TransLiteral Foundation
संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
नासारोगनिदान

माधवनिदान - नासारोगनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


नासारोगनिदान

नाकासंबंधी होणार्‍या रोगांची लक्षणे खाली पीनस रोगापासून प्रारंभ करून क्रमवार सांगितली आहेत .

पीनस लक्षणें .

आनह्यते यस्य विशुष्यते च प्रक्लिद्यते धूप्यति चैव नासा ॥

न वोत्ति यो गन्धरसांश्च जन्तुर्जुष्टं व्यवस्येदिह पीनसेन ॥१॥

तं चानिलश्लेष्मभवं विकारं बृयात्‌ प्रतिश्यायसमानलिङ्गम्‌ ॥

पीनस हा विकार वातकफजन्य असून ह्यामुळे रोग्याचे नाक फुगते , वारंवार कोरडे पडते व वारंवार ओले होते आणि तापते ; तसेच त्यास सुगंध अथवा दुर्गंध यांचे व मधुर , आंबट वगैरे रसांच्या वासाचे ज्ञान होत नाही . त्यांची लक्षणे पडशासारखी असतात .

पूतिनस्यलक्षणें .

दोषैर्विवग्धैर्गलतालुमूले संमूर्च्छितो यस्य समीरणस्तु ॥

निरेति पूतिर्मुखनासिकाभ्यां तं पूतिनस्यां प्रवदन्ति रोगम्‌ ॥२॥

पूतिनस्य विकारात वायु रोग्याचा गळा व टाळू याच्या मुळाशी दुष्ट झालेल्या कफपित्तरक्ताशी मिश्रित होऊन त्यांच्या दुर्गंधासह नाक व तोंड या द्वारानी वाहू लागतो .

नासापाक लक्षणें .

घ्राणाश्रितं पित्तमरुंषि कुर्यात्‌ यस्मिन्विकारे बलवांश्च पाक : ॥

तं नासिकापाकमिति व्यवस्योद्विक्लेदकोथावथवाऽपि यत्र ॥३॥

नासापाकात नाक आतून पिकते व पित्त नाकात महिल्यामुळे बारीक व्रण पडून त्यातून नासकी लस वाहू लागते .

पूयरक्त लक्षणें .

दोषैर्विदग्धैरथवापि जन्तोर्ललाटदेशेऽभिहतस्य तैस्तै : ॥

नासा स्नवेत्पूयमसृग्विमिश्रं तं पूयरक्तं प्रवदन्ति रोगम्‌ ॥४॥

वातादि दोष दुष्ट झाले असता अथवा ललाटभागी आधात झाला असता नाकावाटे रक्तमिश्रित पू वाहतो त्या विकारास पूयरक्त म्हणावे .

क्षवथूचीं ( शिंकेचीं ) लक्षणें .

घ्राणाश्रिते मर्मणि संप्रदुष्टो यस्यानिलो नासिकया निरेति ॥

कफानुयातो बहुशोऽतिशब्दं तं रोगमाहु : क्षवथुं विधिज्ञा : ॥५॥

तीक्ष्णोपयोगदतिजिघ्रतो वा भावान्‌ कटूनर्कनिरीक्षणाद्वा ॥

सूत्रादिभिर्वतिरुणस्थिमर्मण्युद्धाटितेऽन्म : क्षवथुर्निरोति ॥६॥

घ्राणेंद्रियाच्या आश्रयाने असलेल्या मर्मस्थानी ( श्रृंगाटकर्माचे ठिकाणी ) दुष्ट झालेला वायु जेव्हा कफमिश्रित होऊन मोठा शब्द करीत नाकावाटे बाहेर पडतो तेव्हा त्या प्रकारास क्षवथु अथवा शिंक येणे असे म्हणतात . या क्षवथूचे दोषजन्य व आगंतुक असे दोन प्रकार आहेत ; पैकी पहिल्याची कारणे आरंभीच सांगितली आहेत . दुसर्‍या प्रकारचा क्षवथु तीक्ष्ण अथवा तिखट पदार्थ ओढल्यामुळे , सूर्याकडे पाहिल्यामुळे अथवा नाकात सूत वगैरे धातल्यामुळे तरुणास्थीचे मर्मस्थान क्षुब्ध होऊन होतो .

भ्रंशथुलक्षणें .

प्रभृश्यते नासिकया हि यस्य सान्द्रो विदग्धो लवण : कफश्च ॥

प्राक्संचितो मूर्धनि सूर्यतप्ते तं भ्रंशथुं व्याधिमुदाहरन्ति ॥७॥

उन्हामुळे डोके तापून पूर्वी साचलेला , घट्ट , नासका व खारट असा कफ नाकावाटे पडू लागला असता त्या नासारोगाला भ्रंशथु असे नाव देतात .

दीप्तलक्षणें .

घ्राणे भृशं दाहसमन्विते तु विनिश्चरेद्‌ धूम इवेह वायु : ॥

नासा प्रदीप्तेव च यस्य जन्तोर्व्याधिं तु तं दीप्तमुदाहरन्ति ॥८॥

नाकाच्या ठिकाणी दीप्तनामक जो विकार होत असतो त्यात नाकात अत्यंत आग होत असून त्यातून वाहणारा वायु धुराप्रमाणे भासतो व नाक जळत असल्याप्रमाणे वाटते .

प्रतिनाह .

उच्छ्‌वासमार्गं तु कफ : सवातो रुन्ध्यात्प्रतिनाहमुदाहरेत्तम्‌ ॥

जेव्हा नाकात प्रतीनाह नामक विकार उद्भवतो तेव्हा वायूशी मिश्रित झालेला कफ उच्छ्‌वास धेण्याच्या मार्गाचा रोघ करितो व त्यामुळे नाकाचा सूर चांगला वाहत नाही .

नासास्नाव .

घ्राणाद्धन पीतसितस्तनुर्वा दोष : स्नवेत्स्नावमुदाहरेत्तम्‌ ॥

नाकातून दाट अथवा पातळ व तसाच पिवळया अथवा पांढर्‍या वर्णाचा कक पडू लागला असता त्या विकारास नासास्त्राव म्हणतात .

नासापरिशोष लक्षणें .

घ्राणाश्रिते स्नोतसि मारुतेन गाढं प्रतप्ते परिशोषिते च ॥

कृच्छ्राच्छवसेदूर्ध्वमधश्च जन्तुर्यस्मिन्स नासापरिशोष उक्त : ॥

ज्या वेळी दूषित वायूमुळे नाकाची द्वारे अत्यंत तापून शुष्क होतात व रोगी मोठया कष्टाने खाली वर श्वास टाकतो तेव्हा त्यास नासापरिशोष झाला आहे म्हणून समजावे .

पीनसरोगाचीं आमपक्वलक्षणें .

शिरोगुरुत्वमरुचिर्नासास्नावस्तनु : स्वर : ॥

क्षाम : ष्ठीवेत्तथाऽभीक्ष्णमामपीनसलक्षणम्‌ ॥११॥

आमलिङ्गान्वत : श्लेष्मा घन : खेषु निमज्जति ॥

स्वरवर्णविशुद्धिश्च परिपक्वस्य लक्षणम्‌ ॥१२॥

नाकाचे ठिकाणी पीनरा म्हणून जो रोग उद्भवतो त्याचे अपक्व व पक्व असे दोन प्रकार आहेत . अपक्व पीनमात रोग्याचे मस्तक जड होते , तोंडास चव नसते , स्राव पातळ असतो . रोगी वरचेवर शिंकरतो आणि त्याचा आवाज बारीक होतो व पक्व पीनसात अपक्व पीनसातील पातळ कफ घट्टा होऊन नाकाच्या भोकात राहतो व त्याचा स्वर व वर्ण हे पूर्वींसारखे होतात .

प्रतिश्यायाचीं कारणें . संप्राप्ति व प्रकार .

सन्धारणाजीर्णरजोतिभाष्यक्रोधर्तुवैषम्यशिरोऽभितापै : ॥

प्रजागरस्वपनास्वुशीतैरवश्यायकैमैंथुनबाप्पसेकै : ॥१३॥

संस्त्यानदोषे शिरसि प्रवृद्धो वायु : प्रतिश्यायमुदीरयेतु ॥

चयं गता मूर्द्धनि मारुतादय : पृथक समस्ताश्च तथैव शोणितम ॥

प्रकुप्यमाना विविधै : प्रकोपनस्तत : प्रतिश्यायकरा भवन्ति ॥१४॥

मलमूत्रादिकांचा अवरोध , अर्जार्ण , जागरण , स्रीसंग , पुष्कळ भाषण , क्रोध , दिवसा निद्रा , नाकांत धूळ जाणे , डोके तापणे , फार वेळ अश्रु ढाळणे , नवे पाणी पिणे अथवा त्याने स्नान करणे , थंडीत राहणे , अंगावर दव पडणे आणि ऋतूचा पालट होणे हीं कारणे तात्काळ प्रतिश्याय अथवा पडसे उत्पन्न करणारी जाणावी . जेव्हा मस्तकामध्ये तिन्ही दोष पृथक पृथक अथवा मिश्रित होऊन साचतात व रक्तही साचून राहते तेव्हां त्यांचा अनेक कारणांनी प्रकोप होऊन या विकाराचा उद्भव होतो . याचे वातजन्य , पित्तजन्य , कफजन्य , सान्निपातिक व रक्तजन्य असे पाच प्रकार असून खेरीज या पाचांचाहि दुष्ट प्रतिश्याय म्हणून एक अवस्थाभेद सांगितलेला आहे .

प्रतिश्यायाचें पूर्वरूप .

क्षवप्रवृत्ति : शिरसोऽतिपूर्णता स्तम्भोऽङ्गमर्द : परिहृष्टरोमता ॥

उपद्रव श्चाप्यपरे पृथग्विधा नृणां प्रतिश्यायपुर : सरा : स्मृता : ॥

प्रतिश्याय होण्याच्या अथवा पडसे येण्याच्यापूर्वी डोके जड होते , अंग ताठते , स्यावर रोमांच उद्भवतात ; व तो मोडून आल्यासारखे वाटते आणि शिंका येतात . आणखीही निरनिराळे उपद्रव होतात .

वातजन्य प्रतिश्यायाचीं लक्षणे .

आनद्धा पिहिता नासा तनुस्नावप्रसेकिनी ॥

गलताल्वोष्ठशोषश्च निस्तोद : शङ्खयोरपि ॥

भवेत्‌ स्वरोपघातश्च प्रतिश्यायेऽनिलात्मजे ॥१६॥

वायूपासून उद्भवलेल्या पडशाची लक्षणे - नाक चोंदणे , जखडणे व त्यांतून पाणी गळणे ; कानशील ठणकणे , घसा , टाळू आणि ओठ यांचे ठिकाणी कोरड पडणे व आवाज बसणे याप्रमाणे असतात .

पित्तजन्य प्रतिश्यायाचीं लक्षणें .

उष्प : सपीतक : स्नावो घ्राणात्स्रवति पैत्तिके ॥

कृशोऽतिपाण्डु : संतप्तो भवेदुष्णाभिपीडित : ॥

सधूममग्निं सहसा वमतीव च नासया ॥१७॥

पित्तापासून येणार्‍या पडशाची लक्षणे अशी असतात की , रोग्याच्या नाकावाट पिवळया वर्णाचा व कढत असा स्राव होऊ लागून त्यामुळे तो कृश होतो व अतिशय फिका पडतो ; तसेच त्यास उष्ण पदार्थांपासून त्रास व आपल्या नाकातून धुगसह अग्नि निघालासा वाटतो .

कफजन्य प्रतिश्यायाचीं लक्षणें .

घ्राणात्कफ : कफकृते श्वेत : पीत : स्रवेद्वहु : ॥

शुक्लावभास : शूनाक्षो भवेद्‌ गुरुशिरा नर : ॥

कण्ठताल्वोष्ठशिरसां कण्डूरभिपीडित : ॥१८॥

कफापासून पडसे आले असता रोग्याचे डोके जड होते , त्याचा घसा , टाळू व ओठ व डोके यांच्या ठिकाणी कंड सुटते ; डोळे सुजतात व त्याप्रमाणे नाकावाटे पांढर्‍या वर्णाचा व थंड अशा कफाचा अत्यंत स्राव होतो व तो पांढरा फटफटीत पडतो .

सान्निपातिक प्रतिश्याय .

भूत्वा भूत्वा प्रतिश्यायो यस्याकस्मान्निवर्तते ॥

संपक्वो वाप्यपक्वो वा स तु सर्वभव : स्मृत : ॥१९॥

वात , पित्त व कफ या तिन्ही दोषांपासून जे पडसे येते ते पुन : पुन : येत असते व पिकून अथवा पिकल्यावाचून अकस्मात्‌ नाहीसे होते .

रक्तजन्य प्रतिश्याय .

रक्तजे तु प्रतिश्याये रक्तस्नाव : प्रवर्तते ॥

ताम्राक्षश्च भवेज्जन्तुरूरोघातप्रपीडित : ॥

दुर्गन्धोच्वाछसवदनो गन्धानपि न वेत्ति स : ॥२०॥

रक्तदोषापासून पडसे उद्भवल्यामुळे नाकावाटे रक्तस्राव होतो ; डोळे लाल पडतात , वास ओळखता येत नाही ; तोंड व उच्छवास यांना घाण येते व उरात वेदना होतात .

दुष्ट प्रतिश्यायाचीं लक्षणें .

प्रक्लिद्यते पुनर्नासा पुनश्च परिशुष्यति ॥

पुनरानह्यते चापि पुनर्विव्रीयते तथा ॥२१॥

नि : श्वासो वाऽतिदुर्गन्धो नरो गन्धं न वेत्ति च ॥

एवं दुष्टप्रतिश्यायं जानीयात्‌ कृच्छ्रसाधनम्‌ ॥२२॥

दुष्ट प्रतिश्याय हा काही पडशाचा स्वतंत्र प्रकार नसून वर सांगितलेल्या पाच प्रक्रारांचीच एक अवस्था आहे . यात नाक वारंवार ओले होते व वारंवार कोरडे पडते ; पुन : पुन : चोंदते व पुन : पुन : मोफळे होते ; आणि श्वासाला घाण येते आणि कोणत्याहि वासाचे ज्ञान होत नाही ; या प्रकारचा हा दुष्ट प्रतिश्याय कष्टसाभ्य जाणावा .

प्रतिश्यायाचीं असाध्य लक्षणें .

सर्व एव प्रतिश्याया नरस्याप्रतिकारिण : ॥

दुष्टतां यान्ति कालेन तदाऽसाध्या भवन्ति च ॥२३॥

मूर्च्छन्ति कृमयश्चात्र श्वेता स्निग्धास्तथाऽणव : ॥

कृमिजो य : शिरोरोगस्तुल्यं तेनास्य लक्षणम्‌ ॥२४॥

बाधिर्यमान्ध्यमघ्रत्वं घोरांश्च नयनामयान्‌ ॥

शोथाग्निसादकासादीन्‌ वृद्धा : कुर्वन्ति पीनसा : ॥

सर्व प्रकारचे प्रतिश्याय , ते उत्पन्न होताक्षणी त्यावर औषधोपचार न केले असता कालांतराने द्ष्ट होऊन असाध्य होतात . त्यांत नाकामध्ये बारीक , स्निग्ध व पांढर्‍या वर्णाचे कृमि उत्पन्न होऊन त्यामुळे पुढे सांगितलेल्या कृमिजन्य शिरोरोगाच्या लक्षणासारखी लक्षणे उद्भवतात व याशिवाय हेच विकार व पीनस अत्यंत जोरावले तर कानांनी ऐकूं न येणे , सूज , व अग्निमांद्य व खोकला उद्भवणे , नेत्ररोग होणे , वास न कळणे व द्दष्टि जाणेता प्रकारच त्याचे परिणाम द्दष्टीस पडतात .

इतर प्रकारचे नासारोग .

अर्बुदं सप्तधा शोथाश्चत्वारोऽर्शश्चतुर्विधम्‌ ॥

चतुर्विधं रक्ततित्तमुक्तं घ्राणेऽपि तद्वैदै : ॥२५॥

नाकासंबंधी होणारे सर्व रोग येणे संपले . तथापि कित्येक वैद्यांनी त्यांची संख्या याहून अधिक सांगितली आहे व तिजमध्ये सात प्रकारची अर्बुदे , चार प्रकारचे शोय , चार प्रकारचे अर्श व चार प्रकारचे रक्तपित्त , यांचा समावेश केला आहे , तथापि त्या प्रकारच्या नासारोगाची लक्षणे मागे सांगितलेल्या त्याच जातीच्या रोगाशी समान्‌ असल्यामुळे ती येथे आम्ही निराळी देण्याचे कारण नाही ; जिज्ञासूंनी त्याच ठिकाणी पाहून समजून घ्यावी .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-06-24T13:49:46.3330000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

हकारणें

  • v t  Put off; set off; call to. Hoist. 
  • हाकाटणें , हाकाटा इ० पहा . [ हांक ] 
RANDOM WORD

Did you know?

Why are you transliterating?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.