संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
मूत्राघातनिदान

माधवनिदान - मूत्राघातनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


जायन्ते कुपितैदोंषैर्मूत्राघातास्त्रयोदश ॥

प्रायो मूत्रविघाताद्यैर्वातकुण्डलिकादय : ॥१॥

मूत्रादिकांच्या ( मूत्र , मल व शुक्र यांच्या ) वेंगाचा रोध केल्यामुळे कुपित होणारे जे वातादिक दोष , त्यापासून वातकुंडलिकादिक पुढे सांगितलेले तेरा प्रकारचे मूत्राघात होतात .

वातकुंडलिकेची कारणे व लक्षणें .

रौक्ष्याद्वेगविघाताद्वा वायुर्बस्तौ सवेदन : ॥

मूत्रमाविश्य चरति विगुण : कुण्डलीकृत : ॥२॥

मूत्रमल्पाल्पमथवा सरुजं सम्प्रवर्तते ॥

वातकुण्डलिकां तां तु व्याधिं विद्यात्सुदारूणम्‌ ॥३॥

रुक्षपणा अथवा मलमूत्रादिकांच्या वेगाचा अवरोध या कारणामुळे प्रकोप पावलेला मूत्राशयातील वायु मूत्रास वेदनायुक्त प्रतिबंध करून उलट गतीने वावटळीसारखा फिरतो या प्रकारास वातकुंडलिका म्हणतात . हा रोग भयंकर असून यात लध्वीला थोडथोडे होते व ती होताना तिडीक लागते .

अष्ठीलेचीं कारणें व लक्षणें .

आध्मापयन्‌ बस्तिगुदं रूध्वा वायुश्चलोन्नताम्‌ ॥

कुर्यात्तीव्रार्तिमष्ठीलां मूत्रमार्गावरोधिनीम्‌ ॥४॥

जेव्हा वायु मलमूत्राचा अवरोव करून गुदस्थान व बस्ति यास फुगवून चंचल व उंच अशी दगडासारखी तीव्र पीडादायक गाठ उत्पन्न करतो तेव्हा तिला अष्ठीला म्हणावे . ही झाली असता मूत्रमार्गाचा रोध होतो .

वातबस्तीचीं कारणें व लक्षणें .

वेगं विधारयेद्यरतु मूत्रस्थाकुशलो नर : ॥

निरुणद्धि मुखं तस्य बस्तेर्बस्तिगतोऽनिल : ॥५॥

मूत्रसङो भवेत्तेन बस्तिकुक्षिनंपीडित : ॥

वातबस्ति : स विज्ञयो व्याधि : कृच्छ्रप्रसाधन : ॥६॥

वैद्यशास्त्राच्या निषमाविषयी बेफिकीर अशा मनुष्याने लध्वी लागली असता न करून तिचा रोध केला तर त्याच्या बस्तीतील वायु तिचे तोंड बंद करतो , यासच वातबस्ति असे म्हणतात . हा रोग कष्ठसाध्य असून यांत मूत्रास प्रतिबंध होतो व वरित आणि कुक्षी यांच्यामध्ये वातजन्य वेदना होतात .

मूत्रातीताचीं कारणें व लक्षणें .

चिरं धारयतो मूत्रं त्वरया न प्रवर्तते ॥

मेमानस्य मन्दं वा मूत्रातीत : स उच्यते ॥७॥

फार वेळ कोंडून धरलेल्या मूत्राची शीघ्र प्रवृत्ति न होणे या विकारास मूत्रातीत म्हणतात . हा झाला असता रोग्याला लध्वीला सावकाश व थोडथोडे होते .

मूत्रजठराचीं लक्षणें .

मूत्रस्य वेगेऽभिहते तदुदावर्तहेतुक : ॥

अपान : कुपितो वायुरुदरं पूरयेद्भृशम्‌ ॥८॥

नाभेरधस्तादाध्मानं जनयेत्तीव्रवेदनम्‌ ॥

तन्मूत्रजठरं विद्यादधोबस्तिनिरोधजम्‌ ॥९॥

मूत्राच्या वेगाचा निरोध केला असता मूत्रावरोधाने होणार्‍या उदावर्तामुळे अपानवायु प्रकोप पावून पोट फुगवतो व बेंबीच्या खालील ओटीत तीव्र वेदनायुक्त असा आध्मान रोग उत्पन्न करतो . अधोबस्तीचा वेगावरोध करणार्‍या या मूत्रावातास मूत्रजठर असे म्हणतात .

मूत्रोत्संगाचीं लक्षणें .

बस्तौ वाऽप्यथवा नाले मणौ वा यस्य देहिन : ॥

मूत्रं प्रवृत्तं सज्जेत सरक्तं वा प्रवाहत : ॥१०॥

स्नवच्छनैरल्पमल्पं सरुजं वाथ नीरुजम्‌ ॥

विगुणानिलजो व्याधि : स मूत्रोङत्ससंज्ञित : ॥११॥

मूत्रप्रवृत्ति होतेवेळी बस्ति , शिश्र अथवा मणी यामध्ये मूत्र अडकून राहणे व त्या वेळी बळेच कुंथले असता तिडका लागून अथवा न लागून त्याचा हळूहळू व थोडथोडा स्राव होणे अशा प्रकारच्या मूत्राघातास मूत्रोत्संग म्हणतात . हा उलट गतीने फिरणार्‍या दूषित पित्त व वायूपासून उद्‌भवतो .

मूत्रक्षयाचीं लक्षणें .

रूक्षस्य क्लान्तदेहस्य बस्तिस्थौ पित्तमारूतौ ॥

मूत्रक्षयं सरूग्दाहं जनयेतां तदाहृयम्‌ ॥१२॥

रूक्ष व शुष्क असे शरीर झालेल्या रोग्याच्या बस्तीतील दूषित पित्त व वायु हे त्याच्या मूत्राचा क्षय करतात , तेव्हा त्या मूत्राघातास मूत्रक्षय म्हणावे . यात लध्वी करतेवेळेस तिडीक व जळजळ ही लक्षणे उद्‌भवतात .

मूत्रग्रंथीची लक्षणें .

अन्तर्बस्थिमुखे वृत्त : स्थिरोऽल्प : सहसा भवेत्‌ ॥

अश्मरीतुरूगग्रन्थिर्मूत्रग्रन्थि : स उच्यते ॥१३॥

बस्तीच्या आत तोंडाशी स्थिर , वाटोळी व लहान अशी गाठ एकाएकी उत्पन्न होणे आणि मुतखडयाप्रमाणे तिजपासून रोग्यास पीडा होणे या विकारास मूत्रग्रंथि अशी संज्ञा देतात .

मूत्रशुक्राचीं लक्षणें .

मूत्रितस्य स्त्रियं यातो वायुना शुक्रमुद्धतम्‌ ॥

स्थानाच्च्युतं मूत्रयत : प्राक्‌ पश्चाद्वा प्रवर्तते ॥१४॥

भस्मोदकप्रतीकाशं मूत्रशुक्रं तदुच्यते ॥

जेव्हा रोगी लध्वी लागली असता तिच्या वेगाचा निरोध करून तसाच स्त्रीशी प्रसंग करतो , त्याच्या ठायी ज्यास मूत्रशुक्र म्हणतात तो मूत्राघाताचा प्रकार उदभवतो . यात लध्वी करताना प्रथम किंवा मागून स्थानभ्रष्ट झालेले शुक्र पडते व ते पाण्यात कालवलेल्या भस्मासारखे दिसते .

उष्णवाताचीं कारणें व लक्षणें .

व्यायामाध्वातपै : पित्तं बस्तिं प्राप्यानिलायुतम्‌ ॥१५॥

बस्तिं मेढ्रं गुदं चैव प्रदहेत्‌ स्नावयेदध : ॥

मूत्रं हारिद्रमथवा सरक्तं रक्तमेव वा ॥१६॥

कृच्छ्रात्‌ पुन : पुनर्जन्तोरुष्णवातं वदन्ति तम्‌ ॥

अतिश्रम , अतिमार्गगमन व उन्हाचा ताप या कारणांमुळे कुपित झालेले पित्त वायूशी संयुक्त होऊन जो मूत्राघात उत्पन्न करते त्यास उष्णवात असे म्हणतात . याची लसणे :--- रोग्याची बस्ति , शिश्र व गुदस्थान यामध्ये ( पित्तवातामुळे ) दाह होणे व पिकळट किंचित्‌ रक्तयुक्त असे मूत्र वारंवार व कष्टाने स्रवणे याप्रमाणे जाणावी .

मूत्रसादाचीं कारणें व लक्षणें .

पित्तं कफो वा द्वौ वापि संहन्येतेऽनिलेन चेत्‌ ॥

कृच्छान्मूत्रं तदा पीतं रक्तं श्वेतं घनं सृजेत्‌ ॥१७॥

सदाहं रोचनाशङ्खचूर्णवर्णं भवेत्त तत्‌ ॥

शुष्कं समस्तवर्णं वा मूत्रसादं वदन्ति तम्‌ ॥१८॥

दूषित झालेले पित्त व कफ या दोहोंपैकी एक अथवा दोन्हीहि दोष वायूची संयुक्त झाले असता उदद्भवणार्‍या मूत्राघातास मूत्रसाद अशी संज्ञा देतात . यात रोग्यास लध्वी करताना आग होणे , पिवळे , तांबडे , पांढरे , व घट्ट असे मूत्र कष्टाने बाहेर पडणे व ते जमिनीवर सुकले असता गोरोवन , शंखचूर्ण ( चुना ) यांच्या अथवा दुसर्‍या अनेक प्रकारच्या रंगाचे होणे हे प्रकार द्दष्टीस पडतात .

विडविघाताचीं लक्षणें .

रूक्षदुर्बलयोर्वातेनोदावृत्तं शकृद्यदा ॥

मूत्रस्रोतोऽनुपद्येत विटसंसृष्टं तदा नर : ॥१९॥

विङ्गर्न्ध मूत्रयेत्‌ कृच्छ्राद्‌ विड्विघातं विनिर्दिशेत्‌ ॥

रूक्ष पदार्थ सेवन करणार्‍या अथवा अशक पुरुषाचा मळ जेव्हा दूषित वायु आतडे फाडून आणतो व त्यास मूत्रवाहिनी नाडयांमध्ये नेतो , तेव्हा त्यास विडविवात म्हणावे . या रोगात त्यास कष्टाने लध्वी होते व मूत्रप्रवृत्ति मळयुक्त होते .

बस्तिकुंडलाची कारणें व लक्षणें .

दुताध्वलङघनायासैरभिघातात्‌ प्रपीडनात्‌ ॥

स्वस्थानावस्तिरुदवृत्त : स्थूलस्तिष्ठति गर्भवत्‌ ॥२०॥

शूलस्पन्दनदाहार्तो बिन्दुं बिन्दुं स्नवत्यपि ॥

पीडितस्तु सृजेद्धारां संरम्भोद्वेष्टनार्तिमान ॥२१॥

बस्तिकुण्डलमाहुस्तं घोरं शस्त्रविषोपमम्‌ ॥

पवनप्रबलं प्रायो दुर्निवारमबुद्धिभि : ॥२२॥

शीघ्र मार्गगमन , श्रम , लंघन , ( दगड , काठी वगैरेचा ) अभिघात आणि मर्दन या कारणांमुळे आपले स्थान सोडून बस्ति ( मूत्राशय ) बहिगोंल होणे यास बरितकुंडल असे म्हणतात . यांत बस्ति हा गर्भासारखा स्थूल व स्थिर राहतो व लध्वी करताना मूत्राच एकेक थेंव पडतो ; पण जर तो जोराने दाबला तर मोठी धार उडते ; शिवाय तो तुजतो आणि त्यामुळे शूल , कंप , दाह व पेटके हे प्रकार उत्पन्न होतात . या बस्तिउंडलात बहुश : वायूचेच प्राधान्य असून हा शस्त्रविषाप्रमाणे भयंकर आहे म्हणून साधारण बुद्धीच्या वैद्याकडून बरा होत नाही .

तस्मिन्पित्तान्विते दाह : शूलं मूत्रविवर्णता ॥

श्लेष्मणा गौरवं शोथ : स्निग्धं मूत्रं घनं सितम्‌ ॥२३॥

श्लेष्मरुद्धबिलोबस्ति : पित्तोदोर्णो न सिद्धयति ॥

अविभ्रान्तबिल : साध्यो न च य : कुण्डलीकृत : ॥२४॥

स्याद्वस्तौ कुण्डलीभूते तृण्मोह : श्वास एव च ॥

वर सांगितलेल्या बस्तिकुंडल रोगात जरी वायुचेव प्राधान्य असले तरी कधी कधी तो दुसर्‍या दोषांशीही संयुक्त होतो . जेव्हा तो पित्ताशी युक्त असतो तेव्हा दाह , शूल व होणे मूत्राचा रंग बिवडणे आणि कफाशी असतो तेव्हा सूज व जडस्व येणे आणि मूत्र पांढरे , घट्ट व स्निग्ध होणे अशा प्रकारची लक्षणे असतात . यांपैकी ज्यात बस्तीचे तोंड ( छिद्र ) कफाने चोंदले गेले असून जो पित्त ने व्याप्त असतो तो प्रकार असाध्य व व बस्तीचे तोंड मोकळे असून तो कुंडलीभूत झालेला नसला तर तो प्रकार साध्य असे समजावे . ( बस्ति कुंडलीभूत झाला असता श्वास , मूर्च्छा व तहान हे विकार उद्‌भवतात .)

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP