TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
अजीर्णनिदान

माधवनिदान - अजीर्णनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


अजीर्णनिदान

अजीर्णाचे प्रकार .

आमं विदग्धं विष्टब्धं कफपित्तानिलौस्त्रिभि : ।

अजीर्णं केचिदिच्छन्ति चतुर्थं रसशेषत : ॥१॥

अजीर्णं पञ्चमं केचिन्निर्दोषं दिनपाकि च ॥

वदन्ति षष्ठं चाजीर्णं प्राकृतं प्रतिवासरम्‌ ॥२॥

वात , पित्त आणि कफ या त्रिदोषांच्या प्रकोपापासून विष्टब्धाजीर्ण ( अन्न कोंडून राहिल्यामुळे होणारे अजीर्ण ), विदग्धाजीर्ण ( करपटलेले अजीर्ण ), व आमाजीर्ण ( अपक्व अन्न राहिल्यामुळे होणारे अजीर्ण ) या क्रमाने होणारे तीन व रसशेषाजीर्ण ( खाल्लेल्या अन्नाचा रसांश फाजील शिल्लक राहिल्यामुळे होणारे अजीर्ण ) एक , मिळून अजीर्णाचे मुख्य चार प्रकार आहेत . याशिवाय कित्येक ( वैद्य ) निर्दोषाजीर्ण ( जे खाल्लेले अन्न पचवावयास एक अहोरात्र ( रात्र व दिवस ) लागते पण त्यांत पोट फुगणे वगैरे कोणताहि विकार होत नाही ते तितका वेळ असणारे अजीर्ण ) व प्राकृताजीर्ण ( रोज स्वाभाविक होणारे अजीर्ण ) असे त्याचे आणखी दोन प्रकार मानतात , मिळून अर्जीर्णाचे सहा प्रकार जाणावे .

अजीर्णाचीं कारणें

अत्यम्बुपानाद्विषमाशनाच्च

संधारणात्स्वप्नविपर्ययाच्च ॥

कालेऽपि सात्म्यं लघु चापि भुक्त -

मन्नं न पाकं भजते नास्य ॥३॥

ईर्ष्याभयक्रोधपरिप्लुतेन लुब्धेन शुग्दैन्यनिपीडितेन ॥

प्रद्वेषयुक्तेन च सेव्यमानमन्नं न सम्यक्‌ परिपाकमेति ॥४॥

वेळेवारीर न जेवल्याने , पाणी फारष्ययल्यामुळे , अवेळी घेतल्यामुळे व मलमूत्रा दिकांचा अवरोध वेल्यामुळे जरी जेवतांना हलके व सोसणारे अन्न खाल्ले असले तरी ते चांगले न पचून अजीर्ण होते , तसेच चिळस उत्पन्न करणार्‍या पदार्थमक्षणाने अजीर्ण होते . या शिवाय ज्या रोग्याच्या ठायी ईर्ध्या , भय , राग , लोभ हे मनोविकार असून तो शोक व दैन्य यांनी ग्रासलेला असतो , त्याने खाल्लया अन्नाचे चांगले पचन न होऊन अजीर्ण उत्पन्न होते .

आमाजीर्णाचीं लक्षणें .

तत्रामे गुरुतोत्क्लेद : शोथो गण्डाक्षिकूटग : ॥

उद्नारश्च यथाभुक्तमविदग्ध : प्रवर्तते ॥५॥

अंगाला जडपणा येणे , मळमळ सुटणे , गाल व डोळे यांच्या ठायी सूज येणे व खाल्लेल्या अन्नाच्या वासाचा करपट नसलेला ढेकर येणे ही लक्षणे ( कफप्रकोपामुळे होणार्‍या ) आमार्जार्णाची जाणावी .

विदग्धाजीर्णाचीं लक्षणें .

भ्रमतृण्मूर्च्छा : पित्ताच्च विविधा रुज : ॥

उद्नारश्च सधूमाम्ल : रवेदो दाहश्च जायते ॥६॥

पित्तजन्य विदग्धाजीर्णांत पित्तामुळे ( घशात जळजळणे व चुरचुरणे वगैरे ) होणारे अनेक विकार होऊन धुरकट व आंबट असा ढेकर येतो , अंगाचा दाह होतो व त्यास घाम सुटतो . त्याशिवाय चक्कर , मूर्च्छा आणि तहान ही लक्षणे रोग्याच्या ठायी उत्पन्न होतात .

विष्टब्धाजीर्णाची लक्षणें .

विष्टब्धे शूलमाध्मानं विविधा वातवेदना : ॥

मलवाताप्रवृत्तिश्च स्तम्भो मोहोऽङ्गपीडनम्‌ ॥७॥

विष्टब्धाजीर्ण वातप्रकोपामुळे होत असल्याने त्यात ( टोचणे , फूट लागणे ) वगैरे अनेक वातजन्य वेदना होऊन पोट फुगणे , शूळ , मलावरोध तसेच अपानवायु न सरणे , अंग ताठल्यासारखे होणे , मोह व आंग दुखणे ही लक्षणे होतात .

रसशेषाजीर्ण ,

रसशेषेऽन्नविद्वेषो ह्नदयाशुद्धिगौरवे ॥

रसशेषाजीर्णांत अंग जड होणे , ह्रदयात मोकळेपणा न वाटणे व अन्नद्वेष ही लक्षणे होतात .

( निदोंषजीर्ण व प्राकृताजीर्ण हे अजीर्णाचे मुख्य प्रकार नसल्यामुळे आणि त्यापासून कोणताहि विकार होत नसल्यामुळे त्यांची लक्षणे येथे दिली नाहीत .)

अजीर्णापासून होणारे विकार ,

मूर्च्छा प्रलापोवमथु : प्रसेक : सदनं भ्रम : ॥८॥

उपद्रवा भवन्त्ये ते मरणं चाप्यजीर्णत : ॥

अनात्मवन्तं पशूवदभुञ्जन्ते येऽप्रमाणत : ॥९॥

तोंडास पाणी सुटणे व ओकारी येणे , तसेच मूर्च्छा , बडबड , ग्लनि व भोंवळ हे उपद्रव अजीर्णापासून मनुष्याचे ठायी उत्पन्न होतात ; इतकेच नाही . तर जर कधी अजीर्ण फार विकोपास गेले तर त्यापासून त्यास मरणदेखील प्राप्त होते , या सर्व उपद्रवाचे मूळ एक त्याने आपली जीभ स्वाधीन ठेवली नाही व पशूप्रमाणे अधाशीपणे वाटेल ते खाल्ले हेच होय .

अजीर्णमामं विष्टब्धं विदर्ग्धं च यदिरितम्‌ ॥

विषूच्यलसकौ तस्माद्भवेच्चापि विलम्बिका ॥१०॥

वर सांगितलेल्या आम , विष्टब्ध व विदग्ध अजीर्णापासून विषूचिका ( मोडशी पटकी ), अलसक , व विलंबिका हे रोग उत्पन्न होतात .

विषूचिका कोणास होते ?

सूचीभिरिव गात्राणि तुदन्‌ संतिष्ठतेऽनिल : ॥

यत्राजीर्णेन सावैद्यैर्विषूचीति निगद्यते ॥११॥

न तां परिमिताहारा लभन्ते विदितागमा : ॥

मूढास्तामजितात्मानो लभन्तेऽशनलोलुपा : ॥१२॥

जेव्हां अजीर्णात सुयांनी टोंचल्यासारखी शरीरांत वाय़ूची वेदना होते . तेव्हां तिला विषूचिका असे म्हणतात , आपला आहार बेताचा ठेवतात , शास्त्र कळते अशा मनुष्यास ती होत नाही , तर जे त्या शास्त्राच्या नियमांविषयी बेफिकीर व पराकाष्ठेचे खादाड असतात त्यासच होते .

विषूचिकेचीं लक्षणें .

मूर्च्छातिसारौ वमथु : पिपासा शूलभ्रमोद्वेष्टनंजृम्भदाहा : ॥

वैवर्ण्यकम्पो ह्रदये रुजश्च भवन्ति तस्यां शिरसश्च भेद : ॥१३॥

मूर्च्छा , अतिमार , भोंवळ , ओकारी , तहान सर्वांग शूल , भोंवळ व जांभया येणे , उरांत व डोक्यांत वेदना होणे , शोष पडणे , अंगांत कांपरे भरणे व शूल , उत्पन्न होणे , पायास पेटके येणे व अंगाचा दाह होणे व त्याचप्रमाणे अंगाचा वर्ण पालटणे ही विषूचिकेची लक्षणे होत . हिलाच पटकी म्हणतात .

अलस काचीं लक्षणें .

कुक्षिरानह्यतेऽत्यर्थं प्रताम्येत्परिकूजति ॥

विरूद्धो मारुतश्चैवं कुक्षावुपरि धावति ॥१४॥

वातवर्चोनिरोधश्च यस्यात्यर्थं भवेदपि ॥

तस्यालसकमाचष्टे तृष्णोद्नारौ तु यस्य च ॥१५॥

अलसकाचा विकार झाला असतां रोग्याचें पोट फार फुगते , त्यास मूर्च्छा येते व तो मोटयाने ओरडतो , तसेच त्याच्या अपानवाय़ूच्या अधोगतीचा ( गुदद्वाराकडे खाली जाणार्‍या मळाचा ) रोध होऊन तो पोटाच्या वरती उर्ध्व गति होतो ( म्हणजे गळ्याकडे जातो .) याशिवाय शोष पडणे , करपट ढेकर येणे , ही लक्षणे त्याचे ठायी उद‌भवतात .

विलंबिकेचीं लक्षणें .

दुष्टं च भुक्तं कफमारूताभ्यां प्रवर्तते नोर्ध्वमधश्च यस्याम्‌ ॥

विलंबिकां तां भृशदुश्चिकित्स्यामाचक्षते शास्त्रविद : पुराणा : ॥१६॥

शास्त्रावेत्ते ह्या विकाराला विलंबिका म्हणतात , ती बरी होणे फारच कठिण आहे . जेव्हां कफ व वायु यांच्या प्रकोपाने रोग्याने खाल्लेले अन्न दूषित होऊन त्याची वरच्या किंवा खालच्या द्वारांनी मुळीच प्रवृत्ति होत नाही ( म्हणजे ढाळ किंवा ओकारी मुळीच होंत नाही ), व ते तसेच पुष्कळ वेळपर्यंत आमाशयांत राहते .

आमजन्य वेदना .

यत्रस्थमामं विरूजेत्तमेव देशं विशेषेण विकारजातै : ॥

दोषेण येनावततं शरीरं तल्लक्षणैरामसमुद्भवैश्च ॥१७॥

शरीरांत जे आम राहण्याचे स्थाना आहे त्या स्थानी आमापासून होणार्‍या ( आमवात वगैरे ) विकारामुळे व वात , कफ व पित्त या त्रिदोषांपैकी ज्या दोषाने शरीर व्यापले असेल त्याच्या स्वाभाविक लक्षणांमुळे ( म्हणजे वाताने टोचणी लागणे , कफाने अंग जड होणे व पित्ताने दाह होणे या प्रकारच्या लक्षणांमुळे ) रोग्यास वेदना होतात . कधी शरीराच्या इतर भागातहि त्यामुळे वेदना होत असतात .

: श्यावदन्तौष्ठनखोऽल्पसंज्ञो वम्यर्दितोऽभ्यन्तरयातनेत्र : ॥

क्षामस्वर : सर्वविमुक्तसन्धिर्यायान्नर : सोऽपुनरागमाय ॥१८॥

विषूचिका किंवा अलसक झालेल्या रोग्यास वारंवार उलटया होत असून त्याचे दांत , ओठ व नखे काळी पडली , हातापायाचे सांधे ढिले पडले , शब्द व डोळे खोल गेले आणि स्मृति नष्ट होण्याच्या पंथाला लागली म्हणजे तो रोगी साध्य होणे दुरापास्त आहे असे जाणावे . विलंबिका तर आपल्या स्वरूपानेच असाध्य आहे , मग तिची असाध्य लक्षणे निराळी कशाला द्यायला पाहिजेत ?

अन्नपचन झाल्याचीं लक्षणें .

उद्नारशुद्धिरुत्साहो वेगोत्सर्गो यथोचित : ॥

लघुता क्षुत्पिपासा च जीर्णाहारस्य लक्षणम्‌ ॥१९॥

उत्तम रीतीनें अन्न पचन झाले असता चांगला ढेकर येतो , उत्साह वाटतो , शरीरास हलकेपणा व भूक व तहान लागते आणि लघवीस व शौच्यास साफ होते .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-06-24T13:49:32.5470000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

PUṢKARA IV(पुष्कर)


 • 1) General information.
  This is a holy place situated 36 Kilometres to the north of Ajmer. Brahmā once did penance there. There is a temple of Brahmā there. Padma Purāṇa gives a story about the origin of this tīrtha:-- Once Brahmā came to a place holding a lotus. Then Brahmā saw Vajranābha who was engaged in penance for the destruction of the devas. Suddenly the lotus in the hands of Brahmā fell down making a thundering noise. The sound was so loud that its vibrations killed Vajranābha. From that day onwards the place was known as Puṣkara.
  2) Other details.
  (i) Arjuna spent the period after his pilgrimage in this tīrtha. [Śloka 14, Chapter 220, Ādi Parva].
  (ii) Once sage Pulastya praised the greatness of Puṣkara. [Śloka 20, Chapter 82, Vana Parva].
  (iii) Sage Dhaumya praised the greatness of Puṣkaratīrtha. [Śloka 16, Chapter 89, Vana Parva].
  (iv) Once the god of death came and did penance at this place. [Śloka 26, Chapter 54, Droṇa Parva].
  (v) Once Brahmā performed a Yāga at this place and then Sarasvatī rose up from the place in the name of Suprabhā. [Śloka 5, Chapter 38, Śalya Parva].
  (vi) If one performs penance at this place peacefully one can attain mokṣa. [Chapter 297, Śānti Parva].
   
RANDOM WORD

Did you know?

Request for Anagha Ashtami Puja vrat Sagrasangit Puja
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.