मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड १| अध्याय २६ खंड १ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ खंड १ - अध्याय २६ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत पाताकविजयः Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । मत्सरासुरासी सेना । निघाली क्षत्रियांच्या हनना । मिळाली कालचक्रासी चालना । जग जिंकण्या उत्सुक ॥१॥विरोचनादि दैत्य स्थित । यमासारखे जे भासत । युद्ध त्यांच्या समवेत । करील ऐसा कोण जगीं? ॥२॥केवळ पादप्रहारें चूर्ण करित । पर्वतांसी जे बलवंत । शेषाचे मस्तक नमवून चालत । अतुल भार तयांचा ॥३॥मेघासम त्यांसी पाहून । पर्वतासम जे महान । क्षत्रिय होती गतजीवन । यमरुपा समोर त्यांच्या ॥४॥कांहीं तेथ पळून जात । कांहीं झाले शरणांगत । महावीर ते युद्ध करित । रणांत पडता स्वर्ग लाभ ॥५॥मत्सरासुराचे वीर रणांत । मारिती नृप असंख्यात । मृतांच्या पुत्रांसी स्थापित । कर त्यांपासूनि घेऊनी ॥६॥शरणांगत जे आले । ते राजे स्वपदीं स्थापिले ।जें राज्य राजावांचून नांदलें । तेथ नेमिलें दैत्यांसी ॥७॥ऐसे दैत्य राज्य भोगित । सुखोपभोग असंख्यात । देशोदेशीं दैत्य स्थापित । क्षत्रिय नृपांच्या सन्निध ॥८॥द्वीपांसहित वसुधा जिंकित । मत्सर दैत्य प्रमुदित । तेव्हां पाताळलोकीं जात । दैत्यवृदां समवेत ॥९॥नाग सर्पांसी जिंकण्यास । दैत्य करित पाताळवास । नागांचीं उद्यानें अतिसुरस । उद्ध्वस्त करिती दितिनंदन ॥१०॥त्या दैत्यांसी युद्ध करित । वासुकी तक्षक कंबळाश्वतरादि त्वरित । नागराज महाबळ क्रोधयुक्त । नाना वाहनीं बसूनिया ॥११॥शस्त्रास्त्रें बाण सोडिती । महाबळ दैत्यांसि मारिती । दैत्यही शस्त्राघात करिती । नागवीरांवरी तदा ॥१२॥महाबल नाग संहारितो । बहुत दैत्यांसी दंडिती । दर्प नष्ट होऊन पळती । असुर तेव्हां दशदिशांत ॥१३॥दैत्यांचे हनन पाहून । आले असुर प्रमुख विरोचन । क्रोधयुक्त त्यांचे मन । नागांसी तेव्हां मर्दिती ते ॥१४॥विविध शस्त्रास्त्रें सोडिती । नागवीरा रणीं पाडविती । कोणाचीं मस्तकें फुटतीं । कोणाचे तुटले हातपाय ॥१५॥रक्ताच्या महानद्या वाहती । दशदिशांत नाग धावती । भग्न दर्प विव्हल अती । कांही शरण दैत्यांसि गेले ॥१६॥हाहाकार माजला बहुत । नाग जाहले भयत्रस्त । दैत्यांचा पराक्रम पाहत । वासुकी प्रमुख तें येती ॥१७॥तक्षकादि महानाग ओकित । हालाहल सम विष रणांत । त्या विषानें सर्वही व्याप्त । जाहले तेव्हां हे प्रजापति ॥१८॥त्या विषापासून ज्वाला उठतो । असुर-पुगंवासी जाळिती । ऐसे दैत्य मेले किती । कित्येक मेले विषानें ॥१९॥उभे राहण्या असमर्थ होत । दैत्य संग्राममंडळांत । त्यांचीं सर्व शस्त्रास्त्रें जळत । सैन्यही विनाश पावलें ॥२०॥गजाश्वरथ पदाति युत । चतुरंग सैन्य झालें मृत । विरोचनादि असुर मूर्च्छित । पडले रणभूमीवरी तदा ॥२१॥नाग आनंदित झाले । रणांगणावरी नाचले । विजयोत्साहें ते भारले । ओरडती उच्चरवें ॥२२॥परी तेथ जाहले अद्भुत । प्रतापी विरोचन समरीं उठत । पीडा त्याची नष्ट होत । समरश्लाघी महाबळ तो ॥२३॥शुक्राचार्य जिवंत करित । विषानें जे असुर मॄत । अंधक प्रमुख सारे उठत । क्रोधसंयुक्त असुर सारे ॥२४॥तत्क्षणी ते गरुडास्त्र सोडित । त्यांतून निघाले असंख्यात । गरुड ते नागांसी भक्षित । कोलाहल तें माजला ॥२५॥तेव्हां नागराज वासुकी सोडित । विषज्वाला अति संतप्त । गरुडसारे दग्ध होत । गरुडास्त्रही दग्ध झालें ॥२६॥ते पाहून असुर चकित । वासुकींचे पौरुष वाखाणित । विरोचनादि सर्वही होत । मायेनें तें गरुड तेव्हां ॥२७॥क्षणांत भक्षिलें नागसैन्य । पसरविलें सर्वत्र दैन्य । दशदिशा पळालें नागसैन्य । भीतिग्रस्त त्या वेळीं ॥२८॥तक्षकादि महानाग मूर्च्छित । अतिदारुण त्या युद्धांत । जाणतां तो सर्व वृत्तान्त । शेषराजा रणीं आला ॥२९॥ज्ञातिबांधवांचा नाश पाहत । दैत्यांसी तो शरण जात । म्हणे कां झालात क्रोधसंयुक्त । दैत्य वीर हो सांगा मज ॥३०॥तुम्ही माझे बंधु आप्त । यांत तिळमात्र संशय नसत । कां आरंभिलें युद्ध अकस्मात । दिति नंदनहो सांगावें ॥३१॥तुम्हीं आम्हीं पाताळवासी । ऐकोनि शेषाच्या वचनासी । विरोचन म्हणे त्यांसी । मधुर स्वरें त्या वेळीं ॥३२॥शेषा महाभागा मान्य अससी । महामते तूं आम्हांसी । म्हणोनी स्नेहपूर्ण ऐसें बोलसी । प्राज्ञा ऐक सत्यवचन ॥३३॥आमुचा राजा मत्सर । ब्रह्मांड जिंकण्या उत्सुक फार । स्वीकारावें शासन उदार । त्याचें तुम्हीं सर्वांनी ॥३४॥अन्यथा नागांचा विनाश । तैसाचि असुरांचा नाश । ओढवेल अशेष । म्हणोनी हित तें आचरि तूं ॥३५॥विरोचनाचें वचन ऐकून । शेष सर्वार्थ कोविद म्हणे हसून । जे इच्छिसी मत्सरराजा तें करीन । भक्तिपूर्वक स्नेहानें ॥३६॥ऐसें बोलून विरोचनासी देत । करभार वार्षिक विनम्र चित्त । नाना रत्नें देऊन तह करित । असुरांसी तो चातुर्यानें ॥३७॥श्रेष्ठ शेषराजा नंतर जात । वासुकी मुख्य मित्रांसहित । समाधानें स्वगृहाप्रत । नाग सर्वही परतले ॥३८॥असुर झाले अति हर्षित । महाबळ नाग पराजित । संपूर्ण पाताळ जिंकण्या उद्युक्त । वरुणासी जिंकण्या निघाले ॥३९॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणें प्रथमे खंडे वक्रतुंडचरिते पातालविजयो नाम षड्विंशोऽध्यायः समाप्तः ॥ श्रीगजाननार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP