TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
उरूस्तम्भनिदान

माधवनिदान - उरूस्तम्भनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


उरूस्तम्भनिदान

उरुस्तंभाचीं कारणें व संप्राप्ति .

शीतोष्णद्रवसंशुष्कगुरूस्निग्धैर्निषोवितै : ॥

जीर्णाजीर्णे तथाऽऽयाससङक्षोभस्वप्नजागरै : ॥१॥

सश्लेष्मभेद : पवन : साममन्यर्थसञ्जितम्‌ ॥

अभिभूयेतरं दोषमूरूचेत्प्रतिपद्यते ॥२॥

सवथ्यस्थीनि प्रपूर्यान्त : श्लेप्मणा स्तिमितेन च ॥

तदा स्तभ्नाति तेनोरू स्तब्धौ शीतावचेतनौ ॥३॥

परकीयाविवगुरूस्यातामतिभृशव्यथौ ॥

ध्यानाङ्गमर्दस्तैमित्यतन्द्राच्छर्द्यरुचिज्वरै : ॥४॥

संयुतौ पादसदनकृच्छ्रोद्धरणसुप्तिभि : ॥

तमूरुस्तम्भीमत्याहुराढयवातमथापरे ॥५॥

काही अन्न पचन झाले व काही न झाले असता , थंड व उष्ण , पातळ व वाळलेले आणि जड व स्निग्ध अशा प्रकारचे परस्पर विरूद्ध पदार्थ सेवन करणे , दिवसा निजणे व रात्री जागणे , श्रम करणे व चित्तक्षोभ होणे या कारणांनी कफ व मेद यांनी युक्त वायु अत्यंत साचलेल्या आमासह पित्ताला दाबून मांडयात येतो व मांडयाची हाडे आतून ओलसर व घट्ट कफाने भरून टाकतो , तेव्हा मांडया इतक्या जड होतात की त्या आपल्या नव्हेतशा रोग्यास वाटतात आणि ताठ , स्थिर व गार होतात . आणि त्यास कळा लागतात . या शिवाय चिंता , अंग मोडणे व त्यास ओलसरपणाचा भास होणे , झापड , अरुचि , ओकारी , ज्वर , पाय गळणे , बधिर होणे व ते उचलताना त्यास मोटेश्रम पडणें ही दुसरी लक्षणे ज्या रोगात होतात त्यास ऊरूस्तंभ अथवा कोणी आढयाबात असे म्हणतात .

ऊरूस्तंभाचें पूर्वरूप .

प्राग्रूपं तस्य निद्रातिध्यानं स्तिमितता ज्वर : ॥

लोहयर्षोऽरुचिश्च्छर्दिर्जङ घोर्वो : सदनं तथा ॥६॥

ऊरूस्तंभ होण्यापूर्वी रोग्यास पोटर्‍या ( पिंडर्‍या ) व मांडया गळल्यासारख्या व अतिनिद्रा , अतिचिंता , ज्वर , ओकारी , अंग ओले व गुंडाळल्यासारखे वाटणे व त्यावर काटा येणे , अरूचि याप्रमाणे पूर्व लक्षणे उत्पन्न होतात .

उरूस्तस्भाचीं लक्षणें .

वातशङ्किभिरज्ञानात्तस्थ स्यात्स्नेहनात्पुन : ॥

पादयो : सदनं सुप्ति : कृच्छ्रादुद्धरणं तथा ॥७॥

जङघोरुग्लानिरत्यर्थं शश्वद्वा दाहवेदना ॥

पादं च व्यथते न्यस्तं शीतस्पर्शं न वेत्ति च ॥८॥

संस्थाने पीडने गत्यां चालने चाप्यनीश्वर : ॥

अन्यस्येव हि सम्भग्नावूरूपादौ च मन्यते ॥९॥

ऊरुस्तंभ हा केवळ वातरोग नसून आमरोग असल्यामुळे वायूच्या शंकेने यावर स्निग्ध तर्‍हेची चिकित्सा केली असता हा कमी न होता उलट अधिक वाढतो . हा झाला असता पाय गळणे , बधिर होणे व ते उचलताना श्रम पडणे , पिंडर्‍या व मांडया यांमधील शक्ति नाहीशी होणे , शीत स्पर्श न कळणे , पाऊल ठणकणे , आणि अंगात दाह व वेदना होणे ही लक्षणे उत्पन्न होतात . तसेच रोगी बसणे , उठणे , चालणे व अंग हालविणे या सर्व क्रियांना असमर्थ होतो व त्याचे पाय आणि मांडया मोडतात , त्या आपल्या नाहीतशा त्यास वाटतात .

साध्यासाध्य लक्षणें .

यदा दाहार्तितोदार्तो वेपन : पुरूषो भवेत्‌ ॥

ऊरुस्तम्भस्तदाहन्यात्साधयेदन्यथा नवम्‌ ॥१०॥

हा ऊरुस्तंभ रोग नवा असला व दाह , कंप आणि शूल व टोचल्याप्रमाणे वेदना ही लक्षणे त्यांत नसली तर तो साध्य होतो . याशिवाय जो फार दिवसांचा व दाहादि लक्षणांनी युक्त ) तो असाध्य समजावा .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-06-24T13:49:37.6630000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

adermin

 • न. Chem. ऍडर्मिन 
RANDOM WORD

Did you know?

शंकराला अर्धी प्रदक्षिणा कां घालतात ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.