TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
सन्निपात

माधवनिदान - सन्निपात

" शरिरेंद्रिय- सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची व्यापक आयुर्वेदीय व्याख्या आहे.

सन्निपात

अम्लस्निग्धोष्णतीक्ष्णै : कटुमधुरसुरतापसेवाकषायै : ।

कामक्रोधातिरूक्षैर्गुरुतरपिशिताहारसौहित्यशीतै : ॥

शोकव्यायामचिन्ताग्रहगणवनितात्यन्तसङ्गप्रसडै : ।

प्राय : कुष्यन्ति पुंसां मधुसमयशरद्वर्षणे सन्निपाता : ॥१॥

आंबट , स्निग्ध , उष्ण , तीक्ष्ण , तिखट , तुरट व मधुर पदार्थ खाणे , मद्य पिणे , ऊन किंवा शेक घेणे , अति रुक्ष व जड अन्न खाणे , आकंठ जेवणें , मांस खाणें , थंड पदार्थ सेवन करणें काम , क्रोध , शोक , श्रम , चिंता व ग्रहांचा समूह प्रतिकूल हीं उत्पन्न होणे व अति स्त्रीसंग करणें या कारणांमुळे चैत्र , वैशाख , आवण , भाद्रापद , आश्विन आणि कार्तिक या कालीं प्राय : मनुष्याचे ठायीं सन्निपातचा प्रकोप होतो .

सन्निपाताचे तेरा प्रकार .

सन्धिकश्चान्तकश्वैव रुग्दाहश्चित्तविभ्रम : ॥

शीताङस्तन्द्रिक : प्रोक्त : कण्ठकुब्जश्च कर्णक : ॥२॥

विख्यातोभुग्ननेत्रश्च रक्तष्ठीची प्रलापक : ॥

जिव्हकश्चेत्यभिन्यास : सन्निपातांस्त्रयोदश ॥३॥

संधिक , अंतक , रुग्दाह , चित्तविभ्रम , शीतांग , तन्द्रिक , कंठकुब्ज , कर्णक , भुग्ननेत्र , रक्ताष्ठीवी , प्रलापक जिव्हक आणि अभिन्यास असे सन्निपाताचे तेरा प्रकार आहेत ,

तेरा सन्निपातांची दिनमर्यादा ,

सन्धिके वासरा : सप्त चान्तके दश वासरा : ॥

रुग्दाहे विंशतिर्ज्ञेया वन्ह्यष्टौ चित्तविभ्रमे ॥४॥

पक्षमेकं तु शीताङे तन्द्रिके पञ्चविंशति ॥

विज्ञेया वासराश्चैव कण्ठकुब्जे त्रयोदश ॥५॥

कर्णके च त्रयो मासा भुग्ननेत्रे दिनाष्टकम्‌ ॥

रक्तष्ठीवी दशाहानि चतुर्दश प्रलापके ॥६॥

जिव्हके षोडशाहानि कलाभिन्यासलक्षणे ॥

परमायुरिदं प्रोक्तं म्रियते तत्क्षणादपि ॥७॥

संधिकांत सात , अंतकांत दहा , रुग्दाहांत वीस , चित्तविभ्रमांत चोवीस , शीतांगांत पंधरा , तंद्रिकांत पंचवीस , कंठकुब्ज तेरा , कर्णकांन नव्वद , भुग्ननेत्रांत आठ , रक्तष्ठीवींत दहा , प्रलापकांत चौदा , जिव्हाकांत सोळा आणि अभिन्यासांत सोळा याप्रमाणे क्रमानें सांगितलेल्या सन्निपातांत रोग्याच्या आयुष्याची परमावधि असते ; परंतु रोगी तत्क्षणीं देखील मरूं शकेल .

साध्य व असाध्य सन्निपात .

सन्धिकस्तन्द्रिकश्चैव कर्णक : कण्ठकुब्जक : ॥

जिव्हकश्चित्तविभ्रंश : षट्‌ साध्या : सप्त मारका : ॥८॥

संधिक , तंद्रिक , कर्णक , कंठकुंब्ज , जिव्हक व चित्तविभ्रंश हे सहा सन्निपात साध्य आणि बाकीचे सात असाध्य जाणावे .

संधिकसन्निपात .

पूर्वरूपकृतशूलसम्भवं शोषवातबहुवेदनान्वितम्‌ ॥

श्लेष्मतापबलहानिजागरं सन्निपातमिति सन्धिकं वदेत्‌ ॥९॥

ज्याचें पूर्वरूप शूल व लक्षणे शोष , वायूच्या तीव्र वेदना , कफाधिक्य , संताप , बलक्षय आणि निद्रानाश हीं असतात , त्यास संधिक सन्निपात म्हणतात .

अन्तकसन्निपात .

दाहं करोति परितापंनमातनोति ।

मोहं ददाति विदधाति शिर : प्रकम्पम्‌ ॥

हिक्कां करोति कसनं च समाजुहोति ॥

जानीहि तं विबुधवार्जितमन्तकाख्यम्‌ ॥१०॥

ज्यांत अंगाचा दाह , संताप , खोकला , बेशुद्धि , डोक्यास कंप आणि उचकी ही लक्षणे होतात तो हा अंतक सन्निपात होय ; हा असाध्य जाणून चांगले वैद्य ह्याची चिकित्सा करीत नाहींत .

रूग्दाह सन्निपात .

प्रलापपरितापनप्रबलमोहमान्द्यश्रम : ।

परिभ्रमणवेदनो व्यथितकण्ठमन्याहनु : ॥

निरन्तरतृषाकर : श्वसनकासहिक्काकुल : ।

सकष्टतरसाधनो भवति हन्ति रुग्दाहक : ॥११॥

बडबड , संताप , फार बेशुद्धि , थकवा , भोंवळ , चळवळ नसणे , तसेंच गळा , मान व हनुवटी यांचे ठायीं वेदना होणें , सारखी तहान लागणें , श्वास , खोकला आणि उचकी हीं रुग्दाह सन्निपाताची लक्षणे होत ; चतुष्पाद साधने असली तर कष्टसाध्य होतो पण यांत प्राय : रोगी मरतो .

चित्तभ्रमसन्निपाताचीं लक्षणें .

यदि कथमपि पुंसां जायते कायपीडा ।

भ्रममदपरितापो मोहवैकल्यभाव : ॥

विकलनयनहासो गीतनृत्यप्रलापी ॥

ह्यभिदधति च साध्यं केपि चित्तभ्रमाख्यम्‌ ॥१२॥

कोणत्याहि तर्‍हेची शारीरिक पीडा होणें , भोंबळ , नशा , संताप , बेशुद्धि , वैकल्य ( एखादें कमेंद्रिय किंवा ज्ञानेंद्रिय याचा नाश ), डोळ्यास निस्तेजपणा , हसणे , बडबडणे , गाणे आणि नाचणे इतक्या प्रकारची लक्षणे चित्तभ्रम सन्निपातांत असतात , हा साध्य आहे असें कोणी म्हणतात व पुष्कळ अंशी तेंच खरे आहे .

शीतांग सन्निपाताची लक्षणें .

हिमसद्दशशरीरो वेपथुश्वासहिक्का : ।

शिथिलितसकलाङो खिन्ननादोग्रताप : ॥

क्लमथुदवथुकासच्छर्द्यतीसारयुक्त -

स्त्वरितमरणहेतु : शीतगात्रप्रभावात्‌ ॥१३॥

सारे अंग बर्फासाखें थंड आणि शिथिल होणे , कंप . श्वास व उचकी असणे , आवाज खोल जाणे , अत्यंत अंतर्दाह , थकवा , मनास घाबरेपणा , खोकला , ओकारी आणि अतिसार या प्रकारच्या लक्षणांचा हा शीतगात्र सन्निपत होय ; यांत रोगी त्वरित मरतो .

तंद्रिक सन्निपाताची लक्षणें .

प्रभूतातन्द्रार्तिज्वरकफपिपासाकुलतेरा ।

भवेत्‌ श्यामा चिव्हा पृथुलकठिना कण्टकवृता ॥

अतीसार ; श्वास : क्लमथुपरिताप : श्रुतिरुजो ।

भृशं कण्ठे जाडयं शयनमनिशं तन्द्रिकगदे ॥१४॥

फार झांपड असणे , शूळ , ज्वर , कफ पडणे व तृषा यांनी रोगी अत्यंत व्याकूळ होणे , जीभ काळसर , रुंद व कठीण असून काटयांनी व्याप्त , अतिसार , श्वास , ग्लानि , तलखी , कर्णशूळ , घशांत जडपणा , आणि अहोरात्र झोप इतक्या लक्षणांनी युक्त हा तंद्रिक सन्निपात असतो .

कंठकुब्ज सन्निपात .

शिरोर्तिकण्ठग्रहदाहमोहकम्पज्वरा रक्तसमीरणार्ति : ॥

हनुग्रहस्तापविलापमूर्च्छा : स्यात्कण्ठकुब्ज : खलु कष्टसाध्य : ॥१५॥

डोकें व गळा जखडणे , दाह , बेशुद्धि , कंप , ज्वर , नाकातून वगैरे रक्त पडणे , वायूची पीडा होणेम हनुवटी जखडणे , संताप , रडणे आणि मूर्च्छा या लक्षणांनीं युक्त असलेला हा कंठकुब्ज सन्निपात कष्टसाध्य समजावा .

कणर्क सन्निपात .

प्रलापश्रुतिर्‍हासकण्ठग्रहादाङव्यथाश्वासकासप्रसेकप्रभावम्‌ ॥

ज्वरान्तेच कर्णान्तयोर्गल्लपीडा बुधा : कर्णकं कष्टसाध्यं वदन्ति ॥१६॥

बडबड असणे व ऐकू न येणे , गळा धरणे , अंगाला तिडका लागणे , श्वास , खोकला , लाळ गळणे आणि शेवटी शेवटी ज्वर व कर्णमूलाशीं गालांत दुखणे या लक्षणांनीं युक्त असा हा कर्णक सन्निपात चांगले वैद्य कष्टसाध्य समजतात .

सन्निपातज्वरस्यान्ते कर्णमूले सुदारुण : ॥

शोथ : संजायते तेन कश्चिदेव प्रमुच्यते ॥१७॥

ज्वरस्प पूर्वं ज्वरमध्यतो वा ज्वरान्ततो वा श्रुतिमूलशोथ : ॥

क्रमादसाध्य : खलु कष्टसाध्य : सुखेन साध्यो मुनिभि : प्रदिष्ट : ॥१८॥

सन्निपात ज्वराचे शेवटीं कर्णमूलाचे ठिकाणीं जी अतिभयंकर सूज येते , तींतून रोगी क्वचित्‌च बरा होतो . ती सूज ज्वराचे पूर्वी आली तर असाध्य , ज्वरांत आली तर कष्टसाध्य , आणि ज्वर निघाल्यावर आली तर साध्य असें ( वैद्यक जाणणारे ) ऋषि म्हणतात .

भुग्ननेत्र सग्निपात .

ज्वरबलापचय : स्मृतिशून्यता श्वसनभुग्नविलोचनमोहित : ॥

प्रलपनभ्रमकम्पनशोफवान्‌ त्यजति जीवितमाशुसभुग्नद्दक्‌ ॥१९॥

ज्वरामुळें बलनाश , स्मृति नसणे , श्वास लागणे , डोळे ताठणे , बेशुद्धि , बडबड , चक्कर , कंप आणि सूज हीं भुग्ननेत्र सन्निपाताची लक्षणे होत . यांत रोगी त्वरित मरतो .

रक्तष्ठीवी सन्निपाताची लक्षणें .

रक्तष्ठांवी ज्वरवमितृषामोहशूलातिसारा : ।

हिक्काऽऽध्मानभ्रमणदवथुस्वाससंज्ञाप्रणाशा : ॥

श्यामा रक्ता भवति रसना मण्डलोत्थानरूपा ।

रक्तष्ठीवी निगदित इह प्राणहन्ता प्रसिद्ध : ॥२०॥

रक्ताची गुळणी , ज्वर , ओकारी , तहान , मूर्च्छा , शूळ , अतिसार , उचकी , पोट फुगणे , चक्कर येणे , तगमग होणे , श्वास लागणे बेशु्ध्दपणा , जीभ काळी किंवा लाल होणे आणि तिजवर मंडलें असणे अशा लक्षणाचा हा प्राण घेणारा प्रसिद्ध रक्तष्ठीवी सन्निपात समजावा .

प्रलापक सन्निपाताची लक्षणें .

कम्पप्रलापपरितापनशीर्षपीडा ।

प्रौढप्रभावपवमानपरोऽन्यचित्त : ॥

प्रज्ञाप्रणाशविकल : प्रचुरप्रवाद : ।

क्षिप्रं प्रयाति पितृपालपादं प्रलापी ॥२१॥

कंप , बडबड , संताप , डोके दुखणे , वाताचा जोर फार वाढणे , मन निराळया विषयाकडे वाहणे , बुद्धिनाश हेणे , इंद्रियास वैकल्य येणे आणि फार बरळणे , अशा लक्षणांचा हा प्रलापक सन्निपात होय . यांत रोगी लागलीच मरतो .

जिव्हक सन्निपात .

श्वसनकासपरितापविव्हल : कठिन्कण्टकवृताधिजिव्हक : ॥

बधिरमूकबलहानिलक्षणो भवति कष्टतरसाध्यजिव्हक : ॥२२॥

दमा , खोकला व संताप यामुळे व्याकूळ होणे ; जिभेवर कांटा व लक्षपणा येणे , बहिरेपणा , मुकेपणा आणि बलनाश वा लक्षणांचा हा जिव्हक सन्निपात कष्टसाध्य होय .

अभिन्यास सन्निपात .

दोषत्रयस्निग्धमुखत्वनिद्रावैकल्यनिश्चेष्टनकष्टवाणि : ॥

बलप्रणास : श्वसनादिनिग्रहोऽभिन्यास उक्तो ननु मृत्युकल्प : ॥२३॥

त्रिदोषकोपामुळें तोंडावर तुळतुळीतपणा येणे , झोप येणे , निश्चेष्ट पडणे , फार कष्टानें बोलणे , बलनाश , इंद्रियवैकल्य आणि श्वासादिकांचा प्रतिबंध या प्रकारची अभियास सन्निपाताचीं लक्षणे असतात . हा प्रत्यक्ष मृत्यूच आहे .

हारिद्रक सन्निपाताची लक्षणें .

हारिद्रदेहनखनेत्रकराङिघ्रतोय

निष्ठीवनादिकसनैरूपलक्षितो य : ॥

हारिद्रक : स कथित : किल सन्निपात : ।

साध्यो न चैषभिषजां ज्वरकालरूप : ॥२४॥

शरीर , नखें , डोळे , हात , पाय , मूत्र व थुंकी वगैरे पिवळी असून त्यांत खोकला असणे या लक्षणावरून हारिद्रक सन्निपात जाणावा , हा वैद्यास कधी व साध्य होत नाहीं .

सद्यस्त्रिपञ्चसप्ताहाद्दशाहादद्वादशादपि ॥

एकविंशद्दिनै : शुद्ध : सन्निपाती स जीवति ॥२५॥

सन्निपात झाल्यावर केव्हां केव्हां तात्काळ व कधीं तीन , पांच , सात , दहा , बारा आणि कधी एकवीस डतके दिवस लोटल्यावर रोगी डोषमुक्त होऊन वरा होतो .

त्रिदोषज्वर मर्यादा .

सप्तमीद्विगुणायावन्नवम्येकादशी तथा ॥

एषा त्रिदोषमर्यादा मोक्षाय च वधाय च ॥२६॥

पित्तकफानिलवृद्धया दशदिवसद्वादशाहसप्ताहात्‌ ॥

हन्ति विमुञ्चति पुरुषं त्रिदोषजो धातुमलपाकात्‌ ॥२७॥

त्रिदोषाची मर्यादा ते झाल्यापासून सात किंवा चवदा , नऊ किंवा अठरा , आणि अकरा किंवा बावीस दिवसपर्यंत जाणावी . यापुढें रोगी ज्वरमुक्त होतो , अथवा त्यात मृत्यु येतो . पित्त , कफ आणि वात यांची वाढ होऊन क्रमानें दहा , बारा आणि सा दिवसांनंतर धातुपाक झाला असतां त्रिदोषज्वर रोग्याला मारतो व मलपाक झाला असत मुक्त करतो .

धातुपाकाचीं लक्षणें .

निद्रानाशो ह्रदि रतम्भो विष्टम्भो गौरवारुची ॥

अरतिर्बलहानिश्च धातूनां पाकलक्षणम्‌ ॥२८॥

झोंप नसणे , ह्रदय ताठल्यसारखें असणें , मलमूत्राचा अवरोध , अंग जड होणे , अन्नद्वेष , अस्वस्थता आणि बलनाश हीं लक्षणे धातुपाकाचीं समजावीं

मलपाकाचें लक्षणें .

दोषप्रकृतिवैकृत्यं लघुता ज्वरदेहयो : ॥

इन्द्रियाणां च वैमल्यं दोषाणां पाकलक्षणम्‌ ॥२९॥

वातादि दोषांचे धर्म पालटणे , ज्वर कमी होणे , अंग हलकें होणे आणि इंद्रिये निर्मळ होणे ही मलपाकाचीं लक्षणे होत . ( धातुपाक अथवा मलपाक होणे या दोन्ही गोष्टी केवळ रोग्याच्या प्रकृतीवर अवलंबून असतात .)

दोषे विबद्धे नष्टेऽग्नौ सर्वसंपूर्णलक्षण : ॥

सन्निपातज्वरोऽसाध्य : कृच्छ्रसाध्यस्ततोऽन्यथा ॥३०॥

मलादिक दोष , जठराग्रि मंद होणे आणि वातादिक दोषांची संपूर्ण लक्षणे असणे यावरून सन्निपात असाध्य समजावा , याच्या उलट लक्षणांचा ( म्हणजे मलांदि दोष असून जठराग्नि थोडा प्रदीप्त असणे व वातावी दोषांचीं लक्षणे थोडी थोडी असणे ) सन्निपात कष्टसाध्य समजावा .

आगंतुक ज्वर कारणें

अभिघाताभिचाराभ्यामभिषङाभिशापत : ॥

आगन्तुर्जायते दोषैर्यथास्वं तं विभावयेत्‌ ॥३१॥

शस्त्रादिकांचा आघात , चेटूक किंवा करणीं , शाप किंवा पिशाचादिकांची वाधा इत्यादि निरनिराळ्या कारणांनीं आगंतुक ज्वर उत्पन्न होतो तो त्याच्या लक्षणावरून दोष प्रकोप जाणव जाणावा .

श्यावास्यता विषकृते दाहोऽतीसार एव च ॥

भक्तारूचि : पिपासा च तोदश्च सह मूर्च्छया ॥३२॥

औषधीगन्धजे मूर्च्छा शिरोरुग्वमथु : क्षव : ।

तोंड काळवटणे , दाह , अतिसार , अन्नद्वेष , तहान , टोंवल्यासारख्या वेदना होणे आणि मूर्च्छा या लक्षणांनीं युक्त असा आगंतुक ज्वर ( स्थावर - जंगम वगैरे ) विषभक्षणानें येतो . तसाच शिर : शूळ , वांति , मळमळ , शिंका आणी मूर्च्छा या लक्षणांचा आगंतुक ज्वर वनस्पतीचय किंवा झाडपाल्याच्या वासानें येतो .

कामज्वराचीं लक्षणें .

कामजे चित्तविभ्रंशस्तन्द्रालस्यमभोजनम्‌ ॥३३॥

ह्र्दये वेदनन चास्य गात्रं च परिशुष्यति ॥

इच्छित स्त्रीची प्राप्ति न झाल्यामुळे कामज्वर उत्पन्न होतो . त्यांत चित्तभ्रंश ( मन ठिकाणावर नसणे ), झांपड , आळस , भूक नसणे , ह्रदयांत वेदना होणे आणि अंग वाळत जाणे हीं लक्षणे होतात .

अभिचाराभिघाताभ्यां मोहस्तृष्णा च जायते ॥

अभिचार आणि अभिघात यांपासून येणार्‍या ज्वरांस मूर्च्छा किंवा बेशुद्धि आणि तृषा ही लक्षणे होतात .

भूतबाधादिकापासून ज्वर .

भूताभिषङादुद्वेगो हास्यरोदनकम्पनम्‌ ॥३४॥

भयात्प्रलाप : शोकाश्च भवेत्कोपाश्च वेपथु : ॥

भूतबाधेनें येणार्‍या ज्वरांत मन उदास होणे , हंसणे , रडणे , कापणे हीं लक्षणें असतात ; तसेंच भयामुळें व शोकापासूनहि उत्पन्न झालेल्या ज्वरांत बडबड असते व क्रोधापासून झालेल्या ज्वरांत ती बडबड असून शिवाय कांपरे असते .

कामशोकभयाद्वायु : क्रोधात्पित्तं त्रयो मला : ॥

भूताभिषङात्कुप्यन्ति भूतसामान्यलक्षणा : ॥३५॥

काम , शोक आणि भय यांमुळें येणार्‍या ज्वरांत वायुप्रकोप होतो , क्रोधानें येणार्‍या ज्वरांत पित्तप्रकोप होतो आणि भूतबाधेमुळें येणार्‍या ज्वरांत तिची सामान्य लक्षणे असून तिन्ही दोषांचा प्रकोप होतो .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-06-24T13:49:47.4330000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

karte

  • पु. कर्ता 
RANDOM WORD

Did you know?

सौभाग्यवती स्त्रियांनी कुंकू का लावावे ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.