TransLiteral Foundation
संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
उन्मादरोगनिदान

माधवनिदान - उन्मादरोगनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


उन्मादरोगनिदान

उन्मादरोगाचीं कारणें

मदयन्त्युद्नता दोषा यस्मादुन्मार्गमाश्रिता : ॥

मानसोऽयमतो व्याधिरुन्माद इति कीर्त्यते ॥१॥

ज्या अथीं मनुष्याच्या शरीरांतील वाढलेले वातादि दोष आपला नित्याचा मार्ग सोडून मानवाला उन्मत्त बनवतात त्या अर्थीं त्या मनोवह नाडयांत जातात व मनाचे ठायी भ्रम उत्पन्न करतात . या रीतीने जो मानसिक रोग होतो त्या रोगास उन्माद असे म्हणतात .

उन्मादरोगाचे प्रकार .

एकैकश : सर्वशश्च दोषैरत्यर्थमूर्च्छितै : ॥

मानसेन च दुःखेन स पञ्चविध उच्यते ॥२॥

विषाद्भवति पष्ठश्च यथास्वं तत्र भेषजम्‌ ॥

स चाप्रवृद्धस्तरुणो मदसंज्ञां बिभर्ति च ॥३॥

उन्माद रोगाचे पाच प्रकार आहेत ते :--- वात , पित्त व कफ या तीन दोपांपासून पृथक्‌ पृथक्‌ होणारे तीन ; तिन्ही दोष मिळून होणारा जो एक तो चवथा ; व मानसिक दुःखामुळे जो रोग्याच्या ठायीं उत्पन्न होत असतो तो एक पाचवा : याप्रमाणे होत . याशिवाय विषाच्या सेवनामुळेहि एक सहावा उन्माद मनुष्याच्या ठायीं जडत असतो त्यास त्या विषाच्या दोषानुरूप औषधयोजना करावी . हा फार वाढण्याच्या पूर्वीं मद असे नाव धारण करतो .

उन्माद रोगाची संप्राप्ति .

विरुद्धदुष्टाऽशुचिभोजनानि प्रघर्षणं देवगुरूद्विजानाम्‌ ॥

उन्मादहेतुर्भयहर्षपूर्वी मनोभिघातो विषमाश्च चेष्ट : ॥४॥

तैरल्पसत्त्वस्य मला : प्रदुष्टा बुद्धोर्निवासं ह्रदयं प्रदूष्य ॥

स्नोतांस्यधिष्ठाय मनोवहानि प्रमोहयन्त्याशु नरस्य चेत : ॥५॥

परस्परविरुद्ध , दुष्ट व घाणेरडे असे पदार्थ खाल्लामुळे , देव , गुरू व ब्राह्मण यांचा तिरस्कार केल्यामुळे , हर्ष अथवा शोक यांनी मनास धक्का बसल्यामुळे आणि विषमचेष्टा ( आपणांपेक्षां सशक्त पुरुषाशी कुस्ती करणे व वाकडे तिकडे चालणे असे प्रकार ) केल्यामुळे मनुष्याचे ठायीं उन्माद उत्पन्न होतो ; कारण या सांगितलेल्या कारणांमुळे ज्या पुरुषांत सत्त्वगुण अल्य असतो त्याच्या शरीरांतील वातादिदोष प्रकोप पावून बुद्धिनिवासस्थान जे त्याचे ह्रदय त्यास दूषित करितात आणि मनोवह धमन्यांचा आश्रय करून त्याच्या मनास मूढ करितात .

उन्माद रोगाचीं सामान्य लक्षणें .

धीविभ्रम : सत्त्वपरिप्लवश्च पर्याकुला द्दष्टिरधीरता च ॥

अबद्धवातत्वं ह्रदयं च शून्यं सामान्यमुन्मादगदस्य चिन्हम्‌ ॥६॥

बुद्धीला भ्रांती , स्मृतीला नाश , कावरीबावरी द्दष्टि , मनास चंचलपणा , असंबद्ध भाषण आणि अधीरपणा , ( ह्रदय रिकामे म्हणजे कार्यक्षमताहीन ) अशा प्रकारची उन्मादरोगाची सामान्य लक्षणे होत .

वातजन्य उन्मादाचीं लक्षणें .

रूक्षाल्पशीतान्नविरेकधातुक्षयोपवासैरनिलोऽतिवृद्ध : ॥

चिन्तादि दुष्टं ह्रदयं प्रदूष्य बुद्धिं स्मृतिं चापि निहन्ति शीघ्रम्‌ ॥७॥

अस्थानहास्यस्मितनृत्यगीतवागङ्गविक्षेपणरोदनानि ॥

पारुष्यकार्श्यारुणवर्णता च जीर्णे बलं चानिलजस्वरूपम्‌ ॥८॥

वातजन्य उन्मादांत रूक्ष , थोडे व थंड असे अन्न खाल्लयामुळे , रेच आणि वांती झाल्यामुळे व तसेच धातुक्षय व उपवास ही कारणे घडल्यामुळे रोग्याच्या शरीरांतील अत्यंत प्रकोप पावलेला वायु त्याच्य , चिंतादिकांमु व्याकुळ झालेल्या ह्रदयस्थ मनास अतिशय दूषित करून तत्काळ बुद्धि व स्मृति यांचा नाश करतो . मत या रोगामुळे तो कारण नसतांना हसतो व अवेळी नृत्या गयन , ष स्गिम ( गालांत हसणे ), तसेच हाताने वेडे वेडे चाळे करणे व रडणे असले प्रकार करितो . शिवाय त्याचे शरीर कृश , खरखरीत व तांबूस रंगाचे होते . या उन्मादाचा जोर अन्नाचे पचन होऊन गोल्यावर अधिक असतो .

पित्तजन्य उन्मादाचीं कारणें व लक्षणें .

अजीर्णकट्‌वम्लविदाह्यशीतैर्भोज्यैश्चितं पित्तमुदीर्णवेगम्‌ ॥

उन्मादमत्युग्रमनात्मकस्य ह्रदि स्थितं पूर्ववदाशु कुर्यात्‌ ॥९॥

अमर्षसंरम्भविनग्नभावा : सन्तर्जनाभिद्रवणौष्ण्यरोषा : ॥

प्रच्छायशीतान्नजलाभिलाषा : पीतास्यता पित्तकृतरय लिङम्‌ ॥१०॥

असंयमी मनुष्याला अन्नाचे अपचन , अथवा तिसट , आंबट , दाहकारक व उष्ण अशा पदार्थांचे भोजन , या कारणांमुळें रोग्याच्या शरीरांत संचित पित्त अतिशय वाढून त्याच्या ह्रदयाचा आश्रय करिते व वर सांगितल्याप्रमाणे ( बुद्धि व स्मृति यांचा नाश करून ) तत्काळ अति भयंकर असा उन्माद रोग उत्पन्न करिते . या पित्तजन्य उन्मादांत असहनशीलपणा , तिरसटपणा , सावलीत बसून थंडगर अन्न व पाणी सेवन करण्याची इच्छा , राग , भय , दाट छाया असलेल्या स्थलाची आवड व त्याचप्रमाणे नागवे होणें , पळणें . अंगाचा दाह होणे व त्याचा वर्ण पिवला असणे अशा प्रकारची लक्षणे त्याच्या ठायी उत्पन्न होतात .

कफजन्य उन्मादाचीं कारणें व लक्षणें .

संपूरणैर्मन्दविचेष्टितस्य सोष्मा कफो मर्मणि संप्रवृद्ध : ॥

वुद्धिं स्मृतिं चाप्युपहन्ति चित्तं प्रमोहयन्‌ सञ्जनयेद्विकारम्‌ ॥११॥

वाक्‌चेष्टितं मन्दमरोचकश्च नारीविविक्तप्रियताऽतिनिद्रा ॥

छर्दिश्च लाला च बलं च भुङक्ते नखा नखादिशौक्ल्यं च कफाधिके स्यात्‌ ॥१२॥

पौष्टिक पदार्थ खाऊन व्यायाम अत्यल्य करणार्‍या रोग्याच्या शरीरीतील पित्तयुक्त कंफ त्याच्या ह्रदयांत अतिशय वाढून बुद्धि , स्मृति , आणि मन यांची शक्ति नष्ट करितो व त्यास भ्रमिष्ट करुन त्याच्या ठायी उन्मदरोग उत्पन्न करतो . यांत रोग्याचें बोलणें वगैरे फार थोडे चालते , एकान्तवास व स्त्री यांविषयीं त्यास आवड उत्पन्न होते , ओकारी व झोप फार येते , अन्न नकोसे होते , तोंडावाटे लाळ गळते व त्याचप्रमाणें त्याची नखें , मूत्र , डोळे व त्वला वगैरे पांढरी होतात . भोजन केल्यावर या रोगाचा जोर अधिक असतो .

सन्निपातजन्य उन्माद

य : सन्निपातप्रभवो हि घोर : सर्वै : समस्तैरपिहेतुभि : स्यात्‌ ॥

सर्वाणि रुपोणि बिभर्तिं ताहक्‌ विरुद्धभैषज्यविधिर्विवज्य : ॥१३॥

रोग्यास वात , पित्त व कफ या तिन्ही दोषांच्या सर्व कारणांपासून जो उन्माद होतो तो सन्निपातजन्य उन्माद जाणावा , हा फार भयंकर असून वैद्यास असाध्य आहे ; कारण यांत वातादि तिन्ही दोषांची सर्व लक्षणे उत्पन्न होतात व त्यावर विरुद्ध चिकित्सा करावी लागते .

शोकजन्य उन्मादाचीं लक्षणें .

चोरैर्नरेन्द्रपुरुषैररिभिस्तथान्यै -

र्वित्रासितस्य धनबान्धवसंक्षयाद्धा ॥

गाढं क्षते मनसि च प्रियया रिरंसो -

र्जायेत चोत्कटतरो मनसो विकार : ॥१४॥

चित्रं ब्रवीति च मनोनुगतं विसंज्ञो

गायत्यथो हसति रोदिति चातिमूढ : ॥

चोर , सरकारी अधिकारी , शत्रु आणि इतर लोक यांपासून भय पावलेला अथवा धननाश व बंधु वगैरे यांचा वियोग यामुलें शोकाकुल झालेला व तसाच इष्ट स्त्री ची प्राप्ति होण्याविषयी इच्छा करणारा अशा पुरुषाचे मन भयंकर रीतीने दुखावले जाऊन त्याच्या ठायीं शोकजन्य उन्मादरोग उत्पन्न होतो . यांत त्याचे ज्ञान नष्ट होऊन तो काही तरी भलभलतेच बडवडतो च मनांतील गुह्य गोष्ट दुसर्‍या सांगतो , तसेच हसणे , गाणे , रडणे व वेडेवेडेचार करणें असले प्रकार देखील करितो .

विषजन्य उन्माद .

रक्तेक्षणोहतबलेन्द्रियभा : सुदीन :

श्यावाननो विषकृतेन भवेद्विसंज्ञ : ॥१५॥

विषजन्य उन्मादरोग झालेल्या पुरुषाचे डोळे तांबडे होतात व तोंडावर काळिमा येतो ; तसेंच त्याचे बल क्षीण होऊन इंद्रिये आपापल्या आपाराविषयीं असमर्थ होतात व अगावरचे तेज नाश पावने ; शिवाय तो दीन होतो व बेशुद्ध पडतो .

अबाङमुखरतृन्मुखो वा क्षीणमांसबलो नर : ॥

जागरूको हासन्देहमुन्मादेन विनश्यति ॥१६॥

वर सांगितलेल्या सर्व उन्मादरोगांत तोंड ताली घातलेला अथवा वर केलेला , मांस आणि बल यांचा क्षय झालेला आणि झोप उडालेला असा रोगी प्राणास मुकतो .

आतां सांगितलेल्या उन्मादरोगाच्या प्रकाराशिवाय रोग्याच्या ठायीं काही विशेष जातीच्या उन्मादाची लक्षणे द्दष्टीस पडतात ; त्यावरून वैद्यशास्त्रकारांनी ते त्याचे स्वतंत्र प्रकारच मानिले आहेत , त्यांस भूतोन्माद असे म्हणतात .

भूतोन्मादाचीं सामान्य लक्षणें .

अमर्त्यवाग्विक्रमवीर्यचेष्ट :

ज्ञानादिविज्ञानबलादिभिर्य : ॥

उन्मादकालोऽनियतश्च यस्य

भूतोत्थमुन्मादमुदाहरेत्तम्‌ ॥१७॥

भूतोन्मादांत रोग्याचे भाषण , बल , पराक्रम , अंगाचे चलनवलन , तत्त्वज्ञान , शिल्पकौशल्य व समरणशक्ति या गोष्टी मनुष्याच्या सामर्थाबाहेरच्या असतात व तो उन्मत्त होण्य़ाची वेळ अनियमित ( अमुक तिथी किंवा वार अशी ) असते . याचे

देवजुष्ट उन्माद .

सन्तुष्ट : शुचिरतिदिव्यमाल्यगन्धो

निस्तन्द्रस्त्ववितथसंस्कृतप्रभाषी ॥

तेजस्वी स्थिरनयनो वरप्रदाता

ब्रह्मण्यो भवति नर : स देवजुष्ट : ॥१८॥

पहिला प्रकार रोग्याच्या ठायी देवांच्या प्रकोपामूले उत्पन्न होतो . त्यांची लक्षणे रोगी सर्वकाळ संतुष्ट , शुचिर्भूत , सत्य व संस्कृत बोलणारा , तेजस्वी , कल्याणप्रद वर देणारा , द्दष्टी अचल ठेवणारा व ब्राह्मणांवर प्रीति करणारा असा असून त्याच्या डोळयावराची झोप उडालेली असते त्याच्या अंगास अति सुवासिक पुष्पासारखा वास येतो .

दैत्यजुष्ट जन्माद .

संस्वेदी द्विजगुरूदेवदोषवक्ता

जिव्हाक्षो विगतभयो विमार्गद्दष्टि : ॥

सन्तुष्टो न भवति चान्नपान जातै -

र्दुष्टात्मा भवति स देवशत्रुजुष्ट : ॥१९॥

भूतोन्मादाचा दुसरा प्रकार रोगी दैत्यांनी पीडित असल्यास उत्पन्न होतो त्याची लक्षणे :--- रोगी दुष्टबुद्धि , विरुद्ध मार्गाकडे पाहणारा , अन्नपाणी दिले असताहि संतुष्ट न होणारा , नजर वाकडी ठेवणारा व ब्राह्मण , देव आणि गुरु यांस शिव्या देणारा असा असून त्याचे मन निर्भय व अंग सदोदित घामघूम झालेले असते

गंधर्वजुष्ट उन्माद .

ह्रष्टात्मा पुलिनवनान्तरोपसेवी

स्वाचार : प्रियपरिगीतगन्धमाल्य : ॥

नृत्यन्वै प्रहसति चारुचाल्पशद्वं

गन्धर्वग्रहपरिपीडितो मनुष्य : ॥२०॥

रोग्यास गधवापासून पीडा झाली असता त्यास तिसर्‍या प्रकारचा भूतोन्मद होतो , त्याची लक्षणे :--- रोगी आनंदयुक्त , मंजूळ व थोडे बोलणारा , गायन , गंध व फुले यांची आवड धरणारा व नाचणारा अशा प्रकारचा असून तो नेहमी वाळवंटात किंवा अरण्यांत संचार करितो .

यक्षजुष्ट उन्माद .

ताम्राक्ष : प्रियतनुरक्तवस्नधारी

गम्भीरो दुतगतिरल्पवाक्‌सहिष्णु : ॥

तेजस्वी वदति च किं ददामि कस्मै

यो यक्षग्रहपरिपीडितो मनुष्य : ॥२१॥

यक्षापासून पीडा असल्यामुळे रोग्यास चवथ्या प्रकारचा भूतोन्माद होत असतो . त्याची लक्षणे :--- रोगी बुद्धिमान्‌ , गंभीर , थोडे भाषण करणारा , लवकर चालणारा , अत्यंत दानशील ( कोणास काय देउं असे म्हणणारा ) व तेजस्वी असा असून त्याचे डोळे लाल असतात व तो नेहमी चांगले , बारीक व लाल रंगाचे असे वस्त्र परिधान करितो .

पितृजुष्ट उन्माद .

प्रेतानां स दिशति संस्तरेषु पुण्डान्‌

भ्रान्तात्मा जलमपि चापसव्यवस्त्र : ॥

मांसेप्सुस्तिलगुडपायसाभिकाम -

स्तद्भक्तो भवति पितृग्रहाभिजुष्ट : ॥२२॥

पितगंपासून पीडा पावलेला भूतोन्मादाच्या पाचव्या प्रकारचा रोगी नेहमी दर्भा वर पितरांस पिंड देतो व उत्तरीय वस्त्र अपसव्य करून तर्पणहि करितो ; तसेच त्यांस मांसभक्षणाची व खीर , गूळ वगैरे खाण्याची इच्छा होते व तो भ्रमीष्ट होतो .

सर्पग्रहजुष्ट उन्माद .

यस्तूर्व्यी प्रसरति सर्पवत्‌ कदाचित्‌

सृक्किण्यौ विलिहति जिव्हया तथैव ॥

क्रोधालुर्मधुगुडऽदुग्धपायसेप्सु -

र्विज्ञेयो भवति भुजङ्गमेन जुष्ट : ॥२३॥

रोगी सर्पग्रहापासून पीडा पाचलेला असला म्हणजे त्यांस सर्पाप्रमाणे भुईवर पसरणे , उराने चालणे व ओठ जिमेने चाटणे व त्याचप्रमाणे क्रोधयुक्त असणे व गूळ , मध , दूध आणि खीर हे पदार्थं खाण्याची इच्छा करणे अशा प्रकारची लक्षणे असतात .

राक्षसजुष्ट उन्माद .

मांसासृग्विविधसुराविकारलिप्सु -

र्निर्लज्जो भृशमतिनिष्ठुरोऽतिशूर : ॥

कोघालुर्विपुलबलोनिशाविहारी

शौचद्विद भवति स राक्षसैर्गृहीत : ॥२४॥

सातच्या प्रकारच्या भूतोन्माद राक्षसपीडेपासून उत्पन्न होतो . यात तो शुचिर्भूतपणा तिटकारा करणारा , अनेक प्रकारची मद्ये , मांस व रक्त यांच्या सेवनाची इच्छा करणारा , निर्लज्ज , रात्रीस भटकणारा , रागीत स्वभावाचा , अत्यंत शूर व अतिशय बळकट असा असतो . स्वभावाने अत्यंत निष्टुर असतो .

पिशाच्चजुष्ट उन्माद .

उद्धस्त : क्रुशपरुषश्चिरप्रलापी

दुर्गन्धो भृशमशुचिस्तथाऽतिलोल : ॥

बव्हाशी विजनवनान्तरोपसेवी

व्याचेष्टन्‌ भ्रमति रुदन पिशाचजुष्ट : ॥२५॥

भूतोन्मादाचा आठवा अथवा - शेवटचा प्रकार पिशाच्चबाधेमुळे द्दष्टीस पडतो . तो असा की , रोगी आपले हात वर करतो , पुष्कळ खातो , एकान्त स्थळी अथवा वनांत राहण्याची इच्छा दाखवितो . अमंगलपणाने राहतो व निरंतर बडबड करतो . शिवाय त्याचे तोंड तेजहीन व अंग कृश व घाण येणारे असे असते .

सर्व भूतोन्मादांचीं असाध्य लक्षणें .

स्थूलाक्षो द्रतमटन : सफेनलेही

निद्रालु : पतति च कम्पते च योऽति ॥

यश्चद्रिद्विरदनगादिविच्युत : स्यत्‌

सोऽसाध्यो भवति तथा त्रयोदशेऽब्दे ॥२६॥

भूतोन्मादाच्या कोणत्याही प्रकारांत रोगी डोळे वटारलेला , जलद चालणारा , तोंडास फेस आणून चाटणारा , फार झोप घेणारा : पडणारा व कांपणारा असा असला म्हणजे तो असाध्य जाणावा : तसाच पर्वत , झाड किंवा हत्ती यांवरून पडून देवादिकांच्या झपाटयांत सापडलेला असला तर , किंवा तेराव्या वर्षी भूतोन्माद झालेला असला तर तोही असाध्य समजावा .

भूतोन्मादांचा ग्रहणकाल .

देवग्रहा : पौर्णमास्यामसुरा : सन्धयोरपि ॥

गन्धर्वा : प्रायशोऽष्टम्यां यक्षाश्च प्रतिपद्यथ ॥२७॥

पितृग्रहास्तथा दर्शे पञ्चम्यामपि चोरगा : ॥

रक्षांसि रात्रौ पैशाचाश्चतुर्दश्यां विशन्ति हि ॥२८॥

दर्पणादीन्यथा छाया शीतोष्णं प्राणिनो यथा ॥

स्वमणिं भास्करांशुश्च यथा देहं च देहधृक्‌ ॥२९॥

विशन्ति च न द्दश्यन्ते ग्रहास्तद्वच्छरीरिणाम्‌ ॥

प्रविश्याशु शरीरं हि पीडां कुर्वन्ति दु : सहाम्‌ ॥३०॥

सर्व भूतांपैकी देव पौर्णिमेला , दैत्य सकाळी अथवा संध्याकाळी , गंधर्व अष्टमीस , यक्ष प्रतिपदेस , पितर अमावास्येस , सर्प पंचमीस , राक्षस रात्री व पिशाच्च चतुर्दशीस अशा नेमलेल्या वेळी बहुतकरून रोग्यास पछाडतात . त्यांची त्याच्या शरीरांत होणारी दुःसह पीडा मात्र कळते . पण ते कसे पछाडतात ते कळत नाहीं , तर जसे आरशांत प्रतिबिंब शिरते , शरीरांत थंडी व उष्णता प्रवेश करतात , सूर्यकांत म ण्यां त सूर्यकिरण जातात अथवा देहातं जीव प्रवेश होतो , तशाच रीतीने ते प्रादुर्भूत होतात , म्हणून मनुष्याच्या द्दष्टीस पडत नाहीत .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-06-24T13:49:36.2370000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

सात लुगडीं सदा उघडी

 • "सात लुगडीं, शेटें उघडीं" प्रमाणेंच पण जरा शिष्ट प्रकारची म्हण. 
RANDOM WORD

Did you know?

कोणत्याही पूजेसाठी गणपती म्हणून चिकणी सुपारीला महत्व आहे, मग बाकीच्यांना कां नाही?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Total Pages: 46,537
 • Hindi Pages: 4,555
 • Dictionaries: 44
 • Words in Dictionary: 302,181
 • Marathi Pages: 27,517
 • Tags: 2,685
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,230
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.