संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
अर्शोनिदान

माधवनिदान - अर्शोनिदान

" शरिरेंद्रिय- सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


अर्शाचे प्रकार .

पृथग्दोषै : समस्तैश्व शोणितात्सहजानि च ॥

अर्शांसि षट्‌प्रकाराणि विद्याद्‌गुदवलित्रये ॥१॥

वात , पित्त व कफ या तीन दोषांपासून पृथक्‌ पथक उत्पन्न होणारे तीन , तिन्ही दोष मिळून होणारा एक , रक्तजन्य एक आणि जन्मत : च असणारा एक मिळून एकंदर अर्श ( मूळव्याध ) रोगाचे सहा प्रकार आहेत , ते गुदद्वाराच्या तिन्ही वळयांवर उत्पन्न१ होतात .

अर्शाची संप्राप्ति .

दोषास्त्वङमांसमेदांसि सन्दूष्य विविधाकृतीन्‌ ॥

मांसाङकुरानपानादौ कुर्वन्त्यर्शांसि तान्‌ जगु : ॥२॥

वातादि दोष त्वचा , मांस , मेद दूषित करून गुदद्वाराच्या जागी नाना प्रकारच्या आकृतीचे जे मोड उत्पन्न करतात त्यास अर्श म्हणतात . अशा प्रकारचे मोड कधी कधी इतरत्र कानांत व शिश्रावरहि उत्पन्न होतात .

वातार्शाचीं कारणें .

कषायकटुतिक्तानि रुक्षशीतलवूनि च ॥

प्रमिताल्पाशनं तीक्ष्णं मद्यं मैथुनसेवनम्‌ ॥३॥

लङघनं देशकालौ च शीतौ व्यायामकर्म च ॥

शोको वातातपस्पर्शो हेतुर्वातार्शसां मत : ॥४॥

तुरट , तिखट , कडू , रूक्ष , हलके , नि : सस्न व थंड पदार्थ सेवन केल्याने , उशीरां जेवल्याने , थोडे जेवल्याने , कडक मद्य प्याल्याने , श्रम , उपास व शोक केल्याने व स्त्रीसंग केल्याने , तसेच थंड देश व थंड ऋतु यांत राहिल्याने आणि उन्हांत व वार्‍यांत हिंडल्याने वातजन्य अर्श उत्पन होतात .

पित्तार्शाचीं कारणें .

कट्‌वम्ललवणोष्णानि व्यायामाग्न्यातपश्रमा : ॥

देशकालावशिशिरौ क्रोधो मद्यमसूयनम्‌ ॥५॥

विदाहि तीक्ष्णमुप्णं च सर्वं पानान्नभेषजम्‌ ॥

पित्तोल्बणांनां विशेय : प्रकोपे हेतुरर्शसाम्‌ ॥६॥

तिखट , आंबट , खारट , व उष्ण पदार्थ खाल्लयाने व्यायाम व श्रम केल्यानें शेक व उन्ह घेतल्याने , राग आल्यानें व मद्यपान केल्याने असूया उत्पन्न होऊन विदाही तीक्ष्ण उष्ण पेय , अन्न व औषधे घेणे यामुळे पित्ताधिक्य होऊन तजन्न अर्श उत्पन्न होतात .

कफार्शाचीं कारणें .

मधुरस्निग्धशीतानि लवणाम्लगुरुणि चा ॥

अव्यायामदिवास्वप्नशय्यासनसुखे रति : ॥७॥

प्राग्वातसेवाशीतौ च देशकालावचिन्तनम्‌ ॥

श्लेष्मोल्बणानामुद्दिष्टमेतत्कारणमर्शसाम्‌ ॥८॥

गोड , स्निग्घ , थंड , खारट , आंबट व जड पदार्थ खाल्लयानें , व्यायाम न केल्याने दिवसा निद्रा घेतल्याने , मऊ गादीवर निजल्याची व मऊ आसनावर बसण्याची संवय लागल्यानें , निष्काळजी राहिल्यानें , पहाटे पूवेंकडील गार वारा अंगास लागल्याने आणि थंड देशांत व थंड कालात राहिल्यानें कफ प्रकोप होऊन तजन्य अर्शांची उत्पत्ति होतें .

हेतुलक्षणसंसर्गाद्विद्याद्‌द्वन्द्वोबल्णानि च ॥

सर्वो हेतुस्त्रिदोषाणाम लक्षणं सहजै . समम्‌ ॥९॥

वात , पित्त व कफ या दोषांपासून उत्पन्न होणार्‍या अर्शांचा जी पृथक्‌ पृथक्‌ कारणे वर सांगितली त्यांपैकी दोन दोन दोषांची कारणे व लक्षणे असली म्हणजे त्यास द्वंद्वजार्श ( दोन दोन दोषांपसून होणारी मूळव्याध ) म्हणतात . आणि तिन्ही दोषांची कारणे ( पुढे सांगितलेली ) असलेल्या अर्शांची लक्षणे एकत्र जुळली म्हणजे त्यास सन्निपातार्श म्हणतात . त्यांची लक्षणे जन्मत : असणार्‍या अर्शासारखी असतात .

वातार्शाचीं लक्षणें .

गुदाङकुरा बव्हनिला : शुष्काश्चिमिचिमान्विता : ।

म्लाना : श्यावारूणा : स्तब्धा विशदा : परुषा : खरा : ॥१०॥

मिथो विसदृशा वक्रास्तीक्ष्णा विस्फुटितानना : ॥

बिम्बीकर्कन्धुखर्जूरकार्पासीफलसन्निभा : ॥११॥

केचित्कदम्बपुष्पाभा : केचित्सिदार्थकोपमा : ॥

शिरा : पार्श्वासकटयूरुवङक्षणाब्यधिकव्यथा : ॥१२॥

क्षवथूद्नारविष्टम्भहृदग्रहारोचकप्रदा : ॥

कासश्वासाग्निवैषम्यकर्णनादभ्रमावहा : ॥१३॥

तैरार्तो ग्रथितं स्तोकं सशब्दं सप्रवाहिकम्‌ ॥

रुक्केनपिच्छानुगतं विबद्धमुपवेश्यते ॥१४॥

कृष्णत्वङनखविण्मूत्रनेत्रवक्त्रश्च जायते ॥

गुल्मप्लीहोदराष्ठीलासंभवस्तत एव च ॥१५॥

वातप्रकोपामुळे गुदद्वाराचे ठिकाणी उत्पन्न झालेले अर्श ( मोड ) सुके ( स्त्राव न करणारे ) निर्जीव , काळसर तांबुस , ताठ , स्वच्छ , खरखरीत , विषम ( एकसारखे नसणारे ), अणकुचीदार वाकडे असून त्यांची तोंडे मंगलेली असतात ; त्या सर्वांचे आकार सारखे नसतात ; कित्येक तोंडली , बोरे , खारका , व कपाशीची बोंडे यासारखे ; कित्येक कळंबाच्या फुलासारखे जाड , बारीक , व पुष्कळ टोंके असलेले आणि कित्येक तर मोहर्‍याप्रमाणे बारीक असतात . ते सर्व मोड बुळबुळीत नसून चिमचिम ( ठणक्याचा एक प्रकार ) करणारे असतात व हे अर्श झाल्यामुळे रोग्याचे डोके , बरगडया , खांदे , कंबर , मांडया व जांगाडे दुखणे , कानांत गुदगुद शब्द होणे , चक्कर येणे , छातीत कळ निघणे ; त्याचप्रमाणे विषमान्नि ( कधी अन्नपचन चांगले होणे व कधी न होणे ), अरुचि , मलाबरोध , शिंका , ढेकर , आग्नि वैषम्य , श्वास व खोकला ही लक्षणे होतात . शिवाय त्याचा मळ पडतो तो दगडासारखा कठीण , फार कुंथून अडकल अडकत पडलेला आणि शब्द , वेदना , फेस व चिकटा यांनी युक्त असतो . रोग्याची त्वचा , मळमूत्र , डोळे , तोंड , डोके व नखे ही काळी होतात . याच अर्शापासून पुढे गुल्म , प्लीहा , उदर व वायुगोळा हे उपद्रव उत्पन्न होतात .

पित्तार्शाचीं लक्षणें

पित्तोत्तरा नीलमुखा रक्तपीतासितप्रभा : ॥

तन्वस्नस्नाविणो विस्नास्तनवो मृदव : श्लथा : ॥१६॥

शुकजिव्हायकृत्‌खण्डजलौकावक्त्रसन्निभा : ॥

दाहपाकज्वरस्वेदतृण्मूर्च्छारुचिमोहदा : ॥१७॥

सोप्माणो द्रवनीलोप्णपीतरकामवर्चस : ॥

यवमध्या हरित्पीतहारिद्रत्वङनखादय : ॥१८॥

पित्तप्रकोपामुळे उत्पन्न झालेल्या अर्शाची टोके निळी व रंग तांबडा , पिवळा व काळा असून त्यांतून पातळ रक्तसव होतो व त्यास आंबुस घाण मारते . त्यांचे आकार य़कृत्‌ , जळवांची तोंडे व पोपटांच्या जिभा यासारखे भिन्न असून ते लहान , मऊ , शिथिल व मध्ये जवासारखे जाड असतात आणि हात लावला असता कढत लागतात . हे मोड झाल्यामुळे रोग्याचे गुदद्वार पिकते व त्याची आग होते ; शिवाय दाह , पिकणे , ज्वर , घाम , अरुचि , तहान , मूर्च्छा आणि बेशुद्धि ही लक्षणे त्याचे ठायी उत्पन्न होतात . तसेच त्यास पिवळा , निळा , तांबडा , पातळ व ऊन असा मळ पडतो व त्याची त्वचा , डोळे व नखे ही हिरवट , पिवळट किंवा हळदीसारखी पिवळया रंगाची होतात .

कफार्शाचीं लक्षणें .

श्लेष्मोल्वणा महामूला घना मन्दरुज : सिता : ॥

उत्सन्नोपचित्ता : स्निग्धा : स्तब्धा वृत्तगुरूस्थिरा : ॥१९॥

पिच्छिला : स्तिमिता : श्लक्ष्णा : कण्डवाढया : स्पर्शनप्रिया : ॥

करीरपनसास्थ्याभास्तथा गोस्तनसन्निभा : ॥२०॥

वङक्षणानाहिन : पायुबस्तिनाभिविकर्षिंण : ॥

सश्वासकाहृल्लासप्रसेकारुचिपीनसा : ॥२१॥

मेहकृच्छ्रशिरोजाडयशिशिरज्वरकारिण : ॥

क्लैब्याग्निमार्दवच्छर्दिरामप्रायविकारदा : ॥२२॥

वसाभसकफप्राज्यपुरीषा : सप्रवाहिका : ।

न स्रवन्ति न भिद्यन्ते पाण्डुस्निग्धत्वगादय : ॥२३॥

कफाधिक्यामुळे जे मोड उत्पन्न होतात त्यांची मुळे खोल गेलेली असून ते कठिण , लांबट , कमी पीडाकारक , पांढरे , वर उठून पुष्ट , तुळतुळीत , गुळगुळीत व बुळबुळीत , ताठर असतात . अतिखाज व स्पर्शं केला तर बरे वाटणारे असतात . तसेच त्यांचे आकार गाईच्या सडासारखे . नेपतीच्या फाळासारखे किंवा फणसाच्या आठोळीसारखे असून त्यांपासून पीडा कमी होते . पण जांगाड , गुदद्वार , बस्ति आणि नाभी यांस ओढ लागते , हे मोड उत्पन्न झाले असता श्वास , कास उम्हासे , मेह , मूत्रकृच्छ , मळमळ , पोट फुगतें , ओकारी , अग्निमांद्य , नपुंसकत्व , शीतज्वर आणि त्याचप्रमाणे लाळ गळणे , पडसे येणे , तोंडास चव नसणे व डोके जड होणे ही लक्षणे होतात . ह्या मोडांतून लसरक्तादिकांचा स्राव होत नाही व हे फुटत नाहीत ; यापासून आमबहुल अतिसार व प्रवाहिका हे रोग

होतात व त्यांत कफ व वसा यांनी मिश्रित असा पुष्कळ मळ पडतो . हे ( कफार्श ) उत्पन्न झालेल्या रोग्याची त्वचा , नखे व डोळे वगैरे इंद्रिये पांढरी व तुळतुळीत होतात .

सर्वै : सर्वात्मकान्याहुर्लक्षणै : सहजानि च ॥

वर जी वात , कफ व पित्त या दोषाधिक्यापासून उत्पन्न होणार्‍या अर्शाची लक्षणे पृथक्‌ पृथक्‌ सांगितली आहेत ती सर्व लक्षणे ज्या अर्शांत एकत्र मिळतात ते सन्निपातजन्य अर्श जाणावे . त्याचप्रमाणे उपजत अर्शहि त्रिदोषाच्याच प्रकोपासून उत्पन्न होणारे असल्यामुळे तेहि त्याच प्रकारच्या लक्षणांवरून ओळखावे .

रक्तार्शाचीं लक्षणें .

रक्तोल्बणा गुदेकीला : पित्ताकृतिसमन्विता : ॥२४॥

वटप्ररोहसद्दशा गुञ्जाविद्रमसन्निभा : ॥

तेऽत्यर्थं दुष्टमुष्णं च गाढविट्‌कप्रप्रीडिता : ॥२५॥

स्नवन्ति सहसा रक्तं तस्य चातिप्रवृत्तित :

भेकाभ : पीडयते दुःखै : शोणितक्षयसम्भवै : ॥२६॥

हीनवर्णबलोत्साहो हतौजा : कलुषेन्द्रिय : ॥

विट्‌श्यावं कठिनं रुक्षमधोवायुर्न गच्छति ॥२७॥

रक्तदोषजन्य अर्श पित्तार्शांच्याच लक्षणांनीं युक्त असून त्यांचे आकार वडाचे अंकुर , पोवळयांच्या कांडया किंवा गुंजा यांच्यासारखे असतात . ते कठिण , मळाच्या जोराने दाबले गेले असतां त्यांतून दूषित व उष्ण रक्त फार गळते . असे रक्त फार गळले तर त्यामुळे रोग्याच्या शरीराचा वर्ण बेडकासारखा पिवळा पडून ते रक्तक्षयामुळे रुक्ष व शिथिल होते तसाच त्या रोग्याचा उत्साह , कांति व सामर्थ्य नष्ट होऊन डोळे गढूळ व सर्व इंद्रिये व्याकूळ होतात . त्याला शौच्याचे वेळी काळा , कठिण व रूक्ष असा मळ पडतो आणि अपान वायूचा अवरोध होतो .

वाताधिक रक्तार्शाचीं लक्षणें .

तनु चारूणवर्णं च फेनिलं चासृगर्शसाम्‌ ॥

कटयूरूगुदशूलं च दौर्बल्यं यदि चाधिकम्‌ ॥२८॥

तत्रानुबन्धो वातस्य हेतुर्यदि च रूक्षणम्‌ ॥

ज्या रक्तार्शातून पातळ , तांबडे व फेसाळलेले रक्त पडते आणि त्यामुळे गुदद्वार कंबार व मांडया यांचे ठिकाणी वेदना होते ; तसेच ज्यांत रोग्याकडून रूक्ष पदार्थ सेवनाचे अपथ्य झाले असून त्याची शक्ति अगदी क्षीण होते , त्या रक्तार्शात वाताचा प्रकोप झाला आहे असे समजावे .

कफादिक रक्तार्शाचीं . लक्षणें .

शिथिलं श्वेतपीतं च विट्‍ स्निग्धं गुरूशीतलम्‌ ॥

यद्यर्शसां घनं चासृक्‌ तन्तुमत्पाण्डुपिच्छिलम्‌ ॥२९॥

गुदं सपिच्छं स्तिमितं गुरुरिनग्धं च कारणम्‌ ॥

श्लेष्मानुबन्धो विज्ञेयस्तत्र रक्तार्शसां बुधै : ॥३०॥

ज्या रक्तार्शातून दाट , तंतुमिश्रित , पांढरे व बुळबुळीत रक्त पडते ; आणि रोग्याचे गुदद्वार दडस व बुळबळीत होऊन त्यावटे शिथिल . थंड , स्निग्ध , पांढरा किंवा पिवळा आणि जड असा मळ पडतो , तसेच रोग्याकडून जड व स्निग्ध पदार्थाच्या सेवनाचे अपथ्य हे ज्याचे कारण असते , त्यांत ( रक्तार्शांत ) कफाचा प्रकोप झाला असला पाहिजे असे म्हणावे .

( वात - कफांच्या प्रकोपाने होणार्‍या रक्तार्शाप्रमाणे क्रमाने पित्तप्रकोपासून होणार्‍या रक्तार्शांची लक्षणे येथे सांगितली पाहिजेत , परंतु पित्ताची व रक्ताची लक्षणे सारखी असल्यामुळे जी पित्तार्शाची तीच त्याची लक्षणे असतात . म्हणून ती येथे निराळी सांगितली नाहीत .)

अर्शांचीं पूर्वरूपें .

विष्टम्भोऽन्नस्य दौर्बल्यं कुक्षेराटोप एव च ॥

कार्श्यमुद्नारबाहुल्यं सक्थिसादोऽल्पविट्‌कता ॥३१॥

ग्रहणीदोषपाण्डवर्तेराशङका चोदरस्य च ॥

पूर्वरूपाणि निर्दिष्टान्यर्शसामभिवृद्धये ॥३२॥

अर्थ उत्पन्न होण्यापूर्वी , अन्नपचन होतांना अवष्टंभ होणे , शक्ति क्षीण होणें , शरीर कृश होणे , कुशीत गुडगुड शब्द होणे , पुष्कळ ढेकर येणे , मलोत्सर्ग थोडा होणे व मांडया गळून जाणे ही लक्षणे रोग्याच्या ठायी उत्पन्न होतात व त्यास ग्रहणी , पांडुरोग आणि उदर हे ( त्या रोग्यांच्या सारख्या लक्षणावरून ) झाल्याची शंका येते .

अर्श बरे न होण्याचीं कारणें

पश्चात्मा मारुत : पित्तं कफो गुदवलित्रये ॥

सर्व एव प्रकुप्यन्ति गुदजानां समुद्भवे ॥३३॥

तस्मादर्शांसि दुःखानि बहुव्याधिकराणि च ॥

सर्वदेहोपतापीनि प्राय : कृच्छ्रतमानि च ॥३४॥

गुदद्वाराच्या तिन्ही वळ्यांवर अर्श उत्पन्न होत असतां पांच प्रकारचा वायु , १ पांच प्रकारचे पित्त२ व त्याचप्रमाणे पांच प्रकारचा कफ३ हे तिन्ही दोष आपापल्या पांच पांच रूपांनी प्रकुपित होतात ; म्हणून हा अर्शरोग बहुधा रोग्यास पीडा देणारा , त्याच्या शरीराचे ठायी दुसरे अनेक रोग उत्पन्न करणारा आणि महाप्रयासाने बरा होणारा असतो .

अर्शांचीं साध्यासाध्य लक्षणें .

बाह्यायां तु वलौ जातान्येकदोषोल्बणानि च ॥

अर्शांसि सुखसाध्यानि न चिरोत्पतितानि च ॥३५॥

द्वन्द्वजानि द्वितीयायां वलौ यान्याश्रितानि च ॥

कृच्छ्रसाध्यानि तान्याहु : परिसंवत्सराणि च ॥३६॥

सहजानि त्रिदोषाणि यानि चाभ्यन्तरां वलिम्‌ ॥

जायन्तेऽर्शांसि संश्रित्य तान्यसाध्यानि निर्दिशेत्‌ ॥३७॥

हस्ते पादे गुदे नाभ्यां मुखे वृषणयोस्तथा ॥

शोथो हृत्पार्श्वशूलं च तस्यासाध्योऽर्शसो हि स : ॥३८॥

ह्रत्पार्श्वशूलं सम्मोहश्छर्दिरङ्गस्य रुक्‌ ज्वर : ॥

तृष्णा गुदस्य पाकश्च निहन्युर्गदजातुरम्‌ ॥३९॥

तृष्णारोचकशूलार्तमतिप्रसृतशोणितम्‌ ॥

शोथातिसारसंयुक्तमर्शांसि क्षपयन्ति हि ॥४०॥

शेषत्वादायुषस्तानि चतुष्पादसमन्विते ॥

याप्यन्ते दीप्तकायाग्नौ प्रत्याख्येयान्यतोऽन्यथा ॥४१॥

जे उत्पन्न होऊन एक वर्ष झाले नाही असे बाहेरच्या वळीवरचे व एकदोषात्मक अर्श बरे करण्यास साध्य जाणावे . आणि जे उत्पन्न होऊन एक वर्षावर दिवस झाले असून जे दोन दोन दोषांपासून दुसर्‍या वळीवर उत्पन्न झालेले असतात ते अर्श कष्टसाध्य समजावे . याशिवाय रोग्याच्या जन्माबरोबरच त्रिदोषापासून आतल्या वळीवर उत्पन्न झालेले अर्श असाध्य होत . त्याचप्रमाणे ज्या अर्शरोगात रोग्याचे हात , पाय , नाभि , तोंड , वृषण आणि गुदद्वार यांचे ठायी सूज येते आणि त्याचे ह्रदय व पार्श्वभाग यांत वेदना होतात . तो कधी बरा होत नाही . तसेच ह्रदय , पार्श्वभाग आणि शरीराचा दुसरा कोणताहि भाग यांत वेदना होत असणे , रोग्यास मूर्च्छा , ओकारी , ज्वर येणे व तहान लागणे , आणि त्याच्या गुदद्धारावर पिवळे फोड येणे ही अर्श लक्षणे जे अर्श उत्पन्न करतात ते असाध्य जाणावे . याप्रमाणेच ज्या अर्शामुळे तहान , अरुचि व वेदना यांनी रोगी पीडित होतो , ज्यांतून रक्तस्राव पुष्कळ होतो आणि ज्यांत सूज व अतिसार हे उत्पन्न होतात त्यापासून रोगी निश्चयाने मरणार म्हणून समजावे . आतां वर सांगितल्याप्रमाणे असाध्य अर्शरोग झाला असूनहि रोग्याच्या आयुष्याची दोरी बळकट असेल व त्यापाशी चतुष्याद संपत्ति असून त्याचा जठराग्नि प्रदीप्त असेल तर त्याचे ठायी हा अर्शरोग याप्य ( औषध व पथ्य जोंपर्यंत द्यावे तोंपर्यंत बरा होणारा ) होतो , तसे बसेल तर त्याची अशा सोडावी .

इतर ठिकाणीं होणारे अर्श .

मेढ्रादिष्वपि वक्ष्यन्ते यथास्वं नाभिजान्यपि

गण्डूपदास्यरूपाणि पिच्छिलानि मृदूनि च ॥४२॥

शिश्न , नाभि , ( नाक , कान वगैरे ) यांच्या ठायीहि वातादि दोषांच्या प्रकोपानें अर्श ( मोड ) उत्पन्न होतात व ते गांडूळाच्या तोंडासारखे , मऊ आणि बुळबुळीत असतात . त्याविषयी विशेष माहिती पुढे सांगितली आहे .

चर्मकीलांची संप्राप्ति व लक्षणें .

व्यानो गृहीत्वा श्लेष्माणं करात्यर्शस्त्वचो बहि : ॥

कीलोपमं स्थिरखरं चर्मकीलं तु तद्विदु : ॥४३॥

वातेन तोदपारुष्ये पित्तादसितरक्तता ॥

श्लेष्मणा स्निग्धता चास्य ग्रथितत्वं सवर्णतता ॥४४॥

व्यानवायु कफाच्या साहाय्याने रोग्याच्या त्वचेवर जो मोड उत्पन्न करतो त्यास चर्मकील ( चामखीळ ) म्हणतात . तो घट्ट व खरखरीत असतो . वाय़ूच्या प्रकोपाने त्याच्या ठायी सुया टोचल्याप्रमाणे वेदना होते , पित्तामुळे त्वचेला काळसर व तांबडा रंग येतो आणि कफाने त्यास तुळतुळीतपणा व गाठी येऊन त्यांचा रंग त्वचेसारखाच राहतो .

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP