मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
कूपादिकांचा उत्सर्गविधि

तृतीयपरिच्छेद - कूपादिकांचा उत्सर्गविधि

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


कूपादिकांचा उत्सर्गविधि सांगतो -
उत्सर्गविधिश्चोक्तोबह्वृचपरिशिष्टे अथातोवापीकूपतडागयज्ञंव्याख्यास्यामः पुण्येह्न्युदकसमीपेऽग्निंसमाधायवारुणंचरुंश्रपयित्वाज्यभागांतेआज्याहुतीर्जुहुयात् समुद्रज्येष्ठेतिप्रत्यृचं ततोहविषाष्टौतत्त्वायामीतिपंचत्वंनोअग्नेइतिद्वेइमंमेवरुणेतिच स्विष्टकृतंनवमम्‍ मार्जनांतेधेनुंतारयेत् अवतीर्यमाणामनुमंत्रयेत इदंसलिलंपवित्रंकुरुष्वशुद्धाः पूताअमृताः संतुनित्यम् मांतारयंतीकुरुतीर्थाभिषेकंलोकाल्लोकंतरतेतीर्यतेचेति पुच्छाग्रेन्वारब्धउत्तीर्यापोअस्मान्मातरः शुंधयंत्वित्यथापराजितायांदिश्युत्थापयेत् सूयवसाद्भगवतीतिहिंकृतंचेद्धिंकृण्वतीत्यलंकृतांविप्रायदद्यादितरांवाशक्त्यादक्षिणांततउत्सृजेद्देवपितृमनुष्याः प्रीयंतामितिब्राह्मणान् भोजयित्वास्वस्त्ययनंवाचयीत विस्तरस्तुमात्सोक्तोऽस्मत्कृतजलाशयोत्सर्गविधौज्ञेयः कूपादेरुत्सर्गाकरणेदोषउक्तोभविष्ये सदाजलंपवित्रंस्यादपवित्रमसंस्कृतं कुशाग्रेणापिराजेंद्रनस्प्रष्टव्यमसंस्कृतं तथा वापीकूपतडागादौयज्जलंस्यादसंस्कृतम् अपेयंतद्भवेत्सर्वंपीत्वाचांद्रायणंचरेत् ।

बह्वृचपरिशिष्टांत - “ आतां वापी, कूप, तलाव यांचा उत्सर्गसंस्कार सांगतों - शुभ दिवशीं वापी इत्यादि जलाच्या समीप अग्निस्थापना करुन त्याजवर वरुणदेवताक चरु शिजवून, आज्यभागापर्यंत तंत्र झाल्यावर ‘ समुद्रज्येष्ठा० ’ या सूक्ताच्या प्रत्येक ऋचेनें आज्याहुतींचा होम करावा. नंतर चरुच्या आठ आहुति द्याव्या. त्या येणेंप्रमाणें - ‘ तत्त्वायामि० ’ ह्या पांच, ‘ त्वंनोअग्ने० ’ ह्या दोन, आणि ‘ इमंमेवरुण० ’ ही एक, मिळून आठ आहुति झाल्यावर स्विष्टकृताची नववी आहुति देऊन प्रायश्चित्तादि होमशेष समाप्त झाल्यावर मार्जनांतीं त्या उदकांत धेनूला तरवावी. त्या तरविण्याचा मंत्र - ‘ इदं सलिलं पवित्रं कुरुष्व शुद्धाः पूता अमृताः संतु नित्यम्‍ ॥ मां तारयंती कुरु तीर्थाभिषेकं लोकाल्लोकं तरते तीर्यते च ॥ ’ या मंत्रानें तिचें पुच्छाग्र धरुन आंत उतरुन ‘ आपो अस्मान्‍ ० ’ या मंत्रानें मार्जन करुन नंतर ईशानी दिशेस तिला वर काढावी. वर काढावयाचा मंत्र - ‘ सूयवसाद्भगवती० ’ हा समजावा. ती धेनु हुंकार करुं लागली असेल तर ‘ हिंकृण्वती० ’ हा मंत्र म्हणून वर काढावी. नंतर तिला अलंकृत करुन ब्राह्मणास द्यावी. अथवा आपल्या शक्तीप्रमाणें इतर दक्षिणा द्यावी. नंतर ‘ देवपितृमनुष्याः प्रीयंतां ’ असें म्हणून त्या जलाशयाचा उत्सर्ग करावा. नंतर ब्राह्मणांस भोजन घालून त्यांच्याकडून पुण्याहवाचन म्हणवावें. ” याचा विस्तार पहावयाचा असेल तर मत्स्यपुराणोक्त आम्हीं ( कमलाकरभट्टानें ) केलेल्या जलाशयोत्सर्गविधींत पाहावा. कूपादिकांचा उत्सर्ग केला नसेल तर दोष सांगतो भविष्यांत - “ उदक हें सर्वदा पवित्र आहे. पण, संस्कार केलेलें नसेल तर तें अपवित्र आहे. हे राजश्रेष्ठा ! असंस्कृत उदकाला कुशाग्रानें देखील स्पर्श करुं नये. ” तसेंच - “ वापी, कूप, तलाव इत्यादिकांत जें संस्कार केलेलें उदक नसेल तें सारें अपेय ( प्राशनास अयोग्य ) होईल. तें प्राशन केलें तर चांद्रायण प्रायश्चित्त करावें. ”

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP