TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
मुलास पाळण्यांत घालणें

तृतीयपरिच्छेद - मुलास पाळण्यांत घालणें

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


मुलास पाळण्यांत घालणें

आतां दोलारोह ( मुलास पाळण्यांत घालणें ) सांगतो.
अथदोलारोहः पारिजातेबृहस्पतिः दोलारोहस्तुकर्तव्योदशमेद्वादशेपिवा षोडशेदिवसेवापिद्वाविंशेदिवसेपिवा ज्योतिर्निबंधे करत्रयेवैष्णवरेवतीष्वदितिद्वयेवाश्विनकध्रुवेषु कुर्याच्छिशूनांनृपतेश्चतद्वदांदोलनंवैसुखिनोभवंति तत्रैव आंदोलाशयनेपुंसोद्वादशोदिवसः शुभः त्रयोदशस्तुकन्यायाननक्षत्रविचारणा अन्यस्मिन्दिवसेचेत्स्यात्तिर्यगास्येप्रशस्यते अथ दुग्धपानं नृसिंहः एकत्रिंशद्दिनेचैवपयः शंखेनपाययेत् अन्नप्राशननक्षत्रेदिवसोदयराशिषु ।

पारिजातांत बृहस्पति - “ जन्मदिवसापासून दहाव्या किंवा बाराव्या, अथवा सोळाव्या, किंवा बेविसाव्या दिवशीं दोलारोह करावा. ” ज्योतिर्निबंधांत - “ हस्त, चित्रा, स्वाती, श्रवण, रेवती, पुनर्वसु, पुष्य, अश्विनी, रोहिणी, तीन उत्तरा, ह्या नक्षत्रांवर शिशूंचें व राजाचें आंदोलन करावें, म्हणजे ते सुखी होतात. ” ज्योतिर्निबंधांतच - “ पाळण्यांत घालण्याविषयीं पुरुषास बारावा दिवस शुभ होय; आणि कन्येस तेरावा दिवस शुभ, त्या दिवशीं नक्षत्रविचार करण्यास नको. याहून इतर दिवशीं पाळण्यांत घालणें असेल तर तिर्यड्मुख नक्षत्रांवर प्रशस्त जाणावें. ” आतां दुग्धपान सांगतो - नृसिंह - “ जन्मदिवसापासून एकतिसाव्या दिवशीं, व अन्नप्राशनोक्त नक्षत्रांवर, दिवसा उदय झालेल्या लग्नावर शंखानें मुलास दूध पाजावें. ”

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:50:16.9100000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

वांकडा, वाकडा

  • a  Crooked. Hostile. Perverse. 
  • वांकडें पडणें Arise (between parties)-a misunderstanding. 
RANDOM WORD

Did you know?

जुळी मुले झाली असतां शांति करावी काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.