TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
समावर्तन

तृतीयपरिच्छेद - समावर्तन

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


समावर्तन

आतां समावर्तन सांगतो -

अथसमावर्तनं सुरेश्वरः भौमभानुजयोर्वारेनक्षत्रेचव्रतोदिते ताराचंद्रविशुद्धौचस्यात्समावर्तनक्रिया बौधायनसूत्रेतु रोहिण्यांतिष्येउत्तरयोः फाल्गुन्योर्हस्तेचित्रायामैंद्रेविशाखायांवास्नायादित्युक्तं वसिष्ठः स्नानंमध्याह्नकालेतुहोरायांकारयेच्छुभं पूर्वाह्णेतदभावेतुकुर्यात्स्नानंयथाविधि सर्वऋतवोविवाहस्येतिसूत्रात् ‍ यदादक्षिणायनेविवाहस्तदासमावर्तनमपितत्रैवअन्यथोदगयनेसमावर्तनेअनाश्रमीनतिष्ठेतेतिविरोधः स्यादित्युक्तं सुदर्शनभाष्ये एतच्चब्रह्मचारिव्रतलोपप्रायश्चित्तंकृत्वाकार्यं तदाह बौधायनः शौचसंध्यादर्भभिक्षाग्निकार्यराहित्यकौपीनोपवीतमेखलादंडाजिनाधारणदिवास्वापच्छत्रपादुकास्रग्विधारणांगोद्वर्तनानुलेपनांजनद्यूतनृत्यगीतवाद्याभिरतौब्रह्मचारीकृच्छ्रत्रयंचरेत् ‍ महाव्याह्रतिहोमंपाहित्रयोदशहोमंचकुर्यात् ‍ समावर्तनोत्तरंपूर्वमृतानांत्रिरात्रमाशौचंकार्यम् ‍ आदिष्टीनोदकंकुर्यादाव्रतस्यसमापनात् ‍ समाप्तेतूदकंदत्वात्रिरात्रमशुचिर्भवेदितिमनूक्तेः आदिष्टीब्रह्मचारीति विज्ञानेश्वरः ब्रह्मचर्येयदिकश्चिन्नमृतस्तदात्रिरात्रमध्येविवाहः कार्योऽन्यथानेतिसिध्यति जननेतुसत्यपिनत्रिरात्रम् ‍ तत्रातिक्रांताशौचाभावादुदकंदत्वेतिवचनाच्चेतिदिक् ‍ तत्रापिविकल्पः पितर्यपिमृतेनैषांदोषोभवतिकर्हिचित् ‍ आशौचंकर्मणोंतेस्यात्र्यहंवाब्रह्मचारिणामिति छंदोगपरिशिष्टात् ‍ ।

सुरेश्वर - " भौम आणि शनिवारीं , उपनयनोक्त नक्षत्रावर , ताराबळ आणि चंद्रबळ असतां समावर्तन संस्कार करावा . " बौधायनसूत्रांत तर - रोहिणी , पुष्य , उत्तराफल्गुनी , हस्त , चित्रा , ज्येष्ठा , विशाखा , या नक्षत्रांवर समावर्तन करावें , असें सांगितलें आहे . वसिष्ठ - " मध्याह्नकालीं शुभ होरेवर समावर्तन करावें . त्याच्या अभावीं पूर्वाह्णीं यथाविधि समावर्तन करावें . " " विवाहाला सारे ऋतु सांगितले आहेत " या सूत्रावरुन जेव्हां दक्षिणायनांत विवाह करावयाचा असेल तेव्हां समावर्तनही दक्षिणायनांतच होतें . अन्यथा म्हणजे दक्षिणायनांत समावर्तन होत नसल्यामुळें दक्षिणायनांत विवाह करावयाचा असतां त्याच्या पूर्वीं उदगयनांत समावर्तन केलें तर ‘ द्विजानें आश्रमावांचून एक दिवसही राहूं नये ’ या वचनाचा विरोध येईल , असें सुदर्शनभाष्यांत सांगितलें आहे . हें समावर्तन ब्रह्मचारिव्रतलोपप्रायश्चित्त करुन करावें . तें सांगतो बौधायन - " ब्रह्मचार्‍यास शौच , संध्या , दर्भग्रहण , भिक्षा आणि अग्निकार्य हीं झालीं नाहींत ; कौपीन , यज्ञोपवीत , मेखला , दंड , अजिन हीं धारण केलीं नाहींत ; दिवसा निद्रा , छत्री , जोडा , स्रक् ‍, हीं धारण केलीं ; अंगाला उद्वर्तन व उटी लावली ; डोळ्यांत काजळ घातलें ; द्यूत , नर्तन , गायन , वाद्यवादन यांविषयीं आसक्त झाला असतां ब्रह्मचार्‍यानें प्रायश्चित्तार्थ तीन कृच्छ्र करावे . आणि महाव्याह्रति होम ( भूरग्नये च पृथिव्यै० इत्यादि ) व ‘ पाहिनो अग्न एनसे० ’ इत्यादि होम करावा . ब्रह्मचार्‍याचें समावर्तन झाल्यानंतर , पूर्वीं ब्रह्मचर्यावस्थेंत मृत झालेल्या सपिंडांचें त्रिरात्र आशौच करावें . कारण , " ब्रह्मचर्यव्रत समाप्त होईपर्यंत मृत झालेल्या सपिंडांस ब्रह्मचार्‍यानें उदक देऊं नये . व्रत समाप्त झाल्यावर पूर्वीं मृत सपिंडांस उदक देऊन तीन दिवस आशौच करावें " असें मनूचें वचन आहे . या वचनांतील ‘ आदिष्टी ’ या पदाचा अर्थ ब्रह्मचारी , असें विज्ञानेश्वर सांगतो . ब्रह्मचर्यावस्थेंत जर सपिंडांतील कोणी मृत नसेल तर तीन दिवसांचे आंत विवाह करण्यास हरकत नाहीं . मृत असेल तर तीन दिवसांत विवाह होत नाहीं , असें सिद्ध होतें . ब्रह्मचर्यावस्थेंत जननाशौच उत्पन्न असलें तरी त्रिरात्र आशौच नाहीं . कारण , त्या जननाशौचांत अतिक्रांताशौच नाहीं . आणि वरील मनुवचनांत ‘ उदक देऊन त्रिरात्र आशौच करावें . ’ असें सांगितल्यावरुन जननाशौचांत उदकदान नसल्यामुळें आशौचही नाहीं . ही दिशा दाखविली आहे . समावर्तनोत्तर पूर्वीं मृत झालेल्या सपिंडांचें त्रिरात्र आशौच सांगितलें त्याचाही विकल्प आहे . कारण , " पिता मृत झाला तरी ब्रह्मचार्‍यांना कधींही दोष ( आशौच ) नाहीं . अथवा ब्रह्मचार्‍यांना व्रताच्या अंतीं तीन दिवस आशौच आहे . " असें

छंदोगपरिशिष्टाचें वचन आहे .

आतां स्नातकाचीं ( समावर्तन केलेल्याचीं ) व्रतें सांगतो .

स्नातकव्रतान्याहव्यासः यज्ञोपवीतद्वितयंसोदकंचकमंडलुम् ‍ छत्रंचोष्णीषममलंपादुकेचाप्युपानहौ रौक्मेचकुंडलेवेदः कृत्तकेशनखः शुचिः वेदोदर्भबटुः मनुः उपानहौचवासश्चधृतमन्यैर्नधारयेत् ‍ उपवीतमलंकारंस्त्रजंकरकमेवच अन्यान्यपिबह्वृचगृह्यस्मृत्यादिभ्योज्ञेयानि ।

व्यास - " दोन यज्ञोपवीतें , उदक भरलेला कमंडलु , छत्री , पागोटें , खडाव , चर्मीजोडा , सोन्याचीं कुंडलें , दर्भमुष्टि , केश व नखें काढणें , शुचिर्भूतपणा , हीं स्नातकानें नित्य धारण करावीं . " मनु - " उपानह ( चर्मीजोडा ), वस्त्र , यज्ञोपवीत , अलंकार , स्त्रक् ‍ आणि कमंडलु , हीं दुसर्‍यानें वापरलेलीं स्नातकानें वापरुं नयेत . " इतरही व्रतें बह्वृचगृह्यसूत्र आणि स्मृति इत्यादिकांतून जाणावीं .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:50:17.8030000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

फस्तीक पडप

  • भानगडींत पडणें 
  • घोंटाळयांत, पेंचांत सांपडणें. 
RANDOM WORD

Did you know?

कोणतेही कार्य करतांना मुहूर्त कां पहावा? त्यामागची संकल्पना काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.