठायीं ( पत्नीचे ठायीं ) झालेला शौंगशैशिरि नांवाचा ऋषि . त्याजवर गोत्राचें लक्षण येत असल्यामुळें तो गोत्र आहे . त्या शौंगशैशिरि गोत्राचे ‘ आंगिरसबार्हस्पत्यभारद्वाजकात्याक्षीलेति ’ पांच प्रवर . अथवा ‘ आंगिरसबार्हस्पत्यभारद्वाजशौंगशैशिरेति ’ पांच प्रवर . किंवा ‘ आंगिरसकात्याक्षीलेति ’ तीन प्रवर . यांचा सर्व भरद्वाजांशीं आणि सर्व विश्वामित्रांशीं विवाह होत नाहीं .

याचप्रमाणें कपिल , कत , संकृति , पूतिमाष इत्यादिकांचे - ‘ आंगिरसगौरिवीतिसांकृत्येति ’ तीन प्रवर . अथवा ‘ शाक्त्यगौरिवीतिसांकृत्येति ’ तीन प्रवर . यांचा आप आपल्या गणाशीं , सर्व वसिष्ठांशीं , शौंगशैशिरींशीं आणि लौगाक्षींशीं विवाह होत नाहीं . कश्यपांशीं देखील विवाह होत नाहीं असें प्रयोगपारिजातांत सांगितलें आहे .

लौगाक्षि , दार्भायण , इत्यादि ३८ हून अधिक लौगाक्षि . त्यांचे ‘ काश्यपावत्सारवासिष्ठेति ’ तीन . किंवा ‘ काश्यपावत्सारासितेति ’ तीन प्रवर . हे अहर्वसिष्ठ आणि नक्तंकश्यप म्हणजे दिवसा कर्माविषयीं वासिष्ठगोत्री आणि रात्रीं कर्माविषयीं काश्यपगोत्री आहेत . यांचा वसिष्ठांशीं , कश्यपांशीं , आणि संकृतींशीं विवाह होत नाहीं .

देतरात गोत्राचा जामदग्न्य व विश्वामित्र यांच्याशीं विवाह होत नाहीं , असें प्रयोगपारिजातांत सांगितलें आहे . तें अयुक्त आहे . कारण , बह्वृचश्रुतींत ( ब्राह्मणांत ) " देवरात म्हणतो - मी आंगिरस असून तुझा ( विश्वामित्राचा ) पुत्र झालों आहें . तो अजीगर्ताचा पुत्र विद्वान् ‍ व जन्मानें आंगिरस होता . " या श्रुतीवरुन आंगिरस गणांतील असल्यामुळें ‘ हा भार्गव जामदग्न्य आहे ’ या स्मृतीचा व हरिवंशादि स्मृतीचा बाध होत आहे . ह्या श्रुतीवरुन व हरिवंशादि स्मृतीवरुन दोन देवरात आहेत . श्रुतींत सांगितलेला एक आंगिरस देवरात . आणि दुसरा स्मृतींत सांगितलेला भार्गव देवरात . ते दोन निरनिराळ्या कल्पांत झालेले असले , तरी आंगिरस देवरात गोत्राचा जामदग्न्यांशीं विवाह होतच आहे . भार्गव देवराताचा जामदग्न्यांशीं विवाह होत नाहीं . हें तत्त्व समजावें .

धनंजय गोत्राचा विश्वामित्र आणि अत्रि यांच्याशीं विवाह होत नाहीं . जातूकर्ण्याचा वसिष्ठ व अत्रि यांच्याशीं विवाह होत नाहीं . याचप्रमाणें दत्तक , क्रीत ( विकत घेतलेला ), स्वयंदत्त ( आपलें आपण दान केलेला ), पुत्रिकापुत्र इत्यादिकांचा जनक पित्याचे आणि पालक पित्याचे गोत्रप्रवरांशीं विवाह होत नाहीं , असें प्रवरमंजरी , नारायणवृत्ति , प्रयोगपारिजात इत्यादि ग्रंथांत सांगितलें आहे . या सर्वांविषयीं उपपत्ति व मूलप्रमाण हें मी ( कमलाकरभट्टानें ) केलेल्या प्रवरदर्पणांत पाहावें . ही दिशा दाखविली आहे .

क्षत्रियवैश्ययोस्तुपुरोहितगोत्रप्रवरावेवेतिसर्वसिद्धांतः यद्यपिबह्वृचपरिशिष्टेकपिभरद्वाजयोर्विवाहउक्तस्तथापि भरद्वाजाश्चकपयोगर्गारौक्षायणाइतिचत्वारोपि भरद्वाजगोत्रैक्यान्नान्वयुर्मिथः कपिगर्गभरद्वाजामिथोरौक्षायणाद्विजाः नोद्वहेयुः सगोत्रत्वात्प्रवरैक्याच्चकुत्रचिदितिस्मृत्यर्थसाराद्युक्तेरविवाहएवतयोरिति प्रवरमंजरी स्वगोत्राद्यज्ञानेतुसत्याषाढः अथाज्ञातबंधोः पुरोहितप्रवरेणाचार्यप्रवरेणवेति आचार्यगोत्रप्रवरानभिज्ञस्तुद्विजः स्वयम् ‍ दत्वात्मानंतुकस्मैचित्तद्गोत्रप्रवरोभवेत् ‍ यद्वास्वगोत्रप्रवरविधुरोजमदग्निजः विवाहंचनतेनैवगोत्रेणतुसमाचरेदितिकश्चित् ‍ दिवोदासीयेपि स्वगोत्रप्रवराज्ञानेजमदग्निमुपाश्रयेत् ‍ ॥

क्षत्रिय आणि वैश्य यांचें स्वतःचें गोत्र व प्रवर नाहीं . पुरोहिताचे गोत्र - प्रवर जे असतील तेच क्षत्रियवैश्यांचे गोत्रप्रवर समजावे , हा सर्व ग्रंथांचा सिद्धांत आहे . आतां जरी बह्वृचपरिशिष्टांत कपि आणि भरद्वाज यांचा परस्पर विवाह सांगितला आहे , तरी " भरद्वाज , कपि , गर्ग , आणि रौक्षायण ह्या चौघांचें भरद्वाज गोत्र एक असल्यामुळें यांचा परस्पर विवाह होणार नाहीं . कपि , गर्ग , भरद्वाज , व रौक्षायण ह्या द्विजांचें एक गोत्र व एक प्रवर असल्यामुळें ह्यांनीं परस्पर विवाह करुं नये " अशा स्मृत्यर्थसारादिकांच्या उक्तीवरुन कपि व भरद्वाज ह्यांचा विवाह होतच नाहीं , असें प्रवरमंजरीकार सांगतो . आपले गोत्रप्रवर माहीत नसतील तर सांगतो सत्याषाढ - " आतां ज्याचे प्रवर माहीत नसतील त्यांचीं विवाहादि कार्यैं पुरोहिताच्या प्रवरानें अथवा उपनयनकर्त्या आचार्याच्या प्रवरानें करावीं . " आचार्याचे गोत्रप्रवर जाणत नसेल अशा द्विजानें कोणाला तरी आपलें आपण दान करुन त्याचे गोत्रप्रवरी आपण व्हावें . अथवा आपले गोत्रप्रवर जाणत नसेल तो जमदग्नि गोत्रप्रवरी समजावा . त्याच जमदग्नि गोत्रप्रवराशीं त्यानें विवाह करुं नये " असें कोणी एक सांगतो . दिवोदासीयांतही - " आपल्या गोत्रप्रवरांचें ज्ञान नसेल तर जमदग्निगोत्राचा आश्रय करावा . "

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP