TransLiteral Foundation
संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
गुल्मरोगनिदान

माधवनिदान - गुल्मरोगनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


गुल्मरोगनिदान

गुल्माचीं कारणें व स्थानें .

दुष्टा वातादयोत्यर्थ मिथ्याहारविहारत : ॥

कुर्वन्ति पञ्चघा गुल्मं कोष्ठान्तर्ग्रन्थिरूपिणम्‌ ॥१॥

तस्य प्रञ्चविधं स्थानं पार्श्वह्रन्नाभिबस्तय : ॥

अध्यवस्थित आहार व अध्यवस्थित विहार केल्यामुळे भत्यंत दूषित झालेले वातादि दोष कोष्ठात गाठीच्या रूपाचा पुढे सांगितलेला पांच प्रकारचा गुल्म रोग उत्पन्न करतात , दोन्ही कुशी , ह्रदय , नामि व बस्ति ही त्याची पांच स्थाने जाणावी .

गुल्म म्हणजे काय ?

ह्रन्नाभ्योरन्तरे ग्रन्थि : सञ्चारी यदि वाऽचल : ॥

वृत्तश्चयापचयावान्‌ स गुल्म इति कीर्तित : ॥२॥

ह्रदय , नाभि यामध्ये फिरणारा अथवा एक जागी कायम राहणारा , तसाच लहान किंवा मोठा होणारा आणि वाटोळा असा जो गोळा उत्पन्न होतो त्याला गुल्मरोग असे म्हणतात .

गुल्माचे प्रकार .

स व्यस्तैर्जायते दोषै : समस्तैरपि चोच्छ्रितै : ॥

पुरुषाणां तथा स्त्रीणां ज्ञेयो रक्तेन चापर : ॥३॥

वात , पित्त व कफ या तीन दोषांपासून पृथक्‌ पृथक्‌ होणारे तीन व तिन्ही दोषांपासून होणारा एक मिळून पुरुषास होणारे हे चार व रक्तापासून केवळ स्त्रियांनाच होणारा एक , असे गुल्माचे पांच प्रकार जाणावे .

गुल्माचें पूर्वरूप .

उद्नारबाहुल्यपुरीषवतृद्दयक्षमत्वान्त्रविकूजनानि ॥

आटोपमाध्यानमपक्तिशक्तिरासन्नगुल्मस्प वदन्ति चिन्हम्‌ ॥४॥

मलबद्वता , पोट भरलेले वाटणे , सहनशक्ति कमी होणे , ढेकर पुष्कळ येणे , आतडयात कुरकुरणे , पोट दुखून फुगणे व ताटणे आणि जठराग्नि मंद असणे अशा प्रकारची लक्षणे होऊअ लागली की , ती गुल्माची पूर्वरूपे जाणावी .

गुल्माचीं सामान्य लक्षणें .

अरूचि : कृच्छ्रविण्मूत्रं वातेनान्त्रविकृजनम्‌ ॥

आनाहश्चोर्ध्ववातत्वं सर्वगुल्मेवु लक्षयेत्‌ ॥५॥

वर सांगितलेल्या गुल्माच्या सर्व प्रकारांत तोंड बेचव असते , मलमूत्रांची प्रवृत्ति कष्टाने होते , वायुमुळे आतडयात कुरकुरते , पोट फुगते आणि वायूची गति उर्ध्व होते .

वातगुल्माचीं कारणें व लक्षणें .

रक्षान्नपानं विषमातिमात्रे विचेष्टनं वेगविनिग्रहश्च ॥

शोकाभिघातोऽतिमलक्षयश्च निरन्नता चानिलगुल्महेतु : ॥६॥

स्थानसंस्थानरुजाविकल्पं विडवातसङं गलवक्त्रशोषम्‌ ॥

श्यावावरुणात्वं शिशिरज्वरं च ह्रत्कुक्षिपार्श्वोसशिरोरुजं च ॥७॥

करोति जीर्णेऽप्यधिकं च कोपं भुक्ते म्रुदुत्वं समुपैति पश्चात्‌ ॥

वातात्सगल्मो न च तत्र रुक्षं कषायतिक्तं कटू चोपशेते ॥८॥

रूक्ष , विषम व अतिमात्र असे अन्न अथवा पान यांचे सेवन , सशक्त पुरुषाशी कुस्ती , मलमूत्रांच्या वेगाचा अवरोध ( रेचकामुळे केलेला ), मळाचा क्षय , उपवास , अभिघात व शोक या प्रकारच्या कारणांमुळे वातगुल्मरोग उत्पन्न होतो . याची गाठ कधी नाभीत , कधी बस्तीत व कधी बरगडयात जाते : कधी लहान , वाटोळी , मोठी अथवा लांबट होते व तिजमुळे होणारी पीडा कधी कधी थोडी तर कधी फार व तीही कधी टोचल्यासारखी , कधी फूट लागल्यासारखी व कधी या खेरीज दुसर्‍या अनेक प्रकारची असते . तसेच रोग्यास हिवताप येणे , ह्रदय , कुक्षि , खांदे , बरगडया व डोके दुखणे , गळा व तोंड यास कोरड पडणे , अपान वायु न सरणे , मलावरोध होणे , अंगाचा वर्ण निळा अथवा तांबूस पडणे अशा प्रकारची लक्षणे यात उत्पन्न होतात , वातापासून होणारी ही गुरुमाची गाठ अन्न जिरले असता अधिक उसळते व जेवल्यानंतर जरा कमी पडते : इजवर तिखट , तुरट , कडू व रूक्ष , अशा पदार्थांचे सेवन केल्याने काही सुखावह परिणाम होत नाही .

पित्तगुल्माचीं कारणें व लक्षणें .

कटवम्लतीक्षणोक्षणविदाहिरूक्षं

क्रोधातिमद्यार्कहुताशसेवा ॥

आमाभिघातौ रुधिरं च दुष्टं

पैत्तस्य गुल्मस्य निमित्तमुक्तम्‌ ॥९॥

ज्वर : पिपासा वदनाङराग :

शुलं महज्जीर्यति भोजने च ॥

स्वेदो विदाहो व्रणवच्च गुल्म :

स्पर्शासह पैत्तिकगुल्मरूपम्‌ ॥१०॥

तिखट , आंबट , तीक्षण , रुक्ष व दाह कारणारे असे पदार्थ सेवन करणे , अति मद्य पिणे , उन्हात फिरणे , अग्नीजवळ शेक घेणे , तसेच क्रोव , आमविकार व अभि घात ( जखम ) व रक्तदुष्टि या कारणामुळें पितगुल्मरोग उद्भवतो व त्यांत , ज्वर , तृष्णा , जळजळ , घाम आणि याशिवाय तोंड व अंग लाल पडणे , अन्न जिरताना फार वेदता होणे जव्रणाप्रमाणे गाठीला हस्तस्पर्श असह्या वाटणे ही लक्षणे रोग्याच्या ठायी हष्टीस पडतात .

कफ गुल्माची कारणे व लक्षणें .

शीतं गुरु स्निग्धमचेष्टनं च

सम्पूरणं प्रास्वपनं दिवा च ॥

गुल्मस्य हेतु : कफसम्भवस्य

स्तैमित्यशीतज्वव्रगात्रसाद -

ह्रल्लासकासारूचिगौवाणि ॥

शैत्यं रुगल्पा कठिनोन्नतत्वं

गुल्मस्य रुपाणि कफात्मकस्य ॥११॥

कफगुल्म उत्पन्न होण्यास , शीत , जड व स्निग्ध अशा पदार्थांचे व अतिरिक्त अन्नाचे सेवन व व्यायाम न करणे व दिवानिद्रा या गोष्टी कारणीभूत होतात व याची लक्षणे गाठ कठीण असून उचललेली असणे व तिची पीडा कमी असणे , अंगाला ओलसरपणा वाटणे . ग्लनि येणे , तोंड बेचव होणे व त्याचप्रमाणे शीतज्वर , खोकला , मळमळ , शैत्य व जडत्व या प्रकारची असतात .

त्रिदोषजन्य गुल्माचीं लक्षणें .

सर्वस्तु दुष्टो निचयात्मकस्य ॥१२॥

महारुजं दाहपरीतमश्मव -

द्धनोन्नतं शीघ्रविदाहदारुणम्‌ ॥

मन : शरीराग्निबलापहारिणं

त्रिदोषजं गुल्ममसाध्यमादिशेत्‌ ॥१३॥

वर जी वात , कफ व पित्त या तिन्ही दोषांपासून होणार्‍या गुल्मांची कारणे व लक्षणे निरनिराळी सांगितली आहेत . ती सर्व एकत्र दिसून आली असता तो सन्निपात गुल्म होय . त्यांत ज्याची गाठ फार पीडा व दाह करणारी असून दगडाप्रमाणे कठीण व उंच झालेली असते आणि शीघ्र दाहामुळे भयंकर वाटते व जिच्या योगाने रोग्याच्या मनास व्याकुलता , शरीरास कृशपणा व निरनिराळया प्रकारचा वर्ण हे उत्पन्न होतात व त्याचा जठराग्नी कधी मंद तर कधी तीक्ष्ण असा होतो आणि सामर्थ्य नष्ट होते तो सान्निपतिक गुल्म असाध्य जाणावा .

रक्तगुल्माचीं कारणें व लक्षणें .

नवप्रसूताऽतभोजनाया या चामगर्भं विसृजेद्दतौ वा ॥

वायुर्हिं तस्या : परिगृह्य रक्तं करोति गुल्मं सरूजं सदाहम्‌ ॥१४॥

पैत्तस्म लिङ्गेन समानलिडं विशेषणं चाप्यपरं निबोध ॥

य : स्पन्दते पिण्डित एव नाङैश्चिरात्साशूल : समगर्भलिङ : ॥१५॥

स रौधिर : स्त्रीभवएव गुल्मो मासे ज्यतीते दशमे चिकित्स्थ : ॥

नुकल्याच प्रसूत झालेल्या स्त्रीने त्या काळी अथवा ऋतुकाळी अपष्यकारक पदार्थ सेवन केले असता किंवा तिला अपूर्ण गर्भपात झाला असता वायु प्रकोम पावून तिचे ( ऋतुकाळी स्त्रवणारे ) जे रक्त त्याचीं दाहकारक व पीडा देणारी अशी गांठ बनवतो , अशा रीतीने केवळ स्त्रीच्या ठायीव उद्भवलेल्या गांठीस रक्तगुल्म असे म्हणतात . याची लक्षणे बहुतेक वर सांगितलेल्या पितगुल्माच्या लक्षणांप्रमाणे असतात . त्यांत विशेष हाच की त्याचे अवयव हालत . नाहीत तर फार वेळाने ( तो रक्ताचा बनलेला ) सबंध गोळाच हालतो व वेदना उत्षन्न करतो . आणली या रोगाचा स्वाभविक धर्मव असा आहे की , त्यात ( विटाळ न स्रवणे , तोंडास पाणी सुटणे , डोहाळे लागणे व स्तनांच्या बोंडया काळया पडणे वगैरे ) गर्भाची सर्व लक्षणे उत्पन्न होऊन गर्भाचा संशय येतो . याची चिकित्सा हा उत्पन्न झाल्यापासून दहा महिने झाल्यावर करावी .

गुल्मरोगाचीं असाध्य लक्षणें .

सञ्चित : क्रमशो गुल्मो महावास्तुपरिग्रह : ॥

कृतमूल : शिरानद्धो यदा कृर्म इवोन्नत : ॥१७॥

दोर्बल्यारूचिह्रल्लासकासच्छर्द्यरतिज्वरै : ॥

तृष्णातन्द्राप्रतिश्यायैर्युज्यते न स सिध्यति ॥१८॥

गृहीत्वा सज्वर : श्वासच्छर्द्यतीसारपीडितम्‌ ॥

ह्रन्नाभिहस्तपादेषु शोथ : क्षिपत्ति गुल्मिनम्‌ ॥१९॥

श्वास : शूलं पिपासान्नविद्वेषो ग्रन्थिमूढता ॥

जायते दुर्बलत्वं च गुल्मिनां मरणाय वै ॥२०॥

जो गुल्म क्रमाक्रमाने वाढत जाऊन सर्व उदरातील फार मोठी जागा व्यापून टाकतो व कासवाचे पाठीसारखा उचललेला असतो आणि ज्याची मुळे पक्की खोल शिरून त्यावर शिरांचें जाळे होते ; तसेच अन्नद्वेष , मळमळ , ओकारी , ज्वर , तहान , पडासे , खोकला , अशक्तपणा व अस्वस्थता अशा प्रकारवी लक्षणे उत्पन्न करतो तो गुल्म झालेला रोगी साध्य होत नाही . दुसरा , ज्यास गुल्म होऊन वांती व ढाळ यांनी हैराण झालेला . ह्रदय , नाभि , हात व पाय यांच्या ठायी सूज आलेला व ताप आणि दमा हे रोग लागलेला जो रोगी तो वांचत नाही . आणखी ज्याची गाठ एकाएकी नाहीशी होऊन त्याचा शक्तिपात होतो व तो अन्नद्वेष , तहान , दमा व शूल या लक्षणांनी युक्त असतो तो तिसरा गुल्मरोगीही मरणाच्या पंथास लागला असे समजण्यास हरकत नाही .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-06-24T13:49:38.6470000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

finishing chemicals

 • न./अ.व. परिष्करण रसायने 
RANDOM WORD

Did you know?

कपिलाषष्ठीचा योग म्हणजे काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Total Pages: 46,537
 • Hindi Pages: 4,555
 • Dictionaries: 44
 • Words in Dictionary: 302,181
 • Marathi Pages: 27,517
 • Tags: 2,685
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,230
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.