TransLiteral Foundation
संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
मदात्ययनिदान

माधवनिदान - मदात्ययनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


मदात्ययनिदान

मदात्ययाचीं कारणें ,

ये विषस्य गुणा : प्रोक्तास्तेऽपि मद्ये प्रतिष्ठिता : ॥

तेन मिथ्योपयुक्तेन भवत्युग्रो मदात्यय : ॥१॥

किंतु मद्यं स्वभावेन यथैवान्नं तथा स्मृतम्‌ ॥

अयुक्तियुक्तं रोगाय युक्तियुक्तं यथाऽमृतम्‌ ॥२॥

प्राणा : प्राणभृतामन्नं तदयुक्त्या निहत्यसून्‌ ॥

विषं प्राणहरं तच्च युक्तियुक्तं रसायनम्‌ ॥३॥

विषाचे जे ( दहा ) गुण सांगितलेले आहेत ते सर्व मद्यामध्ये असतात : म्हणून मद्य जर वैद्यशास्त्राने सांगितलेल्या नियमाच्या बाहेर सेवन केले तर त्यामुळे भयंकर असा मदात्यय रोग उत्पन्न होतो . विषांत व मद्यात फरक इतकाच आहे कीं , मद्य हे अन्नाप्रमाणे शरीरपोषण करून युक्तीने सेवन केल्यास अमृताप्रमाणे गुणप्रद आहे ; परंतु त्वाविरूद्व प्राणहरण करणारे आहे ; या व्याख्येचा नीट बोध अन्न आणि विष यांच्याच उदाहरणाने होण्यासारखा आहे . अन्न हे केवळ प्राण्याचा प्राण आहे ; तरी ते वैद्यशास्राच्या नियमाविरुद्ध व अतिरिक्त सेवन केले असता रोग उत्पन्न करून त्याचा प्राण वेते ; आणि विष हे जरी प्राणहारक आहे तरी प्रमाणाने घेतल्यास रसायन होते .

प्रमाणशीर मद्य सेवनाचा फायदा .

विधिना मात्रया काले हितैरनैयंथाबलम्‌ ॥

प्रहृष्टो य : पिबेन्मद्यं तस्य स्यादमृतं यथा ॥४॥

स्निग्धै : सदन्नैर्मांसेश्व भक्ष्यैश्च सहसेवितम्‌ ॥

भवेदायु : प्रकर्षाय बलायोपचयाय च ॥५॥

काम्यता मनसस्तुष्टिस्तेजो विक्रम एव च ॥

विधिवत्सेव्यमाने तु मद्ये सन्नि हिता गुणा : ॥६॥

वैद्यशास्त्राच्या नियमाप्रमाणे योग्य काळी व योग्य प्रमाणाने जो कोणी मद्य सेवन करतो त्याच्या ठायी ते अमृताप्रमाणे गुण करते , शक्ति आणते व मन हर्षित करते . ते त्याने स्निग्धान्नाबरोबर , मांसाबरोबर अथवा पक्वान्नाबरोबर घेतले असतां त्याचे आयुष्य वाढते व शरीर पुष्ट होऊन सुद्दढ होते ; तसेच त्याचे रूप सुंदर होते , अगात शौर्य येते आणि मन तृप्त व उत्साहभरित असते . विधिपूर्वक मद्यसेवनाचे अशा प्रकारचे हितकर परिणाम द्दष्टीस पडतात .

मद्स्तु त्रिविध : प्रोक्त : सात्त्विकादिविभेदत : ॥

आचार्या : केचिदिच्छन्ति चतुर्थमतितामसम्‌ ॥७॥

मद्याच्या नशेच्या सात्त्त्रिक , गजस व तामस या तीन व कोणी वेद्य अतितामस म्हणून मानितात ती एक अशा चार अवस्था आहेत . त्यांची लक्षणे पुढे सांगितल्याप्रमाणे जाणवी .

सात्त्विक अवस्था .

बुद्धिस्मृतिप्रीतिकर . सुखश्च पानान्ननिद्रारतिवर्धनश्च

संपाठगीतस्वरवर्धनश्च प्रोक्तोऽतिरम्य : प्रथमो मदो हि ॥८॥

मद्याची पहिली जी सात्विक नशा ती अतिरम्य असून ( पुरुषाचे ठायी ) बुद्धि , स्मृति आणि प्रीति उत्पन्न करते . त्यास सुत्व देते . खाणे , पिणे , निद्रा आणि विषयवासना या वाढविते ; व त्याचप्रमाणे त्याचा स्वर , गायन व पठन यांस उत्तेजक होते .

राजस अवस्था .

अव्यक्तबुद्धिस्मृतिवाग्विवेष्ट : सोन्मत्तलीलाकृतिरप्रशान्त : ॥

आलस्यनिद्राभियतो मुहुश्च मध्येन मत्त : पुरुषो मदेन ॥९॥

मद्याच्या नशेची दुसरी जी राजसावस्था ही मध्यम जाणावी . हिने मत्त झालेल्या पुरुषाची बुद्धि . स्मृति व वाणी वा अस्पष्ट होऊन तो विरुद्ध ( घटकेत हंसणे व घटकेत रडणे या प्रकारच्या ) चेष्टा करतो , रागवतो , आळस व झोप यांनी वारंवार गुंगतों आणि त्याचप्रमाणे उन्मत्तासारखा दिसतो . बेफाम होतो .

तामस अवस्था

गच्छेदगम्यां च गुरून्नमन्येत्खादेदभक्ष्याणि च नष्टसंज्ञ : ॥

ब्रूयाच्च गुह्यानि ह्रदि स्थितानि मदे तृतीये पुरुषोऽस्वतन्त्र : ॥१०॥

मद्याच्या नशेची तिसरी तामस अवस्था ; तिजमुळे मनुष्य अगदी तिच्या स्वाधीन होतो व मनांतील गुह्य दुसर्‍याजवळ बोलतो , तसेच अभक्ष्य भक्षणाविषयी त्यास निर्षध वाटत नाही ; व स्त्रियांसंबंधाने गम्यागम्य भेद समजत नाही ; शिवाय तो वडिलांस मानीत नाही व त्याचे ठायी कसलेहि ज्ञान राहात नाही .

अतितामसावस्था .

चतुर्थे तु मदे मूढो भग्नदार्विव निष्किय : ॥

कांर्याकार्यविभागाज्ञो मृतादष्यपरो मृत : ॥११॥

कोमदं ताद्दशं गच्छेदुन्मादमिव चापरम्‌ ॥

बहुदोषमिवारूढ : कान्तारं सवश : कुती ॥१२॥

मद्याच्या नशेच्या चवथ्या अतितामसावस्थेत मनुष्य मूर्ख बनतो . एखाद्या मोडक्या लांकडाच्याप्रमाणे कांहीही करू शकत नाही . त्यास करावे कोणते व न करावे कोणते हें मुळेंच समजत नाही . तो मेल्यापेक्षाही मेला होतो . तेव्हां प्रतिउन्माद रोगच अशा तर्‍हेच्या उन्मत्त अवस्थेत कोणता संयमी व कर्तबगार पुरुष जाऊ म्हणेल ? तेव्हा आपण होऊन अशा स्थितीत कोण जाईल ?

अविधिपूर्वक मद्यपानाचे विकार .

निर्भुक्तमेकान्तत एव मद्यं निषेव्यमाणं मनुजेन नित्यम्‌ ॥

आपादयेत्कष्ठतमान्विकारानापादयेच्चापि शरीरभेदम्‌ ॥१३॥

ऋउद्धेन भीतेन पिपासितेन शोकाभितप्तेन बुभुक्षितेन ॥

व्यायामभाराध्वपरिक्षतेन वेगावरोधाभिहतेन चापि ॥

अत्यन्नभक्षावततोदरेण साजीर्णभुक्तेन तथाऽबलेन ॥

उष्मामितप्तेन च सेव्यमानं करोति मद्यं विविधान्विकारान्‌ ॥१४॥

मनुष्याने अन्न सेवन न करितां निरंतर मद्यपानच केले तर त्याच्या ठायीं ( पुढे सांगितलेले ) अनेक भयंकर विकार उत्पन्न होतात व त्यांत शरीराचा देखील नाश होतो . तसेच क्रोध . शोक , तृषा व भीति यांनी युक्त असलेला व्यायाम , फार चालणे व ओझे वाहाणे , भुकेलेला , व्रण यांनी क्षीण झालेला , उन्हाने तापलेला , अजीर्ण असताता जेवलेला व फार अन्न खाल्लयाने पोट फुगलेला , बलनाश झालेला आणि मलमूत्रादिकांच्या अवरोघाने पीडा पावलेला अशा मनुष्याने मद्यपान केले असताही त्याच्या ठायी अनेक प्रकारचे रोग उत्पन्न होतात .

पानात्ययं परमंद पानाजीर्णमथापि वा ॥

पानविभ्रममुग्रं च तेषां वक्ष्यामि लक्षणम्‌ ॥१५॥

अति मद्यपान केल्याने पान करणाराचे ठायी मदात्यय ( पानात्यय ), परमद , पानाजीर्ण व पानविभ्रम असे चार प्रकारचे विकार उत्पन्न होतात . मदात्यय विकाराचे वातादिदोषांच्या प्रकोपापासून पृथक पृथक होणारे असे तीन व तिन्ही दोष मिळून होणारा तो सान्निपातिक एक असे चार प्रकार द्दष्टीस पडतात . त्यांची लक्षणे पुढे सांगितली आहेत .

वातमदात्ययाचीं लक्षणें .

हिक्का श्वास : शिर : कम्प : पार्श्वशूलप्रजागर : ॥

विद्याद्वहुप्रलापस्य वातप्रायं मदात्ययम्‌ ॥१६॥

वातप्रधान मदात्यय झालेल्या पुरुषाचे ठायी उचकी , श्वास , फार बडबड व त्याच प्रमाणे झोप नसणे , मस्तक कापणे आणि पार्श्वभागांत वेदना होणे ही लक्षणे उत्पन्न होतात .

पित्तमदात्ययाचीं लक्षणें

तृष्णादाहज्वरस्वेदमोहातीसारविभ्रमै : ॥

विद्याद्धरितवर्णस्य पित्तप्रायं मदात्ययम्‌ ॥१७॥

पित्तप्रधान मदात्यय झालेल्या पुरुषाचे ठायी तहान , दाह , ज्वर , घाम , भोवळ , अतिसार व भ्रम ही लक्षणे द्दष्टीस पडतात व त्याच्या शरीराचा वर्ण हिरवा होतो .

कफमदात्ययाचीं लक्षणें .

छर्द्यरोचकहृल्लासतन्द्रास्तैमित्यगौरवै : ॥

विद्याच्छीतपरीतस्य कफप्रायं मदात्ययम्‌ ॥१८॥

कफप्रधान मदात्यय झालेल्या पुरुषाचे ठायी अरुचि , उम्हासे , वांति , तंद्रा व स्याचप्रमाणे थंडी वाजणे , अंग ओलसर भासणे व त्यास जडत्व येणे अशा प्रकारची लक्षणे होतात .

ज्ञेयस्निदोषजश्चापि सर्वलिङ्गैर्मदात्यय : ॥

वर सांगितलेली वात , कफ व पित्त या तिहींपासून होणार्‍या मदास्ययांची लक्षणे एकत्र असली म्हणजे तो त्रिदोषजन्य मदात्यय जाणावा .

परमदाचीं लक्षणें .

श्लेष्मोच्छ्रयोऽङ्गगुरुता मधुरास्यता च ॥

विष्मूत्रसक्तिरथतन्द्रिररोचकश्च ॥

लिङ्गं परस्य तु मदस्य वदन्ति तज्ज्ञा -

स्मृष्णारुजा शिरसि सन्धिषु चातिभेद : ॥१९॥

परमद झालेल्या पुरुषाची लक्षणे - कफप्रकोप होणे , शरीगस जडत्व येणे , मलमूत्राबरोबर , मस्तकांत वेदना व सांध्याच्या जागी अतिशय फूट लागणे आणि त्याचप्रमाणे तोंडास अरुचि व गोडी , मलमूत्राचा अवरोध , तहान व तंद्रा अशा प्रकारची असतात .

पानाजीर्णाचीं लक्षणें .

आध्मानमुग्रमथवोद्निरणं विदाह : ॥

पाने त्वजीर्णमुपगच्छति लक्षणानि ॥२०॥

व्यास मद्याचे अपचन झालेले असते त्याचे पोट अत्यंत फुगते , किंवा वांती होते व ढेकरा उत्पन्न होतात व जळजळ लागते .

पानविभ्रमाचीं लक्षणें .

हृदात्रतोंदकफसंस्त्रवकण्ठधूम -

मूर्च्छावमिज्वरशिरोरुजनप्रदेहा : ॥

द्वेष : सुरान्नविकृतेष्वपि तेषु तेषु

तं पानविभ्रममुशन्त्यखिलेन धीरा : ॥२१॥

पानविभ्रमविकार झाला असता ह्रदय व इंद्रिये याम्त सुया टोंचल्यासारख्या वेदना , कफस्त्राव , गळयांतून धूर निघाल्याचा भास , मूर्च्छा , वांती , मस्तकशूल , तोंडास कफाचा चिकटा ज्वर ही लक्षणे मद्यसेवन करणार्‍याचे ठायी त्रिदोषापासून उत्पन्न होतात व त्यास निरनिराळया प्रकारच्या मद्यांचा व खाण्याच्या पदार्थांचा तिटकारा येतो .

मदात्ययाचीं असाध्य लक्षणें .

हीनोत्तरौष्ठमतिशीतममन्ददाहम्‌

तैलप्रभारयमतिपानहतं त्यजेत्तु ॥

जिव्होष्ठदन्तमसितंत्वथवापि नीलम्‌ ॥

पीते च यस्य नयने रुधिरप्रभे वा ॥२२॥

ज्या मदात्यय झालेल्या पुरुषाचा खालील ओठापेक्षा वरचा ओठ लांब होऊन लोबतो , शरीरांत बराच दाह होतो पण बाहेरून थंडी वाजते , तेल लावल्याप्रमाणे तोंडावर तुळतुळीतपणा दिसतो आणि तसेच जीभ , ओठ व दांत यांचे ठायी काळेपणा अथवा निळेपणा आणि डोळ्यांच्या ठायी रक्तासारखी लाली अथवा पिवळेपणा द्दष्टीस पडतो तो चिकित्सा करण्यास अयोग्य समजावा .

मदात्ययाचे उपद्रव .

हिक्काज्वरौ वमथुवेपथुपार्श्वशूला : ।

कासभ्रमावपि च पानहतं भजन्ते ॥२३॥

उचकी , ताप , वांति , खोकला , भ्रम , अंग कापणे व पार्श्वभागांत वेदना होणे , अत्ता प्रकारचे उपद्रव मदात्यय रोगांत मद्यप्याचे ठायी उत्पन्न होतात .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-06-24T13:49:35.6870000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

Excess should be regulated

  • अधिक खर्च नियमात बसविण्यात यावा 
RANDOM WORD

Did you know?

मी ह्या साईट साठी काही करू शकते काय
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.