TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
कृमीनिदान

माधवनिदान - कृमीनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


कृमीनिदान

कृमींचे प्रकार .

कृमयस्तु द्विधा प्रोक्ता बाह्याभ्यन्तरभेदत : ।

बहिर्मलकफासृग्विट्‌ जन्मभेदाञ्चतुर्विंधा : ॥१॥

नामतो विंशतिविधा :

स्थानभेदे करूण्न बाह्यकृमि आणि आभ्यंतर कृमि असे कृमीचे प्रकार दोन व आश्रयभेद करून ( स्वदे वगैरे ) बहिर्मलजन्य कृमि , रक्तजन्य कृमि , कफजन्य कृमि आणि विष्ठाजन्य कृमि असे चार मिळून कृमींचे सहा प्रकार जाणावेत . त्यास निरनिराळी वीस नांवे ( वैद्यांनी ) दिली आहेत .

बाह्मकृमि कोणते ?

बाह्यास्तत्र मलोद्भाव : ॥

तिलप्रमाणसंस्थानवर्णा : केशाम्बराश्रया : ॥२॥

बहुपादाश्च सूक्ष्माश्च युकालिक्षादिनामत : ॥

द्विधा ते कोठपिटिका कण्डूगण्डान्‌ प्रकृर्वते ॥३॥

बाह्यकृमि नेहमी शरीरावरील मळापासून उत्पन्न होतात , त्याचे आकार , रंग ( काळा किंवा पांढरा ) आणि प्रमाण या तिन्ही गोष्टी मिळाप्रमाणे असतात . त्यांपैकी पुष्कळ पायांच्या कृमींना उवा म्हणतात व त्याहून बारीक असतात त्यांना लिखा म्हणतात . या दोन प्रकारच्या बाह्य कृमीमुळे रोग्याच्या अंगास कंड सुटते , व गांधी , पुळ्या व गाठी उत्पन्न होतात .

कृमि उत्पन्न होण्याचीं कारणें .

अजीर्णभीजी मधुराम्लनित्यो ।

द्रवप्रिय : पिष्ठगुडोपभोक्त ॥

व्यायामवर्जी च दिवाशयानो ।

विरुद्धभुक्‌ संलभते कृमीस्तु ॥४॥

अजीर्णावर भोजन केले असता , गोड , आंबट , पातळ पदार्थ आणि पीठ व गूळ यांच्या संयोगाचे केलेले पदार्थ ( घारगे , अनारसे वगैरे ) खाल्ले असतां व त्याचप्रमाणे संयोगाविरूद्ध ( दूध , मासे वगैरे ) पदार्थ सेवन केले असता , व्यायामाविषयी हयगय केली असता आणि दिवसा झोंप घेतली असता मनुष्याचे ठायी कुमि ( जंत ) होतात .

भिन्न प्रकारचे कृमि होण्याचीं भिन्न कारणें .

माषपिष्टान्नलवणगुडशाकै : पुरीषजा : ॥

मांसमाषगुडक्षीरदधिशुक्तै : कफोद्भजु : ॥५॥

विरूद्धाजीर्णशाकाद्यै : शोणितोत्था भवन्ति हि ॥

पिठाचे ( लाडू वगैरे ) व उडदाचे पदार्थ , तसेच मीठ व गूळ फार घालून केलेले पदार्थ आणि पालेभाज्या यांच्या सेवनाने विष्ठेच्या ठायी कृमींची उत्पति होते , मांस , उडीद , शिरका , व दूध , दही आणि गूळ हे पदार्थ खाल्लयामुळे कफजन्य कृमि उत्पन्न होतात ; आणि त्याचप्रमाणे संयोगविरुद्ध व अपक्व पदार्थांचे सेवन रकजन्य कृमि उत्पन्न होण्यास कारण होते .

पोटांतील कृमींची लक्षणें .

ज्वरो विवर्णता शूलं ह्रद्रोगच्छर्दनं भ्रम : ॥

भक्तद्वेषोऽतिसारश्च संजातकृमिलक्षणम्‌ ॥६॥

पोटांत कृमि झाले असता ज्वर येणे , शरीराचा वर्ण बदलणे , शूळ व छातीत कळ उठणे , ओकारी व चक्कर येणे , अन्न नकोसे होणे , आणि अतिसार उत्पन्न होणे ही लक्षणे होतात .

कफजन्य कृमींचीं नांवें व लक्षणें .

कफादामाशये जाता वृद्धा : सर्पन्ति सर्वत : ॥

पृथुबध्ननिभा : केचित्‌ केचिद्नण्डूपदोपमा : ॥७॥

रूढधान्याङकुरास्तनुदीर्घास्तथाणव : ॥

श्वेतास्ताम्रावभासाश्च नामत : सप्तधातुते ॥८॥

अन्त्रादा उदरावेष्टा ह्रदयादा महारुज : ॥

चुरवो दर्भकुसुमा : सुगन्धास्ते च कुर्वते ॥९॥

हल्लासमास्यस्नवणमविपाक मरोचकम्‌ ॥

मूर्च्छाच्छर्दिज्वरानाहकार्श्यक्षवथुपीनसान्‌ ॥१०॥

कफामुळे जे कृमि आमाशयांत उत्पन्न होऊन चोहोंकडे शरीरांत पसरतात . त्यांची नावे सात प्रकारची आहेत , ती अंत्राद , उदरावेष्ट , ह्रदयाद , महारुज , दर्भकुसुम चुरु आणि सुगंध , या सर्व प्रकारच्या कृमींपैकी कांही चामढयाच्या वादीसारखे ( रुंद ) काही गांहुळासारखे , काही धान्याच्या मोडासारखे तसेच काही लांब काही आखुड व काही बारीक असून त्यांचे रंग काहींचा पांढरा व काहींचा तांबडा असे असतात . हे उत्पन्न झाल्यामुळे उम्हासे येणे , तोंडाला पाणी सुटणे , अन्नपचन न होणे , अरुचि व त्याचप्रमाणे मूर्च्छा , ओकारी , ज्वर , पोट फुगणे , कृशता , पडसे आणि शिंका ही लक्षणे रोग्याच्या ठिकाणी उत्पन्न होतात .

रक्तजन्य कृमींचीं लक्षणें .

रक्तवाहिशिरास्थाना रक्तजा जन्तवोऽणव : ॥

अपादावृत्तताम्राश्च सौक्ष्म्यात्केचिददर्शना : ॥११॥

केशादा रोमविध्वंसा रोमद्वीपा उदुम्बरा : ॥

षठ्‌ ते कुष्ठैककर्माण : सहसौरसमातर : ॥१२॥

रक्तवाहिन्यांमधील रक्त दूषित होऊन जे कृमि निर्णाण होतात ते अणुस्वरूप , पाय नसलेले , वाटोळे , तांबडया रंगाचे आणि इतके बारीक की , त्यापैकी काही नुसत्या डोळ्यास दिसत देखील नाहीत असे असतात . त्यांची नावे सहा प्रकारची आहेत ती - केशाद , रोमविध्वंस , रोमद्वीप , उदुंबर , सौरस आणि मातर याप्रमाणे जाणावी . हे रक्तजन्य कृमि मनुष्याचे ठायी निरनिराळे कुष्ठ रोगच उत्पन्न करतात .

विष्ठेपासून होणार्‍या कृमींचीं लक्षणें .

पक्वाशये पुराषोत्था जायन्तेऽधोविसर्पिण : ॥

प्रवृद्धा : स्युर्भवेयुश्च ते यदाऽऽमाशयोन्मुखा : ॥१३॥

तदास्योद्नारनिश्वास विङगन्धानुविधायिन : ॥

पृथुवृत्ततनुस्थूला : श्यावपीतासितासिता : ॥१४॥

ते पञ्चनाम्ना कृमय : ककेरूकमकेरूका : ॥

सौसुरादा मलूनाश्च लेलिहा जनयन्ति च ॥१५॥

विदभेदशूलविष्टम्भकार्ष्यपारुष्यपाण्हुता : ॥

रोमहषीग्निसदनगुदकण्डूर्विनिर्गमात्‌ ॥१६॥

विष्ठेपासून पक्वाशयांत उत्पन्न झालेले कृमि गुदद्वारावाटे बाहेर पडतात , पण जेव्हा ते फार वाढतात तेव्हा आमाशयाकडेहि वर येतात . ते तसे आले म्हणजे रोग्याच्या श्वासाला व ढेकराला विष्ठेची घाण मारते . या कृमीपैकी कांही जाड , काही लठ्ठ , काही वाटोळे आणि काही बारीक असून त्यांचा सावळा , काळा , पांढरा व पिवळा असा निरनिराळ्या प्रकारचा रंग असतो . या कृमींपासून रोग्याचे ठायी शूळ उत्पन्न होणे , अंग खरखरीत व कृश होणे , पोट फुगणे , अंगावर पांडुरवर्ण व काटा येणे , मळ पातळ होणे आणि अग्निमांद्य हे उपद्रव जडतात , यांस पांच प्रकारची नावे दिलेली आहेत ती ककेरूक , मकेरुक , सौसुराद , मलून आणि लेलिट ही होत . हे पांचहि प्रकारचे कृमि गुदद्वारावाटे जेव्हां बाहेर येऊं लागतात तेव्हां त्याठिकाणी कंडू उत्पन होते .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-06-24T13:49:32.9830000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

राब बरडळणें

 • भाजलेली जमीन नांगरुन दांताळयानें ढेकळें फोडून सारखी करणें. 
RANDOM WORD

Did you know?

’ श्रीदुर्गासप्तशती’ ग्रंथातील कांही मंत्र जीवनातील संकटे दूर करतात काय? असे कोणते मंत्र आहेत?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.