TransLiteral Foundation
संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
उदररोगनिदान

माधवनिदान - उदररोगनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


उदररोगनिदान

उदररोगाचीं कारणें .

रोगा : सर्वेऽपि मन्देऽग्नौ सुतरामुदराणि च ॥

अजीर्णान्मलिनैश्चान्नैर्जायन्ते मलसञ्चयात्‌ ॥१॥

( अग्निमांद्य हे त्रिदोषोत्पत्ति करणारे असल्यामुळे ) जठराग्नीची शक्ति कमी झाली असता सारेच रोग उद्भवतात : तरी निरंतर होणारे म्हणजे टदररोगच होत . तसेच अजीर्ण , मलिनान्न ( क्षीर , मत्स्य वगैरे संयोगाविरूद्ध पदार्थंचे सेवन अथवा जेवगावर जेवणे ) आणि मलसंचय या कारणांमुळेही उदररोग होतात .

उदररोगाचा संप्राप्ति .

रुध्वा स्वेदाम्बुवाहीनि दोषा : स्त्रोतांसि सञ्चिता : ॥

प्राणाग्न्यपानान्सन्दूष्य जनयन्त्युदरं नृणाम्‌ ॥२॥

वातादिक दोष स्वेदवाहक व उदकवाहक स्वोतसांचा रोघ करून संचितसे प्राणवायू . अपानवायु व जठरान्गि यांना दूषित करून पुढे सांगितलेल्या लक्षणांचा उदररोश उत्पन्न करतात .

उदररोगाची सामान्य लक्षणें .

आध्मानं गमने शक्तिदौर्बल्यं दुर्बलाग्निता ॥

शोथ : सदनमङ्गानां सङ्गो वातपुरीषयो : ॥३॥

दाहस्तन्द्रा च सर्वेषु जठरेषु भवन्ति हि ॥

पोट दुखणे व फुगणे , चालता न येणे , शक्ति क्षीण होणे , अंग गळणे , सुबणे , अग्निमांद्य , मलावष्टंभ , अपानवाय़ूचा अवरोध , दाह आणि तंद्रा या प्रकारची सामान्य लक्षणे कोणत्याही उदररोगांत द्दष्टीस पडतात .

पृथग्‌गदोषै : समस्तैश्च प्लीहबद्धक्षतोदकै : ॥

सम्भवन्त्युदराण्यष्टौ तेषां लिङ्गं पृथक शृणु ॥४॥

वात , पित्त व कफ या तिन्ही दोषांपासून पृथक्‌ पृथक्‌ होणारे तीन व तिन्ही मिळून होणारा एक असे चार आणि प्लीहोटर , बद्धोदर , क्षतोदर आणि जलोदर हे दुसरे चार मिळून आठ प्रकारचे उदररोग होतात ; त्यांची लक्षणे पुढे निरनिराळी सांगितल्याप्रमाणे जाणावी .

वातोदराचीं लक्षणें .

तत्र वातोदरे शोथ : पाणिपन्नाभिकुक्षियु ॥

कुक्षिपार्श्वोदरकटीपृष्ठरूकपर्वभेदनम्‌ ॥५॥

शुष्ककासोऽङ्गमर्दोऽधोगुरुतामलसङग्रह : ॥

श्यावारूणत्वगादित्वमकस्माद्धृद्धिफासवत्‌ ॥६॥

सतोदभेदमुदरं तनुकृष्णशिराततम्‌ ॥

आध्मातबस्तिवच्छब्दमाहतं प्रकरोति च ॥७॥

वायुश्चात्र सरुक्‌शब्दो विचरेत्‌ सर्वतोगति : ॥

वातोदर झाले असता रोग्याचे हात , पाय , नाभी व कुशी याच्या ठिकाणी सूज येते , सांधे तुटतात , कुशी , बरगडया , पोट , कमर , पाठ यात पिडा , कोरडा खोकला उत्पन्न होतो , अंग मोडून येते , त्वचा , नखे व डोळे हे काळे व तांबडे पडतात , मळ सांचतो , कंबरेखालचा भाग जड होतो , पोटात टोचणी व फुटल्यासारखी पीडा , एकाएकी पोट लहान व मोठे होते , त्यावर बारीक काळ्या शिरा उमटतात आणि टिचकी मारली असता फुगलेल्या पखालीप्रमाणे आवाज होतो आणि सर्वत्र वायूचा संचार असून त्याचा गुरगुर असा शब्द व त्यामुळे होणार्‍या वेश्ना हे दोन्ही प्रकार उभवतात .

पित्तोदराचीं लक्षणें .

पित्तोदरे ज्वरो मूर्च्छा दाहस्तृट कटुकास्यता ॥

भ्रमोऽतिसार : पीतत्वं त्वगादावुदरं हरित्‌ ॥८॥

पीतताम्रशिरानद्धं सस्वेदं सोष्म दह्यते ॥

धूमायते मृदुस्पर्शं क्षिप्रपाकं प्रदूयते ॥९॥

पित्तोदर झाले असता ज्वर , मूर्च्छा , चक्कर व तोंडास कडवटपणा येणे , दाह , तहान लागणे , अतिसार व अत्यंत वेदना होणे , त्वचा , नखे व व डोळे हे पिवळे पडणे , आणि पोट हिरवे होणे , त्यावर पिवळया व तांबडया अशा शिरा उमटणे , घामामुळे ओलसर व तसेच कढत आणि स्पर्श केला असता हातास मऊ लागणे , त्याचा दाह होणे व त्यातून धूर निघाल्यासारखा वाटणे आणि ते लौकर पिकणे ( म्हणजे पित्तोदराचे जलोदर होणे ) व पीडा याप्रमाणे जाणावी .

कफोदराचीं लक्षणें .

श्लोष्मोदरेऽ ङ्गसदनं स्वाप : श्वयथुगौरवम्‌ ॥

निद्रोत्क्लेशो रुचि : श्वास : कास : शुक्लत्वगादिता ॥१०॥

उदरं स्तिमितं स्निग्धं शुक्कराजीततं महत्‌ ॥

चिराभिवृद्धं कठिनं शीतस्पर्शं गुरु स्थिक्लरम्‌ ॥११॥

अंग गळणे , स्पर्श न कळणे , सूज येणे , अंग जड होणे , चव नसणे व वांति होईलशी वाटणे , झोप व तोंडाला पाणी सुटणे , श्वास व खोकला उत्पन्न होणे , त्वचा , नखे व डोळे हे पांढरे पडणे आणि पोट स्थिर , जड व मोठे होणे , त्यावर तुळतुळीत पांढर्‍या रेषा उमटणे , स्पर्श केला असता कठीण व गार लागणे आणि चिरकालाने वाढणे ही लक्षणे कफोदराची होत .

सन्निपातोदराचीं कारणें व लक्षणें .

स्त्रियोऽन्नपान नखरोममूत्रविडार्तवैर्युक्तमसाधुवृत्ता : ॥

यस्मै प्रयच्छन्त्यरयो गरांश्च दुष्टाम्बुदूषीविषसेवनाद्धा ॥१२॥

तेनाशु रक्तं कुपिताश्च दोषा : कुर्यु : सुघोरं जठर त्रिलिङ्गम्‌ ॥

तच्छीतवाते भृशदुर्दिने वा विशेषत : कुप्यति दह्यते च ॥१३॥

सचातुरो मूर्छति हि प्रसक्तं पाण्डु : कृश : शुप्यति तृष्णा च ॥

दूष्योदरं कीर्तितमेतदेव

ज्या पुरुषाला वाईट चालीच्या स्त्रिया वशीकरणार्थ , नखे , केस , मूत्र , विष्ठा , विटाळ हे कालवून दिलेले अन्न व पाणी खाऊ घालतात अथवा ज्यास शत्रूकडून कृत्रिम विषप्रयोग करण्यांत येतो , तसेच जो दुष्ट ( विषारी प्राणी , कुजलेली पाने यांनी युक्त असे ) जल अथवा दूषी ( अल्य वीर्याचें , जुने अथवा मारक औषधांनी मारलेले ) विष ग्रहण करतो , त्याच्या शरीरांतील रक्त आणि वातादिक दोष त्या कारणामुळे तत्काळ प्रकोप पावून ते अत्यंत भयंकर अशा सन्निपातोदरास उत्पन्न करतात . याचा जोर विशेषेकरून थंडीचे दिवस आले असता , गडद आभाळ आले असता अथवा गार वारा सुटला असता रोग वाढतो , दाहही होतो , त्यास दूष्योदर ( रक्तास दूषित करून होणारे उदर ) असे दुसरे नांव असून हे झाले असता रोगी विषामुळे निरंतर मुर्च्छा पावतो व त्याचा वर्ण पांढरा पडून तो कृश होतो , तसेच श्रम केले असता त्यास पाण्याचा शोषही पडतो .

प्लीहोदराचीं कारणें व लक्षणें .

प्लीहोदरं कीर्तयतो निवोध ॥

विदाह्यभिष्यन्दिरतस्य जन्तो : प्रदुष्टमत्यर्थमसृक्कफश्च ॥१४॥

प्लीहाभिवृद्धिं कुरुत : प्रवृद्धौ प्लीहोत्थमेतज्जठरं वदन्ति ॥

तद्वामपाश्व परिवृद्धिमेति विशेषत : सीदति चातुरोऽत्र ॥१५॥

मन्दज्जराग्नि : कफपित्तलिङ्गैरुपद्रत : क्षीणबलोऽतिपाण्डु : ॥१६॥

दाहकारक व कफकारक अशा पदार्थांचे सेवन हे प्लीहोदर होण्याचे कारण होय , यामुळे रक्त व कफ वाढून ते प्लीहेची वृद्धि करतात . यास प्लीहोत्थ उदर असेही म्हणतात व हे शरीरांत डावीकडे वाढत जाते . याचीलक्षणे :--- रोग्याची शवित क्षीण होणे , तो अतिशय गळून जाणे व अगदी पांढरी फटफटीत पडणे , तसेच त्याच्या अंगात बारीक ज्वर असणे , जठराग्रि मंद होणे व कफजन्य व पित्तजन्य उदराची लक्षणे उद‌भवणे याप्रमाणे जाणावी .

प्लीहोदराचा भेद व त्याचीं लक्षणें .

सव्यान्यपार्श्वे यकृति प्रदुष्टे ज्ञेयं यकृद्दाल्युदरं तदेव ॥१७॥

उदावर्तरूजानाहैर्मोहतृदहनज्वरै : ॥

गौरवारूचिकाठिन्यैर्विद्यात्तत्र मलान्‌ क्रमात्‌ ॥१८॥

वर सांगितलेल्या प्लीहोदराचाच यकृद्दाल्युदर म्हणून एक निराळा मेद आहे . ह्या मनुष्याच्या शरीरांत उसध्या बाजूला ’ जे यकृत्‌ ( काळीब ) आहे ते वृष्ट ( रोगयुक्त ) झाले असता उदूभवतो व यात वात , पित्त व कफ या तिन्हीही दोषांचा क्रमाने संबंध असतो . जेव्हा उदावर्त , शूल व पोट फुगणे ही लक्षणे द्दष्टीस पडतात तेव्हा वातप्रकोपापासून ; मूर्च्छा , तहान व ज्वर ही लक्षणे असता पित्तप्रकोपापासून आणि अरूचि , काठिन्य व जडत्व या लक्षणांनी रोगी युक्त असता कफपकोपासून या यकृद्दाल्युदराची क्रमाणे उत्यत्ति झाली आहे असे जाणावे .

बद्ध गुदोदराचीं कारणें व लक्षणें .

यस्यान्त्रमन्नैरूपलेपिभिर्वा बालाश्ममिरर्वा पिहितं यथावत्‌ ॥

सञ्चीयते तस्य मल : सदोष : शनै : शनै : सङ्करवच्च नाडयाम्‌ ॥

निरुध्यते तस्य गुदे पुरीषं निरेति ‘ कृच्छ्रादतिचाल्पमल्पम्‌ ॥

हृन्नाभिमध्ये परिवृद्धिमेति तस्योदरं वद्धगुदं वदन्ति ॥२०॥

ज्या पुरुषाचे आतडयात बारीक बारीक ( अन्नाबरोबर गेलेले ) ख्डे , केस अथवा बुळबुळीत अन्न साचून ते आतडे दाटून जाते त्याचा मळ वातादि दोघामुळे हळुहळू पुरीषवह नाडयामधून राहिला , असता त्यापासून बद्धगुदोदर उत्पन्न होते , याची लक्षणे अशी की , रोग्याच्या गुदद्वारात मळ गुंततो व मोठया कष्ठाने व कुंथुन कुंथून थोडथोडा पडतो ; तसेच त्याचे उदर , ह्रदय व नाभि यांच्यामध्ये मोठे होते .

क्षतोदराचीं कारणें . व लक्षणें .

शल्यं तथाऽन्नोपहितं यदन्त्रं भुक्तं भिनत्त्यागतमन्यथा वा ॥

तस्मात्क्षतान्त्रात्सलिलप्रकाश : स्नाव : स्नवेद्वैदतस्तुगुभूय : ॥

नाभेरधश्चोदरमेति वृद्धिं निस्तुद्यते दाल्यति चातिमात्रम्‌ ॥

एतत्परिस्नाव्युदरं प्रदिष्टम्‌

क्षतोदरास पटिस्त्राव्युदर असेही म्हणतात . हे अन्न खातेवेळी कांटा वगैरे शल्य घशाखाली जाऊन व पव्काशगात वाकडे तिकडे होऊन त्यामुळे आतडयास भोक पडले असता ( कधी कधी जांभई आल्यामुळे अथवा अतिशय खाल्यामुळे आतडे फाटले असता ) उद्भवते व तसे उद्भवले असता रोग्याच्या त्या सत पडलेल्या आतडयातून गुदद्वारावाटे पाण्यासारखा वारंवार प्रवाह वाहु लागतो आणि बेंबीच्या खाली त्याचे पोट मोठे होऊन त्यामध्ये टोचल्यासारख्या व फोडल्यासारख्या अत्यंत वेदना होतात .

य : जलोदराचीं कारणें व लक्षणें .

जलोदरं कीर्तयतो निबोध ॥२२॥

स्नेहपीतोऽप्यनुवासितो वा वान्तो विरक्तो प्यथवा निरूढ : ॥

पिबेज्जलं शीतलमाशु तस्य स्त्रोतांसि

दूष्यन्ति हि तद्वहानि ॥२३॥

स्नेहोपलिप्तेष्वथवापि तेषु जलोदरं पूर्ववदभ्युपैति ॥

स्निग्धं महत्तत्परिवृद्धनाभि समाततं पूर्णमिवाम्वुना च ॥

यथा दृति : क्षुभ्यति कम्पते च शब्दायते चापि जलोदरं तत्‌ ॥२४॥

आता शेवटल्या बलोदराची कारणे व लक्षणे पुढे सांगितल्याप्रमाणे समजावी . स्नेहपान केलेल्या , वमन अथवा रेचक घेतलेल्या अथवा अनुवासन किंवा निरूह बस्ति सेविलेल्या अशा पुरुषाने थंड पाणी प्याले असता त्यांची उदकवाहिनी स्रोतसे होऊन अथवा त्या स्नेहाने लिप्त होऊन त्यामुळे जलोदर उत्पन्न होते ; हे वरून तुकतुकीत दिसते ; मोठे असून बेंबीजवळ फारच उंच होते ; आत चहुकडे तिडका लागतात , पोट पाण्याने अगदी भरलेसे व ( पाण्याने भरलेल्या ) पखालीप्रमाणे हालते , डचमळते व डबफ डबक वाजते .

सर्व प्रकारच्या उदरांविषयीं साध्यासाध्य विचार .

जन्मनैवोदरं सर्वं प्राय : कृच्छ्रतम विदु : ॥

बलिनस्तदजाताम्बु यत्नसाध्यं नवोत्थितम्‌ ॥२५॥

पक्षाद्वध्वगुदं तूर्ध्वं सर्वं जातोदकं तथा ॥

प्रायो भवत्यभावाय छिद्रान्न्नं चोदरं नृणाम्‌ ॥२६॥

शूनाक्षं कुटिलोपस्थमुपक्लिन्ननुत्वचम्‌ ॥

बलशोणितमांसाग्निपरिक्षीणं च वर्जयेत्‌ ॥२७॥

पार्श्वभंगान्नविद्वेषशोथातीसारपीडितम्‌ ॥

विरिक्तं चाप्युदरिणं पूर्यमाणं विवर्जयेत्‌ ॥२८॥

बहुतकरून सर्व प्रकारची उदरे जात्याच कष्टमय समजावी , तथापि त्या रोग्याची शक्ति चांगली असेल व त्यास मुकतेच उदर होऊन त्यात पाणी झाले नसेल तर त्यविषयी केलेला प्रयत्न सफळ होण्याची आशा घरावी . तसेच , बद्धगुदोदर - पंधरा दिवसांच्या आत उपाय न केल्यास - व क्षतोदर ही दोन्ही उदरे प्राय : साध्य होत नाहीत . आत पाणी झाले म्हणजे कोणतेही उदर असाध्य समजावे . या उदराचा जो रोगी डोळे सुजलेला , उपस्थ ( शिश्न किंवा योनि ) वाकडे पडलेला , पोटाची त्वचा लसयुक्त व पातळ झालेला आणि बळ , रक्त , मांस व जटराग्नि हे क्षीण झालेला असा असेल त्याची वैद्याने चिकिसा करू नये आणि तसाच जो बरगडया फुटलेला , अन्नाचा द्वेष उत्पन्न झालेला , सूज आलेला , अतिसाराने पीडलेला व रेचकाने रिकामे केलेले पोट पुन : भरत असलेला असा दिसेल त्याचीही त्याने आशा धरू नये .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-06-24T13:49:40.3670000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

रोजगार

  • m  Service for subsistence; an employment. 
RANDOM WORD

Did you know?

आषाढी एकादशीला "देवशयनी एकादशी" का म्हणतात?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.