TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
शूद्राचे संस्कार

तृतीयपरिच्छेद - शूद्राचे संस्कार

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


शूद्राचे संस्कार

आतां शूद्राचे संस्कार सांगतो -

अथशूद्रसंस्काराः यमः शूद्रोप्येवंविधः कार्योविनामंत्रेणसंस्कृतः नकेनचित्समसृजच्छंदसातंप्रजापतिः छंदसामंत्रेण व्यासोपि गर्भाधानंपुंसवनंसीमंतोजातकर्मच नामक्रियानिष्क्रमोन्नप्राशनंवपनक्रिया कर्णवेधोव्रतादेशोवेदारंभक्रियाविधिः केशांतः स्नानमुद्वाहोविवाहाग्निपरिग्रहः त्रेताग्निसंग्रहश्चैवसंस्काराः षोडशस्मृताइत्युक्त्वाह नवैताः कर्णवेधांतामंत्रवर्जंस्त्रियाः क्रियाः विवाहोमंत्रतस्तत्याः शूद्रस्यामंत्रतोदशेति मदनरत्नेहिरण्यगर्भदानेतु गर्भाधानंपुंसवनंसीमंतोन्नयनंतथा कुर्युर्हिरण्यगर्भस्यततस्तेद्विजपुंगवा इत्युक्त्वा जातकर्मादिकाः कुर्यात्क्रियाः षोडशचापराइत्यत्रस्त्रियाजातकर्मनामकरणनिष्क्रमणान्नप्राशनचूडा विवाहाः षट् ‍ शूद्राणांतुषडेतेपंचमहायज्ञाश्चेत्येकादशेत्युक्तम् ‍ रुपनारायणहरिहरभाष्ययोरप्येवम् ‍ शार्ड्गधरस्तु द्विजानांषोडशैवस्युः शूद्राणांद्वादशैवहि पंचैवमिश्रजातीनांसंस्काराः कुलधर्मतः वेदव्रतोपनयनमहानाम्नीमहाव्रतम् ‍ विनाद्वादशशूद्राणांसंस्कारानाममंत्रत इत्याह अपरार्कस्तु गर्भाधानमृतौपुंसइत्यत्राह एतच्चातुर्वर्ण्यपरम् ‍ नद्विजातिमात्रपरम् ‍ तथासत्युपनयनंविधायवाच्यंस्यादिति तेनतन्मतेष्टौभवंति ब्राह्मेतु विवाहमात्रसंस्कारंशूद्रोपिलभतांसदेत्युक्तम् ‍ अत्रसदसच्छूद्रगोचरत्वेनदेशभेदाद्व्यवस्था यत्तुमनुः नशूद्रेपातकंकिंचिन्नसंस्कारमर्हतीति तदर्थमाहमेधातिथिः यत्सामान्यतोनिषिद्धंस्तेयानृतादिनतदतिक्रमेस्यपापंयथाद्विजानाम् ‍ उपनयनरुपंसंस्कारंचनार्हतीति तेचतूष्णींकार्याः शूद्रोवर्णश्चतुर्थोपिवर्णत्वाद्धर्ममर्हति वेदमंत्रस्वधास्वाहावषट्‍कारादिभिर्विनेतिव्यासोक्तेः अमंत्रस्यतुशूद्रस्यमंत्रोविप्रेणगृह्यतेइति मरीच्युक्तेश्च इयंपरिभाषासर्वार्था तेनशूद्रधर्मेषुसर्वत्रविप्रेणमंत्रः पठनीयः सोपिपौराणएवेतिशूलपाणिः एवंस्त्रीणामपीतिदिक् ‍ इतिरामकृष्णभट्टात्मजकमलाकरभट्टकृतेनिर्णयसिंधौसंस्कारनिर्णयः ॥

यम - " याप्रमाणें शूद्राचेही संस्कार मंत्रावांचून ( अमंत्रक ) करावे , प्रजापतीनें कोणत्याही मंत्रासह त्यास उत्पन्न केलेला नाहीं . " व्यासही - " गर्भाधान , पुंसवन , सीमंतोन्नयन , जातकर्म , नामकरण , निष्क्रमण , अन्नप्राशन , चौल , कर्णवेध , व्रतबंध , वेदारंभविधि , केशांत , समावर्तन , विवाह , गृह्याग्नीचें आधान , श्रौताग्नीचें आधान , हे सोळा संस्कार म्हटले आहेत " असें बोलून सांगतो - " यांपैकीं कर्णवेधापर्यंतचे नऊ संस्कार स्त्रियांचे मंत्ररहित करावे . आणि स्त्रियेचा विवाहसंस्कार मंत्रांनीं करावा . शूद्राचे हे दहा संस्कार अमंत्रक करावे . " मदनरत्नांत हिरण्यगर्भदानप्रकरणांत तर - " हिरण्यगर्भाचे गर्भाधान , पुंसवन , सीमंतोन्नयन , हे संस्कार त्या ब्राह्मणश्रेष्ठांनीं करावे . " असें सांगून " इतर जातकर्मादिक षोडश संस्कारही करावे . " या ठिकाणीं स्त्रियांना जातकर्म , नामकरण , निष्क्रमण , अन्नप्राशन , चौल , विवाह हे सहा संस्कार सांगितले आहेत . शूद्रांना तर - हे सहा संस्कार आणि पंचमहायज्ञ पांच मिळून अकरा आहेत , असें सांगितलें आहे . रुपनारायणग्रंथांत आणि हरिहरभाष्यांतही असेंच सांगितलें आहे . शार्ड्गधर तर - " द्विजांनाच सोळा संस्कार होतात . शूद्रांना बाराच होतात . मिश्रजातींना कुलधर्मानें पांचच संस्कार होतात . वेदव्रत , उपनयन महानाम्नी आणि महाव्रत हे चार वर्ज्य करुन बाकीचे बारा संस्कार शूद्रांचे नाममंत्रानें होतात " असें सांगतो . अपरार्क तर - " ऋतुकालीं गर्भाधान इत्यादि संस्कार करावे " या वचनावर सांगतो - हें वचन चारी वर्णांविषयीं आहे . द्विजातिविषयक नाहीं . द्विजातिविषयकच आहे असें म्हटलें तर , उपनयन विधान करुन सांगावयाचें होतें . यावरुन अपरार्काचे मतीं गर्भाधान , पुंसवन , जातकर्म , नामकरण , निष्क्रमण , अन्नप्राशन , चूडा , विवाह , हे आठ संस्कार शूद्रांचे होतात . ब्राह्मांत तर " विवाह मात्र संस्कार शूद्रालाही प्राप्त व्हावा . " असें सांगितलें आहे . ह्या वर सांगितलेल्या प्रकारांची व्यवस्था सच्छूद्रांना व असच्छूद्रांना धरुन करावी , किंवा देशभेदानें करावी . आतां जें मनु - " शूद्राला कोणतेंही पातक नाहीं . आणि तो शूद्र संस्कारास योग्य होत नाहीं . ’’ या वचनाचा अर्थ सांगतो मेधातिथि - ‘ जें चौर्य , अनृत इत्यादिक सामान्यतः निषिद्ध म्हणून सांगितलें आहे , त्याचा अतिक्रम ( उल्लंघन ) केला असतां जसें द्विजांना पाप आहे तसें शूद्राला पाप नाहीं . आणि शूद्र उपनयनरुप संस्काराला योग्य होत नाहीं . ’ ते शूद्रांचे संस्कार अमंत्रक करावे . कारण , " चवथा शूद्रवर्ण हा वर्ण असल्यामुळें धर्माला योग्य होतो . हा प्रकार वेदमंत्र , स्वधा , स्वाहा , वषटकार इत्यादिकांवांचून समजावा " असें व्यासवचन आहे . ‘‘ मंत्ररहित अशा शूद्रांचा मंत्र ब्राह्मणानें उच्चारावा . " असें मरीचिवचनही आहे . ही परिभाषा ( नियम ) सर्वत्र लागू आहे . यावरुन शूद्रधर्मांचे ठायीं सर्वत्र ठिकाणीं ब्राह्मणानें मंत्र पठण करावा , तो मंत्रही पौराणिकच असावा , असें शूलपाणी सांगतो . याचप्रमाणें स्त्रियांना देखील समजावें . ही दिशा दाखविली आहे .

इति निर्णयसिंधौ भाषाटीकायां संस्कारनिर्णयः ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:50:19.1130000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

storm rainfall

 • वादळी वृष्टी 
RANDOM WORD

Did you know?

देवाचे तीर्थ ग्रहण करण्यासंबंधी शास्त्रीय संकेत कोणते?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Total Pages: 46,537
 • Hindi Pages: 4,555
 • Dictionaries: 44
 • Words in Dictionary: 302,181
 • Marathi Pages: 27,517
 • Tags: 2,685
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,230
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.