TransLiteral Foundation
संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
दाहनिदान

माधवनिदान - दाहनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


दाहनिदान

रोग्याच्या शरीराचे ठायी जो दाह उत्पन्न होत असतो त्याचे मद्यजन्य दाह रक्तजन्य दाह , पित्तजन्य दाह , तृष्णानिरोधजन्य दाह , धातुक्षयजन्य दाह , शस्त्राघातजन्य दाह व क्षतजन्य दाह असे सात प्रकार असतात . त्यांची लक्षणे पुढे सांगितल्याप्रमाणे जणावी .

मद्यजन्य दाहाचीं लक्षणें .

त्वचं प्राप्त : स पानोष्मा पित्तरक्ताभिमूर्च्छित : ॥

दाहं प्रकरूते घोरं पित्तवत्तत्र भ्पजम्‌ ॥१॥

मद्यपानामुळें मद्यप्याच्या शरीरांत उत्पन्न झालेली उष्णता त्वचेकडे येते व पित्त आणि रक्त यांमुळें वाढून त्यांच्या ठायी भयंकर दाह करिते , यावर पित्ताप्रमाणेच चिकित्सा केली असतां लागू पडते .

रक्तजन्य दाहाचीं लक्षणें .

कृत्स्नदेहानुगं रक्तमुद्रिक्तं दहति ध्नवम्‌ ॥

शुष्यते तृष्यते चैव ताम्राभरताम्रलोचन : ॥

लोहगन्धाङ्गवदनो वन्हिनेवावर्कार्यते ॥२॥

रोग्याच्या सर्व शरीरांतील रक्त प्रकोप पावले असता निश्चितच दाह करते , त्यावेळी त्यास शोष पड्तो व तहान लागते . तसेच त्याच्या शरीराचा वर्ण तांबडा व डोळे लाल होतात : आणि तोंडास व अंगाला लोखंडासारखी घाण येते , या दाहात अंगावर विस्तव पडल्याप्रमाणे त्याच्या ठायी वेदना होतात .

पित्तजन्य दाह .

पित्तज्वरसम : पित्तात्‌ स चाप्यस्य विधि : स्मृत : ॥

ज्यस पित्तजन्य दाह होतो त्याच्या ठायी पित्तज्वराची सर्व लक्षणे आढळतात व त्यावर चिकीत्साहि पित्तज्वराचीच करावी लागते .

तृष्णानिरोधजन्य दाह - लक्षणें .

तृष्णानिरोधादब्धातौ क्षीणे तेज : समुध्दृतम्‌ ॥

सबाह्याभ्यन्तरं हेहं प्रदहेन्मन्दचेतस : ॥

संशुष्करालताल्वोष्ठो जिव्हां निष्कृष्य वेपते ॥४॥

तहान लागली असता तिबा निरोध केल्यास रोग्याची जलरून धातु क्षीण झाल्यामुळे पित्ताची उष्णता वाढते व ती त्याच्या शरीराचा आंतून व बाहेरून दाह करिते , या दाहामुळे तो बेशुद्ध होतो . त्याचे ओंठ , गळा व टाळू यांच्या ठिकाणी अल्यंत कोरड पडते व तो जीभ तोंडाबाहेर काढून कापत असतो .

धानुक्षयजन्य दाह .

धातुक्षयोत्थो यो दाहस्तेन मूर्च्छातृषान्वित : ॥

क्षामस्वर : क्रियाहीन : स सीदेद्‌भृशषीडित : ॥६॥

शरीरांतील रसादि धातु क्षय पावल्यामुळे जो दाह होतो त्यांत रोगी मूर्च्छित होतो , आवाज खोल जातो , त्यास उठणाबसण्याची अथवा काम करण्याची शक्ति राहात नाही आणि तो वारंवार तहानेने व्याकुळ होतो . या दाहामुळे अत्यंत दु : ख भोगून तो शेवटी मरण पावतो .

क्षत वगैरे पासूनचा दाह .

क्षतजोऽनश्नतश्चान्य : शोचतो वाप्यनेकधा ॥

तेनान्तर्दह्यतेऽत्यर्थ तृष्णामूर्च्छाप्रलापवान ॥७॥

क्षतामुळे , उपवासामुळे किंवा दुसर्‍या अनेक कारणांनी शोक उत्पन्न झाल्यामुळे रोग्याच्या शरीराच्या अभ्यंतर भागी अत्यंत दाह होतो व शिवाय तहान , मूर्च्छा बडबड वगैरे लक्षणे द्दष्टीस पडतात .

मर्माभिघातजन्य दाह .

असृज : पूर्णकोष्ठस्य हाहोऽन्य : स्यात्सुदु : सह : ॥

मर्माभिघातजोऽप्यस्ति सोऽसाध्य : सप्तमो मत : ॥८॥

शस्त्रप्रहार झाल्यामुळे रोग्यांचा कोठा रक्ताने भरून त्याच्या शरीरांत अत्यंत दुःसह दाह होतो ; तसेच मर्मस्थानी घाव बसल्यामुळे जो दाह उत्पन्न होतो तोहि असाध्य असतो . हा दाहाचा सातवा प्रकार होय .

असाध्य लक्षणे .

सर्व एव च वर्ज्या स्यु : शीतगात्रस्य देहिना : ॥

ज्या दा हांत रोग्याचे शरीर बाहेरून थंड असते ते सर्व प्रकार असाध्य जाणेवे .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-06-24T13:49:35.8430000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

bicameral

 • द्विसदन, द्विसदनी 
 • द्विसदनी 
 • द्विगृही 
 • द्विसदनीय, द्विसदन- 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

पिंपळाच्या झाडाला फक्त शनिवारीच स्पर्श का करतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,689
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,801
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.