TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
नेत्ररोगनिदान

माधवनिदान - नेत्ररोगनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


नेत्ररोगनिदान

नेत्र रोगाचीं कारणें व संप्राप्ति .

उष्णाभितप्तस्य जले प्रवेशाहूरेक्षणात्‌ स्वप्नविपर्ययाच्चा ॥

स्वेदाद्रजोधूमनिषेवणाच्च छर्देर्विघातात्‌ वमनातियोगात्‌ ॥१॥

द्रवान्नपानातिनिषेवणाच्च विण्मूत्रवातक्रमनिग्रहाच्च ॥

प्रसक्तसंरोदनशोककोपात् शिरोनुषुघातादतिमद्यपानात ॥२॥

तथा ऋतूणां च विपर्ययेण क्लेशाभिघातादतिमैथुनाच्च ॥

बाष्पग्रहात्सूक्ष्मनिरीक्षणाच्च नेत्रे विकारान्‌ जनयन्ति दोषा : ॥३॥

शिराभिसारिभिर्दोषैर्विगुणैरूर्ध्वमाश्रितै : ॥

जायन्ते नेत्रभागेषु रोगा : परमदारूणा : ॥४॥

सूर्यकिरणाच्या तापाने शरीर व्याकुळ झालेले असता एकदम थंड पाण्यात शिरणे , दिवसा निद्रा घेणे व रात्री जागरण करणे , दूर अंतरावर टक लावून पाहणे अथवा बारीक पदार्थाकडे सारखी द्दष्टि लावणे , अति स्त्रीसंग करणे , निरंतर रडणे , अश्रूंचा वेग दाबणे , डोळ्यांना वाफ लागणे , अथवा त्यांत धूळ किंवा धूर शिरणे व आलेला घाम तसाच त्यांच्या ठिकाणी जिरणे , डोक्यावर प्रहार होणे व त्याचप्रमाणे मल , मूत्र व अपान वायु यांच्या वेगाचा अवरोध , वांतीच्या वेगाचा विधात अथवा अतियोग ; पातळ अन्न व पाणी यांचे अति सेवन , अति मद्यपान , ऋतुविपर्यय ( म्हणजे शीतकाळी उष्ण पदार्थोचे सेवन व उष्णकाळी शीत पार्थांचे सेवन ), आणि मानसिक दु : ख , खेद , शोक अथवा संताप यामुळे वातादि दोष प्रकृपित होऊन डोळयांच्या शिरात शिरतात व नंतर त्यांचा सर्व भाग व्यापून त्या ठिकाणी परम भयंकर असे रोग उत्पन्न करतात .

वातात्पित्तात्कफाद्रक्तादभिष्यन्दश्चतुर्विध : ॥

प्रायेण जायते घोर : सर्वनेत्रामयाकर : ॥५॥

त्या सर्व प्रकारच्या रोगांची उत्पत्ति प्राय : अभिष्यंदापासून ( डोळे येणे या विकारापासून ) आहे म्हणून त्याविषयीच प्रथम सांगतो . हा अभिष्यंद , वातजन्य , रक्तजन्य , पित्तजन्य व कफजन्य अशा चार प्रकारांनी मनुष्याच्या डोळयांस होत असतो .

वातजन्य निस्तोदनस्तंभनरोमहर्षसंघर्षपारुष्यशिरोऽभितापा : ॥

अभिष्यंद . विशुष्कभाव : शिशिराश्रुता च वाताभिपन्ने नयने भवन्ति ॥६॥

वायूच्या प्रकोपाने डोळे आले असता ते जड होतात , त्यांस सुयांनी टोचल्याप्रमाणे मस्तकात पिडा होते , ते रूक्ष असतात , त्यातून थंड अश्रु वाहतात , ते खुपतात , त्यातून स्त्राव होतो , पण मल बाहेर पडत नाहीं . आणि ते आल्याकारणाने रोग्याच्या अंगावर शहारे येतात .

पित्तजन्य दाहप्रपाकौ शिशिराभिनन्दा धूमायनं बाष्पसमुच्छ्रयश्च ॥

अभिष्यंद . उष्णाश्रुता पीतकनेत्रता च पित्ताभिपन्ने नयने भवन्ति ॥७॥

जेव्हा पित्तप्रकोपाने डोळे येतात तेव्हा त्यांच्या ठिकाणी पिवळेपणा दिसतो . आग अतिशय होते , आंतून धूर निधाल्याप्रमाणे दु : ख होते व त्यांस काही थंड पदार्थ लावावा असे रोग्यास वाटते ; आणि तसेच त्यांस सारखी गळ लागून कढत पाणी वाहते व त्याच पाक होतो .

कफजन्य उष्णाभिनन्दा गुरुताऽक्षिठगेथ : कण्डूपदेहावतिशीतता च ॥

अभिष्यंद स्त्रावो बहु : पिच्छिल एव चापि कफाभिपन्ने नयने भवन्ति ॥८॥

कफप्रकोपामुळे आलेल्या डोळयांच्या ठिकाणी जडत्व , पिचपिचितपणा , कंड , सूज व अति गारवा ही लक्षणे असून त्यातून चिकट पाण्याचा पुष्कल स्राव होतो व त्यांस काही उष्ण पदार्थ लावावा अथवा ते शेकावे असे रोग्यास वाटते ,

रक्तजन्य ताम्राश्रुता लोहितनेत्रता च राज्य : समन्तादतिलोहिताश्च ॥

अभिष्यंद . पित्तस्य लिङ्गानि च यानि तानि रक्ताभिपन्ने नयने भवन्ति ॥९॥

रक्तदोषाने डोळे आले असता वर सांगितलेली पित्तप्रकोपाने येणार्‍या डोळयांची सर्व लक्षणे असून त्याशिवाय ते लाला असतात ; त्यांतून तांबूस वर्णाचे अश्रु वाहतात व भोवताली अति लाल रेषा उद्भवतात .

अधिमंथाचीं लक्षणें .

वृद्धैरेतैरभिष्यन्दैर्नराणार्मांकियावताम्‌ ॥

तावन्तस्त्वधिमन्था : स्थुर्नयने तीव्रवेदना : ॥१०॥

उत्पाटयत इवात्यर्थं नेत्रं निर्मथ्यते तथा ॥

शिरसोऽर्धं च तं विद्यादधिमन्थं स्वलक्षणै : ॥११॥

वर सांगितलेल्या चारही प्रकारच्या अभिष्यंदावर जर काही औषधोपचार न करून ते हयगयीने तसेच वाढ दिले तर त्यापासून डोळयांच्या ठिकाणी तितक्याच प्रकारचे अधिमंथरोग उत्पन्न होऊन त्यामुळे अर्घ्या डोक्यात घुसळल्यासारख्या तीव्र व अत्यंत वेदना उद्भवतात व डोळे काढल्याप्रमाणे यातना होतात . सर्व अधिमंथांची ही सामान्य लक्षणे असून बाकीची लक्षणे त्याच प्रकारच्या अभिष्यंदाच्या लक्षणासारखी असतात व त्यांची उपेक्षा केल्यास पुढे सांगितलेल्या अवधीत रोग्याचे डोळे जातात .

हन्याद्दृष्टिं श्लैष्मिक : सप्तरात्राद्योऽधीमन्थो रक्तज : पञ्चरात्रात्‌ ॥

षड्रात्राद्वा वात्तिको वै निहन्यान्मिथ्याचारात्पैत्तिक : सद्य एव ॥१२॥

वातजन्य अधिमंथ सहा दिवसांनी , पित्तजन्य भलतेच उपचार केले अमता तत्काळ ( नाही तर तीन दिवसांनी ); कफजन्य सात दिवसांनी व रक्तळन्य यांच दिवसांनी या क्रमाने द्दष्टीचा नाश करणारे आहेत ; यासाठी अंजनादि जे उपचार करणे असतील ते योग्यप्रकारे त्या कालाच्या आंत करावेत .

आता नेत्ररोगांच्या पक्कपाविषयी व अपक्कपणाविषयी सांगतो .

नेत्ररोगाची अपक्क व पक्क स्थिति .

उदीर्णवेदनं नेत्र रागोद्रकेसमन्वितम्‌ ॥

घर्षनिस्तोदशूलाश्रुयुक्तमामान्वितं विदु : ॥१३॥

मन्दवेदनता कण्डू : संरम्भाश्रुप्रशान्तता ॥

प्रसन्नवर्णता चाक्ष्णो : सपक्कं दोषमादिशेत्‌ ॥

ज्या नेत्ररोगांत डोळयांना लाली व वेदना फार असून ते गढुळतात , त्यात खडा गेल्यासारखी खूप लागते अथवा सुयांनी टोचल्यासारखी पीडा होते आणि ठणका व गळ हे दोन्ही प्रकार सुरू असतात तो नेत्ररोग अपक्क समजावा ; व ज्यात डोळयांची सूज उतरलेली दिसते . ठणक कमी होतो , गळ नाहीशी होते , कंड सुटते व डोळे निवळतात तो नेत्ररोग पव्क झाला असा निश्वय करावा .

सशोथ व अशोथ नेत्रपाक .

कण्डूपदेहाश्रुयुत : पव्कोदुम्बरसन्निभ : ॥

संरम्भी पच्यते यस्तु नेत्रपाक : स शोथज : ॥

शोथहीनानि लिङ्गानि नेत्रपाके त्वशोथजे ॥१४॥

तिन्ही दोषांपासून डोळयांच्या ठिकाणी नेत्रपाक म्हणून जो रोग होतो त्याचे सशोथ नेत्रपाक व अशोथ नेत्रपाक असे दोन प्रकार आहेत ; पैकी सशोथात डोळयांना सूज येऊन ती पिकते व तिजमुळें त्यांच्या ठिकाणी गळ , कंड व पिचपिचितपणा ही असतात व ते पिकलेल्या उंबरासारखे दिसतात ; आणि अशोथात सूज नसून बाक्रीची तिजमुळे होणारी लक्षणेच मात्र उद्भवलेली द्दष्टीस पडतात .

हताधिमंथाचीं लक्षणें .

उपेक्षणादक्षि यदाऽधिमन्थो वातात्मक : सादयति प्रसह्य : ॥

रुजाभिरुग्राभिरसाध्य एष हताधिमन्थ : खलु नेत्ररोग : ॥१५॥

वातजन्य अधिमंथ रोगावर चिकित्सा करण्याविषयी हयगय केली तर ती डोळयांना अगदी शुष्क करून टाकतो ; मग त्यांच्या ठिकाणी टोचणी व दाह वगैरे प्रकार सुरू होऊन ते असाध्य होतात . वातजन्य अधिमंथाच्या या शेवटल्या परिणामास वैद्यशास्त्रांत हताधिमंथ असे म्हणतात .

वातपर्यायाचीं लक्षणें .

वारंवारं च पर्येति भ्रुवौ नेत्रे च मारुत : ॥

रुजश्च विविधास्तीव्रा : स ज्ञेयो वातपर्यय : ॥१६॥

प्रकुपित वायु कधी कधी भ्रुकुटीत व कधी कधी डोळयांत येऊन त्यामुळे त्यांच्या ठिकाणी ज्या भयंकर वेदना उत्पन्न होतात त्या विकारास वातपर्यय असे नाव आहे .

शुष्काक्षिपाकाचीं लक्षणें .

यत्कूणितं दारुणरूक्षवर्त्म संदहयते चाविलदर्शनं यत्‌ ॥

सुदारुणं यत्प्रतिबोधने च शुष्काक्षिपाकोपहतं तदक्षि ॥

शुष्काक्षिपाक हा ( रक्तवातजन्य ) विकार डोळयास झाला असता ते मिटले जाऊन उघद्दण्यास जड जातात अथवा मुळीच उघडता येत नाहीत ; त्यांच्या पापण्या कठीण व रूक्ष होतात . त्यांच्या टिकाणी अत्यंत आग होत असते व ते गढूळ झालेले द्दष्टीस पदतात .

अन्यतोवाताचीं लक्षणें .

यस्यावटूकर्णशिरोहनुस्थो मन्यागतो वाप्यनिलोऽन्यतो वा ॥

कुर्याद्रुजं वै भ्रुवि लोचने च तमन्यतोवातमुदाहरन्ति ॥१८॥

जेव्हा प्रकुपित वायु गळ्यातील घाटी , मानेंच्या शिरा , डोके , कान , हनुवटी , यांच्या ठिकाणी राहून डोळयांत आणि भुवयांत टोचणी , जळजळ वगैरे वेदना उत्पन्न करतो तेव्हा त्या प्रकारच्या नेत्ररोगास अन्यतोवात म्हणतात .

अम्लाध्युषिताचीं लक्षणें .

श्यावं लोहितपर्यन्तं सर्वं चाक्षि प्रपच्यते ॥

सदाहशोथं सास्रावमम्लाध्युषितमम्लत : ॥१९॥

अम्लाध्युषित हा विकार अतिशय आंबट पदार्थ खाण्यात आल्याने डोळयांस होत असतो . यात संपूर्ण नेत्र निळया वर्णाचा होऊन त्यांच्या कडा लाल होऊन त्या पिकतात ; त्यांच्या ठिकाणी दाह असून त्यांवर सूज येते व त्याचप्रमाणे त्यांस गळ लागते व त्यांवर बारीक अशा पिवळया पुटकळया उद्भवतात .

शिरोत्पात - लक्षणें .

अवेदना वापि सवेदना वा यस्याक्षिराज्यो हि भवन्ति ताम्रा : ॥

मुहुर्विरज्यन्ति च या : स ताद्दग्व्याधि : शिरो्त्पात इति प्रदिष्ट : ॥

शिरोत्पात हा विकार रक्तजन्य आहे . यात डोळयांतील शिरा वारंवार तांबडया पडतात व त्या निवळतात . तसेच त्यांच्या ठिकाणी कधी वेदना असतात अथवा कधी मुळीच नसतात .

शिराहर्षाचीं लक्षणें .

मोहाच्छिरोत्पात उपाक्षतस्तु जायेत रोगस्तु शिराप्रहर्ष : ॥

ताम्राभमस्नं स्नवति प्रगाढं तथा न शक्रोत्यभिवीक्षितुं चा ॥२१॥

वर सांगितलेल्या प्रकारचा शिरोत्पात झाला असून जर त्यावर औषधोपचार करण्याविषयी हयगय झाली तर स्यापासून शिराहर्ष हा विकार उत्पन्न होतो . यात रोग्याच्या डोळयावाटे दांबडया वर्णाचे अश्रु सारखे गळत असतात व त्यास पापण्या उघडून पाहता येत नाही .

येथपर्यंत डोळयांच्या बाहेरील दिकारांविषयी सांगितले ; आता त्यांमधील काळया बुब्बुळाच्या विकाराविषयी पुढे सांगतो .

सव्रण शुक्राचीं लक्षणें .

निमग्नरूपं तु भवेद्धि कृष्ण सूच्येव विद्धं प्रतिभाति यद्वै ॥

स्नांव स्नवेदुष्णमतीव यच्च तत्सव्रणं शुक्रमुदाहरन्ति ॥२२॥

द्दष्टे : समीपे न भवेनु यत्तु न चाबगाढं न च संस्नवेद्धि ॥

अवेदनं वा न च युग्मशुक्रं तत्सिद्धिमायाति कादाचिदेव ॥२३॥

डोळयांतील बुब्बुळावर सुईने टोचल्यासारखी बारीक खाच पडल्यासारखी दिसते तेव्हा त्यास सव्रणशुक्र म्हणतात . हे झाले असता डोळयांवाटे कढत पाण्याचा पुष्कळ स्राव होतो . डोळयांच्या आतील मूदुभागी पडलेल्या क्षतामुळे अत्यंत ठणका लागतो . हे बहुतकरून असाध्य आहे . तथापि ते फूल जर एका फुलाशेजारी दुसरे अशा रीतीने उत्पन्न झालेले नसून तसेच द्दष्टीजवळ उद्भवलेले , खोल गेलेले , फर पाणी गळत असलेले व ठणका लागलेले नसले तर कादाचित्‌ त्यावर औषधोपचार केल्याने साध्य होते .

अव्रण शुक्राचीं लक्षणें .

स्पन्दात्मकं कृष्णगतं सचोषं शङेखन्दुकुन्दप्रतिभावभासम्‌ ॥

वैहायसाभ्रप्रतनुप्रकाशमथाव्रणं साध्यतमं वदन्ति ॥२४॥

गम्भीरजातं बहलं च शुक्रं चिरोत्थितं वापि वदन्ति कृच्छ्र्म्‌ ॥

विच्छिन्नमध्यं पिशितावृतं वा चलं शिरासूक्ष्ममद्दष्टिकृच्च ॥

द्वित्वग्गतं लोहितमन्ततश्च चिरोत्थितं चापि विवर्जनीयम्‌ ॥२५॥

डोळे येण्याचा विकार झाला असता त्याच विकारापासून डोळयांच्या बुब्बुळावर ब्रणरहित असे जे फूल उद्‌भवते ; त्याचा वर्ण शंख , कुंदपुष्प अथवा चंद्र यासारखा निव्वळ पांढरा असून ते आकाशातील ढगाप्रमाणे पातळ दिसते व त्यामुळे तुमडी लावल्यासारखी डोळयांस ओढ लागते . अशा लक्षणाचे हे अब्रणशुक्र औषधोपचाराने सुसाध्य आहे ; पण जर ते उत्पन्न होऊन फार दिवस झाले असले अथवा बुब्बुळात खोल गेले व त्याचप्रमाणे जाड झाले तर कष्टसाध्य होते . याशिवाय याच प्रकारच्या फुलामधील मांस झडून जाऊन ते खळगा पडलेले अथवा ते मध्ये तसेच राहून त्याच्याभोवती मांस वाढले , तसेच ते पसरत असले , शिरांनी व्यापून टाकल्यामुळे बारीक दिसू लागले , फार दिवस राहून जुने झाले , भोवती तांबडे असून मध्ये पांढरे पडले , डोळयांच्या बुब्बुळावरील दोन सूक्ष्म पटलांच्या पार गेले व त्याने द्दष्टीला अगदी नाहीसे केले म्हणजे वैद्यास हेच अव्रणशुक्र असाध्य जाणून सोडून देणे भाग पडते .

उष्णाश्रुपात : पिडका च नेत्रे यस्मिन्भवते‌ मुद्ननिमं च शुक्रम्‌ ॥

तदप्यसाध्यं प्रवदन्ति केचिदन्यच्च यात्तत्तिरिपक्षतुल्यम्‌ ॥२६॥

वर सांगितलेल्या लक्षणांच्या अव्रणशुक्राशिवाय डोळयांतून वारंवार उष्णाश्रू गळाल्यामुळे त्यामध्ये बुब्बुळावर एक पुतकुळी उत्पन्न होते व त्याच ठिकाणी मुगाएवढे व त्याच्या वर्णांचे असे छिद्र नसलेले फूल पडते . अशा प्रकारे पडलेले हे फूल असाध्य आहे . तसेच कधी कधी तित्तीर पक्ष्याच्या पंखासरखे ठिपकेदार असे जे फूल डोळयांत पडते तेही कांही वैद्यांच्या मते असाध्य आहे .

अक्षिपाकात्ययाचीं लक्षणें .

श्वेत : समाक्रामति सर्वतो हि दोषेण यस्यासितमण्डलं च ॥

तमक्षिपाकात्ययमक्षिपाकं सर्वात्मकं वर्जयितव्यमाहु : ॥२७॥

त्रिदोषांपासून डोळयांच्या बुब्बळावर फुलाप्रमाणे सर्वत्र पांढरेपणा पसरणे यास अक्षिपाकात्यय अशी संज्ञा असून हा नेत्ररोग असाध्य म्हणून सांगितला आहे .

अजकाजात लक्षणें .

अजापुरीषप्रतिमो रुजावान्‌ सलोहितो लोहितपिच्छिलाश्रु : ॥

विगृह्य कृष्णं प्रचयोऽभ्युपैति तच्चाजकाजातमिति व्यवस्पेत्‌ ॥

डोळयातील काळया बुब्बुळावर शेळीच्या वाळलेल्या लेंडीसारखा , किंचित्‌ लाल वर्णाचा अथवा किंचित्‌ तांबूस असा जो फुगवटा उद्भवतो त्यास अजकाजात असे नाव असून ह्या विकारामुळे बुब्बुळास ठणका लागतो व डोळयांवाटे लाल चिकट चिकट अश्रु गळतात .

येथे बुब्बुळाचे सर्व रोग संपून आता पुधे द्दष्टीसंबंधी विकारास प्रारंभ झाला आहे असे समजावे .

प्रथमपटलगत दोषलक्षणें .

प्रथमे पटले दोषा यस्य द्दष्टयां व्यवस्थिता : ॥

अव्यक्तानि स रूपाणि कदाचिदथ पश्यति ॥२९॥

प्रकुपित दोष पहिल्या पडद्यात शिरून त्यांनी द्दष्टि व्यापून टाकली असता रोग्यास सर्व पदार्थ स्पष्ट दिसतात .

द्वितीय पटलगत दोषलक्षणें .

द्दष्टिर्भृशं विव्हलति द्वितीये पटले गते ॥

मक्षिकामशकांश्वापि जालकानि च पश्यति ॥३०॥

मण्डलानि पताकांश्व मरीचिं कुण्डलानि च ॥

परिप्लवांश्च विविधान्‌ वर्षमभ्रं तमांसि च ॥३१॥

दॄरस्थानिच रुपाणि च मन्यते स समीपत : ॥

समीपस्थानि दूरे च द्दष्टेर्गोचरविभ्रमात्‌ ॥३२॥

यत्नवानपि चात्यर्थं सूचीपाशं न पश्यति ॥

दुसर्‍या पडद्यात गेलेल्या दोषांमुळे द्दष्टि व्याकुल झाली असता ती कोणताही पदार्थ पाहण्याविषयी असमर्थ होते व तिला विषयभ्रांति होऊन दूर असलेले पदार्थ जवळ दिसतात व जवळचे दूर वाटतात ; मोठया प्रयासानेही तिला सुईचे नेडे दिसत नाही . तसेच डोळयांपुढे अनेक वस्तु फिरताहेत असे वाटते व माशा , चिलटे , केस , जाळी , पताका , किरणे , कुंडले , अभ्रे वगैरे , अनेक प्रकारच्या पावसाच्या घारा व अंधार मुळीच नसताना द्दष्टि व्याकुळ झाल्यामुळे आहेतसे वाटतात .

तृतीय पटलगत दोषलक्षणें .

ऊर्ध्वं पश्यति नाधस्तात्‌ तृतीयं पटलं गते ॥३३॥

महान्त्यपि च रूपाणि छादितानीव चाम्बरै : ॥

कर्णनासाक्षिहीनानि विकृतानि च पश्यति ॥३४॥

यथादोषं च रज्येत्‌ द्दष्टिर्दोषे बलीयसि ॥

अध : स्थे तु समीपस्थं दूरस्थं चोपरिस्थिते ॥३५॥

पार्श्वस्थिते पुनर्दोषे पार्श्वस्थं नैव पश्यति ॥

समन्तत : स्थिते दोषे सकुलानीव पश्यति ॥३६॥

द्दष्टिमध्यस्थिते दोषे सकुलानीव पश्यति ॥

द्विधा स्थिते द्विधा पश्येद्वहुधा वाऽनवस्थिते ॥३७॥

दोषे द्दष्टिस्थिते तिर्यगेकं वै मन्यते द्विधा ॥

प्रकुपित वातादि दोष तिसर्‍या पडद्यात शिरले म्हणजे रोग्यास वरचे मात्र दिसते ; खालचे दिसत नाही . विशाल भव्य असे पदार्थ जरी पुढे असले तरी त्यास ते वस्त्रादिकांनी झाकल्यासारखे दिसतात व डोळे , नाक , कान वगैरे नसलेली शरीरे द्दष्टीस पडतात . या विकारात रक्तादि धातूंच्या सहाय्याने वातादिदोष प्रबळ झालेले असतात . म्हणून ते आपल्या वर्णाने द्दष्टीला रंगवून टाकतात . ( म्हणजे वातामुळे द्दष्टि काळी अथवा निळी होते ; पित्तामुळे पिवळी होते व कफामुळे पांढरी होते व तिनं पाहिलेले कोणतेही पदार्थ तिच्याच वर्णाचे दिसतात .) तसेच दोषांचे स्थान खाली असता जवळचे ; वर असता दूरचे व बाजूस असता बाजूचे दिसत नाहीसे द्वोते ; व सर्वत्र पसरले असता द्दष्टीने पाहिलेले पदार्थ एकमेकांत मिसळलेले वाटतात . मशिवाय दोष द्दष्टीच्या मध्ये गेल्यास मोठे पदार्थ लहान दिसतात . दोन ठिकाणी झाल्यास ( एकेकच असलेले पदार्थ ) दोनदोन आहेतसे वाटतात ; अव्यवस्थित ( नियमित जागी नसलेले ) राहिल्यास ( एकेकच पदार्थ ) अनेक रूपात्मक भासतात . आणि बाजूस आल्यास ( एकच अखंड ) पदार्थाचे दोन तुकडे केल्याप्रमाणे द्दष्टिस पडतात .

चतुर्थ पटलगत दोघाचीं लक्षणें .

तिमिराख्य : स वै रोगश्चतुर्थपटलं गत : ॥३८॥

रुणद्धि सर्वतो द्दष्टिं लिङ्गनाशमत : परे ॥३९॥

अस्मिन्नपि तमोभूते नातिरूढे महागदे ॥

चन्द्रादित्यौ सनक्षत्रावन्तरिक्षे च विद्युत : ॥४०॥

निर्मलानि च तेजांसि भ्राजिष्णूनि च पश्यति ॥

वातादि दोषांपैकी कोणताही दोष डोळयांत चतुर्थ पटलगत झाला म्हणजे त्या विकारास तिमिर अथवा लिंगनाश असे म्हणतात . यामुळे चहूकडून द्दष्टीचा रोध होतो ( म्हणजे सर्व अंधकारम्य दिसू लागते ) व जेव्हा हा फार वाढलेला नसतो तेव्हा रोग्याम्र त्याच्या द्दष्टीच्या प्रोकळीत चंद्र , सूर्य , तारे , विजा व त्याचप्रमाणे दुसरी स्वच्छ व दैदीप्यमान अशी तेजे दिसतात .

काच व मोतीबिंदु .

स एव लिङ्गनाशस्तु नांलिका काचसंज्ञित : ॥४१॥

दोष तृतीय पटल्गत झाला असता डोळयांत काच उद्भवतो व या काचात्ती उपेक्षा केल्यास तो चवथ्या पटलात शिरून असाध्य होतो ; तेव्हा त्यास नीलिका अथवा लिंगनाश ( मोतीबिंदु ) म्हणतात .

पृथ‍क्‌ दोषांत होणारे पृथक्‌ रूपाचें दर्शन .

तत्र वातेन रूपाणि भ्रमन्तीव च पश्यति ॥

आविलान्यरूणाभानि व्याविद्धानीव मानव : ॥४२॥

पित्तेनादित्यखद्योतशक्रचापतडिद्नणान्‌ ॥

नृत्यतश्चै शिखिन : सर्वं नीलं च पश्यति ॥४३॥

कफेन पश्येद्रूपाणि स्निग्धानि च सितानि च ॥

सलिलप्लावितानीव परिजाडयानि मानव : ॥४४॥

सन्निपातेन चित्राणि विप्लितानि च पश्याति ॥

रूपाचें दर्शन .

बहुधा च द्विधा वापि सर्वाण्येव समन्तत : ॥

हीनाङ्गान्यधिकाङ्गानि ज्योतींष्यपि च पश्यति ॥४५॥

पश्येद्रक्तेन रक्तानि तमांसि विविधानि च ॥

स सितान्यपि कृष्णानि पीतान्यपि च मानव : ॥४६॥

वरी तिमिर रोगाची सामान्य लक्षणे सांगितली . त्यातच निरनिराळया दोषांचे प्राधान्य असता निरनिराळी रूपे दिसतात ती अशी की , वाताधिक्य असता अस्वच्छ , तांबडी , वेडीवाकडी व फिरणारी अशी रूपे अथवा आकार द्दष्टीस पडतात ; पित्ताधिक्य असता सूर्य , काजवा , इंद्रधनुष्य , विजा व नाचत असलेले मोर दिसतात आणि सर्व पदार्थ निळया रंगाचे आहेतसे वाटतात . कफाधिक्यामुळे स्निग्ध , पांढर्‍या वर्णच्या , जड व पाण्यात बुचकळून काढल्यासारख्या अस्पष्ट आकृति दिसतात . सन्निपातात भिन्नभिन्न वर्णाच्या एकाची दोन किंवा अनेक रूपे झालेल्या व त्याचप्रमाणे कमी अथवा अधिक अवयवांनी बेढब दिसणार्‍या अशा आकृति व ( तेजस्वी ) ज्योति द्दष्टीस पडतात ; आणि रक्तदोषाधिक्यामुळे तांबूस , किंचित्‌ पांढर्‍या , पिवळया काळया अशा ; वर्णाच्या आकृति रोग्यास त्याच्या द्दष्टीसमोरच्या पोकळीत दिसतात .

परिम्लायितिमिराचीं लक्षणें

पित्तं कुर्यात्‌ परिम्लायि मूर्च्छितं रक्ततेजसा ॥

पीता दिशस्तथोद्यन्तं रविं चापि स पश्यति ॥४७॥

विकीर्यमाणान्‌ खद्योतैर्वृक्षांस्तेजोभिरेव च ॥

रक्तपित्तापासून परिम्लयिनामक ( वर सांगितलेल्या तिमिराखेरीज ) दुसर्‍या प्रकारचा एक तिमिर रोग उत्पन्न होत असतो व त्यात रोगी सूर्य उगवलेला , सर्व दिशा पिवळया झालेल्या व त्याचप्रमाणे झाडांच्या रागा काजळव्यांनी अथवा दुसर्‍या विलक्षण तेजांनी लकाकत असलेल्या पाहतो .

वक्ष्यामि षड्विधं रागैलिंङ्गनाशमत : परम्‌ ॥४८॥

निरनिराळया दोषांमुळे मोतीबिंदुचे वर्णपरत्वे सहा प्रकार आता सांगतो .

सहा प्रकारचे लिंगनाशाचे वर्ण .

रागोऽरुणो मारुतज : प्रदिष्टो म्लायी च नीलश्च तथैव पित्तात्‌ ॥

कफात्‌ सित : शोणितज : सरक्त : समस्तदोषप्रभवो विचित्र : ॥४९॥

अरुणं मण्डलं द्दष्टयां स्य़ूलकाचारूणप्रभम्‌ ॥५०॥

परिम्लायिनी रोगे स्पानम्लायि नीलं च मण्डलम्‌ ॥

दोषक्षयात्कदाचित्स्यात्स्वयं तत्र तु दर्शनम्‌ ॥५१॥

वातामुळे झालेला मोतीबिंदू तांबूस वर्णाचा असतो ; पित्तामुळे पिवळट निळा अथवा निळा झालेला दिसतो ; कफाने पांढर्‍या वर्णाचा होतो ; रक्तदोषापासून लालसर असा उद्भवतो ; सान्निपातिक अनेक प्रकारच्या वर्णांनी मिश्रित झालेला द्दष्टीस पडतो व रक्तपित्तजन्य परिम्लयि तिमिररोग द्दष्टीस जाड काचेसारख्या उद्भवलेल्या तांबडया वर्णाच्या मंडलांनी युक्त असतो . या परिमलयि तिमिगंतील हे मंडळ कधी हिरव्या व कधी निळया अशा वर्णांचे देखील असते व दोषांचे प्राबल्य कमी झाल्यास आपोआप केव्हा केव्हा द्दष्टी येते .

द्दष्टिमंडलाचे प्रकार व लक्षणें .

अरुणं मण्डलं वातात्‌ चञ्चलं परूषं तथा ॥

पित्तान्मण्डलमानीलं कांस्याम पीतमेव च ॥५२॥

श्लेष्मणा बहलं स्निग्धं शङ्वकुन्देन्दुपाण्डुरम्‌ ॥

चलत्पद्मपलाशस्थ : शुक्लो बिन्दुरिवाम्भस : ॥

मृद्यमाने च नयने मण्डलं तद्विसर्पति ॥५३॥

प्रवालपद्मपत्रामं मण्डलं शोणितात्मकम्‌ ॥

द्दष्टिरागो भवेच्चित्रो लिङ्गनाशे त्रिदोषजे ॥

यथास्वं दोषलिङ्गानि सर्वेष्वेव भवन्ति हि ॥५४॥

निरनिराळया दोषांपासून निरनिराळे प्रकार द्दष्टीमंडलाचे ठिकाणी झालेले द्दष्टीस पडतात ते असे की , वायूमुळे द्दष्टिमंडल तांबडया वर्णाचे , लहान मोठे होणारे व खरखरीत असे होते . पित्तामुळे ( द्दष्टिमंडल ) किंचित्‌ निळया व काशासारख्या पिवळया वर्णाचे झालेले असते ; कफामुळे ते स्निग्ध व जाड असून शंख , कुंदपुष्प व चंद्र यांच्यासारख्या पांढर्‍या वर्णाचे द्दष्टीस पडते व ( वार्‍याने ) हलणार्‍या कमळाच्या पानावरचा पाण्याचा बिंदू पसरतो त्याप्रमाणे डोळा चोळला असता ते पसरते ; रक्तामुळे तेच द्दष्टीमंडळ पोवळयासारखे अथवा तांबडया कमळासारखे लाल पडते आणि सान्निपातिक लिंगनाशात अनेक प्रकारच्या वर्णांचे व सर्व दोषांच्या लक्षणांनी युक्त असते .

षडलिङ्गनाशा : षडिमे च रोगा द्दष्टयाश्रया : षट्‌च षडेव च स्यु : ॥

द्दष्टीय होणार्‍या बारा विकारापैकी सहा लिंगनाशांची लक्ष्णे आतापर्यंत सांगितली . आता बाकीच्या सहा विकारांविषयी खाली सांगतो :---

तथापर : पित्तविदग्धद्दष्टि : कफेन चान्यस्त्वथधूमदर्शीं ॥

यो र्‍हस्वजात्योनकुलान्धसंज्ञो गम्भीरसंज्ञा च तथैवद्दष्टि : ॥५५॥

ते सहा विकार पित्तविदग्धद्दष्टि , कफविदग्धद्दष्टि , धृमदर्शी , र्‍हस्वद्दष्टि , नकृलाध्य व गंभीरद्दष्टि हे होत .

पित्तविदग्धद्दष्टीचीं लक्षणें .

पित्तेन दुष्टेन गतेन वृद्धिं पीता भवेद्यस्य नरस्य द्दष्टि : ॥

पीतानि रूपाणि च तेन पश्येत्स वैनर : पित्तविग्धद्दष्टि : ॥

दूषित झालेल्या पित्तामुळे द्दष्टीच्या ठिकाणी पिवळेपणा येऊन सर्व पदार्थ पिवळया वर्णाचे दिसू लागले म्हणजे पित्तविदग्वद्दष्टि विकार झाला असे समजावे .

( दिवांधळें ) दिवांध्य .

प्राप्ते तृतीयं पढलं च दोषे दिवा न पश्येन्निशि वीक्षते स : ॥

रात्रौ स शीतानुनृहीतद्दष्टि : दित्ताल्पभावादपि तानि पश्येत्‌ ॥

पित्तविदग्धद्दष्टीविकारातील दोष तिसर्‍या पटळात गेला असता रोग्यास दिवांध्य अथवा दिवांवळे होते . म्हणजे दिवसा पितावा भर असल्प : मुळे त्यास दिसत नाही ; रात्रीच्या थंडपणामुळे ते उतरले म्हणजे दिसू लागते .

कफविदग्धद्दष्टि तथा नर : श्लेष्मविदग्धद्दष्टित्तान्येव शुक्ल नि हिमन्यते तु ॥

दूषित कफामुळे कफविदग्धद्दष्टीचा विकार उद्भवतो व यात द्दष्टीचे ठिकाणी पांढरेपणा येऊन सर्व वस्तु पांढर्‍याच दिसतात .

नक्तांध्य ( रातांधळें )

त्रिषु स्थितो य : पटलेषु दोषो नक्तान्ध्यमापादयति प्रसह्य ॥

दिवा स सूर्यानुगृहीतद्दष्टि : पश्येत्तु रूपाणि कफाल्पभावात्‌ ॥

हाच ( कफविदग्धद्दष्टीतील ) कफ तिसर्‍या पटलात गेला म्हणजे नक्तांध्य अथवा रातांधळे उत्पन्न करतो . यामुळे रोग्यास रात्री कफास जोर असल्यामुळे दिसत नाही . दिवसा तो सूर्याच्या तापाने जेव्हा कमी होतो तेव्हा दिसते .

धूमदर्शीचीं लक्षणें .

शोकज्वरायासशिरोभितापैरभ्याहता यस्प नरस्य द्दष्टि : ॥

धूम्रांस्तथा पश्यति सर्वभावान्‌ स धूमदर्शीति नर : प्रदिष्ट : ॥

शोक , श्रम , ज्वर व मस्तकातील ताप यामुळे प्रकुपित झालेल्या पित्तापासून धूमदर्शिनी द्दष्टीचा विकार उद्भवतो ; यात दिवसा पित्ताला जोर असल्यामुळे रोग्यास सर्व पदार्थ धुरकटलेले दिसतात ; व रात्री तो कमी पहल्यामुळे स्वच्छ दिसून येतात .

र्‍हस्वद्दष्टि यो र्‍हस्वजात्यो दिवसेषु कृच्छ्रात्‌ र्‍हस्वानि रूपाणिच तेन पश्येत्‌ ॥

मध्यगत असता सर्व पदार्थ ( आपल्या वास्तविक रूपाहून ) लहान दिसतात .

नकुलांध्य - लक्षणें .

विद्योतते यस्य नरस्य द्दष्टिर्दोषाभिपन्ना नकुलखय यद्वत्‌ ॥

चित्राणि दिवा स पश्येत‌ स वै विकारो नमुलान्ध्यसंज्ञ : ॥

ज्यास नकुलांध्य हा द्दष्टिविकार होतो त्याची हष्टि वातादि दोषांनी व्याप्त होऊन मुंगसाच्या द्दष्टीसारखी चमकते व त्यास ( त्याच्या डोंळयांसमोरील पोकळीत ) चिन्नविचिव्र वर्णाच्या आकृति दिसतात . [ हा विकार चतुर्थ पटलगत दोषामूळे ऊद्भवतो .]

गंभीरद्दष्टि .

द्दष्टिर्विरूपा श्वसनोपसृष्टा संक्रोचमभ्यन्तरतश्च याति ॥६०॥

रुजावगाढं च तमक्षिरोगं गम्भीरिकेति प्रवदन्ति तज्ज्ञा : ॥

दूषित वायूमुळे द्दष्टि विरूप होऊन , आत संकोच पावते व तिला ठणका लागतो ; या द्दष्टिविकाराम गंभीर द्दष्टि असे म्हणतात . [ ह्य विकार सर्व पटलगत दोष होऊन होत असल्यामुळे अस्मध्य आहे .]

आगंतुक लिंगनाशक ,

वाह्यौ पुनर्द्वाविह संप्रदिष्टौ निमित्ततश्चाप्यानीमित्ततश्च ॥६१॥

निमित्ततस्तत्र शिरोऽभितापाज्क्षेयस्त्वभिष्यन्दनिदर्शन : स : ॥

सुरषिंगन्धर्वमहोरगाणां संदर्शनेनापि च भास्करस्य ॥६२॥

हन्येत द्दष्टिर्मनुजस्य यस्य स लिङ्गनाशस्त्वनिमित्तसंज्ञ : ॥

तत्राक्षि विस्पष्टमिवावमाति वैडूर्यवर्णा विमला च द्दष्टि : ॥६३॥

मागे लिंगनाश अथवा तिमिर या नेत्ररोगाच्या सहा प्रकारांविषयी सांगण्यात आले आहे ; पण त्मशिवाय आगंतुक बाह्म कारणांनीही कधी कधी लिंगनाश होत असतो ; म्हणून या द्दष्टिगेगांच्या शेवटी त्याविषयी माधवाचार्य सांगतात की , आगंतुक लिंगनाश दोन प्रकारांनी होतो . एक निमित्तजन्य व दुसरा अनिमित्तजन्य , पैकी विषारी वारा मस्तकास लागणे वगैरे कारणांनौ , निमित्तजन्य लिंगनाश होतो व व त्याची सर्व लक्षणे अभिष्यंद विकाराच्या लक्षणांसारखी असतात ; आणि देव , ऋषि , गंधर्य , महासर्प अथवा सूर्य यांकडे टका लावून पाहिले असता एकदम जो लिंगनाश होतो तो अनिमित्तजन्य असतो . यात द्दष्टि अगदी वैडूर्यमण्यासारखी निर्मळ दिसते ; पण तिने रोग्यास दिसत मात्र नाही .

येथे द्दष्टिसंबंधी सर्व रोग संपले . आता पाच प्रकारचे अर्म तसेच दुसरे नेत्ररोग याविषयी पुढे सांगाक्याचे आहे .

डोळयांच्या पांढर्‍या भागावरील रोग .

प्रस्तारिशुक्लक्षतजाधिमांस ---

स्नाय्वर्मसंज्ञा : खलु पञ्च रोगा : ॥

स्याच्छुक्तिकाचार्जुनपिष्टकौ च

जालं शिराणां पिडिकाश्च या : स्यु : ॥६४॥

रोगाबलासग्रथिलेन सार्द्ध -

मेकादशाक्ष्णो : खलु शुक्लभागे ॥

अर्म रोगाचे प्रस्त र्यर्म , शुक्लार्म , रक्तार्म , अधिमांसार्म व स्नाय्वर्म हे पाच प्रकार व त्याचप्रमाणे , शुक्तिका अर्जुन अथवा अहिरा , पिक्ष्क , जाल , शिराजन्य पिटिका व बलास हे निरनिराळे सहा विकार मिळून डोळयांतील पांढर्‍या भागावर होणारे अकरा रोग आहेत ; त्यांची लक्षणे खाली लिहिल्याप्रमाणे ----

पांच प्रकारच्या अमांचीं लक्षणें .

प्रस्तार्यर्म तनुस्तीर्णं श्यावं रक्तनिभं सिते ॥

सश्वेतं मृदु शुक्लार्म शुक्ले तद्वर्घते चिरात्‌ ॥६५॥

पद्माभं मृदुरक्तार्म यन्मांसं चीयते सिते ॥

पुथु मृद्वधिमांसार्म बहलं च यकृन्निभम्‌ ॥६६॥

स्थिर प्रस्तारि मांसाढयं शुष्कं स्नाय्वर्म पञ्चमम्‌ ॥

प्रस्तारि अर्म ही संज्ञा डोळयांच्या पांढर्‍या भागावर काळया व तांबूस वर्णाचे जे पातळ व पसरलेले मांस उद्भवते त्यास देतात . शुक्लार्म असे त्याच भागावर फार दिवसांनी वाढणार्‍या व पांढर्‍या वर्णाच्या अशा मृदु मांसास म्हणतात . कमळासारख्या लाल वर्णाचे व मऊ असे जे मांस उद्भवते ते रक्तार्म होय व पसरलेले , मऊ आणि काजळाच्या वर्णासारखे जे दिसते ते आधिप्रांसार्म होय , तसेच वरचेवर कठिण व स्त्रावरहित असे जे मांस वाढून पसरत जाते त्यास स्नाय्वर्म म्हणावे .

शुक्तिकेचीं व अहिर्‍याचीं लक्षणें .

श्यावा : स्यु : पिशितनिभास्तु बिन्दवो ये

शुक्त्याभा : सितनियता : स शुक्तिसंज्ञ : ॥

एको य : शशरुधिरोपमश्च बिन्दु :

शुक्लस्थोभवति तदर्जुनं वदन्ति ॥६८॥

डोळयांच्या पांढच्या भागावर मांसपिंद्यच्या वर्णसारखे सावळे व शिंपाच्या आकाराचे असे जे अनेक बिंदु उद्भवतात त्यास शुक्तिका म्हणतात ; व त्याच भागावर सशाच्या रक्तासारखा एक लालपिंड ( बिंदु ) उत्पन्न होतो त्यास वैद्यशास्त्रांत अर्जुन व लोकांत अहिरा असे म्हणतात .

पिष्टकाचीं लक्षणें .

श्लोष्ममारुतकोपेन शुक्ले मांसं समुन्नतम्‌ ॥

पिष्टवत्‌ पिष्टकं विद्धि मलाक्तादर्शसन्निभम्‌ ॥६९॥

कफ व वात यांपासून डोळयांच्या पांढर्‍या भागावर पिठाच्या वर्णचे व धुरळा बसून मळकट झालेल्या आरशासारखे दिसणारे असे जे मांस वाढते ते पिष्टक या नवाने प्रसिद्ध आहे .

जालांचीं व पिटिकांचीं लक्षणें .

जालाभ : कठिनशिरो महान्‌ सरक्त :

सन्तान : स्मृत इह जालसंझितस्तु ॥

शुक्लस्था : सितपिडका : शिरावृता यास्ता

ब्रूयादसितसमीपजा : शिराजा : ॥७०॥

डोळयांतील पांढर्‍या भागावर जाळयासारखे कठिण असे जे लाल शिरांचे जाळे उत्पन्न होते त्यास शिराजाल अथवा नुसते जाल म्हणतात व त्याच भागावर बुब्बुळांच्या शेजारी शिरांनी व्याप्त झालेल्या पुटकुळया होतात त्यांस शिराजन्य पिटिका अथवा नुसते पिटिका असे नाव देतात .

बलासाचीं लक्षणें .

कांस्याभोऽमृदुरथ वारिबिन्दुकल्पो

विज्ञेयो नयनसिते बलाससंज्ञ : ॥

तेथेच काशाच्या तुकडयासारखा पांढरा , कठिण व पाण्याच्या थेंबाप्रमाणे वर उचलून आलेला असा जो ग्रंथि उद्धवलेला दिसतो , त्यास बलास अशी संज्ञा आहे .

येणेप्रमाणे डोळ्यांतील पांढर्‍या भागावर होणार्‍या अकरा रोगांची नावे व लक्षणे सांगितली . आता सांध्यावरच्या विकारांविषयी पुढे सांगतो :---

पूयालस व उपनाह .

पक्क : शोथ : सन्धिजो य : सतोद ;

स्नवेत्पूयं पूति पूयालसाख्य : ॥

ग्रस्थिर्नाल्पोद्दष्टिसन्धावपाकी

कण्डुप्रायो नीरुजस्तूपनाह : ॥७१॥

डोळयांच्या सांध्यावर सूज उत्पन्न होऊन ती पिकते , फुटते , तिला ठणका लागतो व तीतून पुजाचा स्राव होतो . या विकरास पूयालस म्हणतात व त्याच्या ( डोळयाच्या ) सांध्यावर मोठी गांठ येते , ती किंचित्‌ पिकते व तिला कंड फार असून वेदना नसते , या प्रकारच्या गाठीस उपनाह म्हणतात .

नेत्रस्नावाचे प्रकार . व लक्षणें .

गत्वा सन्धीनश्रुमार्गेण दोषान्‌ कुर्यु : स्नावान्‌ लक्षणै : स्वैरुपेतान्‌ ॥

तं हि स्नावं नेत्रनाडीति त्तैके तस्यालिङ्गं कीर्तभिष्ये चतुर्धा ॥७२॥

पाक : सन्धौ संस्नवेद्यस्तु पूयं पूयास्नावोऽसौ गद ; सर्वजस्तु ॥

श्वेतं सान्द्रं पिच्छिलं संस्नवेद्वि श्लेष्मास्नावोऽसौ विकावो मतस्तु ॥

रक्तंस्नाव : शोणितोत्थो विकार : स्नवेदुष्णं तत्र रक्तं प्रभूतम्‌ ॥

हारिद्राभं पीतमुष्णं जलं वा पित्तात्स्नाव : संस्नवेत्‌ सन्धिमध्यात्‌ ॥

त्या त्या कारणांनी कुपित झालेले दोष अश्रुनार्गाने डोळयांच्या संधीत गेले असता जो आपापल्या लक्षणांनी युक्त असलेला स्राव उत्पन्न करतात त्यास नेत्रस्राव अथवा नेत्रनाडी ( अथवा व्यवहारांत लासूर ) म्हणतात . या स्रावाचे चार प्रकार आहेत . पहिला पूयस्राव - हा सान्निपातजन्य आहे व यांत डोळयाच्या सांध्यावर सूज येऊन , ती पिकते व फूटून पुवाचा स्रांव होतो . दुसरा श्लेष्मस्राव - यांत पांढर्‍या वर्णाचा , घट्ट व चिकट अशा पुवाचा स्राव होत असतो . तिसरा रक्तस्राव - हा रक्तजन्य असतो व यांत उष्ण असे पुष्कळ रक्त स्रवते : आणि चवथा पित्तस्रव - यात ( डोळयाच्या सांध्यांतून ) कडत व हळदीसारखे पिवळट झालेले माणी वाहते .

पर्वणीव अलजी .

ताम्रा तन्वी दाहपाकोपपन्ना ज्ञेया वैद्यै : पर्वणी वृत्तशोथा ॥

जाता सन्धौ शुक्लकृष्णेऽलजी स्पात्‌ तस्मिन्नेव ख्यापिता पूर्वलिङ्गै : ॥

डोळयांतील पांढरा भाग व बुब्बुळ यांच्या संधीवर तांबूस , लहान वाटोळी सूजयुक्त अशी ज्जी दाह व पाक या लक्षणांनी युक्त पुटकुळी उद्भवते तिला पर्वणी ; व त्याच टिकणी मागे प्रमेहपिटिकेत सांगितलेल्या अलजांच्या पाच लक्षणांनी युक्त अशी जी मोठी पुळी उत्पन्न होते तिला अलजं ; अशी नावे वैद्यशास्त्रात दिलेली आहेत .

वृमिग्रंथि - लक्षणे .

कृमिग्रन्थिर्वर्त्मन पक्ष्मणश्च कण्डूं कुर्यु : कृमय : सन्धिजाता : ॥

लक्षणे . नानारूपावत्मंशूल्कान्तसन्धौ चरन्त्यन्तर्नयनं दूषयन्त : ॥७५॥

डोळयांच्या पापण्या व केस यांच्या संधीत कृमि उत्पन्न होऊन ते कंड व गाठ उत्पन्न करतात . या त्रिदोषजाय विकार स कृमिग्रंथि म्हणतात . हे कृमि पापण्या व पांढरा भाग यांच्याही संधीतून डोळयांच्या आतील भागात शिरून त्यात फिरतात व त्यास दूघ करतात .

आता पापण्यांसंबंधी होणारे रोग खाली सांगितल्याप्रमाणे होत .

उत्संगपिटिकेचीं लक्षणें .

अभ्यन्तरमुखी ताम्रा बाह्मतो वर्त्मनश्च या ॥

सोत्सङ्गोत्सङगपिटिका सर्वजा स्थूलकण्डुरा ॥७६॥

वातादि तिन्ही दोषांच्या प्रकोपामुळे तांबुस वर्णाची , मोठी व फार कंड उत्पन्न करणारी अशी जी , तोंड आत असलेली व पापणींच्या कातडयावर उचलून आलेली पुटकळी उद्भक्ते तिला उत्संगपिटिका अशी संज्ञा आहे .

कुंभिकेचीं लक्षणें .

वर्स्मान्ते पिटिका ध्माता भिद्यन्ते च स्नवन्ति च ॥

कुम्भीकबीजसद्दशा : कुम्भीका : सन्निपातजा : ॥७७॥

सान्निगतापासूनच पापण्यांच्या आतील भागाच्या कडेवर कुंभ्याच्या बियांसारख्या पिवळया वर्णाच्या षुटकुळया उद्भवून त्या फुगतात व फूटून बाहतात : त्यास कुंभिका म्हणतात .

पोथकीचीं लक्षणें .

स्नाविण्य : कण्डुरा गुर्व्यो रक्तसर्पपसान्निमा : ॥

रुजावन्स्यश्च पिटिका : पोथक्य इति कीर्तिता : ॥७८॥

पापण्यांच्या आतील भागावर तांबडया मोहरीसारख्या लाल वर्णाच्या , जड रक्तस्रथ करणार्‍या , खाजणार्‍या व खुपणार्‍या अशा ज्या पुटकळथा उत्पन्न होतात त्या विकारास वैद्यशास्त्रात पोयकी व आपल्या खुपर्‍या म्हणतात .

वर्त्मशर्करेचीं लक्षणें .

पिडिका या खरा स्थुला सूक्ष्माभिरभिसंवृता ॥

वर्त्मस्था शर्करा नाम स रोगो वत्मर्दूषक : ॥७९॥

पापण्यांच्या आतील भागावर एक मोठी व कठीण अशी पुळी मध्यभागी उद्भवून तिच्या भोवतील दुसर्‍या अनेक पुटकुळया उद्भवतात . या विकारास वर्त्मशर्करा असे नाव असून हा पापण्यांना दूषित करणारा आहे .

अशोंर्त्माचीं लक्षणें .

एर्वारूवीजप्रतिमा : पिडका मन्दवेदना : ॥

श्लक्षणा : खराश्च वर्त्मस्थास्तदर्शोवर्त्म कीर्त्यते ॥८०॥

डोळयांच्या पापण्यांच्या आतील भागावर काकडीच्या बियांसरख्या गुळगुळीत , कठिण व योडया वेदना असलेल्या पुटकुळया उद्भवणे वा विकारास अशोंवर्म म्हणतात .

शुष्कार्शाचीं लक्षणें .

दीर्घाङ्कुर : खर : स्तब्धो दारूणोऽभ्यन्तरोद्भव : ॥

व्याधिरेषोऽभिविख्यात : शुष्काशों नामनामत : ॥८१॥

त्रिदोषप्रकोपापासून पापणीच्या आतील भागावर कठिण , खरखरीत , लांबर व वेदना पुक्त असा जो मांसाचा मोद्ध उदभक्तो त्यास शुष्कार्श म्हणतात .

अंजना . ( रांजवाडी )

दाहतोदवती ताम्रा पिटिका वर्त्मसंभवा ॥

मृद्री मन्दरूजा सूक्ष्मा ज्ञेया साऽञ्जननामिका ॥८२॥

पापणीच्या आतील भागावर जी एक लहान . मऊ , तांबडी व त्याचप्रमाणे दाह , टोचणी व योडायोडा ठणका या लक्षणांनी युक्त अशी पुळी ( सन्निपातापासूनच ) उत्पन्न होते तिला अंज्ना अथवा रांजणवाडी म्हणतात .

बहलवर्त्माचीं लक्षणें .

वर्त्मोपचीयते यस्य पिडिकामि : समन्तत : ॥

सवर्णाभि : स्थिराभिश्च विद्याद्धहलवर्त्म तत्‌ ॥८३॥

सन्निपातापासून पापण्यांच्या आतील भागी स्वचेच्याच वर्णाच्या व कठिण अद्या पुटकुळया सर्वव्र उद्भवणे या विकारास बहलवर्त्म असे नाव आहे .

वर्त्मबंधाचीं लक्षणें .

कण्डूमताऽल्पतोदेन वर्त्मशोथेन यो नर : ॥

न स संच्छादयेदक्षि यत्रास्रौ वर्त्मबन्धक : ॥८४॥

त्रिदोषप्रकोपापासून पापणीच्या आतील भामावर सूत्र उत्पन्न होते व तिच्या ठिकाणी कंड व किंचित्‌ ठोचणी ही लक्षणे असून तिच्या योगाने डोळा मिढता येत नाही . या प्रकारच्या विकारास वर्त्मबंध म्हणतात .

क्लिष्टवर्त्मांची लक्षणें .

मृद्वल्पवेदनं ताम्रं यद्वर्त्म सममेव च ॥

अकस्माच्च भवेद्रक्तं क्लिष्टवर्त्मेति तद्विदु : ॥८५॥

क्लिष्टवर्त्म हा पापण्यांच्या ठिकाणी होणारा विकार कफरक्तजन्य असून यात दोन्ही पाणण्यांचे आतील भाग प्रथम मऊ व तांबूस होऊन त्या ठिकाणी थोडथोडी वेदना होते व एकाएकी ते लाल पडतात .

वर्त्मकर्दमाचीं लक्षणें .

क्लिष्टं पुन : पित्तयुतं शोणितं विदहेद्ददा ॥

तदा क्लिन्नत्वमापन्नमुच्यते वर्त्मकर्दम : ॥८६॥

वर सांगितलेल्या विकारातील कृष्णवर्त्मच पुन : पित्तमिश्रित रक्ताशी संयुक्त झाले असता जळते व कर्दमा ( चिखला ) सारखे होते ; या विकारास वर्त्मकर्दम असे म्हणतात .

श्याववर्त्माचीं लक्षणें .

यद्वर्त्म बाह्यतोऽन्तश्च श्यावं शूलं सवेदनम्‌ ॥

तदाहु : श्याववर्त्मेति वर्त्मरोगविशारदा : ॥८७॥

 

ज्या पापण्यांच्या विकाराने पापण्यांचा आतील व बाहेरील भाग काळा पडतो , सुजतो व ठणकतो त्यास श्याववर्त्म असे वैद्य म्हणतात .

प्रक्लिन्नवर्त्माचीं लक्षणें .

अरुजं बाह्यत : शूनं वर्त्म यस्य नरस्य हि ॥

प्रक्लिन्नवर्त्म तद्विद्यात्‌ क्लिन्नमत्यर्थमन्तत : ॥८८॥

ज्या कफजन्य विकारात पापण्यांचा बाहेरील भाग सुजतो , ठणकत नाही व कडेला अत्यंत चिकचिकित होतो , त्यास प्रक्लिन्नवर्त्म असे नाव आहे .

अक्लिन्नवर्त्माची लक्षणें .

यस्य धौतान्यधौतानि संबधन्ते पुन : पुन : ॥

वर्त्मान्यपरिपक्वानि विद्यादक्लिन्नवर्त्म तत्‌ ॥८९॥

ज्या विकाराने पापण्याचे आतील भाग पिकून त्यातून स्रवणार्‍या पुवामुळे पापण्या एकमेकांस चिकटतात व धुतल्या अथवा न धुतल्या तरी पुन : पुन ; चिकटल्याशिवाय राहात नाहीत त्यास अक्लिन्नवर्त्म म्हणावे .

वातहतवर्त्माचीं लक्षणें .

विमुक्तसन्धिनिश्चेष्टं वर्त्म यस्य न मील्यते ॥

एतद्वातहतं वर्त्म जानीयादक्षिचिन्तक : ॥९०॥

वातहतवर्त्म विकारात पापण्यांच्या आतील भागाचे साधे ढिले होतात व त्यामुळे पापण्या निश्चिल होऊन त्या मिटता येत नाहीत .

वर्त्मार्बुदाचीं लक्षणें .

वर्त्मान्तरस्थं विषयं ग्रन्थिभूतमवेदनम्‌ ॥

आचक्षतेऽर्बुदमिति सरक्तमविलम्बितम्‌ ॥९१॥

त्रिदोषप्रकोपाने पापण्यांच्या आतील भागावर वाटोळी , किंचित्‌ तांबूस वर्णाची , थोडा ठणका उत्पन्न करणारी , जलद वाढणारी अशी गांठ उत्पन्न होते तेव्हा तिला वर्त्मार्बुद असे म्हणतात .

निमेषाचीं लक्षणें .

निमेषिणी : शिरा वायु : प्रविष्टो वर्त्मसंश्रय : ॥

प्रचालयति वर्त्मानि निमेषं नाम तं बिदु : ॥९२॥

डोळयांच्या पापण्यांच्या शिरांचा आश्रय करून गहणारा वायु प्रकुपित झाला असता त्या शिरांत शिरून पापण्यांना ताठ उघडया राहण्याविषयी असमर्थ करतो ; या विकारास निमेष अथवा डोळे मिचकावणे असे म्हणतात व यात पापण्या वारंवार मिटतात .

शोणितार्शाचीं लक्षणें .

य : स्थितो वर्त्ममध्ये तु लोहितो मृदुरङकुर : ॥

तद्रक्तजं शोणितार्श छिन्नं छिन्नं प्रवर्घते ॥९३॥

दूषित रक्तापासून पाणणीच्या आतील भागी तांबूस वर्णाचा व म्रुदु असा जो मोड उद्भवतो व तो कापला असताही पुन ; पुन ; उद्भवतो , या विकारास शोणितार्श असे नाव आहे .

नगणाचीं लक्षणें .

अपाकी कठिन : स्थूलो ग्रन्थिवर्त्मभवोऽरुज : ॥

नगणो नाम स व्याधिर्लिङ्गत : परिकीर्तित : ॥९४॥

पापणीच्या कातडयाच्या आतील भागावर कठीण व मोठी गाठ येते . तिला नगण अशी संज्ञा असून ही ( गाठ ) कफजन्य असल्यामुळे ठणकत नाही व पिकतही नाही .

बिसवर्त्माचीं लक्षणें .

त्रयो दोषा बहि : शोथं कुर्युश्छिद्राणि वर्त्मनो : ॥

प्रस्नवत्यन्तरुदकं विसवद्विसवर्त्म तत्‌ ॥९५॥

वातादि तिन्ही दोषांच्या प्रकोपासून होणार्‍या विसवर्त्म विकारांची लक्षणे - पापण्यांचे वरील भाग सुजून स्यांना छिद्रे पडणे व त्यावाटे कमळाच्या तंतूप्रमाणे हळूहळू डोळयांस पाणी येणे ही होत .

कुंचनाचीं लक्षणें .

वाताद्या वर्त्मसंकोचं जनयन्ति यदा मला : ॥

तदा द्रष्टुं न शक्नोति कुञ्चन ताम तद्विदु ॥९६॥

ज्या पापण्यांच्या विकारात दुष्ट झालेले वातादिदोष पापण्या आकुंचित करतात व स्यामुळे डोळे नीट उघडता येत नाहीत , त्यास कुंचन म्हणतात .

( पडकेंस ) पक्ष्मकोपाचीं लक्षणें .

प्रचालितानि वातेन पक्ष्माण्यक्षि विशन्ति हि ॥

घृष्यन्त्यक्षि मुहुस्तानि संरप्भं जनयन्ति च ॥९७॥

असिते सितभागे च मूलकोषात्‌ पतन्त्यपि ॥

पक्ष्मकोप : स विज्ञेयो व्याधि : परमदारूण : ॥९८॥

पक्ष्मकोप अथवा पडकेस म्हणून जो पाणण्यांचा विकार आहे तो रोग्यास अत्यंत त्रासदायक होत असतो . यात पापण्यांचे केस उरफाटे होऊन ते बुब्बुळावर वारंवार घासले जातात व त्यामुळे काळे व पांढरे हे दोन्हीही भाग सुजतात व पापण्यांचे केस आपल्या स्थानापासून सुटून डोळयांत चिकटून राहतात व अत्यंत सलतात .

पक्ष्मशाताचीं लक्षणें .

वर्त्मपक्ष्माशयगतं पित्तं रोमाणि शातयेत्‌‍ ॥

कण्डूं दाहं च कुरुते पक्ष्मशातं तमादिशेत्‌ ॥९९॥

पापण्यांच्या केसाच्या मुळांचा आश्रय करणारे पित्त दूषित झाले असता पापण्यांचे केस झडतात व डोळयांच्या ठिकाणी कंड व दाह ही लक्षणे उद्भवतात . या विकारास पक्ष्मशात म्हणतात .

एकंदर नेत्ररोगांची संख्या .

नवसन्ध्याश्रयस्तेषु वर्त्मजास्त्वेकविंशति : ॥

शुक्लभागे दशैकश्च चत्वार : कृष्णभागजा : ॥१००॥

सर्वाश्रया : सप्तदशद्दष्टिजाद्वादशैव तु ॥

बाह्यजौ द्वौ समाख्यातौ रोगौ परमदारूणौ ॥

भूय़ एतान्‌ प्रवक्ष्यामि सङख्यारूपचिकित्सितै : ॥१०१॥

नेत्रसंधीच्या आश्रयाने होणारे नऊ , पापण्यांसंबंधी एकवीस , डोळयांच्या पांढर्‍या भागावर होणारे अकरा , बुब्बुळांचे चार , सर्व डोळयांसंबंधी मतरा , द्दष्टीसंबंधी बारा , व डोळयांच्या बाहेरच्या अंगास होणारे परम भयंकर दोन , मिळून शहात्तर नेत्ररोगांची वर जी निरनिराळी लक्षणे सांगितली आहेत ती वैद्यांनी त्या त्या रोगांवर चिकित्सा करण्यापूर्वी नीट समजून घ्यावी .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-06-24T13:49:46.4900000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

multiple myeloma

  • चक्रन्यष्टि श्वेताकर्क 
  • चक्रन्यष्टि श्वेता अर्बुद 
  • (also myelomatosis) 
RANDOM WORD

Did you know?

लग्न ठरवितांना पत्रिका पाहणे किती योग्य आहे? पत्रिका पाहूनही कांही विवाह अयशस्वी कां होतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.