मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
वधूप्रवेश

तृतीयपरिच्छेद - वधूप्रवेश

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां वधूप्रवेश सांगतो -

अथवधूप्रवेशः जयतुंगे मार्गशीर्षेतथामाघेमाधवेज्येष्ठसंज्ञके सुप्रशस्तेभवेद्वेश्मप्रवेशोनवयोषिताम् ‍ नारदः आरभ्योद्वाहदिवसात्षष्ठेवाप्यष्टमेदिने वधूप्रवेशः संपत्यैदशमेथसमेदिने संग्रहे विवाहमारभ्य वधूप्रवेशोयुग्मेदिनेषोडशवासरांतात् ‍ ऊर्ध्वंततोऽब्देऽयुजिपंचमांतादतः परस्तान्नियमोनचास्ति नारदः समेवर्षेसमेमासियदिनारीगृहंव्रजेत् ‍ आयुष्यंहरतेभर्तुः सानारीमरणंव्रजेत् ‍ प्रयोगरत्नेतु वधूप्रवेशः प्रथमे तृतीयेशुभप्रदः पंचमकेथवाह्नि द्वितीयकेवाथचतुर्थकेवाषष्ठेवियोगामयदुःखदःस्यादित्युक्तं तत्रमूलंचिंत्यम् ‍ वृद्धवसिष्ठोपि षष्ठाष्टमेवादशमेदिनेवाविवाहमारभ्यवधूप्रवेशः पंचांगसंशुद्धदिनंविनापिविधावसद्गोचरगेपिकार्यः लल्लः स्वभवनपुरप्रवेशेदेशानांविप्लवेतथोद्वाहे नववध्वागृहगमनेप्रतिशुक्रविचारणानास्ति मांडव्यः नित्ययानेगृहेजीर्णेप्राशनांतेषुसप्तसु वधूप्रवेशेमांगल्येनमौढ्यंगुरुशुक्रयोः ज्योतिः प्रकाशे वामेशुक्रेनवोढायाः सुखंहानिश्चदक्षिणे धनंधान्यंचपृष्ठस्थेसर्वनाशः पुरः स्थिते नवोढायास्तुवैधव्यंयदुक्तंसंमुखे भृगौ तदेवविबुधैर्ज्ञेयंकेवलंतुद्विरागमे पूर्वतोभ्युदितेशुक्रेप्रयायाद्दक्षिणापरे पश्चादभ्युदितेचैवयायात्पूर्वोत्तरेदिशौ व्यवहारतत्त्वे पौष्णात् ‍ कभाच्चश्रवणाच्चयुग्मेहस्तत्रयेमूलमधोत्तरासु पुष्येचमैत्रेचवधूप्रवेशोरिक्तेतरेव्यर्ककुजेचशस्तः गर्गः व्यतीपातेचसंक्रांतौग्रहणेवैधृतावपि श्राद्धंविनाशुभंनैवप्राप्तकालेपिमानवः तथा अमासंक्रांतिविष्ट्यादौप्राप्तकालेपिनाचरेदिति ॥

जयतुंगांत - ‘‘ मार्गशीर्ष , माघ , वैशाख , आणि ज्येष्ठ या मासांत नूतनविवाहित स्त्रियांचा गृहप्रवेश प्रशस्त आहे . " नारद - " विवाहदिवसापासून सहाव्या , किंवा आठव्या अथवा दहाव्या व इतर सम दिवशीं वधूप्रवेश संपत्तिदायक होतो . " संग्रहांत - " विवाहदिवसापासून सोळा दिवसांचे आंत सम दिवशीं वधूप्रवेश शुभ आहे . सोळा दिवसांचे पुढें पांच वर्षांचे आंत विषमवर्षीं शुभ आहे . पांच वर्षांच्या पुढें हा समविषमांचा नियम नाहीं . " नारद - " विवाहापासून समवर्षीं व सममासांत जर स्त्री गृहप्रवेश करील तर ती भर्त्याचें आयुष्य हरण करील आणि ती स्त्री मरेल . " प्रयोगरत्नांत तर - " विवाहापासून पहिल्या , तिसर्‍या , अथवा पांचव्या दिवशीं ; तसाच दुसर्‍या किंवा चवथ्या दिवशीं वधूप्रवेश शुभदायक आहे . सहाव्या दिवशीं वधूप्रवेश वियोग , व्याधि इत्यादि दुःखदायक आहे . " असें सांगितलें आहे . या वचनांविषयीं मूलवचन चिंत्य ( प्रमाणशून्य ) आहे . वृद्धवसिष्ठही - " विवाहदिवसापासून सहाव्या किंवा आठव्या , अथवा दहाव्या दिवशीं पंचांगशुद्धि नसली तरी , आणि चंद्रबळ नसलें तरी वधूप्रवेश करावा . " लल्ल - " आपल्या घरीं व आपल्या नगरीं जावयाचें असतां , देशाचा विध्वंस होतेसमयीं कोठें गमन करावयाचें असतां , विवाहाकरितां जाणें असतां , नववधूचा गृहप्रवेश करावयाचा असतां , संमुख शुक्रदोषाचा विचार करुं नये . " मांडव्य - " नेहमींचें जाणें , जीर्णगृहाची दुरुस्ता करणें , गर्भाधानादिक अन्नप्राशनापर्यंतचे सात संस्कार करणें , वधूप्रवेश , आणि मांगलिक कृत्य यांविषयीं गुरुशुक्रांचा अस्तदोष नाहीं . " ज्योतिः प्रकाशांत - " नूतनविवाहित स्त्रियेच्या गृहप्रवेशसमयीं वामभागीं शुक्र असतां सुख होतें . दक्षिणभागीं शुक्र असतां हानि होते . पृष्ठभागीं शुक्र असतां धनधान्यप्राप्ति होते . आणि संमुख शुक्र असतां सर्वनाश होतो . संमुख शुक्र असतां नूतन विवाहित स्त्रियेला वैधव्य प्राप्त होतें , असें जें सांगितलें तेंच विद्वानांनीं केवळ द्विरागमनाविषयीं समजावें . शुक्राचा उदय पूर्वेस असतां दक्षिणेस आणि पश्चिमेस जावें . शुक्राचा उदय पश्चिमेस असतां पूर्वेस आणि उत्तरेस जावें . " व्यवहारतत्त्वांत - सोळा दिवसांच्या पुढें वधूप्रवेशास दिवस - " रेवती , अश्विनी , रोहिणी , मृग , श्रवण , धनिष्ठा , हस्त , चित्रा , स्वाती , मूळ , मघा , तीन उत्तरा , पुष्य , अनुराधा , ह्या नक्षत्रांवर ; रिक्ता तिथि सोडून बाकींच्या तिथींस ; रवि आणि भौमवार वर्ज्य करुन बाकीच्या वारीं वधूप्रवेश शुभ आहे . " गर्ग - " व्यतीपात , संक्रांति , सूर्यचंद्रांचें ग्रहण , वैधृति यांजवर श्राद्धावांचून इतर कर्म शुभदायक होत नाहीं ; म्ह० इतर कर्माचा काल प्राप्त असला तरी तें कर्म त्या दिवशीं मनुष्यानें करुं नये . " तसेंच - " अमावास्या , संक्रांति , विष्टि इत्यादि दुष्ट दिवस असतां कर्माचा काल प्राप्त असला तरी तें कर्म त्यादिवशीं करुं नये . "

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP