TransLiteral Foundation
संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
रक्तपित्तनिदान

माधवनिदान - रक्तपित्तनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


रक्तपित्तनिदान

रक्तपित्त उत्पन्न होण्याचीं कारणें .

धर्मव्यायामशोकाध्वव्यवायैरतिसेवितै : ॥

तीक्ष्णोष्णक्षारलवणैरम्लै : कटुभिरेव च ॥१॥

पित्तं विदग्धं स्वगुणैर्विदहत्याशु शोणितम्‌ ॥

तत : प्रवर्तते रक्तमूर्ध्वं वऽधो द्विधाऽपि वा ॥२॥

ऊर्ध्वं नासाक्षिकर्णास्यैर्मेढ्रयोनिगुदैरध : ॥

कुपितं रोमकूपैश्च समस्तैस्तत्प्रवर्तते ॥३॥

वारंवार उन्हांत फिरणें , अतिशय श्रम करणें , फार शोक करणें , पुष्कळ चालणें , अत्यंत स्वीसंभोग करणें , आणि त्याचप्रमाणें मनस्वी तीक्ष्ण , उष्ण , खारट , लवण , आंबट व तिखट , अशा पदार्थांचें सेवन करणें इत्यादि कारणांमुळें कुपित झालेलें पित्त आपल्या ( उष्ण , द्रवकारक व तीक्ष्ण या ) स्वाभाविक गुणांमुळे रक्ताला तापवतें ते रक्त कधी रोग्याच्या ऊर्ध्व मार्गानें म्हणजे नाक , डोळे , कात व तोंड यांवाटें बाहेर पडतो ; कवी अधोमार्गाने म्हणजे शिश्न , येनि व गुदद्वार यांवाटे बाहेर पडते ; कधी कधी दोन्ही मार्गांनी पडू लागते . रक्त फारच दूषित झाले असले तर रोग्याच्या सर्व रोमरंध्रातून वाहूं लागते .

पूर्वरूप .

सदनं शीतकामित्वं कण्ठधूमायनं वमि : ॥

लोहगन्धिश्च निश्वासो भवत्यस्मिन्‌ भविष्यति ॥४॥

रक्तपित्त होण्याच्यापूर्वी घशातून धूर निघाल्याचा भास होणे , थंड पदार्थांचे सेवन करावेसे वाटणे , ग्लानि व ओकारी उत्पन्न होणे आणि त्याचप्रमाणे तापलेल्या लोखंडावर पाणी ओतल्याने जसा वास येतो तसा वास श्वासाला येणे , ही लक्षणे रोग्याच्या ठायी उत्पन्न होतात . ( या रक्तपित्ताचे वात , कफ व पित्त या तीन दोषांपासूनां पृथक्‌ पृथक्‌ होणारे तीन ; दोन दोषांच्या योगाने होणारा एक व तिन्ही दोष मिळून होणारा सान्निपातिक एक : असे पांच प्रकार आहेत .)

वातजन्य रक्तपित्त .

श्यावारूणं सफेतं च तौनुरुक्षं च वातिकम्‌ ॥

वातजन्य रक्तपित्त असले म्हणजे ते श्याम व अरूण रंगाचे , किचित्‌ फेसयुक्त , पातळ आणि रूक्ष असे असते .

कफजन्य रक्तपित्त .

सान्द्रं सपाण्डुसस्नेहं पिच्छिलं च कफान्वितम्‌ ॥५॥

कफमिश्रित रक्तपित्त . घट्ट , बुळबुळीत , किंचित पांढरे आणि स्नेहयुक्त असते .

पित्तजन्य रक्तपित्त .

रक्तपित्तं कषायाभं कृष्णं गोमूत्रसन्निभम्‌ ॥

मेचकागारधूमाभमञ्जनाभं च पैत्तिकम्‌ ॥६॥

पित्तसंबंधाच्या रक्तपित्ताचा रंग भगवा , काळा , गोमूत्रासारखा , मृदंगाच्या शाईसारखा , घेरोश्यासारखा किंवा सुर्ग्यासारस्वा काळा याप्रमाणे निरनिराळ्या प्रकारचा असतो .

संसृष्टलिङ्गं संसर्गात्‌ ट्रिलिङ्गं सान्निपातकम्‌ ॥

द्विदोषजन्य ( दोन दोन दोषांपासून होणार्‍या ) रक्तपित्तांत वर सांगितलेलीं दोन दोषांची लक्षणे मिश्रित असतात ; आणि त्रिदोषजन्य ( सान्निपातिक ) रक्तपित्तांत तिन्ही दोषांची लक्षणे द्दष्टीस पडतात .

ऊर्ध्वगं कफसंसृष्टमधोगं मारुतान्वितम्‌ ॥

द्विमार्गं कफवाताभ्यामुभाभ्यामनुवर्तते ॥७॥

कफजन्य रक्तपित्त ऊर्ध्व मार्गाने वाहते व वातजन्य अधोमार्गाने बाहेर पडते , दोन्ही मार्गांनी प्रवृत्त असलेल्या रक्तपित्तांत वात व कफ , किंवा वात व पित्त ; याप्रमाणे दोन दोषांचा संबंध असतो .

रक्तपित्ताविषयीं साध्यासाध्य विचार .

उर्ध्वं साध्यमधोयाप्यमसाध्यं युगपद्नतम्‌ ॥

एकमार्गं बलवतो नातिवेगं नवोत्थितम्‌ ॥८॥

रक्तपित्तं सुखे काले साध्यं स्यान्निरूपद्रवम्‌ ॥

एकदोषानुगं साध्यं द्विदोषं याप्यमुच्यते ॥९॥

त्रिदोषजं असाध्यं स्यान्मन्दाग्नेरतिवेगितम्‌ ॥

व्याधिभि : क्षीणदेहस्य वृद्धस्पानश्नतश्च यत्‌ ॥१०॥

उर्ध्व मार्गाने पडणारे रक्तपित्त कफजन्य असल्यामुळे साध्य असते . अधोमार्गाने बाहणारे रक्तपित्त याप्य ( रोगी औषध घेतो आहे तोपर्यंत बरे होणार व औषध सोडतांच पुन्हां उत्पन्न होणारे ) होऊन राहते ; पण उमयामार्गानें होणारे जें रक्तपित्त ते असाध्य बाणावे . याशिवाय रोग्याची शक्ति कायम राहून जर त्यास झालेले रक्तपित्त नवे , फार ओर नसलेले व ( हेमंत , शिशिर वगैरे ) सुखप्रद काळी झालेले असले व ते ( पुढे सांगितलेल्या ) त्यामुळे उद्भवणार्‍या उपद्रवांनीं युक्त नसले तर साध्य होते . आतां दोषाविषयी विचार केला तर एक दोषापासून उद्भवणारे रक्तपित्त साध्य होते . दोन दोषांपासून होणारे याप्य होऊन राह्ते . आणि त्न्ही दोषांच्या प्रकोपामुळे झालेले असाध्य असते . त्याचप्रमाणे रोगी वृद्ध , अन्न तुटलेला , जठराग्नि मंद झालेला व शरीराची शक्ति गेलेला असेल व त्यास फार जोराने पडणारे रक्तपित्ता झाले असेल तर ते असाध्य होय .

रक्तपित्ताचीं असाध्य लक्षणें .

मांसप्रक्षालनाभं कुथितमिव च यत्कर्दमाम्भोनिभं वा ।

मेद : पूयास्नकल्पं यकृदिव यदि वा पक्वजम्बूफलाभम्‌ ॥

यत्कृष्णं यश्च नीलं भृशमतिकुणपं यत्र चोक्त विकारा -

स्तद्वर्ज्यं रक्तपित्तं सुरपतिधनुषा यच्च तुल्यं विभांति ॥११॥

येन चोपहतो रक्तं रक्तपित्तेन मानव : ॥

पश्येद्दश्यं वियच्चापि तच्चासाध्यमसंशयम्‌ ॥१२॥

लोहितं छर्दयेद्यस्तु बहुशो लोहितेक्षण : ॥

लोहितोद्नारदर्शी च म्रियते रक्तपैत्तिक : ॥१३॥

असाध्य रक्तपित्त जाणण्याची आणखी कांहीं लक्षणे आहेत ती पुढे दिल्याप्रमाणे - जे रक्तपित्त मांस धुतलेल्या , कुजलेल्या किंवा चिखलाच्या पाण्यासारखे व त्याच प्रमाणे मेद , पू व रक्त यासारखे असून त्याचा रंग यकृतासरखा ( उदी ). पिकलेल्या बांभलासारखा काळा किंवा निळा असतो व त्यास प्रेताप्रमाणे अतिशय घाण येणे , आणि ज्यामुळे ( पुढे सांगितलेले श्वासादि ) विकार रोग्याचे ठिकाणी उत्पन्न होतात ते रक्तपित्त असाध्य होय , तसेच , इंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणे अनेक रंगाचे असलेले रक्तैत्तहि असाध्यच होय . जोरक्तैत्त झालेला रोगी सर्व पदार्थ तांबूस रंगाचे पाहतो किंवा ज्याला डोळ्यापुढील आकाश रंगाचें दिसते तो नि : संशय असाध्य म्हणून वैद्याने सोडावा : व त्याचप्रमाणे ज्यास वारंवार तांबडया उठटया होणे , डोळे रक्तासारखे लाल होणे व ढेकराबरोबर रक्ताची गुळणी येणे ही लक्षणे होतात तो रक्तपिताचा रोगी ह्टकून मरणार असून तो नाद सोडावा .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-06-24T13:49:33.6600000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

machine screw

  • यंत्र पेच 
RANDOM WORD

Did you know?

’ एकोद्दिष्ट श्राद्ध ’ बद्दल माहिती द्यावी.
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.