संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
राजयक्ष्मानिदान

माधवनिदान - राजयक्ष्मानिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


राजयक्ष्म्याचीं कारणें व संप्राप्ति .

वेगरोधात्क्षथाच्चैव साहसाद्धिषमाशनात्‌ ॥

त्रिदोषो जायते यक्ष्मा गदो हेतु वतुष्टयात्‌ ॥१॥

कफग्रधानैर्दोषैस्तु रुद्धेषु रसवर्त्मसु ॥

अतिव्यवायिनो बापि क्षीणे रेतस्यनन्तरा : ॥२॥

क्षीयन्ते धातव : सर्वे तत : शुष्यति मानव : ॥

वेगावरोध , धातुक्षय , साहस व विषप्राशनाने त्रिदोषजन्य यक्ष्मारोग चारही कारणांनी होतो . कफपवान दोषांनी रसवाही स्त्रोतेसे रूद्ध १ होऊन , किंवा अतिस्त्रीसंगाने शुल क्षीण २ होऊन सर्व धातु क्षीण होतात व मनुष्य सुकतो .

राजयक्ष्म्याचें पूर्वोतप .

श्वासाङ्गसादकफसंस्नवतालुशोष -

वभ्यग्निसादमदपीनसकासनिद्रा : ॥

शोष भविष्यति भवन्ति स चापि जन्तु : ॥

शुक्लेक्षणो भवति मांसपरो रिरंसु : ॥३॥

स्वप्नेषु ककशुकशल्लकनीलकण्ठ -

गृध्रास्तथैव कपय कृकलासकाश्च ॥

तं वाहयन्ति स नदीर्विजलाश्च पश्ये -

च्छुष्कांस्तरून्पवनधूमदवार्दितांश्च ॥४॥

राजयक्ष्या होण्याचे पूर्वी धातुक्षय व्हावयाचा असला म्हणजे होणारी अडसे , खोकला , झोप , श्वास , धुंदी , अग्निमांद्य , ओकारी , हातपाय गळणे , कफस्त्राव , होणे व टाळूला कोरड पडणे ही जी लक्षणे ती रोग्याच्या ठायी सर्वं उत्पन्न होऊन शिवाय डोळ्यांवर पांढरेपणा येणे आणि ( केवळ रोगप्रभावाने मन , दुष्ट झाले असता ) मांस खाण्याची वा स्त्रीसंभोग करण्याची अत्यंत इच्छा उत्पन्न होणे हे प्रकार त्यांच्या ठायी द्दष्टीस पडतात . त्याचप्रमाणे या रोगाची पूर्वरूपदर्शक अशी त्यास स्वप्ने पडतात . ती - कधी रोगी आपणास कावळे , राधू , साळई , मोर , गिघाड , वानर व सरड हे ओढून किंवा पाठीवरून वाहुन नेत आहेत असे बघतो . कधी त्यास पाणी आटलेल्या नद्या व वठलेले आणि वणवा , वारा व धूर यांनी व्यापलेले असे वूक्ष दिसतात - याप्रमाणे समजावी .

राजयक्ष्म्याचीं आवश्यक लक्षणें .

असंपार्श्वाभितापश्च सन्ताप : करपादयो : ॥

ज्वर : सर्वाङगश्चैव लक्षणं राजयक्ष्मण : ॥५॥

खांदे व बरगडया यांचे ठायी संतप्तता , हात व पाय यांचे ठायी जळजळ व सर्वांगांत ज्वर ही तीन प्रकारची लक्षणे राजयक्ष्म्यांत अवश्य असली पाहिजेत .

राजयक्ष्म्याचीं अवांतर लक्षणें .

स्वरभदोऽनिलाच्छूलं संकोचश्चांसपार्श्वयो : ॥

ज्वरो दाहोऽतिसारश्च पित्ताद्रक्तस्य चागम : ॥६॥

शिरस : परिपूर्णत्वमभक्तच्छान्द एव च ॥

कास : कण्टस्य चोद्‌ध्वंसो विज्ञेय : कफकोपत : ॥७॥

एकादशभिरेतैंर्वा षडभिर्वापि समन्वितम्‌ ॥

कासातिसारपार्श्वार्तिस्वरभेदारूचिज्वरै : ॥८॥

त्रिभिवी पीडितं लिङ्गैज्वर्रकासासृगामयै : ॥

जह्याच्छोषार्दितं जन्तुमिच्छन्‌ सुविपुलं यश : ॥९॥

त्या ( आवश्यक लक्षणा ) शिवाय वायूच्या योगाने घसा बसणे , शुल , खांदे आणि छातीच्या बरगडयांच्या बाजू आकसणे ही लसणे होणे , तसेव पित्तपासून ज्वर , अंगाचा दाह , अतिसार व तोंडावाटे रक्तस्त्राव हे प्रकार होणे ; आणि कफामुळे अन्नद्वेष , खोकला , स्वरभेद ; व मस्तकाचे ठायी जडत्व या प्रकारच्या तिन्ही दोषांच्या प्रकोपामुळे होणारी अकरा लक्षणे राजयक्ष्मा झालेल्या रोग्याचे ठायी होत असतात . ही अकराहि लक्षणें ; अथवा यांपैकी खोकला , अतिसार , बरगडयांच्या वरच्या बाजूमध्ये वेदना , स्वरभेद , अन्नद्वेष व ज्वर , ही सहा लक्षणे किंवा ज्वर खोकला आणि रक्तास्राव ही तीन लक्षणे रोग्याच्या ठायी पीडा करीत असली व त्याच्या बलमांसाचा क्षय झाला असला तर त्यास बरे करण्यात यश य़ेणार नाहीं असे वैद्याने समजावे .

साध्यविचार .

सर्वैरर्धैस्त्रिभिर्वापि लिङ्गैर्वापि बलक्षये ॥

युक्तो वर्ज्यश्चिकित्स्पस्तु सर्वरूपोऽप्यतोऽन्यथा ॥१०॥

ज्वरानुबन्धरहितं बलवन्तं क्रियासहम्‌ ॥

उपक्रमेदात्मवन्तं दीप्ताग्निमकृशम्‌ नरम्‌ ॥११॥

वर सांगितलेल्या अकरा , सहा किंवा तीन प्रकारची लक्षणे होत असलेला व बलर मांम्राचा क्षय झालेला राजयक्ष्म्याचा रोगी साध्य होणे अशक्य आहे हे खरे : पण चा बलमांम्राचा क्षप झाला नसून इतर लक्षणे मात्र झाली असली तर तो रोगी चिकिस्सा करण्यास्म्र योग्य आहे , त्याचप्रमाणे ज्या राजय्क्ष्म्यात सारखा व फार दिवस राहणारणार नसून रोगी शक्ति कायम असलेला , कृश न झालेला , जठराग्नि प्रदीप्र असलेला व तम्राच पैप्य करणारा व औधशादि उपचार सहन करणारा असा असतो तोहि चिकित्सा करण्यास योग्य आहे ,

राजयक्ष्म्याचीं असाध्य लक्षणें .

महाशनं क्षीयमाणमतिसारनिपीडितम्‌ ॥

शूनमुष्कोदरं चैव यक्ष्मिणं परीवर्जयेत्‌ ॥१२॥

शुक्लाक्षमस्नद्वेष्टारमूर्ध्वश्वासनिपीडितम्‌ ॥

कृच्छ्रेण बहुमेहन्तं यक्ष्मा हन्तीह मानवम्‌ ॥१३॥

पुष्कळ खात असतांहि दिवसेंदिवस क्षीण होत जाणारा , अतिसारापासून पीडा पावणारा आणि त्याचप्रमाणे ज्याचा अंडकोष व उतद ही सुजलेली आहेत असा राजयक्ष्म्याचा रोगी वैद्याने असाध्य समजून सोडून द्यावा , आणखी याशिवाय पांढते ढोळे झालेला , ऊर्थ्य श्वासान पीद्धा पावलेला , कष्टाने पुष्कळ लधवी होत असलेला व अधाचा द्वेष करीत असलेला असा राजयक्ष्म्याचा रोगीहि नाश पावणारा असे जाणून सोडून द्यावा .

व्यवायशोकवार्धक्यव्यायामाध्वप्रशोषिण : ॥

व्रणोर : क्षसंज्ञौ च शोषिणो लक्षणं शृणु ॥१४॥

व्यवायशोषी , शोकशोषी , वार्धक्यशोषी , व्यायामशोषी , अध्यशोषी , व्रणशोषी आणि उर : क्षतशोषी असे जे राजयक्ष्म्याचे दुसरे सात प्रकार आहेत त्यांची लक्ष णे पुढे सांगितल्याप्रमाणे जाणावी .

व्यवायशोषीचीं लक्षणें .

व्यवायशोषी शुक्रस्य क्षयलिङ्गेरुपष्टत : ॥

पाण्डुदेहो यथापूर्वं क्षीयन्ते चास्य धातव : ॥१५॥

व्यवायशोधी ( अति स्त्रीसंगाने क्षीण झालेल्या ) रोग्याची लक्षणे , शुक्रश्लयाच्या लक्षणांनी तो पीडित होणे , त्याचे शरीर पांढरे फटफटीत होणे व शुश्वपासून पूर्वीचे घातु क्रमाने क्षीण होत जाणे , याप्रमाणे जाणावी .

शोकशोषी .

प्रध्यानशील : स्नस्ताङ्ग शोकशोष्यपि ताद्दश : ॥

शोकशोषी ( शोकाने क्षीण झालेला ) हा नेहमी काळजी वाहणारा , हाताय गळालेला आणी शोकामुळे क्षीण होणार्‍या धातूंच्या लक्षणांनी युक्त असलेला अम्रा असतो .

वार्धक्यशोषीचीं लक्षणें .

जराशोषी कृशो मन्दवीर्यबुद्धिबलेन्द्रिथ : ॥

कम्पनोऽरुचिमान्‌ भिन्नकांस्पपात्रहतस्वर : ॥१६॥

ष्ठीवति श्लेष्मणा हीनं गौरवारुचिपीडित : ॥

सस्प्रस्त्रुतास्यनासाक्ष : शुष्करुक्षमलच्छधि : ॥१७॥

वार्धक्यशोषी ( म्हातारपणामुळे धातु क्षीण झालेल्या ) रोग्याची लक्षणे - शरीर कृश होणे , वीर्य , शक्ति आणि इंद्रिये ही मंद होणे , अंग कांपणे , अजाला रुचि नसणे , फुटक्या काशाच्या भांडयासारखा स्वर होणे , कफावाचून थुंका पडणे , शरीरालर जडपणा येणे , तोंडास चव नसणे , तोंड , नाक व डोळे यांस गळ लागणे , मळ कोरडा व रूक्ष पडणे आणि शरीराचे तेज नष्ट होणे , याप्रमाणे असतात .

अध्वशोषीचीं लक्षणें .

अध्वप्रशोषीर्मुस्त्रस्ताङ्ग सम्भृष्टपरूषच्छवि : ॥

प्रसुप्तगात्रावयव : शुष्कक्लोमगलानन : ॥१८॥

अध्यप्रशोषी ( अति प्रवास करून धातु क्षीण झालेल्या ) रोग्यांची लक्षणे :--- हातपाय गळून जाणे , शरीराचा वर्ण भाजल्यासारस्त्रा रूक्ष होणे , सर्व गात्रांचे ठायी बधिरपणा येणे आणि क्लोम , गळा व तोंड यास कोरड पडणे अशा प्रकारची असतात .

व्यायामशोषींचीं लक्षणें .

व्यायामशोषी भूयिष्ठमेभिरेच समान्वित : ॥

लिङ्गैरूर : क्षयकृतै संयुक्तश्च क्षतं विना ॥१९॥

व्यायामशोषी ( पुष्कळ श्रम केल्यामूळे धातु क्षीण झालेल्या ) रोग्याच्या ठायी वर सांगितलेली अध्यप्रशोषी रोग्यांची लक्षणे त्यापेक्षा अधिक प्रबळ झालेली असून शिवाय क्षत पडल्यावाचून तो रोगी पुढें सांगितलेल्या उर : शत - शोष्याच्या लक्षणांनीहि युक्त असतो .

अणशोंषीची लक्षणें .

रक्तज्ञयाद्वेदनाभिस्तथैवाहारयन्त्रणात्‌ ॥

व्रणिनश्च भवेच्छोष : स चासाध्यतमो मत : ॥२०॥

व्रणशीषो ( व्रण पडून धातु क्षीण झालेला ) रोग्याच्या ठायी रक्तक्षय , व्रण वेदना व अन्न तुटणे ही लक्षणे उत्पन्न होतात ; तो वैद्याने अत्यंत असाध्य जाणून सोडून द्यावा .

उर : शतशोषीचीं लक्षणें .

उरोरुक शोणितछर्दि : कासो वैशेषिक : कफे ॥

क्षीणे सरक्तमूत्रत्वं पार्श्वपृष्ठकटिग्रह : ॥२१॥

अल्पलिङ्गस्थ दीप्ताग्ने : साध्यो बलवतो नव : ॥

परिसंवत्सरो याप्य : सर्वलिङ्गं विवर्जयेत्‌ ॥२२॥

उर : क्षतशोषी ( उरास क्षत पडून धातुक्षय झालेल्या ) रोग्यास छातीत वेदना , रक्ताची ओकारी , विशिष्ट ( पुढे सांगितलेल्या दृषित श्वासदि लक्षणांचा ) कास , तसेच , कफ क्षीण झाला असता , लघवीवाटे रक्त पडणे व पाठ , कंबर आणि बरगडया जखडल्यासारख्या होणे , याप्रमाणे लक्षणे होतात ; त्यांपैकी थोडी लक्षणे असलेला , हा रोग नशीनच झालेला , सशक्त व जठरान्गि प्रदीप्त असलेला असा रोगी असेल तर तो साध्य होतो ; ( अशीच थोडी लक्षणे असून ) रोग होऊन एक वर्ष लोटलेला असा असेल तर त्याचे ठिकाणी तो याप्य ( कधी साध्य व कधी असाध्य ) होऊन राहतो ; आणि वर सांगितलेल्या सर्व लक्षणांनी युक्त जर तो असला तर तो वै द्या स खचित असाध्य होतो .

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP