मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
वस्त्रधारण

तृतीयपरिच्छेद - वस्त्रधारण

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां वस्त्रधारण सांगतो -

अथवस्त्रं श्रीपतिः रोहिणीषुकरपंचकेश्विभेत्र्युत्तरासुचपुनर्वसुद्वये रेवतीषुवसुदैवतेचभेनव्यवस्त्रपरिधानमिष्यते जीर्णंरवौसततमंबुभिरार्द्रमिंदौभौमेशुचेबुधदिनेतुभवेद्धनाय ज्ञानायमंत्रिणिभृगौप्रियसंगमायमंदेमलायचनवांबरधारणंस्यात् ‍ रोहिणीगुरुपुनर्वसूत्तरेयाबिभर्तिनववस्त्रभूषणे सानयोषिदवलंबतेपतिंस्नानमाचरतिवारुणेपिया ॥

श्रीपति - " रोहिणी , हस्त , चित्रा , स्वाती , विशाखा , अनुराधा , अश्विनी , तीन उत्तरा ( उत्तरा , उत्तराषाढा , उत्तरा भाद्रपदा ), पुनर्वसु , पुष्य , रेवती , धनिष्ठा , या नक्षत्रांवर नवें वस्त्र धारण करावें . नव्या वस्त्राचें धारण रविवारीं केलें असतां तें लवकर जीर्ण होतें , सोमवारीं सतत उदकानें आर्द्र होतें , भौमवारीं शोककारक होतें , बुधवारीं धन देणारें होतें . गुरुवारीं ज्ञान देणारें होतें , शुक्रवारीम प्रियसंगतिदायक होतें , मंदवारीं मलदायक होतें . जी स्त्री रोहिणी , पुष्य , पुनर्वसु , आणि उत्तरा या नक्षत्रांवर नवें वस्त्र व नवा अलंकार धारण करिते , आणि शततारका नक्षत्रावर स्नान करिते , ती स्त्री पतीचा आश्रय करीत नाहीं . "

आतां अलंकार , वलय इत्यादि धारण सांगतो -

अथालंकारवलयादि दैवज्ञवल्लभः नासत्यपूषवसुभिः करपंचकेनमार्तंडभौमगुरुदानवमंत्रिवारे मुक्तासुवर्णमणिविद्रुमशंखदंतरक्तांबराणिविधृतानिभवंतिसिद्ध्यै ज्योतिर्निबंधे हस्तानुराधमृगपूषधनिष्ठयुक्तचित्रोत्तरासुचपुनर्वसुरोहिणीषु लग्नेस्थिरेरविसुतेंदुजजीववारेहेमादिधारणविधिः कथितोनराणाम् ‍ तत्रैवश्रीपतिः पौष्णाश्विनीवसुकरादिषुपंचकेषुकौसुंभहेममणिविद्रुमकाचशंखाः नार्याधृताः सुतसुखार्थकराभवंतिब्राह्मोत्तरादितिगुरुष्वसुखायभर्तुः तत्रैव शंखादिवररत्नानिपुष्यादित्युत्तरासुच रोहिण्यांनैवगृह्णीतभर्तुर्जीवितकांक्षिणी ॥

दैवज्ञवल्लभ - " अश्विनी , रेवती , धनिष्ठा , हस्त , चित्रा , स्वाती , विशाखा , अनुराधा , या नक्षत्रांवर ; रवि , भौम , गुरु , शुक्र , या वारीं ; मोतीं , सुवर्ण , मणि , पोंवळीं , शंखाचे व हस्तिदंताचे अलंकार , आणि रक्तवस्त्रें धारण केलीं असतां सिद्धिकारक होतात . " ज्योतिर्निबंधांत - " हस्त , अनुराधा , मृगशीर्ष , रेवती , धनिष्ठा , चित्रा , उत्तरा , पुनर्वसु , रोहिणी , या नक्षत्रांवर ; स्थिरलग्नावर ; शनि , बुध , गुरु , या वारीं ; मनुष्यांना सुवर्णादिकांचें धारण सांगितलें आहे . " तेथेंच श्रीपति - " रेवती , अश्विनी , धनिष्ठा , हस्त , चित्रा , स्वाती , विशाखा , अनुराधा , या नक्षत्रांवर ; कुसुंभानें रंगविलेलें वस्त्र , सुवर्ण , मणि , पोंवळीं , काचेचे व शंखाचे अलंकार , स्त्रियेनें धारण केले असतां पुत्र , सुख , द्रव्य देणारे होतात . आणि रोहिणी , तीन उत्तरा , पुनर्वसु , पुष्य , या नक्षत्रांवर धारण केले असतां भर्त्याला दुःखदायक होतात . " तेथेंच - " भर्त्याचें आयुष्य इच्छिणार्‍या स्त्रियेनें पुष्य , पुनर्वसु , तीन उत्तरा , आणि रोहिणी या नक्षत्रांवर शंखादिकांचे अलंकार आणि श्रेष्ठ रत्नें ग्रहण करुं नयेत . "

अथसूचीकर्म वासवादितिभत्वाष्ट्रमैत्रचांद्राश्विनीषुच सूचीकर्मतनुत्राणमेभिऋक्षैः प्रशस्यते अथशय्या हस्तादितिब्राह्मगुरुत्तराणिपौष्णाश्विमूलेंदूभचित्रभानि वारेषुजीवेंदुसितेंदुजानांशय्यासनारंभणमुत्तमंस्यात् ‍ अथशस्त्रधारणम् ‍ पुष्येचादितिचित्रपद्मतनयेशक्रोत्तरारेवतीस्वातीवाजिविशाखमित्रसहिते भानौगुरौभार्गवे कुंभेकीटगृहेवृषेमृगपतौचेंदौशुभैर्वीक्षितेसन्नाहः शरखड्गकुंतछुरिकाधार्यानृपाणांहिताः अथस्वामिसेवा चंडेश्वरः रोहिण्युत्तरपौष्णेषुवसुवारुणयोरपि सेवेतस्वामिनंभृत्यः शुभवारोदयेतथा ज्योतिर्निबंधे दासीदासादिभृत्यानांकुर्यात्संग्रहणंबुधैः स्थिरलग्नेशुभैर्दृष्टेमंदवारेविशेषतः ॥

आतां सूचीकर्म सांगतो - " धनिष्ठा , पुनर्वसु , चित्रा , अनुराधा , मृगशीर्ष , अश्विनी , या नक्षत्रांवर आंगरखा चिलखत वगैरे शिवण्याचें काम करणें प्रशस्त आहे . " आतां शय्या सांगतो - " हस्त , पुनर्वसु , रोहिणी , पुष्य , तीन उत्तरा , रेवती , अश्विनी , मूळ , मृगशीर्ष , चित्रा या नक्षत्रांवर ; गुरु , चंद्र , शुक्र , बुध , यांच्या वारीं ; शय्या , आसन यांचा आरंभ करणें उत्तम आहे . " आतां शस्त्रधारण सांगतो - " पुष्य , पुनर्वसु , चित्रा , रोहिणी , ज्येष्ठा , तीन उत्तरा , रेवती , स्वाती , अश्विनी , विशाखा , अनुराधा , या नक्षत्रांवर ; रवि , गुरु , शुक्र या वारीं ; वृषभ , सिंह , वृश्चिक , कुंभ या लग्नांवर ; चंद्र शुभग्रहावलोकित असतां राजांनीं चिलखत वगैरे चढविणें ; बाण , खड्ग , कुंत , छुरिका इत्यादि शस्त्रें धारण करणें ; हितकारक आहेत . " आतां स्वामिसेवा सांगतो - चंडेश्वर - " रोहिणी , तीन उत्तरा , रेवती , धनिष्ठा , शततारका , या नक्षत्रांवर ; शुभवारीं व शुभ लग्नावर चाकरानें धन्याची सेवा करण्यास आरंभ करावा . " ज्योतिर्निबंधांत - " विद्वानांनीं दासी , दास , चाकर इत्यादिकांचा संग्रह शुभग्रहांनीं अवलोकित अशा स्थिर लग्नावर विशेषेंकरुन मंदवारीं करावा . "

आतां हत्ती , घोडे , मेणा यांच्यावर आरोहण सांगतो -

अथगजाश्वदोलाः सएव पौष्णप्रजेशादितिभद्वयानिहस्तादिषट्कश्रवणोत्तराणि दोलादिमातंगतुरंगमाणामारोहणेभीष्टफलप्रदानि अथनृत्यम् ‍ हस्तः पुष्योवासवंरोहिणीचज्येष्ठापौष्णंवारुणंचोत्तराश्च पूर्वाचार्यैः कीर्तितश्चक्रवर्तीनृत्यारंभेशोभनोऽयंभवर्गः अथराजदर्शनं श्रीपतिः मृगाश्विपुष्यश्रवणश्रविष्ठाहस्तध्रुवत्वाष्ट्रभपूषभानि मैत्रेणयुक्तानिनरेश्वराणांविलोकनेभानिशुभप्रदानि अथक्रयविक्रयौ भाद्रद्वयत्रिदशमंत्रिदिवाकरेषुमूलानिलोत्तरतुरंगमरेवतीषु सारंगपाणिरजनीकरमैत्रभेषुलाभः सदैवभवतिक्रयविक्रयाभ्यां वस्त्रेतु चित्राशतभिषास्वातीरेवतीचाश्विनीशुभा श्रवणश्चतथाप्रोक्तावस्त्राणांक्रयणेशुभाः अथसेतुः स्वातीयुक्तेमंदवारेवृषलग्नेशुभेदिने सेतूनांबंधनंकार्यंध्रुवभेचार्कजीवयोः ॥

तोच चंडेश्वर - " रेवती , अश्विनी , रोहिणी , मृग , पुनर्वसु , पुष्य , हस्त , चित्रा , स्वाती , विशाखा , अनुराधा , ज्येष्ठा , श्रवण , उत्तरा , उत्तराषाढा , उत्तराभाद्रपदा , हीं नक्षत्रें डोली , मेणा , हत्ती , घोडे इत्यादिकांवर बसण्यास प्रशस्त आहेत . " आतां नृत्य सांगतो - " हस्त , पुष्य , धनिष्ठा , रोहिणी , ज्येष्ठा , रेवती , शततारका , तीन उत्तरा हीं श्रेष्ठ नक्षत्रें नृत्याच्या आरंभाविषयीं प्रशस्त आहेत . " आतां राजदर्शन सांगतो - श्रीपति - " मृग , अश्विनी , पुष्य , श्रवण , धनिष्ठा , हस्त , रोहिणी , तीन उत्तरा , चित्रा , रेवती , अनुराधा , हीं नक्षत्रें राजांच्या दर्शनाविषयीं शुभकारक आहेत . " आतां क्रय आणि विक्रय सांगतो - " पूर्वाभाद्रपदा , उत्तराभाद्रपदा , पुष्य , हस्त ; मूल , स्वाती , तीन उत्तरा , अश्विनी , रेवती , श्रवण , मृगशीर्ष , अनुराधा , या नक्षत्रांवर खरेदी आणि विक्री केली असतां सर्वदा लाभ होतो . " वस्त्राविषयीं तर सांगतो - " चित्रा , शततारका , स्वाती , रेवती , अश्विनी आणि श्रवण , हीं नक्षत्रें वस्त्रांची खरेदी करण्याविषयीं शुभ आहेत . " आतां सेतुबंधन सांगतो - " स्वातीनक्षत्रयुक्त मंदवारीं शुभदिवशीं वृषभ लग्नावर सेतुबंधन करावें . आणि रविवारीं व गुरुवारीं ध्रुव ( रोहिणी , तीन उत्तरा ) नक्षत्रावर सेतुबंधन करावें . "

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP