TransLiteral Foundation
संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
ज्वरनिदान

माधवनिदान - ज्वरनिदान

" शरिरेंद्रिय- सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची व्यापक आयुर्वेदीय व्याख्या आहे.


ज्वरनिदान

दक्षापमानसंक्रद्धरुद्रनि : श्वससंभव : ॥

ज्वरोऽष्टधा पृथग्‌ द्वंद्व : संधाततागन्तुज : स्मृत : ॥१॥

दक्षानें शंकराचा अपमान केला होता ; त्यामुळें जो त्यांस क्रोध आला त्यापासून ज्वराची मूळ उत्पत्ति झाली असें पौराणिक मत आहे , ज्वराचे आठ प्रकार आहेत --- वात , पित्त , कफ इहीं करून वेगळाले तीन ; दोन दोषांपासून तीन ; सन्निपात एक आणि आगंतुक एक मिळू न हे आठ समजावेत .

ज्वराची संप्राप्ति .

मिथ्याहारविहाराभ्यां दोषा ह्यामाशयाश्रया : ॥

बहिर्निरस्य कोष्ठाग्निं ज्वरदा : स्यू रसानुगा : ॥२॥

अव्यवस्थित आहार आणि अव्यवस्थित विहार ( वागणूक ) यांच्या योगानें दुष्ट झालेले आमाशयांतील ( वातादिक ) दोष कोठयांतील अग्नीला बाहेर काढून रसधातूला मिळतात व ज्वर उत्पन्न करितात , शारीरज्वराची संप्राप्ति या रीतीनें होते , आगंतुक ज्वराची होत नाहीं ; आगंतुक ज्वरांत दोषप्रकोप मागाहून होतो .

ज्वराचें लक्षणें .

स्वेदावरोध : संताप : सर्वाङ्गग्रहणं तथां ॥

युगपद्यत्र रोगे च स ज्वरो व्यपदिश्यते ॥३॥

अवरोध ज्या रोगांत घामाचा प्रतिबंध , सर्वांग तापणे आणि जखडणें इतके प्रकार एकाकालीं होतात त्यास ज्वर म्हणतात .

ज्वराचें पूर्वरूप .

श्रमोऽरतिर्विवर्णत्वं वैरस्यं नयनप्लव : ॥

इच्छाद्वेषौ मुहुश्चापि शीतवातातपादिषु ॥४॥

जृम्भाऽङ्गमर्दो गुरुता रोमहर्षोऽरूचिस्तम : ॥

अप्रहर्षश्च शीतं च भवन्त्युत्पत्स्यति ज्वरे ॥५॥

सामान्यतो विशेषात्तु जृम्भात्यर्थं समीरणात्‌ ॥

पित्तान्नयनयोर्दाह : कफ न्नान्नाभिनंदनम्‌ ॥६॥

श्रमावांचून थकवा येणे , चैन न पडणे , शरीरास ग्लनि , तोंडास बेचवपणा , पाण्यानें डोळे भरून येणे , थंडी , वारा व ऊन यांची वारंवार इच्छा आणि द्वेष , जांभया येणे , अंग मोडून येणे व जड होणे , काटा येणे , रुचि नसणे , अंधारी येणे , उल्हास नसणे आणि थंडी वाजणे हीं लक्षणे सामान्यत : ज्वराचीं पूर्वरूपें होत . विशेष प्रकार असा कीं , वातजन्य ज्वर येणे असला तर जांभया फार येतात . पित्तजन्य येणें असला तर डोळ्यांची आग होते ; कफजन्यांत अन्न नकोसे होते .

वातज्वराचीं लक्षणें .

वेपथुर्विषमो वेग : कण्ठौष्ठमुखशोषणम्‌ ॥

निद्रानाश : क्षवस्तम्भो गात्राणां रौक्ष्यमेव च ॥७॥

शिरो्हृद्नात्ररुग्वक्त्राइरस्यं गाढविटकता ॥

शूलाध्माने जृभ्भणं च भवन्त्यनिलजे ज्वरे ॥८॥

अंग कांपणे , अनियमितकाळीं ज्वर कमीजास्त होणे किंवा येणे , घसा , तोंड व ओठ यांचे ठिकाणीं कोरड पडणे , झोप नाहींशी होणे , शिंका न येणे , इंद्रियें रूक्ष होणे , डोकें , ह्रदय व इद्रियें यांमध्यें दुखणे , तोंडाला चव नसणे , शौचास खडा होणे , पोट फुगणे व दुखणे आणि जांभया येणे हीं वातज्वराचीं लक्षणे जाणावीं .

पित्तज्वराची लक्षणें .

वेगस्तीक्ष्णोऽतिसारश्च निद्राल्पत्वं तथा वमि : ॥

कण्ठौष्ठमुखनासानां पाक : स्वेदश्च जायते ॥९॥

प्रलापोवकत्रकटुता मूर्च्छा दाहो मदस्तृषा ॥

पीतविण्मूत्रनेत्रत्वक्‌ पैत्तिके भ्रम एव च ॥१०॥

ज्वराचा वेग जोरात असणें , अतिसार होणे , झोंप किंचित्‌ असणे , ओकारी येणे , गळा , ओठ , तोंड आणि नाक यांचे ठायी फोड येणे , घाम येणे , बडबड असणे , तोंड कडू होणे , मूर्च्छा , अंगाचा दाह व धुंदी हीं असणे , पाण्याचा शोष पडणे , विष्ठा , मूत्र डोळे आणि त्वचा ही पिवळीं होणें आणि चक्कर येणे हीं लक्षणें पित्तज्वरचीं जाणावीं .

कफज्वराची लक्षणें .

स्तैमित्यं स्तिमितो वेग : आलस्यं मधुरास्यता ॥

शुक्लमूत्रपुरीषत्वक्‌ स्तम्भस्तृप्तिरथापि च ॥११॥

गौरवं शीतमुत्क्लेशो रोमहर्षोऽतिनिद्रता ॥

प्रतिश्यायोऽरुचि : कास : कफजेऽक्ष्णोश्च शुक्लता ॥१२॥

अंगास ओले वस्त्र गुंडाळल्याप्रमाणे वाटणे , ज्वराचा वेग मंद असणे , आळस येणे , तोंड गुळचट होणे , मूत्र , विष्ठा व त्वचा यांचे ठायीं पांढरेपणा असणे , अंग ताठणे , पोट भरलेसे वाटणे , अंग जड होणे , थंडी वाजणे , उम्हासे येणें , कांटा येणे , फार झोंप असणे , पडसे येणे , तोंडाला चव नसणे , खोकला असणे व डोळ्यांवर पांढरेपणा येणे हीं कफज्वराचीं लक्षणे समजावीं .

वातपित्तज्वराची लक्षणें .

तृष्णा मूर्च्छा भ्रमो दाह : स्वप्ननाश : शिरोरूजा ॥

कण्ठास्यशोषो वमथू रोमहर्षोऽरुचिस्तम ॥१३॥

पर्वभेदश्च जृम्भा च वातापित्तज्वराकृति : ॥

तृषा , मूर्च्छा , चक्कर व अंगाचा दाह असणे , झोंप नसणें , मस्तकशूळ असणें . गळा व तोंड यांचे ठिकाणीं कोरड पडणे , वांती होणे , कांटा येणे , तोंडास बेचव , अंधारी येणे , सांधे दुखणे आणि जांभया येणे हीं वातपित्तज्वराचीं लक्षणे होत .

वातश्लेष्मज्वराचीं लक्षणें .

स्तैमित्यं पर्वणां भेदो निद्रागौरवमेव च ॥१४॥

शिरोग्रह : प्रतिश्याय : कास : स्वेदाप्रवर्तनम्‌ ॥

संतापो मध्यवेगश्च वातश्लेष्मज्वराकृति : ॥१५॥

अंगाला ओलें फडकें गुंडाळल्याप्रमाणे वाटणे , सांधे फुटणे , झोंप फार येणे , अंग जड होणे , डोकें जखडलेसे वाटणे , पडसें , खोकला व घाम न येणे , अंगाचा दाह होणे आणि ज्वर मध्यम वेगाचा असणे हीं वातश्लेष्मज्वराचीं लक्षणे होत .

श्लेष्मपित्तज्वराचीं लक्षणें .

लिप्ततिक्तास्यता तन्द्रा मोह : कासोऽरुचिस्तृषा ॥

मुहुर्दाहो मुहु ; शीतं श्लेष्मपित्तज्वराकृति : ॥१६॥

तोंड कडू व चिकट असणे , झापड , बेशुद्धि , खोकला , तोंड बेचव असणे , तहान लागणे , अगाचा वारंवार दाह होणे व वारंवार थंडी वाजून येणें हीं श्लेष्मपित्तज्वराचीं लक्षणे होत .

सन्निपात ज्वराची लक्षणें .

क्षणे दाह : क्षणे शीतमस्थिसन्धिशिरोरुजा ॥

सास्नावे कलुषे रक्ते निर्भुग्ने चापि लोचने ॥१७॥

सस्वनौ सरुजौ कर्णौ कण्ठ : शूकैरिवावृत : ॥

तन्द्रा मोह : प्रलापश्च कास : श्वासोऽरुचिर्भ्रमा ॥१८॥

परिदग्धा खरस्पर्शा जिव्हा स्नस्ताङता परम्‌ ॥

ष्ठीवनं रक्तपित्तस्य कफेनेन्निश्रितस्य च ॥१९॥

शिरसो लोठन तृष्णा निद्रानाशो ह्रदै व्यथा ॥

स्वेदमूत्रपुरीषाणां चिराद्दर्शनमल्पश : ॥२०॥

कृशत्वं नातिगात्राणां प्रततं कण्ठकूजनम्‌ ॥

कोठानां श्यावरक्तानां मण्डलानां च दर्शनम्‌ ॥२१॥

मूकत्वं स्रोतसां पाको गुरुत्वमुदरस्य च ॥

चिरात्पाकश्च दोषाणां सन्निपातज्वराकृति : ॥२२॥

क्षणांत अंगाचा दाह होणे व क्षणांत थंडी वाजणे , हाडें , सांधे व डोके यांचें ठायीं वेदना असणे , डोळे पाण्यानें भरलेले , गढूळ , लाल आणि वटारलेले असणे , कानांत शब्द व वेदना होणे , गळ्यात भातकूस लागल्यासारखें दुखणे , झांपड , मूर्च्छा व बडबड असणे , खोकला येणे , श्वास लागणे , तोंडास चव नसणे , चक्कर येणे , जीभ होरपळल्यासारखी व सागाचे पानासारखी खरखरीत होणे , अंग अत्यंत गळून जाणे , रक्तपित्तमिश्रित व क्फयुक्त थुंकी येणे , डोके घण मारल्याप्रमाणे वेदना होणे , तृष लागणे , निद्रा न येणे , हृदयात दुखणे , घाम , मूत्र व मळ फार वेळानें थोडे थोडे होणे , इंद्रियें फारशी कृश होत नाहींत . गळा एकसारखा घरघर वाजणे , मधमाशी हसल्याप्रमाणे अंगावर गांधी येणें व काळसर आणि तांबूस अशीं चकंदळें उठणे , वाचा बसणे , कान , नाक व तोंड यांचे ठिकाणीं फोड येणे , पोट जड होणे व उशिराने वात , पित्त , कफ या दोषत्रयांचा पाक होणे हीं लक्षणे सन्निपातज्वरांत रोग्यास होतात .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-06-24T13:49:29.6170000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

टपकन

 • क्रि.वि. १ टप असा आवाज करून . २ निमिषांत ; क्षणांत ; फटकन ; चपकन . [ घ्व ] 
RANDOM WORD

Did you know?

देव्हार्‍यात कोणत्या दिशेला दिव्याची वात असावी, त्याचे फायदे तोटे काय?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Total Pages: 46,537
 • Hindi Pages: 4,555
 • Dictionaries: 44
 • Words in Dictionary: 302,181
 • Marathi Pages: 27,517
 • Tags: 2,685
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,230
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.