TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
औषध सेवनाविषयीं मुहूर्त

तृतीयपरिच्छेद - औषध सेवनाविषयीं मुहूर्त

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


औषध सेवनाविषयीं मुहूर्त

आतां औषध सेवनाविषयीं मुहूर्त सांगतो -

अथभेषजं चंडेश्वरः मूलानुराधमृगतिष्यपुनर्वसौचपौष्णाश्विनीश्रवणशक्रकरत्रयेच वारेषुवाक्पतिसितेंदुदिनेषुशस्तंभैषज्यभक्षणममीषुहितंनराणाम् ‍ अथारोग्यस्नानम् ‍ श्रीपतिः इंदोर्वारेभार्गवेच ध्रुवेषुसार्पादित्यस्वातियुक्तेषुभेषु पित्र्येचांतेवापिकुर्यात्कदाचिन्नैवस्नानंरोगनिर्मुक्तजंतुः चरेविलग्नेरविभौमवारेरिक्तेतिथौस्याद्बहुलेचपक्षे धिष्ण्येचरेरोगनिपीडितानांस्नानंनराणांनिरुजत्वकारि अथदंतधावनम् ‍ पृथ्वीचंद्रोदयेविष्णुः प्रतिपद्दर्शषष्ठीषुचतुर्दश्यष्टमीषुच नवम्यांभानुवारेचदंतकाष्ठंविवर्जयेत् ‍ नारदः चतुर्दश्यष्टमीपौर्णमासीसंक्रमणेषुच नंदासुचनवम्यांचदंतकाष्ठंविवर्जयेत् ‍ श्राद्धेयज्ञेचनियमेतथाप्रोषितभर्तृका व्यतीपातेचसंक्रांत्यांनंदाभूताष्टपर्वसु तैलंक्षौरंरतिंमांसंदंतकाष्ठंचवर्जयेत् ‍ वसिष्ठः शन्यर्कशुक्रवारेषुकुजाहेव्रतवासरे जन्माहेश्राद्धदिवसेदंतकाष्ठंविवर्जयेत् ‍ हेमाद्रौस्कांदे अभ्यंगेजलधिस्नानेदंतधावनमैथुने जातेचनिधनेचैवतत्कालव्यापिनीतिथिः संवर्तः रवौविवाहआशौचेवर्जयेद्दंतधावनं व्यासः अलाभेदंतकाष्ठानांनिषिद्धानांतथातिथौ अपांद्वादशगंडूषैर्विदध्याद्दंतधावनम् ‍ ॥

चंडेश्वर - " मूल , अनुराधा , मृग , पुष्य , पुनर्वसु , रेवती , अश्विनी , श्रवण , ज्येष्ठा , हस्त , चित्रा , स्वाती , ह्या नक्षत्रांवर गुरु , शुक्र , सोम ह्या वारीं औषधभक्षण शुभ होय . " आतां आरोग्यस्नान श्रीपति - " तीन उत्तरा , रोहिणी , आश्लेषा , पुनर्वसु , स्वाती , मघा , रेवती , ह्या नक्षत्रीं ; सोम व शुक्र ह्या वारीं रोगमुक्त मनुष्यानें कदापि स्नान करुं नये . चर लग्न ; रवि व भौमवार ; रिक्ता तिथि ; श्रवण , धनिष्ठा , शततारका नक्षत्रें ; व शुक्लपक्ष अशा कालीं रोगमुक्त मनुष्यांनीं स्नान करावें . " आतां दंतधावन सांगतो - पृथ्वीचंद्रोदयांत विष्णु - " प्रतिपदा , अमावास्या , षष्ठी , चतुर्दशी , अष्टमी , नवमी , रविवार ह्या दिवशीं काष्ठानें दंतधावन करुं नये . " नारद - " चतुर्दशी , अष्टमी , पौर्णिमा , संक्रांति , प्रतिपदा , षष्ठी , एकादशी , आणि नवमी , श्राद्धदिवस , यज्ञ , व्रतदिवस , ह्या दिवशीं काष्ठानें दंतधावन करुं नये . ज्या स्त्रियेचा पति प्रवासांत असेल तिनेंही करुं नये . " व्यतीपात , संक्रांति , प्रतिपदा , षष्ठी , एकादशी , चतुर्दशी , अष्टमी , अमावास्या , पौर्णिमा ह्या दिवशीं तैलभक्षण , क्षौर , मैथुन , मांसभक्षण , काष्ठानें दंतधावन हीं करुं नयेत . वसिष्ठ - " शनि , रवि , शुक्र , मंगळ ह्या वारीं ; व्रतदिवशीं , जन्मदिवशीं , श्राद्धदिवशीं , काष्ठानें दंतधावन करुं नये . " हेमाद्रींत स्कंदपुराणांत - " अभ्यंग , समुद्रस्नान , दंतधावन , मैथुन , उत्पत्ति , मरण , ह्यांविषयीं तिथि घ्यावयाची ती त्या वेळीं असलेली घ्यावी . " संवर्त - " रविवारीं , विवाहांत , व आशौचांत दंतधावन वर्ज्य करावें . " व्यास - " दंतधावनाचीं काष्ठें मिळत नसतील त्यावेळीं किंवा निषिद्धतिथि असतां त्या दिवशीं उदकाचे बारा चूळ करुन दंतांचें धावन करावें . "

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:50:20.3030000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

factor matrix

 • घटक सारणी 
 • घटक आव्यूह 
 • घटकभार सारणी 
RANDOM WORD

Did you know?

स्पंदशास्त्र हे काय आहे?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Total Pages: 46,537
 • Hindi Pages: 4,555
 • Dictionaries: 44
 • Words in Dictionary: 302,181
 • Marathi Pages: 27,517
 • Tags: 2,685
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,230
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.