मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
उपवेशन

तृतीयपरिच्छेद - उपवेशन

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आता उपवेशन सांगतो.
अथोपवेशनं प्रयोगपारिजाते पाद्मे विष्णुधर्मेच पंचमेचतथामासिभूमौतमुपवेशयेत्‍ तत्र सर्वेग्रहाः शस्ताभौमोप्यत्रविशेषतः उत्तरात्रितयंसौम्यंपुष्यर्क्षंशक्रदैवतं प्राजापत्यंचहस्तश्चशस्तमाश्विनमित्रभं वाराहंपूजयेद्देवंपृथिवींचतथाद्विजः रक्षैनंवसुधेदेविसदासर्वगतंशुभे आयुः प्रमाणंसकलंनिक्षिपस्वहरिप्रिये अचिरादायुषस्त्वस्ययेकेचित्परिपंथिनः जीवितारोग्यवित्तेषुनिर्दहस्वाचिरेणतान् वरेण्याशेषभूतानांमातात्वमसिकामधुक्‍ अजराचाप्रमेयाचसर्वभूतनमस्कृता चराचराणांभूतानांप्रतिष्ठानाव्ययाह्यसि कुमारंपाहिमातस्त्वंब्रह्मातदनुमन्यतां ।

प्रयोगपारिजातांत - पाद्मांत व विष्णुधर्मांत - “ पांचव्या मासीं त्या बालकास भूमीवर बसवावें. त्या समयीं सारे ग्रह शुभस्थानीं असावे आणि मंगळ तर विशेषेंकरुन योग्य स्थानीं असावा. नक्षत्रें सांगतो - तीन उत्तरा, मृग, पुष्य, ज्येष्ठा, रोहिणी, हस्त, अश्विनी, अनुराधा, ह्या नक्षत्रांवर भूमीवर उपवेशन करवावें. द्विजानें वराह देव, पृथ्वी यांची पूजा करुन बालकाला भूमीवर ठेऊन पुढें सांगितलेल्या मंत्रानें भूमीची प्रार्थना करावी. प्रार्थनामंत्र - ‘ रक्षैनं वसुधे देवि सदा सर्वगतं शुभे ॥ आयुःप्रमाणं सकलं निक्षिपस्व हरिप्रिये ॥ अचिरादायुषस्त्वस्य ये केचित्परिपंथिनः ॥ जीवितारोग्यवित्तेषु निर्दहस्वाचिरेण तान्‍ ॥ वरेण्याशेषभूतानां माता त्वमसि कामधुक्‍ ॥ अजरा चाप्रमेया च सर्वभूतनमस्कृता ॥ चराचराणां भूतानां प्रतिष्ठानाव्यया ह्यसि ॥ कुमारं पाहि मातस्त्वं ब्रह्मा तदनुमन्यतां ॥ ”

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP