TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
कासनिदान

माधवनिदान - कासनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


कासनिदान

कासाचीं कारणें व संप्राप्ति .

धूमोपघाताद्रजसस्तथैव

व्यायामरूक्षान्ननिषेवणाच्च ॥

विमार्गगत्वादपि भोजनस्य

वेगावरोघात्‌ क्षवथोस्तथैव ॥१॥

प्राणो ह्युदानानुगत : प्रदुष्ट :

सम्भिन्नकांस्यस्वनतुल्यघोष : ॥

निरोति वक्त्रात्‌ सहसा स दोषो

मनीषिभि : कास इति प्रदिष्ट : ॥२॥

नाकातोंडांत धूर किंवा धूळ शिरल्यामुळे , नित्य व्यायाम तसेच रूक्ष अन्न सेवन केल्यामूळे , घाईघाईने जेवत असतां , अन्न निराळ्या मार्गात गेल्यामुळे आणि मलमूत्रादिकांचा व शिकेचा रोध वेल्यामुळें प्रकोप पवलेला प्राणवायु ( कंठस्थानांतील ) दूषिंत झालेल्या उदानवाय़ूशीं मिश्रित होऊन फुटक्या कांशाच्या भांडयाच्या नादाप्रमाणे शब्द करीत करीत तो रोग्याच्या तोंडातून दोषयुक्त असा बाहेर पडतो . या प्रकारच्या होणार्‍या रोगास विचारी वैद्यलोक कास ( खोकला ) असे म्हणतात .

कासाचे प्रकार .

पञ्च कासा : स्मृता वातपित्तश्लेश्मक्षतक्षयै . ॥

क्षयायोपेक्षिता : सर्वे : बलिनश्चोत्तरोत्तरम्‌ ॥३॥

वात , पित्त , कफ या तीन दोषांपासून पृथक्‌ पृथक्‌ होणारे तीन आणि क्षत व क्षय या दोहोंपासून होणारे दोन असे एकंदर पांच प्रकारचे कास असून ते एकापेक्षां एक ( म्हणजे वातकासापेक्षां पित्तकास या क्रमाने वर सांगितलेले सर्व कास ) अधिक बळवान आहेत . त्यांच्यावर जर ताबडतोब उपाय केला नाहीं तर ते रोग्याच्या ठायीं क्षयरोग उत्पन्न करतात .

कासाचें पूर्वरूप .

पूर्वरूपं भवेत्तेषां शूकपूर्णगलास्यता ॥

कण्ठे कण्डूश्च भोज्यानामवरोधश्च जायते ॥४॥

कास ( खोकला ) यावयाचा असला म्हणजे रोग्याच्या घशांत कुसळ अडकल्यासारखें वाटतें . गळ्यांत खवखवते व अन्न पदार्थ पोटात जाताना गळयातच अडकतात .

वातकासाचीं लक्षणें .

हृच्छङ्खमूर्द्धादरपार्श्वशूली

क्षामानन : क्षीणबलस्वरौजा : ॥

प्रसक्तवेगस्तु समीरणेन

भिन्नस्वर : कासति शुष्कमेव ॥५॥

वातकास झाल असतां ह्रदय , कानशील , मस्तक , उदर आणि पार्श्चमाग यांच्या ठायीं वेदना होणे , चेहरा उतरणे , बल , स्वर आणि ओज ( शरीरांतील सर्व घातंचे तेज ) यांचा नाश होणे , वारंवार खोकल्याची एकसारखी उसळी येणे , आवाज बदलणे व कोरडा खोकला येणे ही लक्षणे रोग्याच्या ठायी द्दष्टीस पडतात .

पित्तकास्रचीं लक्षणें .

उरोविदाहज्वरवक्तशोषे -

रभ्यर्दितस्तिक्तमुखस्तृषार्त : ॥

पित्तेन पीतानि वमेत्कटूनि

कासेन : पाण्डु : परिदह्यमान : ॥६॥

पित्तकासामुळे रोग्यास तहान फार लागते , तोंडास कोरड पडते व ते कडू होते , उरांत जळजळ लागते , पिवळी व तिखट अशी ओकारी येते , त्याचप्रमाणे ज्वर येतो , वर्ण पांढरा होतो व अंगाचा दाह होतो .

कफकासाचीं लक्षणें .

प्रलिप्यमानेन मुखेन सीदन्‌

शिरोरुजाऽतं : कफपूर्णदेह : ।

अभक्त रुग्गौरवकण्डुयुक्त :

कासेदभृशं सान्द्रकफ : कफेन ॥७॥

रोग्याचे तोंड आंतून कफाने सारवल्यासारखे होणे , ग्लानि येणे , मस्तकाच्या ठायी अत्यंत वेदना होणे , अंग धड होणे व त्यास कंड सुटणे , अन्नाची रुचि नयेणे , वारंवार खोकला येणे व दाट असा कफ पडणे आणि सर्व शरीराच्या ठायी कफ दूषित होणे या प्रकारची लक्षणे कफकासाची जाणावी .

क्षतकासाचीं लक्षणें व कारणें .

अतिव्यवायभाराध्वपुद्धाश्चगजविग्रहै : ॥

रुक्षस्थोर : क्षतं वायुर्गृहीत्वा कासमावहेत्‌ ॥८॥

स पूर्वं कासत शुष्कं तत : ष्ठीवेत्सशोणितम्‌ ॥

कण्ठेन रुजताऽअर्थं विरुग्णेनेव वोरसा ॥९॥

सुचीभिरिव तीक्ष्णाभिस्तुद्यमानेन शूलिना ॥

दु : खस्पर्शेन शूलेन भेदपीडाभितापिना ॥१०॥

पर्वभेदज्वरश्चासतृष्णावैस्वर्यपीडित : ॥

पारावत इवाकूजन्‌ कासवेगात्क्षतोद्भवात्‌ ॥११॥

अति स्त्रीसंग , अति भार वाहणे , अति मार्ग चालणे , मल्लयुद्दह करणें , घोडा , हत्ती वगैरे जनावर पळतांना धरणे इत्यादि कारणांमुळे रुक्ष देही पुरुषाचे उर ( फुप्फुस ) फाटून त्यास वातजन्य असा हा क्षतकास रोग होतो , त्यांत प्रथम नुसती खोकल्याचीकोरडी ढांस लागते . नंतर रक्त पदणे , घसा अतिशय दुखणे , छाती फुटल्यासारखी होणे व तिच्या ठायी तीक्ष्ण सुया टोचल्यासारख्या वेदना होणे व त्याचप्रमाणे स्पर्श सहन न होणे , कुर्‍हाडीने तोडल्यासारख्या वेदना व दाह करणारा असा शूल होणे , सांधे फुटणे आणि शिवाय , ज्वर , स्वरभेद्र , श्वास व तहान हीं लक्षणें त्याच्या ठायीं उत्पन्न होतात : आणि तो क्षतजन्यकासपीडित रोगी पारव्यासारखा घुमतो .

क्षयकासाचीं लक्षणें व करणें .

विषमासात्म्यभोज्यातिव्यवायोद्वेगनिग्रहात्‌ ॥

घृणिनां शोचतां नृणां व्यापन्नेऽग्नौ त्रयो मला : ॥

कुपिता : क्षयजं कासं कुर्युर्देहक्षयप्रदम्‌ ॥१२॥

सगात्रशूलज्वरदाहमोहान्‌ प्राणक्षयं चापि लभेत कासी ॥१३॥

शुष्यन्विनिष्ठीवति दुर्बलस्तु प्रक्षीणमांसो रुधिरं सपूयम्‌ ॥

तं सर्वलिङगम्‌ भृशदुश्चिकित्स्यं चिकित्सितज्ञा : क्षयजं वदन्ति ॥१४॥

अवेळी कमीजास्त व सवयीचे नसलेले वा न मानवणारे असे भोजन केल्यामुळे , अति स्त्रीसंग केल्यामुळे व मलमूत्रादिकांच्या वेगाचा रोघ केल्यामूळे , शोक करणार्‍या अत्यंत कोमलह्रदयाच्या पुरुपाना जठराग्नि मंद झाला असता , वातादि त्रिदोष प्रकोप पावून ते त्याच्या ठायी शरीरास मारक असा क्षयजन्य कास ( खोकला ) उत्पन्न करतात . त्याची लक्षणे रोग्याच्या सर्व गात्रांच्या ठायी वेदना , ज्वर , दाह , मूर्च्छा , बलनाश आणि तसेच अंग कृश होणे व त्यांतील मास नष्ट होणे , खोकतांना रक्त व पू यांनी मिश्रित असा बेडका पडणे आणि शेवटी प्राणनाश होणे याप्रमाणे जाणावी . हा क्षयजन्य कास आता सांगितलेल्या सर्व लक्षणांनी युक्त असला तर वैद्यास त्याची चिकिरसा करिता येणे परम अवघड असते .

कासरोगाविषयीं साध्यासाध्य विचार .

इत्येष : क्षयज कास : क्षीणानां देहनाशन : ॥

साध्यो बलवतां वा स्याद्याप्यरत्वेवं क्षतोत्थित : ॥१५॥

नवौ कदाचित्सिध्येतामपि पादगुणान्वितौ ॥

स्थविराणां जराकास : सर्वो याप्य : प्रकीर्तित : ॥

त्रीन्पूर्वान्साधयेत्साध्यान्पध्यैर्याप्यांस्तु यापयेत्‌ ॥१६॥

वर सांगितल्याप्रमाणे क्षयजन्य कास हा क्षीण पुरुषास मारक होतो व सशक्त पुरुषाचे ठायी साध्य होतो किंवा याप्य होऊन राहतो . हाच नियम क्षतजन्यकासाविषयीहि समजावा , क्षयजन्य व क्षतजन्य हे दोन्ही कास रोग्यास नुकतेच झालेले असले आणि तो चतुष्पाद संपत्तीने युक्त असला तर कदाचित्‌ साध्य होतात . वृद्ध पुरुषास धातुक्षयामुळे होणारा कास हा त्याच्या ठायी नेहमी याप्य होऊन राहतो . एकंदर कासाच्या पाच प्रकारांपैकीं पहिले तीन ( वातजन्य , पित्तजन्य व कफजन्य ) प्रकार साध्य समजून त्यांवर औषधोपचार करावेत : व बाकीचे दोन याप्य आहेत यांविषयी पथ्य संभाळून वाढूं देऊं नयेत .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-06-24T13:49:34.1370000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

खरखरमुढा

 • पु. १ मुसलमान जातींतील भिक्षेकर्‍यांचा एक वर्ग व्यक्ति . हें लोकांनीं भिक्षा द्यावी म्हणुन आपल्या छातीवर , हातावर , डोक्यावर , दंडावत , जखम करुन लोकांकडुन आपली कींव करवून घेऊन भिक्षा मिळवितात . ' मलंग भडंग कलंदर । खरखरमुडें । ' - दावि ४७४ . २ भिक्षा मागतांना हिजड्याबरोबरचा एक सोबती , मुंडा पहा . ३ ( ल .) निष्कांचन , अनाथ , कफल्लक माणुस . 
RANDOM WORD

Did you know?

भारतीय विवाहसंस्थेचा पाया केव्हां घातला गेला?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.