TransLiteral Foundation
संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
अग्निमांद्यनिदान

माधवनिदान - अग्निमांद्यनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


अग्निमांद्यनिदान

जठराग्नीच्या विघाडापासून होणारे विकार .

मन्दस्तीक्ष्णोऽथ विषम : समश्चेति सतुर्विध : ॥

कफपित्तानिलाधिक्यात्तत्साम्याज्जाठरोऽनल : ॥१॥

विषमो वातजान्‌ रोगान्‌ तीक्ष्ण : पित्तनिमित्तजान्‌ ॥

करोत्यग्निस्तथा मन्दो विकारान्‌ कफसम्भवान्‌ ॥२॥

वात , पित्त व कफ या दोषात्रयांच्या आधिक्याने जठराग्रि अनुक्रमे विषम , तीक्ष्ण आणि मंद होतो आणि त्याच्या सारखेपणाने तो सम होतो . या जठराग्नीच्या होणार्‍या चार प्रकारापैकीं विषमाग्नीपासून वातजन्य , तीक्ष्णाग्नीपासून पित्तजन्य आणि मदाग्नीपासून कफजन्य , याप्रमाणे विकार रोग्याच्या ठायी उत्पन्न होतात , समाग्नि मात्र कोणतेहि विकार उत्पन्न करीत नाही .

जठराग्नीच्या चार प्रकारांची लक्षणें .

समा समाग्नेरशिता मात्रा सम्यग्विपच्यते ॥

स्वल्पापि नैव मन्दाग्नेर्विषमाग्नेस्तु देहिन : ॥३॥

कदाचित्पच्यते सम्यक्‌ काचिन्न विपच्यते ॥

मात्रातिमात्राप्यशिता सुखं यस्प विपच्यते ॥४॥

तीक्ष्णाग्निरिति तं विद्यात्‌ समाग्नि : श्रेष्ठ उच्यते ॥

ज्याचा जठराग्नि सम आहे , त्या मनुष्याचा आहार योग्य प्रमाणाने असला तर तो चांगला पचतो ; ज्याचा जठराग्नि मंद असतो त्याने अल्पाहार केला तरी तो पचत नाही . विषम जठराग्नि असलेल्या रोग्याने खाल्लेले अन्न कधी चांगलें पचते व कधी पचत नाही , आणि तीक्ष्ण जठराग्नि असणाराने कितीहि खाल्ले तरी त्याचे चांगले पचन होते . या चार प्रकारच्या जठराग्नीमध्ये सम जठराग्नीच हितकर समजावा .

अत्यग्नि अथवा भस्मक .

नरे क्षीणकफे पित्तं कुपितं मारूतानुगम्‌ ॥५॥

स्वोष्मणा पाचकस्थाने बलमग्ने : प्रयच्छति ॥

तदा लब्धबलो देहं रूक्षयेत्सानिलोऽनल : ॥६॥

अभिभूय पचत्यन्नं तैक्ष्णादाशु मुहुर्मुहु : ॥

पक्त्वान्नं स ततो धातून्शोणितादीन्पचत्यपि ॥७॥

ततो दौर्बल्यमातङकं मृन्युं चोपनयेत्परम्‌ ॥

भुक्तेऽन्ने लभते शान्तिं जीर्णमात्रे प्रताम्यति ॥८॥

तृट्‌कासदाहमोहा : स्युर्व्याधयोऽत्यग्निसंभवा : ॥

रोग्याचा कफ क्षीण झाला असतां दूषित झालेले पित्त वायूची मिश्रित होऊन व पाचकस्थानी जाऊन आपल्या उष्णतेच्या योगाने जठराग्नीला प्रकार करते , मग वायुच्या ते ते तो लवकर आणि वारंवार पचवितो व ते पचल्यानंतर रक्तादि सप्त धातूसहि पचवून टाकितो , यामुळे रोग्याच्या ठायी शक्तिक्षीणता व रोगोत्पत्ति होते इतकेच नाही तर कधी कधी त्यास मृत्यूहि येतो . थोडेसे खाल्ले म्हणजे त्याला अमळ समाधान वातते खरे , पण ते खालेले पचतांक्षणीच त्यास तगमन्ग होते . या रोग्यास अत्यग्नि अथवा भस्मक म्हणतात . यापासून तहान , खोकला , अंगाचा दाह आणि मूर्च्छा ह्या व्याधिक रोग्याच्या ठायी उत्पन्न होतात .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-06-24T13:49:30.8670000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

Did you know?

Gotra. Vats & vatsayan are same ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Total Pages: 46,537
  • Hindi Pages: 4,555
  • Dictionaries: 44
  • Words in Dictionary: 302,181
  • Marathi Pages: 27,517
  • Tags: 2,685
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,230
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.