TransLiteral Foundation
संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
परिणामशूलनिदान

माधवनिदान - परिणामशूलनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


परिणामशूलनिदान

स्वैर्निदानै : प्रकुपितो वायु : सन्निहितस्तथा ॥

कफपित्ते समावृत्य शूलकारी भवेद्वली ॥१॥

भुक्ते जीर्यति यच्छूलं तदेव परिणामजम्‌ ॥

तस्य लक्षणप्येतत्समासेनाभिधीयते ॥२॥

परिणामशूल हा काही स्वतंत्र रोग नसून शुलाचाच एक प्रकार आहे . जेव्ह आपल्याच कारणांनी ( वायु दूषित करणीर्‍या पदार्थांच्या सेवनामुळे ) प्रकोप पावलेले . वायु , कफ व पित्त या दोषांशी मिश्र होऊन प्रवळ होतो तेव्हा तो जो शूल उत्पन्न करतो त्यास परिणामशूल असे म्हणतात , हा अग्नपचन होत असताना उत्पन्न होतो . याचे वातिक , पैत्तिक , श्लैष्मिक , द्वंद्वज व सान्निपातिक असे पांच प्रकार असून त्यांची लक्षणे संक्षेपाने सांगतो .

वातिक परिणामशूल .

आध्मानाटोपविण्मूत्रविबन्धारतिवेपनै : ॥

स्निग्धोष्णोपशमं प्रायं वातिकं तद्वदेद्भिषक्‌ ॥३॥

ज्यात गुडगुड शद्व , अस्वस्थपणा , कंप , मलमूत्राचा अवरोध व पोट फुगणे ही लक्षणे असून जो स्निग्व व उष्ण अशा पदार्थांच्या सेवताने शमतो त्यास वैद्य वातिक परिणामशूल असे म्हणतात .

पौत्तिक परिणामशूल .

तृष्णादाहारतिस्वेदकद्‌वम्ललवणोत्तरम्‌ ॥

शूलं शीतशमप्रायं पैत्तिकं लक्षयेदबुध : ॥४॥

जो शूल अस्वस्थपणा , तहान , दाह व घाम ही लक्षणे उत्पन्न करतो व तसाच तिखट , आंबट व खारट पदार्थांच्या सेवनाने वाढतो आणि थंड पदार्थ सेवन केल्याने शमतो तो पैत्तिक परिणाम शूल असे वैद्य मानतात .

श्लैष्मिक परिणामशूल .

छर्दिहल्लाससम्मोहं स्वल्परूक्‌ दीर्घसन्तति ॥

कटुतिक्तोपशान्तं च तच्च ज्ञेयं कफात्मकम्‌ ॥५॥

ज्या शूलाची पीडा थोडी असून ज दीर्घकालपर्यंत राहतो व ओकारी , तळमळ आणि मान व इंद्रिये यांच्या ठायी व्याकुलपणा ही लक्षणे उत्पन्न करतो तो श्लैष्मिक ( कफजन्य ) परिणामशूल जाणावा , हा तिखट व कडू पदार्थांने शमतो .

संसृष्टलक्षणं यच्च द्विदोषं परिकल्पयेत्‌ ॥

द्विदोषजमसाध्य तु क्षीणमांसबलानलम्‌ ॥६॥

ज्या परिणामशूलांत दोन दोन दोषांची लक्षणे असतात तो द्वंद्वज व तिन्ही दोषांची असतात तो सान्निपातिक होय . रोग्याचा जठराग्रि मंद होऊन त्याचे बल व मांस ही ज्यात क्षीण होतात तो परिणामशूल असाध्य जाणावा .

अन्नद्रव शूल .

जीर्णेजीर्यत्यजीर्णे वा यच्छ्रलमुपजायते ॥

पथ्यापथ्यप्रयोगेण भोजनाभोजने न च ॥

न शमं याति नियमात्सोऽनद्रव उदाहृत : ॥७॥

अन्नद्रवाख्यशूलेषु न तावत्‌ स्वस्थ्यमश्रते ॥

वान्तमात्रे जरत्‌ पित्तं शूलमाशूयपोहति ॥

अन्न जिरले असता , न जिरले असता अथवा जिरत असताही ( म्हणजे सर्वकाल ) जो शूल उत्पन्न होतो ; आणि पथ्य केल्याने अथवा कुपथ्य केल्याने , तसेच जेवल्याने अथवा न जेवल्याने म्हणजे कोणत्याही नियमित उपायाने शमत नाही , त्यास अन्नद्रवशूल असे म्हणतात . ( अशा प्रकारचा हा शूल आहे . तरी तो असाध्य नाही )

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-06-24T13:49:38.1700000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

staleness

 • पु. शिळेपणा 
RANDOM WORD

Did you know?

घर के मंदिर में कौनसी बातों का ध्यान रखना चाहिये?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Total Pages: 46,537
 • Hindi Pages: 4,555
 • Dictionaries: 44
 • Words in Dictionary: 302,181
 • Marathi Pages: 27,517
 • Tags: 2,685
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,230
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.