संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
वातरोगनिदान

माधवनिदान - वातरोगनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


वातरोगाचीं कारणें .

रूक्षशीताल्पलध्वन्नव्यवायातिप्रजागरै : ॥

विषमादुपचारच्च दोषासृक्‌स्रावणादपि ॥१॥

लङ्गघनप्लवनात्यध्वव्यायामातिविचेष्टनै : ॥

धातूनां संक्षयाच्चिन्ताशोकरोगातिकर्षणात्‌ ॥२॥

वेगसन्धारणादाभादभिघातादभोजनात्‌ ॥

मर्माबाधाद्नजोष्ट्राश्वशीघ्रयानादिसेवनात्‌ ॥३॥

देहे स्नोतांसि रिक्तानि पूरयित्वाऽनिलो बली ॥

करोति विविधान्‌ व्याधीन्‌ सर्वाङ्गैकाङ्गसंश्रयान्‌ ॥४॥

रूक्ष , हलके , थंड अथवा भुकेपेक्षा थोडया प्रमाणाचे अन्नसेवन , अति स्त्रीसंग , अत्यंत जागरण , वमनादिद्वारां दोषांचा स्राव . रक्तस्राव , उपवास , मलमूत्रादिकांच्या वेगाचा अवरोध , आमविकार , रसादिधातूंचा क्षय , आम , काष्ठादिकांचा प्रहार , अन्नत्याग , मर्मस्थानी जखम , काळजी शोक व रोग यांनी शरीरास आलेला कृशपणा , अति मार्गक्रमण व अतिशय परिश्रम इत्यादि कारणामुळे व तसेच लांब उडी मारणे , नदीत पोहणे व हत्ती , घोडा , उंट , वगैरे जलद चालणार्‍या वाहनांवर आरोहण करणे या गोष्टी केल्यामुळे अथवा वमनविरेचनादि विषम उपचार केल्याने शरीरातील कफ , पित्त , मलमूत्र इत्यादि दोष वाढल्यामुळे शरीरात प्रकोप पावलेला वायु बलवान्‌ होऊन रिकाम्या स्रोतसात भरून रोग्याचे सर्वांग अथवा एखादे अंग व्यापून टाकणारे असे अनेक प्रकारचे रोग उत्पन्न करितो .

वातरोगाचें पूर्वरूप .

अव्यक्तं लक्षणं तेषां पूर्वरूपमिति स्मृतम्‌ ॥

आत्मरूपं तु तद्वयक्तमपायो लघुता पुन : ॥५॥

अनेक प्रकारच्या सांगितलेल्या वातव्याधीचे जे अस्पष्ट लक्षण , तेच त्याचे पूर्वरूप वाणावे . ज्वरादिकांप्रमाणे ते अमुकच असे ठरीव नाही . तसेच दोषाच्या कमीजास्तपणामुळे जे त्याचे रूप द्दष्टीस पडते तेच लक्षण होय . कधी कधी ( धनुर्वातासारख्या ) वातव्याधींची लक्षणे एकदाम बंद होतातशी दिसतात . तरी ती समूळ नाहीशी न होता रोग्याच्या ठायी अत्यंत सूक्ष्मरूपाने असतात असे समजावे .

वातरोगाचे पकार ,

सङकोच : पर्वणां स्तम्भो भङ्गोऽस्थां पर्वणामपि ॥

लोमहर्ष : प्रलापश्च पाणिपृष्ठशिरोग्रह : ॥६॥

खाञ्ज्यापाङगुल्यकुब्जत्वं शोथोऽङगानामनिद्रता ॥

गर्भशुक्ररजोनाश : स्पन्दनं गात्रसुप्तता ॥७॥

शिरोनासाक्षिजवूणां ग्रीवायाश्चापि डुण्डनम्‌ ॥

भेदस्तोदोर्तिराक्षेपो मोहश्चायास एव च ॥८॥

एवंविधानि रूपाणि करोति कुपितोऽनिल : ॥

हेतुस्थानविशेषाच्च भवेद्रोगविशेषकृत्‌ ॥९॥

वातदोषाच्या प्रकोपामुळे रोग्याच्या ठायी जे अनेक रोग उत्पन्न होतात . ते पुढे लिहिल्याप्रमाणे --- सांध्यांचा सं कोच अथवा ताठपणा ; हाडे व सांधे यांचे ठायी फुटल्यासारख्या वेदना ; हात , पाठ व डोके ही जखडणे , आंचके येणे , डोके , नाक , डोळे , छातीचे मधले हाड व मान ही आत जाणे किंवा वाकडी होणे ; अंगावर काटा येणे अथवा मेहेरी उत्पन्न होणे , शुक्र व स्त्रीचें रज यांचा नाश होणे व गर्भधारणा न होणे , अंग कापणे , ताणणे अथवा सुजणे , झोप ना ही शी होणे , सर्वांगास फूट व टोचणी लावणे आणि त्याचप्रमाणे लंग डे पणा , पांगळेपणा , कुबडेपणा , कळ , मूर्च्छा व असंबद्ध भाषण इत्यादि अनेक विकार वायु उत्पन्न करितो , व त्यातहि हेतु व स्थान याच्या भेदाला अनुसरून विशिष्ट रोग उत्पन्न करतो . ( जसे - जेव्हा वायू कफाने व्याप्त असतो तेव्हा तो रोग्याची मान ताठ करितो , पण पक्वाशयात असतो . तेव्हा आंतडया कळ उत्पन्न करितो .)

कोष्ठाश्रित वायु .

तत्र कोष्ठाश्रिते दुष्टे निग्रहो मूत्रवर्चसो : ॥

वर्ध्महद्रोगगुल्मार्श पार्श्वशूलं च मारुते ॥१०॥

दुष्ट झालेल्या वायूने रोग्याच्या कोठयाचा आश्रय केला आसतां मलमूत्रावरोध , अंतर्गळ , ह्रद्रोग , गुल्म , मूळव्याध व बरगडयामध्ये शूल , हे रोग त्याच्या ठायी उत्पन्न होतात .

सर्वांगकुपित वायु .

सर्वांङ्गकुपिते वाते गात्रत्फुरणजृम्भणम्‌ ॥

वेदनाभि : परीतस्य स्फुटन्तीवास्य सन्धय : ॥११॥

दुष्ट झालेला वायु जेव्हा रोग्याच्या सर्वांगाभर फिरतो तेव्हां अंग फुरफुरणे , जांभया येणे व सांध्याच्या ठायी वेदना लागून ते फुटतातच की काय असे वाटणे , हे प्रकार त्याच्या ठायीं द्दष्टीस पडतात .

गुदस्थित वायु ,

ग्रहो विण्मूत्रवातानां शूलाध्मानाश्मशर्करा : ॥

जङघोरुत्रिकह्रत्पृष्ठरोगशोफौ गुदे स्थिते ॥१२॥

गुदद्वाराचे ठिकाणी असलेला वायु प्रकोप पावला असतां मळ , मूत्र व अपान वायु यांचा रोध होणे , पोट फुगणे व शूळ , मूत्राबरोबर शर्करा ( खडे ) पडणे , तसेच मुतखडा , शूल व सूज ही लक्षणे रोग्याचे ठायी उत्पन्न होतात व त्याच्या मांडया माकडहाड , ह्रदय आणि पाठ यांमध्ये वेदना होतात .

आमाशयस्थित वायु .

रुक्पार्श्वोदरह्रन्नाभेरतृष्णोद्नारविषूचिका : ॥

कास : कण्ठास्पशोषश्च श्वासश्चामाशये स्थिते ॥१३॥

आमाशयांतील वायु कुपित झाला असता रोग्याची नाभि , उदर , ह्रदय आणि पार्श्चभाग यांत वेदना होतात व तहान , ढेकर , श्वास , खोकला व त से च घसा व तोंड यांस कोरड ही लक्षणे त्याच्या ठा यी द्दष्टीस पडतात व त्याच्या सर्वांगांत सुया टोंचल्यासारखी पीडा होते .

पक्काशयस्थ वायु .

पक्काशयस्थोऽन्त्रकूजं शूलाटेपौ करोति च ॥

कृच्छ्रमूत्रपुरीषत्वमानाहं त्रिकवेदनाम्‌ ॥१४॥

पक्वाशयांतील वायूच्या कोपामुळे रोग्यास मळमूत्र कष्टाने हो णे , पोट फुगणे , माकडहाडांत दुखणे , आंतडयांत गुरगुरणे व शूल ही लक्षणे उत्पन्न होतात .

इंद्रियस्थित वायु

श्रोत्रादिष्विन्द्रियवधं कुर्यात्‌ कृद्ध : समीरण : ॥

कान वगैरे इंद्रियांच्या ठायी प्रकोप पावलेला वायु त्या इंद्रियांचा नाश करितो .

त्वग्गत वायु .

त्वग्रूक्षा स्फुटिता सुप्ता कृशा कृष्णा च तुद्यते ॥

आतन्यते सरागा च मर्मरुक्‌ त्वग्गतेऽनिले ॥१५॥

त्व चेच्या ठिकाणी वायु प्रकोप पावला असतां ( त्याच्या योगाने त्वचेत असलेल्या रसादि धातूंदे शोषण होऊन ) त्वचा रूक्ष , बधिर , खरखरी , काळी व किंचित्‌ लाल अशी होते ; आणि तशीच ती फुटते , ताणली जाते व तिच्या ठायी टोचल्याप्रमाणे पीडा होते . शिवाय रोग्याच्या हृदय वगैरे मर्मस्थानाचे ठिकाणीहि वेदना होते .

रक्तगत वायु .

रुजस्तीव्रा : ससन्तापा वैवर्ण्यं कृशताऽरुचि : ॥

गात्रे चारूंषि भुक्तस्थ स्तम्भश्चासृग्गतेऽनिले ॥१६॥

रक्ताचे ठायी वायु प्रकोप पावला असतां संतापयुक्त तीव्र वेदना , अंग कृश - होणे , त्यावर पुटकुळ्या येणे व त्याचा रंग पालटणे , आणि तोंड बेचव होणे खाल्लेले अन्न मार्गांत अडणे ही लक्षणे रोग्याच्या ठायी उत्पन्न होतात .

मांसमेदोगत वायु .

गुर्वङ्गं तुद्यते स्तब्धं दण्डमुष्टिहतं यथा ॥

सरुक्‌ स्तिमितमत्यर्थं भांसमेदोगतेऽनिले ॥१७॥

मांस व मेद यांचे ठायी वायूचा प्रकोप झाला असता रोग्याचे अंग टोचल्यासारखे किंवा काठीने अथवा वुक्कीने मारल्यासारखे दुखते , आणि जड , ताठ व मंद ( आळस आल्यासारखे ) होते .

मज्जास्थिगत वायु .

भेदोऽस्थिपर्वणां सन्धिशूलं मांसबलक्षय : ॥

अस्वप्नं सन्तता रूक्‌ च मज्जास्थिकुपितेऽनिले ॥१८॥

मज्जा व अस्थि यांच्या ठायी वायूचा कोप झाला असता रोग्याच्या हाडांची पेरी फुटणे , सांधे दुखणे , झोप न येणे , मास व बळ यांचा क्षय होणे व सतत अंग ठणकणे ही लक्षणे उत्पन्न होतात .

शुक्रगत वायु .

शुक्रं मुञ्चति वध्नाति शुक्रं गर्भमथापि वा ॥

विकृतं जनयेच्चापि शुक्रस्थ : कुपितोऽनिल : ॥१९॥

शुक्रस्थानीं प्रकोप पावलेला वायु शुक्र अथवा गर्म यांस लवकर सोडतो अथवा त्याचा अवरोध करितो आणि त्यापैकी कोणाला तरी विकार करितो .

शिरागत वायु .

कुर्याच्छिरागत : शूलं शिराकुञ्चनपूरणम्‌ ॥

सबाह्याभ्यन्तरायामं खल्लीं कूब्जत्वमेव च ॥२०॥

रोग्याच्या शिरांच्या ठायी असलेला वायु कुपित झाला असता तो त्यांचा संकोच व विकास करितो ; अंग आतून व बाहेरुन वाकवितो आणि खल्ली व कुबडेपणा हे रोग उत्पन्न करितो .

स्नायुसंधिगत वायु .

सर्वाङ्गैकाङगरोगांश्च कुर्यात्स्नायुगतोऽनिल : ॥

हन्ति सन्धिगत : सन्धीन्‌ शूलशोथौ करोति च ॥२१॥

स्नायूंच्या ठिकाणचा प्रकोप पावलेला वायू रोग्याचे ठिकाणी सर्वांग व एकांग रोग आणि संधीच्या ठिकाणी प्रकोप पावलेला वायू त्याचे सांधे निखळविणे किंवा ताठविणे आणि शूल व सूज याप्रमाणे रोग उत्पन्न करितो .

प्राणवायु .

प्राणे पित्तावृते छर्दिर्दाहश्वैवोपजायते ॥

दौर्बल्यं सदनं तन्द्रा वैरस्यं च कफावृते ॥२२॥

प्राणवायु पित्ताने आवृत झाला असता दुर्बलपणा , ग्लनि , तंश व अरुचि या प्रकारचे विकार उत्पन्न करितो .

अपानवायु .

अपाने पित्तयुक्ते तु दाहौप्ण्यं रक्तमूत्रता ॥

अध : काये गुरूत्व च शीतता च कफावृते ॥२३॥

अमानवायु पित्तमिश्रित झाला असता दाह , उष्णता व मूत्राचे ठायी तां ब डेपणा आणि कफमिश्रित झाला असता कमरेखालील अंगास जडपणा आणि थंडी हे विकार होतात .

व्यानवायु ,

व्याने पित्तावृत्ते दाहो गात्रविक्षेपणं क्लम : ॥

स्तम्भनं दण्डकश्चापि शोथशूलौ कफावृते ॥२४॥

जेव्हां व्यानवायु पित्तमिश्रित असतो तेव्हा रोग्यास ग्लानि येते , त्यार्च्या अंगाचा दाह होतो व तो हातपाय पाखडतो , तसेच जेव्हा तो कफमिश्रित असतो ते व्हां त्याचे अंग काठीप्रमाणे ताठते व त्याच्या ठा यी सूज व शूल उत्पन्न होतात .

उदानवायु .

उदाने पित्तयुक्ते तु दाहो मूर्च्छा भ्रम : क्लम : ॥

अस्वेदहषौं मन्दाग्नि : शीतता च कफावृते ॥२५॥

उदानवायु पित्तमिश्रित झालेला असतो तेव्हा रोग्याच्या ठायी दाह , मूर्च्छा भ्रम आणि आयासावाचून थकवा व कफमिश्रित झालेला असतों तेव्हा घाम न येणे , अंगावर काटा , अग्निमांद्य आणि थंडी वाजणे अशा प्रकारचे विकार उत्पन्न करतो .

समानवायु .

स्वेददाहौष्ण्यमूर्च्छा : स्यु : समाने पित्तसंयुते ॥

कक्तेन सङ्गो विण्मूत्रे गात्रहर्षश्च जायते ॥२६॥

पित्तमिश्रित झालेल्या समान वायूने त्याच्या ठायी मलमूत्रांचा अवरोध व अंगावर काटा अशा प्रकारचे विकार उत्पन्न होतात .

आक्षेपक रोगाचीं लक्षणें .

यदा तु धमनी : सर्वा : कूपितोऽभ्येति मारूत : ॥

तदा क्षिपत्याशु मुहुर्मुहुर्देहं मुहुश्चर : ॥२७॥

मुहुर्मुहुस्तदाक्षेपादाक्षेपक इति स्मृत : ॥

ज्यांत रोग्याचे अंगास वारंवार आचके येतात व त्यास आक्षेपकरोग म्हणतात . तो कुपित झालेला वायु सर्व धमन्याप्रत प्राप्त होऊन व त्यामध्ये वारंवार संचार करून सर्वांगाचे ठायी वारंवार आंचके उत्पन्न करितो त्यामुळे होतो .

अपतंत्रक अथवा अपतानक

कृद्ध : स्वै : कोपनैर्वायु : स्थानदूर्ध्वं प्रवर्तते ॥

पीडयन्‌ ह्रदयं गत्वा शिर : शङखौ च पीडयेत्‌ ॥२८॥

धनुर्वन्नामयेद्नात्राण्याक्षिपेन्मोहयेत्तथा ॥

स कृच्छ्रादुच्छवसेच्चापि स्तब्धाक्षोऽथ निमीलक : ॥२९॥

कपोत इव कूजेच्च नि : संज्ञ : सोऽपतन्त्रक : ॥

द्दष्टिं संस्तभ्य संज्ञां च हत्वा कण्ठेत कूजति ॥३०॥

ह्रदि मुक्ते नर : स्वास्थ्यं याति मोहं वृते पुन : ॥

वायुना दारुणं प्राहुरेके तमपतानकम्‌ ॥३१॥

रुक्षान्नादि पदार्थांचे सेवन करणार्‍या रोग्याचा कुपित झालेला वायु आपले स्थान सोडून वर येतो व वातप्रकोपक विकार त्याच्या ह्रदयात जाऊन पीडा उत्पन्न करितो . या रोग्यास अपतंत्रक अथवा कोणी अपतानक असे म्हणतात . त्याची लक्षणे पुढे लिहिल्याप्रमाणे जाणावी :--- रोग्याची गात्रे धनुष्याप्रमाणे वाकतात , व त्यांना झटके बसतात . त्यास मूर्च्छा येते व तो मोठया कष्टाने श्वास टाकितो व पारव्या सा रखा घुमतो . डोळे ताठतात व झांकतात , मस्तक व कानशील यांच्या ठायी वेदना होतात , गळ्यात घुरघुर श ब्द होतो व त्याची बुद्धि नष्ट होऊन तो वेशुद्ध पडतो . या रोगा रोग्याचे ह्रदय वायु सोडतो तेव्हा हे विकार बंद पडतात ; पण पुन : जेव्हा तो पछाडतो तेव्हा हे विकार बंद पडतात ; पण पुन : जेव्हा तो बेशु द्ध पडतो . ( व सर्व विकार पुन : उत्पन्न होतात .)

दंडापतानक .

कफान्वितो भृशं वायुस्तास्वेव यदि तिष्ठति ॥

स दण्डवत्‌ स्तम्भयति कृच्छ्रो दण्डापतानक : ॥३२॥

जेव्हां वायु कफमिश्रित होऊन रोग्याच्या सर्व धमन्यांच्या ठायी प्राप्त होतो तेव्हां त्याचे शरीर दंडासारखे ताठते . या रोगास दंडापतानक म्हणतात हा कष्ट सा ध्य आहे .

धनुस्तंभ ,

धनुस्तुल्यं नमेद्यस्तु स धनुस्तम्भसंज्ञित : ॥

वायुमुळे रोग्याचे शरीर धनुष्यासारखे वाकले असता त्यास धनुस्तंभ म्हणतात . ( याचे अंतरायाण आणि बहि रा याम असे दोन प्रकार आहेत .)

अंतरायाम लक्षणें .

अङगुलीगुल्फजठरहद्वक्षोगलसंश्रित : ॥३३॥

स्नायुप्रतानमनिलो यदा क्षिपति वेगवान्‌ ॥

विष्टब्धाक्ष : स्तब्धहनुर्भग्नपार्श्व : कफं वमन्‌ ॥३४॥

अभ्यन्तरं धनुरिव यदा नमति मानव : ॥

तदासोऽभ्यन्तरायामं कुरुते मारुतो वली ॥३५॥

जेव्हा रोगी पोटाकडून धनुष्याप्रमाणे वाकला जातो तेव्हा त्यास अंतरायाम म्हणतात . या रोगात त्याची बोटे , घोटे , पोट , ह्रदय , वक्ष : स्थल व गळा या ठिकणी असलेला वायु प्रकोप पावून त्याच्या सर्व स्नायूचे आकर्षण करितो आणि त्यामुळे डोळे ताठणे , हनुवटी जखडणे , पार्श्वभाग मोडल्यासारखे होणे व तोंडावाटे कफ पडणे ही लक्षणे द्दष्टीस पडतात .

बाह्यायाम लक्षणें .

बाह्यन्नायुप्रतानस्थो बाह्यायामं करोति च ॥

तमसध्यां बुधा : प्राहुर्वक्ष : कटथरुमञ्जनम्‌ ॥३६॥

जेव्हा रोगी पाठीकडून धनुष्याप्रमाणे वांकला जातो तेव्हा त्यास बाह्यायाम म्हणतात . यात शाखागत ( हातापायातील ) स्नायूच्या जालात राहिलेला वायु प्रकोप पावून वक्ष : स्थल , कंबर व मांडया ह्यांस मोडून टाकतो .

आक्षेपकाचे चार प्रकार ,

कफषित्तान्वितो वायुर्वायुरेव च केवल : ॥

कुर्यादाक्षेपकं त्वन्यं चतुर्थमभिघातजम्‌ ॥३७॥

आक्षेपकाने चार प्रकार आहेत ते :--- कफमिश्रित वायूमुळे होणारा एक ; पित्त मिश्रित वायुमुळे होणारा दुसरा ; केवळ वायुमुळे होणारा तिसरा व अभिघातामुळे प्रकोप पावलेल्या वायुपासून होणारा चवथा या क्रमाने जाणावे .

असाध्य आक्षेपक .

गर्भपातनिमित्तश्च शोणितातिस्नवाश्च य : ॥

अभिघातनिमित्तश्च न सिद्धयत्यपतानक : ॥३८॥

गर्भपातामुळे , अत्यंत रक्तस्रावामुळे अथवा ज खम झाल्यामुळे जो अपतानक ( आक्षेपक ) होतो तो असाध्य असतो .

पक्षघाताचीं लक्षणें .

गृहीत्वाऽर्धं तनोर्वायु : शिरास्नायुर्विशोष्य च ॥

पक्षमन्यतरं हन्ति सन्धिबन्धान्विमोक्षयन्‌ ॥३९॥

कृत्स्नोऽर्द्धकायस्तस्य स्यादकर्मण्यो विचेतन : ॥

एकाङ्गरोगं तं केचिदन्ये पक्षवधं विदु : ॥४०॥

ज्या वेळी प्रकोप पावलेला वायु रोग्याच्या शरीराच्या अर्ध्या भागातील सर्व शिरा व स्नायु यांस शोषून टाकितो व सांध्याची बंधने ढिली करितो त्या वेळी त्यास पक्षधात अथवा कोणी एकांगरोग झाला असे म्हणतात . या रोगात त्याचे अधें शरीर अगदी अकिय ( हालता चालता न येण्यासारखे ) होते , व त्यास स्पर्शादि ज्ञान होत नाही .

सर्वांगघात .

सर्वाङ्गरोगं तं केचित्सर्वकायाश्रितेऽनिले ॥

वर पक्षघाताची जी लक्षणे सांगितली ती रोग्याच्या सर्व शरीराच्या ठायी वायूच्या प्रकोपामुळे द्दष्टीस पडली असता त्यास कोणी सर्वांगघात असेही म्हणतात .

पक्षघाताविषयीं साध्यासाध्य विचार .

दाहसन्तापमूर्च्छा : स्युर्वायौ पित्तसमन्विते ॥

शैत्यशोथगुरुत्वानि तस्मिन्नेव कफान्विते ॥४१॥

शुद्धवातहतं पक्षं कृच्छ्रसाध्यतम विदु : ॥

साध्यमन्येन संसृष्टमसाध्यं क्षयहेतुकम्‌ ॥४२॥

पक्षाघातं परिहरेद्वेदनारहितो यदि ॥४३॥

वायु हा पित्त दोषाने युक्त असला म्हणजे पक्षवातात रोग्याच्या ठायी दाह , संताप व मूर्च्छा ही लक्षणे द्दष्टिस पडतात व नुसता कफयुक्त असला त र शैत्य , सूज व जडत्व हे प्रकार उत्पन्न होतात ; तेव्हा नुसत्या वायूच्याच प्रकोपाने होणारा पक्षघात हा कष्टसाध्य व तो इतर म्हणजे पित्त वा कफ दोषांनी युक्त असता साध्य असे समजावे . गर्भिणी व बा ळं तीण अशी स्त्री व बाल , वृद्ध अथवा अशक्त असा पुरुष यांस झालेला क्षय व रक्तस्राव यांपासून उद्भवला असून वेदनारहित असलेला अशा प्रकारचा जो पक्षपात तो असाध्य समजून त्याची चि कि त्सा करू नये .

अर्दितरोग अथवा मुख पक्षघात

उच्चैर्व्याहरैर्ताऽत्यर्थं खादत : कठिनानि च ॥

हसतो जृम्भमाणस्य विषमाच्छयनासनात्‌ ॥४४॥

शिरोनासौष्ठचुबुकललाटेक्षणसन्धिग : ॥

अर्दयत्यनिलो वक्त्रमर्दिनं जनयत्यत : ॥४५॥

वक्रीभवति वक्त्रार्धं ग्रीवा चास्यापवर्तते ॥

शिरश्चलति वाक्स्तम्भो नेत्रादीनां च वैकृतम्‌ ॥४६॥

ग्रीवाचुबुकदन्तानां तस्मिन्पार्श्वे च वेदना ॥

तमर्दितमिति प्राहुर्व्याधिं व्याधविशारदा : ॥४७॥

उंच स्वराने पठण व हास्य वा जांभई केल्यामुळे , उंचसखल जागेवर निजल्यामुळे अथवा कठिण पदार्थांचे सेवन अथवा विष प्रा शन केल्यामुळे प्रकोप पावलेला वायु रोग्याचे डोके , नाक , ललाट , ओठ , हनुवटी व डोळे यांच्या संधीमध्ये मुखाचा अर्धा भाग लटका पाडतो . अशा प्रकारच्या रोग्यास वैद्य आर्दित रोग म्हणतात . याची लक्षणे - रोग्याचे अधें तोंड व मान , हनुवटी व दात वाकडे होतात , डोके कापते , वाचा बंद होते , डोळे , भुवया व गळा यांचे ठायी ( वांकडेपणा , स्फुरण , वगैरे ) विकार उत्पन्न होतो : व त्याच्या मुखाकडची जी बाजू लटकी पडते त्या बाजूकडची मान , ओठ व दात यांत वेदना होतात .

असाध्य अर्दितरोग .

क्षीणस्पाऽनिमिषाक्षस्प प्रसक्ताव्यक्तभाषिण : ॥

न सिध्यत्यर्दितं गाढं त्रिवर्षं वेषनस्प च ॥४८॥

वर सांगितलेला अर्दितरोग झालेला मनुष्य क्षीण झालेला , अंग कापत असलेला , डोळयांची उघडझाप करण्याची शक्ति नसलेला व अडखळत व अस्पष्ट बोलणारा असा असून जर त्याचा रोग तीन वर्षांचा जुना झालेला असेल तर तो वैद्यास साध्य होत नाही .

गते वेगे भवेत्स्वास्थ्यं सर्वेष्वाक्षेपकादिषु ॥

एखाद्याच्या डोक्यावरचा भार उतरला असता त्यास जसा स्वस्थपणा वाटतो तसा आक्षेपकादि सर्व वातरोगांत दोषांचा वेग शांत झाल्यावर रोग्यास स्वस्थपणा वाटतो .

हनुग्रहाचीं लक्षणें .

जिव्हानिलखेंनाच्छुष्कभक्षणादभिघातत : ॥४९॥

कुपितो हनुमूलस्थ : स्रंसयित्वाऽनिलो हनुम्‌ ॥

करोति विवृतास्पत्वमथवा संवृतास्यताम्‌ ॥५०॥

हनुग्रह : स तेन स्यात्कृच्छ्राच्चर्वणभाषणम्‌ ॥

ज्यास हनुग्रह रोग झालेला असतो म्हणजे हनुवटीच्या मूल ठिकाणचा वायु प्रकोप पा वू न तो हनुवटी व तोंड यांचे सांधे ढि ले करून तोंड वासवतो अथवा मिटवितो त्यास चावण्यास व बोलण्यास आयास पडतात , हा रोग अघात झाल्यामुळे , कोरडे अन्न खा ल्ल्या मुळे अथवा जीभ खरवडल्यामुळे उत्पन्न होतो .

मन्यारत्तंभाचीं लक्षणें .

दिवास्वप्नासनस्थानविकृतोर्ध्वनिरीक्षणै : ॥५१॥

मन्यास्तम्भं प्रकुरुते स एव श्लेष्मणायुत : ॥

वेडेवाकडे बसणे अथवा उभे राहणे , दिवसा झोप घेणे व वर पाहणे या कारणांमुळे जेव्हा रोग्याच्या श रीरातील प्रकोप पावलेला वायु कफयुक्त होऊन त्याच्या मानेच्या शिरा ताठ करून मान जखडून टा कितो तेव्हा त्या रोगास मन्यास्तंभ असे म्हणतात .

जिव्हास्तंभाचीं लक्षणें .

वाग्वाहिनीशिरासंस्थो जिव्हां स्तम्भयतेऽनिल : ॥५२॥

जिव्हास्तम्भ : स तेनान्नपानवाक्येप्वनीशता ॥

रोग्याच्या वाणीवाहक शिरातील वायु दूषित झाला असता त्याची जीभ जखडून टाकतो व त्यास बोलण्यास व खाण्यापिण्यास असमर्थ करतो . या रोगास जिव्हास्तंभ म्हणतात .

शिरोग्रहाचीं लक्षणें .

रक्तामाश्रित्य पवन : कुर्यान्मूर्धधरा : शिरा ॥५३॥

रूक्षा : सवेदना : कृष्णा : सोऽसाध्य : स्याच्छिरोग्रह : ॥

जेव्हा दूषित वायू रोग्याच्या मस्तकास धारण करणार्‍या शिरा , रक्ताचा आश्रय करून जखडून टाकतो तेव्हा त्या शिरा रूक्ष , काळया व वेदनायुक्त होतात . या रोगास शिरोग्रह अशी संज्ञा असून हा असाध्य आहे .

गृध्रसी .

स्फिक्‌ पूर्वा कटिपृष्ठोरूजानुजङघापादं क्रमात्‌ ॥५४॥

गृध्रसी स्तम्भरूकतोदैर्गृण्हाति स्पन्दते मुहु : ॥

वाताद्वातकफात्तन्द्रा गौरवारोचकान्विता : ॥५५॥

गृध्रसीरोग दोन प्रकारचा होतो . एक नुसत्या दूषित झालेल्या वायूपासून व दुसरा दूषित वायु व कफ यांपासून , वायूपासून होणार्‍या गृध्रसीची लक्षणे --- वायु प्रथम रोग्या च्या कंबरेच्या मागील भागास जखडतो व पुढे क्रमाने कंबर , पाठ , मां ड्या , गुडधे , पोटर्‍या व पाय या सर्वांस जखडतो . त्या जखडलेल्या जागी वेदना , सुया टोचल्याप्रमाणे पीडा व कंप ही उत्पन्न होतात . दुसरा वायु व कफ यांपासून जो गृधसी होतो त्यास आता सांगितलेली वायूची सर्व लक्षणे असून शिवाय अंगास जडपणा , तोंडास अरूचि व तंद्रा ही कफाची लक्षणे अधिक द्दष्टीस पडतात .

विश्वाचीं .

तसं प्रत्यङगुलीना या : कण्डरा बाहुपृष्ठत : ॥

बाह्ये : कर्मक्षयकरी विश्वाची चेति सोच्यते ॥५६॥

बाहुच्या मुळापासून हाताच्या वरच्या भागापर्यंत जे बोटांचे जाड स्नायु आहेत त्यांच्या ठिकाणी जेव्हा दूषित वायु शिरून हात आखडणे , लांब करणे वगैरे क्रिया बंद करितो तेव्हा त्यांस विश्वाची रोग म्हणात .

क्रोष्टुशीर्ष ,

वातशोणितज : शोथो जानुमध्ये महारुज : ॥

ज्ञेय : क्रोष्टुकशीर्षस्तु स्थूल : क्रोष्टुकशीर्षवत्‌ ॥५७॥

दुषित वायु रक्तमिश्रित होऊन रोग्याच्या गुड घ्या मध्ये जी अत्यंत वेदना करणारी सू ज उत्पन्न करतो तिजमुळे गुडया क्रो ष्टु शीर्ष ( कोल्ह्याच्या डोक्या ) प्रमाणे जाड दिसतो ; म्हणून या रोगास क्रोष्टुशीर्ष अथवा गुडची असे म्हणतात .

खंजत्व व पांगुल्य .

वायु : कटयाश्रित : सक्थ्न : कण्डरामाक्षिपेद्यदा ॥

खञ्जस्तदा भवेज्जन्तु : पङगु : स्नकथ्न्योर्द्वयोर्वधात्‌ ॥५८॥

दूषित वायु रोग्याच्या कंबरेमध्ये शिरून जेव्हा तो त्याच्या एका पायाचा मोठा स्ना यु जखडतो तेव्हा तो पंगु म्हणजे पांगळा होतो व पंगु म्हणजे व दोन्ही मांडयाचे खंज म्हणजे लंगडा होतो व दोन्ही मांडयाचे मोठे स्नायु जखडतो तेव्हा तो पंगु म्हणजे पांगळा होतो

कलायखंज .

प्रक्रामन वेपते यस्तु खञ्जन्निव च गच्छति ॥

कलायखञ्जं तं विद्यात्‌ मुक्तसन्धिप्रबन्धनम्‌ ॥५९॥

वातप्रकोपामुळे सांध्याची बंधने शिथिल झाली असता रोगी चालताना थरथर कापतो व पाय फरफटत या ओवाळल्यासारखा चालतो . अशा प्रकार च्या रोगास कलायखंज म्हणतात .

वातकंटक .

रुकपादे विषमे न्यस्ते श्रमद्धा जायते यदा ॥

वातेन गुल्फमाश्रित्य तमाहुर्वातकण्टकम्‌ ॥६०॥

पाय वाक ्डा तिकडा पडला असता अथवा त्यास चाळ ण्याचे वगैरे श्रम झाले असता वातकंटक रोग उत्पन्न होतो ; यां त प्रकोप पावलेला वायु रोग्याच्या घोटयात शिरून त्या ठिकाणी वेदना उत्पन्न करतो .

पाददाह ,

पादयो : कुरुते दाहं पित्ताऽसृक्‌सहितोऽनिल : ॥

विशेषतश्चङक्रमत : पाददाहं तमादिशेत्‌ ॥६१॥

पित्तरक्ताशी मिश्रा झालेला दूषित वायु रोग्याच्या पायाची आग करतो . यास पा द दाह रोग म्हणतात . ही आग विशेषेकरुन चालताना होते .

पादद्दर्ष .

द्दष्येते चरणौ यस्थ भवेतां चातिसुप्तकौ ॥

पावहर्ष : स विज्ञेय : कफवातप्रकोपज : ॥६२॥

दूषित वातकफापासून रोग्याच्या पायाच्या ठा यी पादहर्ष रोग उद्भवतो . यांत पायांच्या झिणझिण्या होऊन ते अगदी बधिर होतात .

अंसशोष व अवबाहुक .

अंसदेशे स्थितो वायु : शोषयेदंसथन्धनम्‌ ॥

शिराश्चाकुञ्च्य तत्रस्थो जनयेदवबाहुकम्‌ ॥६३॥

दुषित वायु खांद्यात राहून त्याने त्याच्या बंधनाचा शोष केल्यामुळे खांदा वा ळू न गेला असता त्यास अंसशोष रोग म्हणतात ; शिरा जखडून टाकल्या असता अववाहुक म्हणतात .

मूकरोग वगैरे .

आवृत्य वायु : सकफो धमनी : शब्दवाहिनी : ॥

नरान्‌ करोत्याक्रियकान्‌ मूकमिम्मिणगद्नदान्‌ ॥६४॥

रोग्यास मुळीच बोलता न येणे तो मूकरोग : दुसरा प्रकार नाकात गेंगणे बोलता येणे तो मिम्मिणरोग आणि तिसरा त्याने बोलताना शब्दाची मधली अक्षरे खाणे तो गद्रदरोग , हे तिन्हीही रोग दूषित झालेल्या वायूने कफाचा आश्र य करून त्याच्या शब्दवाहिनी नाडया व्यापून टाकल्या म्हणजे उत्पन्न होतात .

तूनीरोग .

अधो या वेदना याति वर्चोमूत्राशयोत्थिता ॥

भिन्दन्तीव गुदोपस्थं सा तूनी नाम नामत : ॥६५॥

तनी म्हणून जो रोग होत असतो त्यात रोग्याचे मलाशय व मूत्राशय यात कळ उत्पन्न होऊन ती खाली जाते व गुदद्वार आणि उत्पन्न ( स्त्री व पुरुष यांचे जननें द्रिय ) यांमध्ये फुटल्यासारखी पीडा करते .

प्रतूनी रोग .

मुदोपस्थोत्थिता चैन प्रतिलोमं प्रधावति ॥

वेगै : पक्वाशयं याति प्रतूनी चेह सोच्यते ॥६६॥

वर सांगितलेल्या लक्षणांच्या उलट प्रकारचा दुसरा प्रतूनी रोग होत असतो . त्यात गुद द्वा र व उपस्थ यांत उत्पन्न झालेली कळ जोराने पक्वाशयात शिरून त्याला फुटल्यासारखी पीडा करते .

अध्यान .

साटोपमत्युग्नरुजमाध्मातमुदरं भृशम्‌ ॥

आध्मानमिति जानीयाद्‌घोर वातनिरोधजम्‌ ॥६७॥

अपानवायूचा अवरोध केल्याने गुडगुड शब्द व वेदना यांनी युक्त असे पोट फुगले असता तो भयंकर आध्मान रोग जाणावा .

प्रत्याध्मान

विमूत्तपार्श्वह्रदयं तदेवामाशयोत्थितम्‌ ॥

प्रत्याध्मानं विजानीयात्‌ कफव्याकुलितानिलम्‌ ॥६८॥

वर सांगितलेला आध्मानरोग रोग्याच्या आमाशायात उत्पन्न झाला असता त्यास प्रध्याध्मान म्हणतात . यात दुषित वायु कफमिश्रित असून त्याने पा र्श्व भाग व ह्रदय यांत वेदना होत नाहीत .

वाताष्ठीला .

नाभेरधस्तात्सञ्जात : सञ्चारी यदि वाऽचल : ॥

अष्ठीलाबद्धनो ग्रन्थिरुर्ध्वमायतउन्नत : ॥

घाताष्ठीलां विजानीयाद्वहिर्मार्गावरोधिनीम्‌ ॥६२॥

रोग्याच्या नाभीखाली स्थिर किंवा चंचल , वा टोळया द ग डाप्रमाणे कठिण ; लांब पसरलेली व उचललेली अशी जी गाठ येते तिला वाताष्ठीला असे म्हणतात . हिच्यामुळे वायु , मल व मूत्र यांचा रोध होतो .

प्रत्यष्ठीला .

एतामेव रूजायुक्तां वातविण्मूत्ररोधिनीम्‌ ॥

प्रत्यष्ठीलामिति वदेज्जठरे तिर्यगुत्थिताम ॥७०॥

जेव्हा वातप्रीलेची गाठ पोठावर आडवी पसरलेली व अत्यंत वेदना करणारी असून रोग्याचा वायु आणि मलमूत्र यांचा रोध करते . ते व्हा तिला प्रत्यष्ठीला असे म्हणतात .

वातविकार .

मारुतेऽनुगुणे बस्तौ मूत्रं सम्यक्‌ प्रवतंते ॥

विकारा विविधाश्चाषि प्रतिलोमे भवस्ति हि ॥७१॥

रोग्याच्या बस्तीमध्ये वायु अनुलोम असता त्यास मूत्र चांगल्या रीतीने होते . पण तो प्रतिलोम झाला की , त्याच्या ठायी ( मुतखडा वगैरे ) अनेक विकार ज ड तात .

ऊर्ध्ववात .

अध : प्रतिहतो वायु श्लेमष्णा मारुतेन वा ॥

करोत्यूद्नारवाहुल्धमूर्ध्ववात : प्रचक्षते ॥७२॥

दुषित कफ अथवा वायु यामुळे रोग्याच्या अपानवायूचा खालून अवरोध झाल्याने त्यास पुष्कळ ढेक रा येतात . त्या विकारास ऊ र्ध्ववा त असे म्हणतात .

कंपवायु .

सर्वाङ्गकम्य : शिरसो वायुर्वेपथुसंज्ञक ॥

दुषित वा युमूळे रोग्याचे सर्व शरीर व डोके यांच्या ठा यी कंप उत्पन्न होतो त्या रोगास वेपथु अथवा कंपवायु म्हणतात .

खल्ली .

खल्ली तु पादजडघोरुकरमूलावमोटिनी ॥७३॥

दूषित वायुमुळे रोग्याचे पाय , पिंडर्‍या , मांडया व हाताची मुळे मोडल्यासारखी झाली असता त्यास खल्लीरोग झाला असे म्हणावे .

स्थाननामानुरुपैश्च लिङ्गै : शेषान्चिनिदिशेत्‌ ॥

सर्वेष्येतेषु संसर्गं पिताद्यैरुपलक्षयेत्‌ ॥७४॥

वर सांगितलेल्या वातव्याधीशिवाय आणखी अनेक प्रकारचे वातव्या धी आहेत . त्यांची लक्षणे स्थानावरून व नावांवरून समजावी . जसे - पा र्श्व शूल , पर्वभेद , नखतोद . अंगुलिस्तंभ , हस्तकंस इत्यादि - व ( सर्व वातव्याधीत ) पित व कफ यांचा संसर्ग त्यांच्या त्यांच्या लक्षणावरून ओळखावा .

वातव्यार्धींची साध्यासाध्य लक्षणें .

हनुस्तम्भार्दिताक्षेपपक्षाघातापतानका : ॥

कालेन महता वाता यत्नात्सिध्यन्ति वा न वा ॥७५॥

नवान्बलवतस्त्वेतान्साधयेन्निरुपद्नवान्‌ ॥

शूनं सुप्तत्वचं भग्नं कप्पाध्माननिपीडितम्‌ ॥७६॥

रुजार्तिमन्तं च नरं वातव्यादिर्विनाशयेत्‌ ॥

सशक्त रोग्यात हनुस्तंभ , अर्दित , आक्षेपक , अपतानक व पक्षाघात हे वातरोग नुकतेच झालेले व पुढे सांगितलेल्या उपद्र वा वाचून असतील तर ते लौकर बरे होतात ; पण फार दिवसांचे जुनाट झाले म्हणजे बरे करण्यास मोठे कष्ट पडतात ; व कधी तर साध्य होत नाहीत . ज्या वातरोग्याचे अंग सुजलेले व बधिर झालेले असून कंपयुक्त असते व पोट फुगणे व दुखणे , शूल उत्पन्न होणे आणि सांधे व हाडे वगैरे मोडणे यामुळे अ त्यं त पीडा पावते , तो रोगी नाश पावतो .

वातरोगातील उपद्रव रोग .

विसर्पदाहरूक्‌सङ्गमूर्च्छारुच्यग्निमार्दवै : ॥

क्षीणमांसबले वाता घ्नन्ति पक्षवधादय : ॥७७॥

 

विसर्य दाह , शुक्र मूर्च्छा , अरूचि अग्निमांद्य व मलमूत्रावरोध हे उपद्रव वातव्यातीत उत्पन्न होतात . रोगी या उपद्र वां नी युक्त असून त्याचे बल , मांस क्षीण झाले असता पक्षाधातादिक रोग त्यास मारक होतात .

अव्याहतगतिर्यस्य स्थानस्थ : प्रकृतौ स्थित : ॥

वायु : स्यासोऽधिकं जीवेद्वीतरोग : समा : शतम्‌ ॥७७॥

ज्या पुरुषाच्या वायुची गती अकुंठित असून तो त्याच्या आश्रयात ( नेमलेल्यास्थानी ) अविकृत राहिलेला असतो तो निरोगी अवस्थेत शंभरापेक्षा जास्त वर्षे जगतो .

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP