TransLiteral Foundation
संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
विद्रधिरोगनिदान

माधवनिदान - विद्रधिरोगनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


विद्रधिरोगनिदान

विद्रधिरोगाचीं कारणें व प्रकार .

त्वग्रक्तमांसमेदांसि सन्दूप्यास्थिसमाश्रिता : ॥

दोषा : शोथं शनैर्घोरं जनयन्त्युच्छ्रिता भृशम्‌ ॥१॥

महामूलं रुजावन्तं वृत्तं वाप्यथवाऽतम्‌ ॥

स विद्रधिरिति ख्यातो विज्ञेय : षङ्विवधश्च स : ॥२॥

पृथग्दोषै : समस्तैश्च क्षतेनाप्यसृजा तथा ॥

षण्णामपि हि तेषां तु लक्षणं संप्रवक्ष्यते ॥३॥

आपापल्या कारणांनी प्रकोप पावलेले व अस्थींचा आश्रय करून राहिलेले वातादि दोष रोग्याची त्वचा , रक्त , मांस व मेद यांस दूषित करून जी अस्थीपर्यंत मूळ गेलेली , वाटोळी अथवा लांब असलेली व उत्पत्तिकाळीच अत्यंत वेदना करणारी अशी सूज उत्पन्न करतात तिला विद्रधि रोग असे म्हणतात . याचे तिन्ही दोषांपासून पृथक्‌ पृथक्‌ होणारे तीन , सान्निपातिक एक , क्षतजन्य एक व रक्तजन्य एक असे सहा प्रकार आहेत ; त्यांची निरनिराळी लक्षणे पुढे सांगितल्याप्रमाणे जाणावी .

वातजन्य विद्रधि .

कृष्णोऽरूणो वा विषमो भृशमत्यर्थवेदन : ॥

चित्रोत्थानप्रपाकश्च विद्रधिर्वातसंभव : ॥४॥

वातजन्य विद्रघि काळया अथवा तांबूस वर्णाचा , कदाचित्‌ लहान व कदाचित्‌ मोठा आणि अत्यंत वेदना करीत असलेला असा असून ( वायूची क्रिया विषम असल्यामुळे ) त्याची वाढ व पाक अनेक प्रकारांनी झालेले द्दष्टीस पडतात .

पित्तजन्य विद्रधि .

पव्कोदुम्बरसंकाश : श्यावो वा ज्वरदाहवान्‌ ॥

क्षिप्रोत्थानप्रपाकश्च विद्रधि : पित्तसंभव : ॥५॥

पित्तजन्य विद्रधि हा काळया अथवा पिकलेल्या उंबराच्या वर्णाचा आणि ज्वर व दाह उत्पन्न करणारा असून त्याची वाढ व पाक हे लौकर होतात .

कफजन्य विद्रधि .

शरावसद्दश : पाण्डुरतिस्निग्धोऽल्पवेदन : ॥

चिरोत्थानप्रपाकश्च विद्रधि : कफसंभव : ॥६॥

कफजन्य विद्रधीचा आकार परळाप्रमाणे मोठा व वर्ण पांढरा असून तो स्निग्ध व थोडी पीडा उत्पन्न करणारा असतो ; आणि त्याची वाढ व पाक हे फार वेळाने होतात .

सान्निपातिक विद्रधि .

नानावर्णरुजास्त्रावो घण्टालो विषमो महान्‌ ॥

विषमं पच्यते चापि विद्रधि : सान्निपातिक : ॥७॥

जो विद्रधि घंटेसारखा लोंबणारा , कधी लहान तर कधी मोठा , कदाचित्‌ पिकणारा व कदाचित्‌ न पिकणारा आणि नाना रंगांचे स्राव व वेदना उत्पन्न करणारा असा असतो तो सान्निपातिक विद्रधि होय .

क्षतजन्य अथवा अभिघातजन्य विद्रधि .

तैस्तैर्भावैरभिहते क्षते वाऽपथ्यकारिण : ॥

क्षतोष्मा वायुविसृत : सरक्तं पित्तमीरयेत्‌ ॥८॥

ज्वरस्तृष्णा च दाहश्च जायन्ते तस्य देहिन : ॥

आगन्तुर्विद्रधिर्ज्ञेय : पित्तविद्रधिलक्षण : ॥९॥

काठी , दगड वगैरे लागून जखम झाली असता अथवा क्षत पडले असता अपथ्य सेवन करणार्‍या रोग्याचा वायु दूषित होऊन तो क्षतजन्य उष्णता शरीरात पसरवितो ( वाढवितो ) व रक्तासह पित्तास दूषित करून ( अभिघात अथवा क्षत यांमुळे उद्भवणारा ) आगंतुक विद्रधि उत्पन्न करतो , अशा प्रकारच्या विद्रधीची लक्षणे पित्तजन्य विद्रधीच्या लक्षणांसारखीच असून शिवाय ज्वर , तहान व दाह हे प्रकार त्यांत अधिक उद्‌भवतात .

रक्तजन्य विद्रधि .

कृष्णस्फोटावृत : श्यावस्तीव्रदाहरुजाकर : ॥

पित्तविद्राधिलिङ्गस्तु रक्तविद्रधिरुच्यते ॥१०॥

रक्तजन्य विद्रधि हा काळया वर्णावा व काळया फोडांनी व्यापलेला आणि तसाच दाह , ठणका व ज्वर हे जोराचे उत्पन्न करणारा असा असून त्यातही ( इतर ) लक्षणे पित्तजन्य विद्रधीच्या लक्षणाप्रमाणे द्दष्टीस पडतात .

अंतर्विद्रधि .

पृथक्‌ संभूय वा दोषा : कुपिता गुल्मरूपिणम्‌ ॥

वल्मीकवत्समुन्नद्धमन्त : कुर्वन्ति विद्रधिम्‌ ॥११॥

प्रकृपित झालेले वातादि दोष पृथक्‌ पृथक्‌ अथवा एकत्र होऊन ( वर सांगितलेल्या विद्रधीच्या प्रकारांशिवाय कधी कधी ) रोग्याच्या शरीरात गुल्म अथवा वाल्मीक ( वारूळ ) यासारखा जो विद्रधी उत्पन्न करतात त्यास अंतर्विद्रधि असे म्हणतात . त्याची स्थाने व लक्षणे पुढे लिहिल्याप्रमाणे जाणावी .

अंतर्विद्रधीचीं स्थानें व लक्षणें .

गुदे बस्तिमुखे नाभ्यां कुक्षौ वङक्षणयोस्तथा ॥

वृक्कयो : प्लीन्हि यकृति हृदि वा क्लोन्नि वाप्यथा ॥१२॥

तेषामुक्तानि लिङगानि बाह्यविद्रधिलक्षणै : ॥१३॥

गुदद्वार , बस्तीचे तोंड , काखा , जांगाडे , नामिप्रदेश , कुक्षिपिंड , प्लीहा , काळीज , ह्रदरय व फुप्फुस इतक्या ठिकाणी अंतर्विद्रधि उत्पन्न होतात व वर सांगितलेल्या बाह्मवेद्रधीच्या लक्षणांप्रमाणेव त्यांची लक्षणे असतात . त्याखेरीज जे विशेष प्रकार होतात ते :---

गुदे वातनिरोधस्तु बस्तौ कृच्छ्राल्पमूत्रता ॥

नाभ्यां हिक्का तथाऽटोप : कुक्षौ मारुतकोपनम्‌ ॥१४॥

कटीपृष्ठग्रहस्तीव्रो वङ्क्षणोत्थे तु विद्रधौ ॥

वृक्कयो : पार्श्वसङकोच : प्लीहन्युच्छ्वासावरोधनम्‌ ॥१५॥

सर्वाङ्गप्रग्रस्तीव्रो ह्रदि कम्पश्च जायते ॥

श्वासो यकृति हिक्का च क्लोन्नि पेपीयते पय : ॥१६॥

गुदद्वारात ( अतंर्विद्रदि ) झाला असता वाय़ूचा रोघ होतो ; बस्तीमध्ये झाला असता रोग्यास कष्टाने व थोडेथोडे लव्वीला होते ; नाभीमध्ये झाला म्हणजे उचकीं लागते आणि पोट गुरगुरते व दुखते ; कुशीमध्ये झाला तर वायूचा क्षोम होतो ; जांगाडांत झाला असता कंबर व पाठ , या अतिशय जखडल्या जातात ; मूत्रपिंडात झाल्याने बरगडया आखडतात ; प्लीहेवर झाल्यामुळे उच्छवास कोंडला जातो ; हृदयात झाला असता सर्वांग जखडते व कापते ; काळजात झाला असता श्वास व उचकी लागतात आणि फुप्फुसांत झाला तर ही दोन्हीं लक्षणे असून रोग्यास वारंवार पाणी प्यावेसे वाटते .

सर्व विद्रधींचा स्नावनिर्गम .

नाभेरुपंरिजा : पव्का यान्त्यूर्ध्यामितरे त्वध : ॥

अध : स्नतेपु जीवेत्तु स्त्रतेषूर्ध्वं न जीवति ॥१७॥

नाभी वरच्या भागात जे विद्रधि होतात ते पिकले असता त्यांचा स्राव रोग्याच्या तोंडावाटे होतो व नाभीच्या खालच्या भागात जे विद्रधि होतात , ते पिकले असता त्यांचा स्राव रोग्याच्या गुदद्वारावाटे होतो . नाभीतच जे ( विद्रधि ) उत्पन्न होतात ते पिकले असता त्यांचा स्राव उभय मार्गांनी ( तोंड व गुदद्वार यांनी ) होत असतो ; यापैकी ज्यांचा स्राव गुदद्वारावाटे होतो ते विद्रधि साध्य व ज्यांचा तोंडावाटे होतो ते असाध्य व रोग्यास मारणारे होत .

विद्रधीचीं साध्यासाध्य लक्षणें .

हुन्नाभिबस्तिवर्ज्या ये तेषु भिन्नेषु बाह्यत : ॥

जीवेत्कदाचित्‌ पुरूषो नेतरेषु कथञ्चन ॥१८॥

साध्या विद्रधय : पञ्च विवर्ज्य : सान्निपातिक : ॥

( आमपव्कविदग्धत्वं तेषां शोथवदादिशेत्‌ ) ॥१९॥

आध्मातं बद्धनिप्यन्दं छर्दिहिव्कातृषांन्वितम्‌ ॥

रुजाश्वाससमायुक्तं विद्रधिर्नाशयेन्नरम्‌ ॥२०॥

हृदय , नाभि व बास्ति या स्थानी झालेले अंतर्विद्रधि रोग्याचा प्राण घेतातपरंतु याशिवाय गुदद्वार , काखा , जांगाडे , मूत्रपिंड , प्लीहा , काळीज व फुफ्फुस या ठिकाणी जे अंतर्विद्रधि होऊन बाहेरून फुटले जातात ते कदाचित्‌ साध्य असतात . बाह्म विद्रधीपैकी सान्निपातिक विद्रधि मात्र असाध्य आहे ; बाकीचे पाच ( वातजन्य , पित्तजन्य , कफजन्य , रक्तजन्य व क्षतजन्य ) साध्य होतात . ( या पांचाच्या आम , पव्क व विदग्ध या तिन्ही अवस्था मागे सांगितलेल्या शोथ रोगाच्या ( सुजेच्या ) च त्या त्या अवस्थांप्रमाणे जाणाव्या ). ज्या विद्रधीमुळे पोट फुगणे व दुखणे , मूत्र कोंडणे , पाण्याचा शोष पडणे , उचकी व श्वास लागणे , ओकारी येणे व ठणका उत्पन्न होणे या लक्षणांनी रोगी पीडित होतो तो विद्रधि त्यास मृत्यूची जोड देणार म्हणून समजावे .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-06-24T13:49:41.8830000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

diagramatic representation

  • न. आकृतिरूपण 
RANDOM WORD

Did you know?

लग्न ठरवितांना पत्रिका पाहणे किती योग्य आहे? पत्रिका पाहूनही कांही विवाह अयशस्वी कां होतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.