मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड १| अध्याय ३४ खंड १ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ खंड १ - अध्याय ३४ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत देवासुरयुद्धप्रसंगः Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । दैत्य आपुल्या भरमणांत । गेले दृंढीच्या पुढयांत । देवगणांनी युक्त । वक्रतूंडा ते न जाणती ॥१॥परी प्रतापी वक्रतुंडसी पाहती । तेव्हां असुर भयभीत होती । महाकाय महावीर्य त्यासे आकृती । नर-कुंजर स्वरुपधारी ॥२॥नाना वीरांनी परिवृत । प्रलयाग्निसम तो वाटत । हर्षभरें भक्तिभावयुक्त । स्तुती करिती देव त्याची ॥३॥दैत्यवीर घाबरले मनांत । ओढवला मृत्यू ऐसें तया वाटत । आकाशवाणीनें निर्देशित । हाच तो वक्रतुंड वाटतसे ॥४॥ह्याचा जयजयकार करिती । जय जय वक्रतुंड देव म्हणती । म्हणोनी वक्रतुंड हाचि निश्चिती । आतां काय करावें? ॥५॥आम्हीं जर का युद्ध करुं । युद्धांत आम्हीं खचित मारुं । हा वृत्तान्त निवेदनार्थ येरु । कोण जाईल मत्सराप्रती ॥६॥म्हणोनी सत्वर जावें परतोनी । मत्सराच्या समीप जाउनी । त्यास सांगावा निर्भयमनीं । वक्रतुंडाचा समाचार ॥७॥ऐसा निश्चय करुनी । मत्सराकडे जाउनी । सांगती तो वक्रतुंड येथपासूनी । पंचयोजनें दूर असे ॥८॥भयरहित तो सभेंत विलसे । आकाशवाणी सत्य झालीसे । नरकुंजररुपें प्रकटला असे । प्रत्यक्ष तो प्रभु वक्रानन ॥९॥देव त्याच्या समवेत । तेथ विहरती निश्चिंत । याचा काय तो विचार त्वरित । महाराज आपण करावा ॥१०॥तें दूतांचे वचन ऐकून । मत्सर झाला चिंतामग्न । त्याचें वंदन झालें म्लान । जाणून शत्रूस महाबलासी ॥११॥नंतर उत्साहयुत बोलत । क्रोधयुक्त होतें चित्त । दैत्येंद्रांना आज्ञापित । सज्ज रहा युद्धासाठीं ॥१२॥ह्या वक्रतुडां महाबलास । जाईन मी मारण्यास । देवांसहित मारितां त्यास । माझें चित्त सुखावेल ॥१३॥आज्ञा होताक्षणीं दैत्य होत । ते सर्वही युद्धसज्ज उत्साहांत । होता सभास्थित । तेथ सत्वर ते जाती ॥१४॥सैन्यांत मत्सर वीर शोभत । वक्रतुंडावरी चाल करित । जेथ बैसला होता सभास्थित । तेथ सत्वर ते जाती ॥१५॥पाहून त्यांचें संचलन । देव वक्रतुंडा सांगती वचन । गणनायका स्वामी दैत्य महान् । आला स्वये सेनेसह ॥१६॥तरी आतां क्षणीं करावें । प्रभू आपणां जें इच्छित बरवें । नाहींतरी दुष्ट स्वभावें । मारतील दैत्य आम्हां ॥१७॥देवा आम्हां रक्ष आतां । मृत्यू वाटे समीपे तत्त्वता । तेव्हा वक्रतुंड त्या भयार्तां । म्हणे निर्भय राह तुम्ही ॥१८॥दैत्यांसह मत्सरासी । संहारीन मी त्या दुष्टाशी । पहावें माझ्या कौतुकांसी । परम अद्भुत युद्धांत ॥१९॥ऐसें बोलून सिंहावर । आरुढ झाला तो पाशांकुशधर । गडगडासारखा स्वर । गर्जनेच्या तयाच्या ॥२०॥त्याच्या गर्जनेनें संत्रस्त । चराचर त्रैलोक्य समस्त । दैत्यगण जाहले भयभीत । मत्सरही चकित झाला ॥२१॥म्हणे आपुल्या अनुयायांस । वक्रतुंड सेना प्रबल सरस । काय होईल या समयास । शंका माझ्या मनीं असे ॥२२॥तेव्हां दैत्यप त्यास म्हणत । स्वामी व्हावें चिंतामुक्त । आमुचें युद्धतेज प्रदीप्त । पहावें आतां प्रत्यक्ष ॥२३॥ऐसें बोलून प्रल्हाद प्रमुख असुर । चालून गेले वक्रतुंडावर । त्रिभुवनीं निनादे त्यांचा स्वर । गर्जनापरांच्या त्या वेळीं ॥२४॥बाणवृष्टी अतिभयंकर करित । असुर ते क्रोधसमन्वित । शस्त्रास्त्रें नंतर बरसत । वर्षा ऋतूंत मेघांसम ॥२५॥त्या अस्त्रांनीं देवांचे सैन्य । विद्ध झालें पसरलें दैन्य । विष्णु प्रमुख देवमान्य । आले तेव्हां लढावया ॥२६॥कधीं न पूर्वीं पाहिलें । ऐसें युद्ध नंतर झालें । देव असुर उभय पडले । रणांगणीं मृत्युमुखीं ॥२७॥परस्पर जयोद्यत । शस्त्रपाणी ते लढत । कोणी बाण प्रखर सोडित । कोणी शक्ति फेंकिती ॥२८॥कोणी भन्दिपालांनी लढत । कोणी होते खड्गहस्त । कोणी पाशांनी बांधीत । अन्य भाल्यांनीमारिती ॥२९॥कोणी गदायुद्ध करिती घोर । कोणी मारिती मुद्गर । कोणी मल्लयुद्धांत चतुर । महावीर त्या समयीं ॥३०॥उभय सैन्यांच्या संचलनात । नभांत तेव्हां धूळ उडत । तेणें दिशा व्याप्त । आपपरही न समजे ॥३१॥शस्त्रांसि शस्त्रें भिडतीं । अस्त्रांचे उतर अस्त्रें देती । परस्परांचे बाण तोडिती । परमोत्सार मनीं त्यांच्या ॥३२॥शस्त्रें मोडता ते वीर । होती मल्लयुद्धपर । उभे राहुनी मंडळाकार । आव्हाने देती परस्परांशी ॥३३॥हातांनी हात धरिती । पायांनीं पाय खेचितीं । कोपरें मारती परस्परांशीं । डोक्यांवर आपटती डोकें ॥३४॥ललाटें मारित ललाटांस । कोणी गुडघ्यांनी परस्परांस । परी नव्हता संतोष त्यास । शत्रुनाश ध्येय होतें ॥३५॥ऐशा त्या भयंकर युद्धांत । अनेक मेले अनेक मूर्च्छित । नाना शस्त्रप्रहारें विद्ध होत । महावीर उभय पक्षींचे ॥३६॥रक्ताची नदी वाहिली । आंतडीं त्यांत तरंगू लागलीं । ऐसी विकल स्थिती झाली । युद्धभूमीवर त्या वेळीं ॥३७॥रथी रथस्थांसी लढत । गजी गजधरांसी भिडत । अश्वारुढ हल्ला करित । अश्वारुढांवरी तदा ॥३८॥पायदळ पायदळासी लढत । श्रेष्ठ ललकारिती त्वेषांत । श्रेष्ठ वीर तें धांवत । आपुलें शौर्य दाखवाया ॥३९॥परस्परांसी मारिती । शस्त्रास्त्रांनी विद्ध करिती । प्रफुल्ल किंशुकासम दिसती । रक्ते माखिल्या सर्वांगी ॥४०॥कधीं वाटे देव जिंकिती । कधीं वाटे ते पराजित होती । जयापजयाची नव्हती निश्चिती । युद्ध क्रिती रात्रींही ॥४१॥ऐसे पांच दिवस युद्ध चाललें । देवदैत्यांचें वीर लढले । परी कोणांसही न मिळालें । विजय चिन्हे त्या वेळीं ॥४२॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे प्रथमे खण्डें वक्रतुंडचरिते देवासुरयुद्धप्रसंगी नाम चतुस्त्रिंशोऽध्यायः समाप्तः ।श्रीगजाननार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP