मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
पुनः प्रतिष्ठा

तृतीयपरिच्छेद - पुनः प्रतिष्ठा

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां पुनः प्रतिष्ठा सांगतो -

अथपुनः प्रतिष्ठा तामधिकृत्यहयशीर्षपंचरात्रे चांडालमद्यसंस्पर्शदूषितावह्निनाथवा अपुण्यजनसंस्पृष्टाविप्रक्षतजदूषिता संस्कार्येतिशेषः पदार्थादर्शेब्राह्मे खंडितेस्फुटितेदग्धेभ्रष्टेमानविवर्जिते यागहीनेपशुस्पृष्टेपतितेदुष्टभूमिषु अन्यमंत्रार्चितेचैवपतितस्पर्शदूषिते दशस्वेतेषुनोचक्रुः सन्निधानंदिवौकसः यागः पूजा पशुर्गर्दभादिः पंचरात्रे खंडितास्फुटितादग्धायस्मादर्चाभयावहा तस्मात्समुद्धरेत्तांतुपूर्वोक्तविधिनानरः अर्चाभंगादावुपवासः कार्यः नराज्ञोविप्लवेश्नीयात्सुरार्चाविप्लवेतथेति विष्णुधर्मोक्तेः सिद्धांतशेखरेचौरचंडालपतितश्वोदक्यास्पर्शनेसति शवाद्युपहतौचैवप्रतिष्ठांपुनराचरेत् ‍ पंचरात्रे अंगादंगादिसंधानेप्रतिष्ठांपुनराचरेत् ‍ जलाधिवासविहितनेत्रोन्मीलनवर्जिताम् ‍ शुद्धिविवेकेविष्णुः द्रव्यवत्कृतशौचानांदेवतार्चानांभूयः प्रतिष्ठापनेनशुद्धिरिति अर्चाः प्रतिमाः तद्द्रव्यस्तताम्रादेरुक्तशौचंकृत्वा पुनः प्रतिष्ठांकुर्यादित्यर्थः स्मृत्यर्थसारेऽप्येवम् ‍ ॥

पुनः प्रतिष्ठेचा उपक्रम करुन सांगतो - हयशीर्षपंचरात्रांत - " देवाची मूर्ति चांडाल , मद्य यांच्या स्पर्शानें दूषित झाली , अथवा अग्नीनें दग्ध झाली , किंवा पापीजनांच्या स्पर्शानें दूषित झाली , अथवा ब्राह्मणाच्या रक्तानें दूषित झाली तर त्या मूर्तीची पुनः प्रतिष्ठा करावी . " पदार्थादर्शांत ब्राह्मांत - " देवाच्या मूर्तीचे तुकडे उडाले , मूर्ति फुटली , दग्ध झाली , स्थानभ्रष्ट झाली , अपमानित झाली , पूजारहित झाली , कुत्रा गर्दभ इत्यादिक नीच पशूनें स्पष्ट झाली , दूषित भुईवर पडली , शूद्रादिकांनीं पूजित झाली , पतित - रजस्वला इत्यादिकांच्या स्पर्शानें दूषित झाली , ह्या दहा प्रकारांतून कोणताही प्रकार झाला असतां त्या मूर्तीचे ठायीं देव राहात नाहींत . " पंचरात्रांत - " ज्या कारणास्तव खंड झालेली , फुटलेली , व दग्ध झालेली प्रतिमा भय उत्पन्न करणारी आहे त्या कारणास्तव पूर्वीं सांगितलेल्या विधीनें तसल्या प्रतिमेचा उद्धार करावा . " देवाच्या मूर्तीचा भंग वगैरे झाला असतां उपवास करावा . कारण , " राजाचा नाश झाला असतां भोजन करुं नये . तसेंच देवाच्या मूर्तीचा भंग झाला असतां भोजन करुं नये " असें विष्णुधर्मांत वचन आहे . सिद्धांतशेखरांत - " चोर , चांडाल , पतित , कुत्रा , रजस्वला , आणि शव इत्यादिकांचा स्पर्श झाला असतां पुनः प्रतिष्ठा करावी . " पंचरात्रांत - " अंगादिकांचें संधान झालें असतां जलाधिवासांत विहित जें नेत्रोन्मीलन तें वर्ज्य करुन पुनः प्रतिष्ठा करावी . " शुद्धिविवेकांत विष्णु - " ताम्रादि धातूंच्या प्रतिमा दूषित झाल्या असतील तर त्या त्या धातूंची जी शुद्धि सांगितली असेल ती शुद्धि त्या प्रतिमांची करुन पुनः प्रतिष्ठा करावी , म्हणजे शुद्धि होते . " म्हणजे त्या ताम्रादि धातूला सांगितलेली शुद्धि करुन त्या प्रतिमांची पुनः प्रतिष्ठा करावी , असा भाव . स्मृत्यर्थसारांतही असेंच सांगितलें आहे .

पुनः प्रतिष्ठेचा विधि सांगतो -

तद्विधिर्बौधायनसूत्रे पूर्वप्रतिष्ठितस्याबुद्धिपूर्वमेकरात्रंद्विरात्रमेकमासंद्विमासंवार्चनादिविच्छेदेशूद्ररजस्वलाद्युपस्पर्शनेपूर्वोक्तेकालेपुण्याहंवाचयित्वायुग्मान् ‍ ब्राह्मणान् ‍ भोजयित्वानिशायांजलाधिवासंकृत्वाश्वोभूतेकलशपूर्णेनपंचगव्येनतत्तन्मंत्रैः स्नापयित्वाऽन्यंकलशंशुद्धोदकेनापूर्यतस्मिन्नवरत्नानिप्रक्षिप्य तंकलशंतत्तद्गायत्र्याष्टसहस्त्रमष्टशतमष्टाविंशतिवारंवाभिमंत्र्यतेनोदकेनदेवंस्नापयेत्ततः शुद्धोदकेनस्नापयेदष्टसहस्त्रमष्टशतमष्टाविंशतिंवापुरुषसूक्तेनमूलमंत्रेणच ततः पुष्पाणिदत्वायथासंभवमर्चयित्वागुडौदनंनिवेदयेदिति बुद्धिपूर्वंतुविच्छेदेपूर्वोक्तांप्रतिष्ठांपुनः कुर्यात् ‍ पूर्वोक्तविष्णुवचनात् ‍ इदंमलमासशुक्रास्तादावपिकार्यमितिमदनरत्नेहेमाद्रौच देवार्चाप्रासादभेदनेतु शूलपाणौकाश्यपः वापीकूपारामसेतुसभातडागवप्रदेवतायतनभेदनेप्रायश्चित्तंचतस्त्र आज्याहुतीर्जुहुयात् ‍ इदंविष्णुर्मानस्तोकेविष्णोः कर्माणिपादोस्येति यांदेवतामुत्सादयति तस्यैदेवतायैब्राह्मणान् ‍ भोजयेदिति शंखलिखितौ प्रतिमारामकूपसंक्रमध्वजसेतुनिपातभंगेषुतत्समुत्थानंप्रतिसंस्कारोऽष्टशतंचनिपातितानामिति समुत्थानं प्रतिक्रिया प्रतिसंस्कारः पुनः प्रतिष्ठा अष्टशतंपणादंडश्चेत्यर्थः ॥

बौधायनसूत्रांत - " पूर्वीं प्रतिष्ठित देवाची साहजिक ( मुद्दाम होऊन नव्हे ) एक दिवस , दोन दिवस , किंवा एक महिना दोन महिनेपर्यंत पूजा वगैरे झालेली नसेल ; अथवा शूद्र , रजस्वला इत्यादिकांचा स्पर्श झाला असेल ; तर पूर्वीं सांगितलेल्या सुमुहूर्तावर पुण्याहवाचन करुन युग्म ब्राह्मणांना भोजन घालून रात्रीं जलाधिवास करुन दुसर्‍या दिवशीं कलश करुन पंचगव्य घेऊन त्या पंचगव्यानें त्या त्या मंत्रांनीं स्नान घालून दुसरा कलश शुद्धोदकानें भरुन त्या कलशांत नवरत्नें टाकून त्या कलशाचें त्या त्या देवतेच्या गायत्रीनें अष्टसहस्त्र , अथवा अष्टशत , किंवा अष्टाविंशतिवार अभिमंत्रण करुन त्या उदकानें देवाला स्नान घालावें . नंतर शुद्धोदक घेऊन पुरुषसूक्तानें आणि मूलमंत्रानें अष्टसहस्त्र , किंवा अष्टशत अथवा अष्टाविंशतिवार स्नान घालावें . तदनंतर पुष्पें समर्पण करुन यथासंभव पूजा करुन गुडौदनाचा नैवेद्य दाखवावा . " पूजादिकांचा विच्छेद मुद्दाम दोऊन केलेला असेल तर वर सांगितलेल्या विष्णुवचनावरुन पूर्वीं सांगितलेली प्रतिष्ठा पुनः करावी . ही पुनः प्रतिष्ठा मलमासांत व शुक्रादिकांच्या अस्तादिकांतही करावी , असें मदनरत्नांत हेमाद्रींत सांगितलें आहे . देवाची मूर्ति , देवाचा प्रासाद यांचा भेद केला असेल तर सांगतो . शूलपाणींत काश्यप - " वापी , कूप , आराम ( उपवन ), पूल , सभा , तलाव , प्राकार , देवालय यांचा भेद केला असेल तर प्रायश्चित्त करावें ; तें असें - ‘ इदंविष्णु ; ० , मानस्तोके० , विष्णोः कर्माणि० , पादोस्य० ’ ह्या चार मंत्रांनीं चार आज्याहुतींचा होम करावा . आणि ज्या देवतेचा उच्छेद करील त्या देवतेच्या उद्देशानें ब्राह्मणांना भोजन घालावें . " शंख लिखित - " देवाची प्रतिमा , आराम , कूप , किल्ल्याचा मार्ग , ध्वज , सेतु हीं पाडलीं असतां त्यांची दुरुस्ती करावी . व त्यांची पुनः प्रतिष्ठा करावी . आणि ज्यांनीं तीं पाडलीं असतील त्यांना आठशें पण दंड करावा . "

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP