मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
धर्मार्थविवाह करण्याचें फल

तृतीयपरिच्छेद - धर्मार्थविवाह करण्याचें फल

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


धर्मार्थंविवाहकरणेफलमुक्तंमहाभारते ज्ञात्वास्ववित्तसामर्थ्यमेकंचोद्वाहयेद्दिजं तेनाप्याप्नोतितत् ‍ स्थानंशिवभक्तोनरोध्रुवम् ‍ अपरार्केदक्षः मातापितृविहीनंतुसंस्कारोद्वाहनादिभिः यः स्थापयतितस्येह पुण्यसंख्यानविद्यते मदनरत्नेभविष्ये विवाहादिक्रियाकालेतत्क्रियासिद्धिकारणं यः प्रयच्छतिधर्मज्ञः सोश्वमेधफलंलभेत् ‍ कन्यागृहेभोजननिषेधोपितत्रैव अप्रजायांतुकन्यायांनभुंजीतकदाचन दौहित्रस्यमुखं दृष्ट्वाकिमर्थमनुशोचति अपरार्केआदित्यपुराणे विष्णुंजामातरंमन्येतस्यकोपंनकारयेत् ‍ अप्रजायांतुकन्यायांनाश्नीयात्तस्यवैगृहे ब्रह्मदेयांनवैकन्यांदत्वाश्नीयात्कदाचन अथभुंजीतमोहाच्चेत्पूयाशेनरकेवसेत् ‍ तत्रैवकश्यपः अहतंयंत्रनिर्मुक्तंवासः प्रोक्तंस्वयंभुवा शस्तंतन्मांगलिक्येषुतावत्कालंनसर्वदा यंत्रनिर्मुक्तंनूतनं विवाहमध्येस्त्रियासहभोजनेपिनदोषइत्याहहेमाद्रौप्रायश्चित्तकांडेगालवः विवाहकालेयात्रायांपथिचौरसमाकुले असहायोभवेद्विप्रस्तदाकार्यंद्विजन्मभिः एकयानसमारोहएकपात्रेचभोजनम् ‍ विवाहेपथियात्रायांकृत्वाविप्रोनदोषभाक् ‍ अन्यथादोषमाप्नोतिपश्चाच्चांद्रायणंचरेत् ‍ मिताक्षरायामप्येवम् ‍ रत्नमालायां मूलमैत्रमृगरोहिणीकरैः पौष्णमारुतमघोत्तरान्वितैः भौमसौररविवारवर्जितेपाणिपीडनविधिर्विधीयते अत्रानिष्टनक्षत्रादौदानमुक्तंज्योतिषे विपत्तारेगुडंदद्यान्निधनेतिलकांचनम् ‍ प्रत्यरेलवणंदद्याच्छागंदद्यात्र्त्रिजन्मसु चंद्रेचशंखंलवणंचतारेतिथौविरुद्धेत्वथतंदुलांश्च धान्यंचदद्यात्करणेचवारेयोगेविरुद्धेकनकंप्रदेयम् ‍ ।

धर्मार्थविवाह करण्याचें फल सांगतो महाभारतांत - " आपलें द्रव्यसामर्थ्य पाहून एका ब्राह्मणाचा विवाह करावा . त्या योगानें त्या शिवभक्त मनुष्याला तें उत्तम स्थान निश्चयानें प्राप्त होतें . " अपरार्कांत दक्ष - " माता , पिता यांनीं रहित अशा ब्राह्मणाला उपनयन , विवाहादि संस्कार करुन धर्माचे ठायीं जो स्थापन करील त्याच्या पुण्याची संख्या करितां येत नाहीं . " मदनरत्नांत भविष्यांत - " विवाहादि कार्यसमयीं त्या कार्याच्या सिद्धीचें जें कारण द्रव्यादिक असेल , तें जो करुन देईल त्याला अश्वमेधाचें फल प्राप्त होईल . " कन्येचा घरीं भोजनाचा निषेधही तेथेंच सांगतो - " कन्येला पुत्र झालेला नसतां तिच्या घरीं कधींही भोजन करुं नये . दौहित्राचें ( कन्यापुत्राचें ) मुख पाहिल्यावर शोक करण्याचें ( भोजननिषेध मानण्याचें ) कारण नाहीं . " अपरार्कांत आदित्यपुराणांत - " जांवई हा विष्णुरुपी आहे , असें मानून त्याला कोप येईल असें करुं नये . कन्येला प्रजा झालेली नसतां जामात्याच्या घरीं भोजन करुं नये . ब्रह्म देणारी अशी जी कन्या ती देऊन जामात्याच्या घरीं कधींही भोजन करुं नये . आतां मोहाच्या ( अज्ञानाच्या ) योगानें जर भोजन करील तर पूयाश ( पुवाच्या ) नरकांत जाईल . " तेथेंच कश्यप - " यंत्रांतून निघालेलें नूतन वस्त्र तें ब्रह्मदेवानें अहत म्हणून सांगितलें आहे . तें अहतवस्त्र मंगलकार्यांमध्यें तावत्कालपर्यंत प्रशस्त म्हणून सांगितलें आहे . सर्वदा प्रशस्त नाहीं . " विवाहांत स्त्रियेसह भोजन केलें तरी दोष नाहीं , असें सांगतो हेमाद्रींत प्रायश्चित्तकांडांत गालव - " विवाहकालीं , यात्रासमयीं , मार्गांत , आणि चोर असतील त्या वेळीं दुसरा कोणी साहाय्य नसेल तर ब्राह्मणादिकांनीं स्त्रियेसहवर्तमान एका यानांत बसावें , आणि एका पात्रांत भोजन करावें . याप्रमाणें विवाहकालीं , यात्रासमयीं , आणि मार्गांत स्त्रीसह एका पात्रांत भोजन केलें असतां तो ब्राह्मण दोषी होत नाहीं . इतर वेळीं एका पात्रांत स्त्रियेसह भोजन करील तर दोषी होईल . त्या दोषाच्या निवारणासाठीं चांद्रायणप्रायश्चित्त करावें . " मिताक्षरेंतही असेंच सांगितलें आहे .

रत्नमालेंत - " मूल , अनुराधा , मृग , रोहिणी , हस्त , रेवती , स्वाती , मघा , तीन उत्तरा , ह्या नक्षत्रांवर ; भौम , शनि , रवि हे वार वर्ज्य करुन इतर वारीं विवाह करावा . " ह्या विवाहकालीं तारा वगैरे अनिष्ट असतां दान सांगतो ज्योतिषांत - " विपद् ‍ तारा असतां गुड द्यावा . निधनतारा असतां तिल व सुवर्ण द्यावें . प्रत्यरतारा असतां लवण द्यावें . आणि त्रिजन्मतारा ( जन्मनक्षत्र , त्यापासून दहावें आणि एकोणिसावें नक्षत्र ) असतां बोकड द्यावा . चंद्र अनिष्ट असतां शंख द्यावा . तारा अनिष्ट असतां लवण द्यावें . तिथि अनिष्ट असतां तंडुल द्यावे . कारण , आणि वार अनिष्ट असतां धान्य द्यावें . योग अनिष्ट असतां सुवर्ण द्यावें . "

विवाहमंडपमाहवसिष्ठः षोडशारत्निकंकुर्याच्चतुर्द्वारोपशोभितम् ‍ मंडपंतोरणैर्युक्तंतत्रवेदिंप्रकल्पयेत् ‍ अष्टहस्तंतुरचयेन्मंडपंवाद्विषटकरं दैवज्ञमनोहरः चित्राविशाखाशततारकाश्विनीज्येष्ठाभरण्यौशिवभाच्चतुष्टयम् ‍ हित्वाप्रशस्तंफलतैलवेदिकाप्रदानकंकंडनमंडपादिकम् ‍ हेमाद्रौव्यासः कंडनदलनयवारकमंडपमृद्वेदिवर्णकाद्यखिलं तत्संबंधिगतागतमृक्षेवैवाहिकेकुर्यात् ‍ यवारकंचिकसाइतिप्रसिद्धम् ‍ वैवाहिकेतुदिवसेशुभेवाथतिथौशुभे चतुर्थिकंप्रकुर्वीतविधिदृष्टेनकर्मणा वेदिमाहनारदः हस्तोच्छ्रितांचतुर्हस्तैश्चतुरस्त्रांसमंततः स्तंभैश्चतुर्भिः सुश्लक्ष्णांवामभागेतुसद्मनि समांतथाचतुर्दिक्षुसोपानैरतिशोभिताम् ‍ प्रागुदक् ‍ प्रवणारंभांस्तंभैर्हंसशुकादिभिः एवंविधामारुरुक्षेन्मिथुनंसाग्निवेदिकामिति सप्तर्षिमते मंगलेषुचसर्वेषुमंडपोगृहमानतः कार्यः षोडशहस्तोवाद्विषट् ‍ हस्तोदशावधि स्तंभैश्चतुर्भिरेवात्रवेदीमध्येप्रतिष्ठिता हस्तोवध्वाः सोपानं पश्चिमतः उपरिभागेउक्तपरिमाणाद्भिन्नम् ‍ ।

विवाहास मंडप सांगतो वसिष्ठ - " कनिष्ठ अंगुलीपर्यंत जो हात तो अरन्नि म्हटला आहे . अशा सोळा हातांचा लांब रुंद मंडप करावा . तो चार द्वारांनीं सुशोभित करावा . आणि तोरणें बांधावीं . नंतर त्या मंडपांत वेदी करावी . अथवा आठ हात किंवा बारा हात लांब व रुंद मंडप करावा . " दैवज्ञमनोहर - " चित्रा , विशाखा , शततारका , अश्विनी , ज्येष्ठा , भरणी , आर्द्रा , पुनर्वसु , पुष्य , आश्लेषा हीं नक्षत्रें सोडून बाकीच्या नक्षत्रांवर फल , तैल , वेदिका , हळद , कांडणें , मंडप इत्यादिक विवाहसंबंधी कर्मै करावीं . " हेमाद्रींत व्यास - " कांडण , दळण , यवारक ( चिकसा ), मंडप , मृत्तिकाहरण , वेदी , चित्रें वगैरे काढणें , आणि जाणें येणें हीं विवाहसंबंधीं सारीं कृत्यें विवाहनक्षत्रावर करावीं . विवाहोक्त शुभदिवशीं शुभतिथीस चतुर्थीकर्म यथाविधि करावें . " वेदी सांगतो नारद - " घराच्या वामभागीं एक हात उंचीची चार हात लांबीची व चार हात रुंदीची अशी चतुरस्त्र वेदी करावी . तिच्या चार बाजूंस केळीचे चार स्तंभ असावे . ती वेदी चारी दिशांस सारखी असून तिला पायर्‍या असाव्यात . ती वेदी पूर्वेस व उत्तरेस किंचित् ‍ उतरती असावी . आणि त्या वेदीवर केळीचे स्तंभ , व हंस , शुक इत्यादि पक्षी असावेत . अशा प्रकारच्या वेदीवर अग्नीसह वधूवरांनीं चढावें . " सप्तर्षिमतांत - " सर्व मंगलकार्यांत घराच्या मानानें सोळा हात , किंवा चवदा हात , अथवा बारा हात किंवा दहा हात मंडप घालावा त्या मंडपांत चारी बाजूंस चार स्तंभ लावून वेदी करावी . " या ठिकाणीं हात वधूचा घ्यावा . वेदीला पायर्‍या सांगितल्या त्या पश्चिमदिशेस कराव्या . वर सांगितलेलें जें वेदीचें प्रमाण त्याच्या बाहेर पायर्‍या असाव्यात .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP