TransLiteral Foundation
संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
आगंतुक व्रणनिदान

माधवनिदान - आगंतुक व्रणनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


आगंतुक व्रणनिदान

( मागील प्रकर णां त व्रणाच्या दोन प्रकारांपैकी शारीरव्रणाचे निदान सांगितले . आता यात दुसर्‍या प्रकारच्या आगंतुक ब्रणाविषयी सांगतो .)

आगंतुक व्रणांचीं कारणें व प्रकार .

नानाधारामुखै : शस्त्रैर्नानास्थाननिपातितै : ॥

भवन्ति नानाकृतयो वर्णास्तांस्तान्निबोध मे ॥१॥

छिन्नं भिन्नं तथा विद्धं क्षतं पिश्चितमेव च ॥

घृष्टमाहुस्तथा षष्ठं तेषां वक्ष्यामि लक्षणम्‌ ॥२॥

तीव्र अनेक धारा असलेली व नाना प्रकारच्या टोकांची अशी शास्त्रे शरीराच्या अनेक भागांवर लागली असता भिन्नभिन्न आकाराचे असे व्रण तेथे उत्पन्न होतात . हे आगंतुक व्रण होत , यांचे छिन्नव्रण , भिन्नव्रण , विद्धव्रण , क्षतव्रण , पिच्चितब्रण आणि धृष्टव्रण असे सहा प्रकार आहेत . त्या सर्वांची लक्षणे पुढे सांगितस्याप्रमाणे निरनिराळी असतात .

छिन्नव्रणाचीं लक्षणें .

तिर्यक्‌छिन्नऋजुर्वापि यो व्रणस्त्वायतो भबेत्‌ ॥

गात्रस्य पातनं तद्धि छिन्नमित्यभिधीयते ॥३॥

शरीरावर शस्त्राचा घाव लागल्यामुळे तिरकस , सरळ अथवा लांब असा जो व्रण पडतो किंवा गात्र गळून पडते त्यास छिन्नव्रण म्हणतात .

भिन्नव्रणाचीं लक्षणें .

शक्तिकुन्तेषु खडगाग्रविषाणैराशयो हता ॥

यत्किञ्चित्‌ प्रस्नवेत्तद्धि भिन्नलक्षणमुच्यते ॥४॥

बर्ची , भाला , तलवारीचे टोक , शिंघ इत्यादिकांनी कोष्ठावर आधात केला असता जो व्रण पडतो व त्यातून स्राव थोडा होत असतो त्यास भिन्नव्रण म्हणतात .

कोष्टभिन्न व्रणाचीं विशेष लक्षणें .

स्थानान्यामग्निपव्कानां मूत्रस्य रुधिरस्य च ॥

हृदुन्दुक : फुप्फुसश्च कोष्ठ इत्यभिधीयते ॥५॥

तस्मिन्‌ भिन्ने रक्तपूर्णे ज्वरोदाहश्च जायते ॥

मूत्रमार्गगुदास्येभ्यो रक्तं घ्राणाञ्च गच्छति ॥६॥

मूर्च्छाश्वासतृषाघ्मानमभक्तच्छ्न्द एव च ॥

विण्मूत्रवातसङ्गश्च स्वेदास्नावोऽक्षिरक्तता ॥७॥

लोहगन्धित्वमास्यस्य गात्रदौर्गन्ध्यमेव च ॥

ह्रच्छूलं पार्श्वयोश्चापि विशेषं चात्र मे शृणु ॥८॥

आमाशयस्थे रुधिरे रुधिरं छर्दयत्यपि ॥

आघ्मानमतिमात्रं च शूलं च भृशदारुणम्‌ ॥९॥

पव्काशययगेत चापि रुजा गौरवमेव च ॥

अध : काये विशेषेण शीतता च भवेदिह ॥१०॥

वरच्या व्याख्येत जो कोष्ठ शद्व आला आहे तो वैद्यशास्त्रात आमाशय , अग्न्याशय , पव्काशय , मूत्राशय , रक्ताशय , मलाशय , काळीज , प्लीहा , ह्रदय , व फुप्फुस इतक्या अर्थाने योजतात , तो भिन्न होऊन ( त्याच्या ठिकाणी भिन्न व्रण होऊन ) रक्ताने भरला असता रोग्याचा मूत्रमार्ग , गुदद्वार व नाक यावाटे रक्तस्राव होतो ; आणि ज्वर दाह , मूर्च्छा , श्वास , तहान , अन्नद्वेष ही लक्षणे उत्पन्न होतात , शिवाय मल , मूत्र व अपान वायु यांचा अवरोध होतो , घाम फार येतो , पोट फुगते , ढोळयांना लाली चढते , तापलेल्या लोखंडावर पाणी टाकले असता जसा त्याचा वास येतो तशी तोंडास घाण येते आणि हृदय व वरगडया यांमध्ये वेदना उत्पन्न होतात . या लक्षणांशिवाय ( कोष्ठभिन्न व्रणासंबंधी ) विशेष प्रकार असा दिसतो की , आमाशयात रक्तसंचय झाला असता रोग्यास रक्ताची ओकारी होते , पोट फुगते व त्यात अत्यंत भयंकर वेदना उद्भवतात आणि पव्काशयांत ( रक्तसंचय झाला असता ) त्याच्या शरीरास जडपणा येतो व विशेषकरुन कंबरेखालील भाग गार असतो आणि शूल उत्पन्न होतो .

विद्धव्रणाचीं लक्षणें

सूक्ष्मास्यशल्याभिहतं यदङ्गं त्वाशयं विना ॥

उत्तुण्डितं निर्गतं वा तद्विद्धामिति निर्दिशेत्‌ ॥११॥

कोष्ठाशिवाय असलेल्या शरीराच्या भागावर बारीक टोकाचे शल्य टोवल्यामुळे तोंड ( व्रण ) पडून शल्य निघून जाते किंवा आत राहते तेव्हा त्या पदलेल्या व्रणास विद्धव्रण असे म्हणतात .

क्षतव्रणाचीं लक्षणें .

नातिंच्छिन्नं नातिभिन्नमुभयोर्लक्षणान्वितम्‌ ॥

विषमं व्रणमङ्गेषु तत्क्षतं त्वभिनिर्दिशेत्‌ ॥१२॥

जो व्रण वाकडातिकडा पडतो पण धड छिन्न नव्हे व धड भिन्न नव्हे असा असून स्या दोन्ही व्रणांच्या लक्षणांनी युक्त असतो तो क्षतव्रण होय .

पिच्चित व्रणाचीं लक्षणे .

प्रहारपीडनाभ्यां तु यदङ्गं पृथुतां गतम्‌ ॥

सास्थि तत्पिच्चितं विद्यान्मज्जारक्तपरिप्लुतम्‌ ॥१३॥

ज्या व्रणात प्रहार अथवा दाव बसल्यामुळे अंग हाडांसहित चेचून गेलेले व पसरट झालेले असते तो पिच्चित व्रण जाणावा . हा मज्जा भरलेला व रक्तबंबाळ झालेला असतो .

वृष्टव्रणाचीं लक्षणें .

घर्षणादभिघाताद्वा यदङ्गं विगतत्वचम्‌ ॥

ऊषास्नावान्वितं तद्धि घृष्टमित्यभिनिर्दिशेत्‌ ॥१४॥

घर्षण अथवा प्रहार यामुळे अंगाची त्वचा जाऊन आग होते व तेथे जो व्रण पडून त्यातून रक्त जाते त्यास घृष्टव्रण ( घासटणे ) म्हणावे .

व्रणांत शल्य राहिल्याचीं लक्षणें व परिणाम .

श्यावं सशोथं पिटिकान्वितं च मुहुर्मुहु : शोणितवाहिनं च ॥

मृदूद्धतं बुद्‌बुदतुल्यमांसं व्रणं सशल्यं सरुजं वदन्ति ॥१५॥

त्वचोऽतीत्य शिरादीनि भित्वा वा परिहृत्य वा ॥

कोष्ठप्रतिष्ठितं शल्यं कुर्यादुक्तानुपद्रवान्‌ ॥१६॥

तत्रान्तर्लोहितं पाण्डुशीतपादकराननम्‌ ॥

शीतोच्छ्वासं रक्तनेत्रमानद्धं परिवर्जयेत्‌ ॥१७॥

व्रणांत शल्य राहिले असता तो निळया वर्णाचा , सुजलेला , पुळयांनी व्यापलेला असतो . त्याचप्रमाणे जेव्हा ( व्रणांत राहिलेले ) शल्य रोग्याच्या ( सात ) त्वचांचा भेद करून किंवा त्या पलीकडील शिरादिकांचा भेद करून अथवा न करून कोष्टात जाऊन राहते तेव्हा ( मागे सांगितलेल्या भिन्न व्रणाच्या व्याख्येतील ) भिन्न कोष्ठाच्या सर्व ( ज्वर , मलमूत्रावरोध वगैरे ) उपद्रवास उत्पन्न करते . या उपद्रवांनी पीडित झालेला सशल्य भिन्नकोष्ठ रोगी ( कोष्ठात ) रक्त साचलेला , अंगावर पांढरेपणा आलेला , हातपाय गार पडलेला , डोळे लाल झालेला , पोट फुगलेला व थंड श्वास टाकणारा या प्रकारच्या लक्षणांनी युक्त असता तो असाध्य जाणून त्याची चिकित्सा करू नये .

भ्रम : पलाप : पतनंग प्रमोहो विचेष्टनं ग्लानिरथोष्णता च ॥

स्नस्ताङ्गता मूर्च्छकमूर्ध्ववातस्तीव्रा रुजोवातकृताश्च तास्ता : ॥१८॥

मांसोदकाभं रुधिरं व गच्छेत्सर्वेन्द्रियार्थोपरमस्तथैव ॥

दशार्धसङख्येध्वथ विक्षतेषु सामान्यतो मर्मसु लिङगमुक्तम्‌ ॥१९॥

मांस , शिरा , स्नायू , अस्थि आणि सांधे या पाच मर्मस्थानी जखम झाली . असता चक्कर , वडबंड , भूभीवर आपोआप तोल जाऊन पडणे , ग्लानी , मूर्च्छा व उष्णता ही लक्षणे उत्पन्न होतात व रोगी हातपाय पाकडतो , त्याचे अंग गळून जाते , दम लागतो , उर्ध्व वायू होतो , तीव्र वेदना होतात , क्षातंतून मांस धुतलेल्या पाण्यासारखे रक्त वाह्ते आणि त्याच्या मनास व इंद्रियांस व्याकुळता येऊन त्यांचे त्यापार बंद पडतात .

विद्ध शिरा .

सुरेन्द्रगोप्रतिमं प्रभूतं रक्तं स्नवेत्तत्क्षतजश्च वायु : ॥

करोति रोगान्विविधान्यथोक्तान्‌ शिरासु विद्धास्वथवा क्षतासु ॥

शिरास जखम झाली असता अथवा टोचले असता त्यातून इंद्रगील किडया प्रमाणे लाल व पुष्कळ रक्ताचा स्राव होतो व त्या स्रावामुळे झालेल्या रकक्शयाने कुपित झालेला वायु ( आचके वगैरे ) अनेक विकार उत्पन्न करतो .

विद्धस्नायू .

कोब्ज्यं शरीरावयवावसाद : क्रियास्वशक्तिस्तुमुला रुजश्च ॥

चिराद्‌व्रणो रोहति यस्य चापि तं रनायुविद्धं पुरुषं व्यवस्येत्‌ ॥

स्नायूस जखम झाली असता , रोग्यास , कुब्जेपणा येतो , त्याचे शरीर विकल होते व व त्यास कोणतेही काम करण्याची शक्ति राहात नाही , तसेच जखमेच्या जागी अत्यंत वेदना होत असतात व ती भरण्यास फार काळ लागतो .

विद्धसंधीचीं लक्षणें .

शोथाभिवृद्धिस्तुमुला रुजश्च बलक्षय ; पर्वसु भेदशोथौ ॥

क्षतेषु सन्धिध्वचलाचलेषु स्थात्सर्वकर्मोपरमश्च लिङगम्‌ ॥२२॥

शरीरातील हालणार्‍या व न हालणार्‍या दोन्ही प्रकारच्या संध्यांत जखमा झाल्यास त्या ठिकाणी सजू उत्पन्न होऊन ती वाढते , अत्यंत वेदना होतात व सांधे , सुजतात व फुटलाप्रमाणे दुखतात , रोग्यास शक्तिपात होतो व त्यास कोणतेही काम करता येत नाही .

विद्धास्थीचीं लक्षणें .

थोरा रुजो यस्थ निशादिथेषू सर्वास्थवस्थाखु च जैसि शानिवार

भिवग्निपश्चितार्थसूत्रादा कुदा वारासा ॥२३॥

जाच्या अस्थींनी वखम झाली आहे त्या दुरुक्षच्य शरीरी जाइदा वेदना होतात व कोणत्याही अवस्थेत त्यास समाचन वाटत नाही हे खूप व अस्था अर्थ विचारी वैद्याने जाणूनच उपचार करावा .

यथास्थमेतानि विभाचचेचु लिङ्गागि र्वाइसैइदादा ॥

शिरा , स्नायू , संधि व अस्थि यांस मर्मरहित स्थानी वाक काल्याण वर जी लक्षणे सांगतली तीच लक्षणे त्यांस ( धिरविकांस ) मर्मस्थाणी काम झाली असता उद्भवतात .

पाण्डुर्विवर्ण : स्पृशितं न वेत्ति यो मांसमर्मस्वभिताडित : स्यात्‌ ॥

शास्त्रवर्णित मांस मर्मस्थानी जखम झाली असता रोगी पांढरा पडतो , त्याचा रंग बदलतो व त्याचे स्पर्शज्ञान नष्ट होते .

व्रणरोगाचे उपद्रव .

विसर्प : पक्षघातश्च शिरास्तम्भोऽपतानक : ॥

मोहोन्मादव्रणरूजो ज्वरस्मृष्णा हनुग्रह : ॥२५॥

कासश्छर्दिरतीसारो हिक्का श्वास : सवेपथु : ॥

षोडशोपद्रवा : प्रोक्ता व्रणानां व्रणचिन्तकै : ॥२६॥

कोणत्याही प्रकारच्या व्रणरोगात विसर्प , पक्षघात , शिरास्तंभ , अपतानक , मूर्च्छा , उन्माद , वेदना , ज्वर , तहान , हनुग्रह , खोकला , वांति , श्वास , उचकी , कंप व अतिसार हे सोळा प्रकारचे उपद्रव उद्भवतात म्हणून वैद्यशास्त्रात सांगितले आहे .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-06-24T13:49:42.5900000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

conveyance of goods

 • मालाचे हस्तांतरण 
 • माल वाहून नेणे 
RANDOM WORD

Did you know?

वास्‍तुदोषावर आरसा काय करतो आरशांचा उपयोग कसा होतो
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,689
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,801
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.