मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड १| अध्याय ३० खंड १ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ खंड १ - अध्याय ३० मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत शिवादिपराजयः Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । गण पिशाचांचे दारुण वचन । शिव स्वयं जाती तें ऐकून । युद्ध करण्या सज्ज होऊन । मत्सरासुरा जिंकावया ॥१॥ब्रह्मविष्णु काम धनद । वसू चंद्र समीर शक्तिद । वहिनकालाग्नि रुद्र जलद । भैरव भूतनायक ॥२॥युद्धोचित वेष करुनी । सारे ठाकले शिव सन्निधानीं । अष्टभैरव वीरभद्र येउनी । नंदी भृंगी पुष्पदंत ॥३॥महाकालरवासहित । महाकाली मुख तेथ येत । कार्तिकेयादींना युत । शुभं महेश्वर ससैन्य ॥४॥बैसोनिया वृषभावरी । युद्धलालसेने मदनारी । मजातेज तो सत्वरी । जेथ दैत्य उभे होते ॥५॥नाना युद्धविशारदा शंकरासी । सैन्यासह युद्धासी । पाहून नाना शस्त्रधरांसी । बाण सोडिती दैत्य सारे ॥६॥तेव्हा देव क्रुद्ध झाले । शस्त्रास्त्रांनी लढूं लागले । ऐशियापरी दारुण ओढवलें । देवासुरांचे युद्ध तें ॥७॥शस्त्रास्त्रें उभय फेकिती । तैसेचि बाण तीक्ष्ण अती । तेणें अंधकार सभोंवती । सर्वत्र तेथ पसरला ॥८॥सैन्यांच्या संचलनांत । धूळ उसळे आकाशांत । आपुला कोण शत्रु कोण हें न कळत । उभय पक्षांत त्या समयीं ॥९॥घंटांचा शंख नगार्यांचा । कोलाहल माजला आरोळ्यांचा । घोडयांच्या खिंकाळणयांचा । आवाज बधिर करी सर्वां ॥१०॥देव दैत्यांसी मारिती । दैत्य देवांई संहारिती । सुरदानव युद्ध करिती । बहु प्रकारें त्वेषानें ॥११॥शस्त्रांसी शस्त्रें भिंडतीं । अस्त्रांसी अस्त्रें तोडिती । मल्लयुद्धही कोणी करिती । मदान्वितउभय वीर ॥१२॥त्या घोर संग्रामांत । कोणी धारातीर्थीं पडत । कोणी छिन्न भिन्न दुःखित । वेदना असह्य भोगिती ॥१३॥आतां मृतांच्या अंगांतून वाहत । त्या रक्ताची नदी होत । मांसकर्दमानें युक्त । लाल रंग त्या नदीचा ॥१४॥अस्थिरुप बलाका त्यांत । केसांचें शेवाळ शोभत । धनुष्यें सापासम वाटत । शिरें दिसतीं कमलें जणु ॥१५॥शिरविहीन कबंधद्रुम । महाघोर रक्तनदींत अनुपम । काष्ठें भल्लक रुपासम । चामरें तृणरुपांत ॥१६॥छत्रांखालीं दुर्गम स्वैर । चर्म पट्टिश होतें दर्दुर । वीरांसी अत्यंत आल्हादकर । भीरुंना भयद रक्तनदी ॥१७॥ऐसी ती शोणितसरिता । दैत्यराजांना दिसतां । अंगीं क्रोधोत्साह भरतां । देवांचें सैन्य मारिती ते ॥१८॥बाणांची जाळी होत । सर्व दिशा त्यानी व्याप्त । पुढें जाण्यास मार्ग नसत । देव माघार तें घेती ॥१९॥दशदिशांत देव पळती । ती पाहून त्यांची स्थिती । देवराज त्यांसी थांबवितो । नंतर रंगली द्वंद्वयुद्धें ॥२०॥नमुचि कामदेवाशीं लढत । शंबर वायुदेवा ललकारित । महाबलं शुभं द्वंद्व खेळत । देवीसह त्या वेळीं ॥२१॥निशुंभ चंद्रासह लढत । विरोचन गुहासहित । कालभैरव दानव मल्लयुद्ध करित । कालभैरव देवाशी ॥२२॥महिषासुर आव्हान देत । कालाग्नि रुद्राप्रत । प्रल्हाद विष्णूसह लढत । विप्रचिती सूर्यासह ॥२३॥अंधक वीरभद्रा ललकारिता । दुर्बुद्धी असुर अग्नीसह लढत । विषयप्रिय दानव ब्रह्मयासहित । सुंदरप्रिय शंभूसह ॥२४॥मत्सरासुर दैत्येश उपस्थित । तीं द्वंद्व युद्धें पाहत । शेकडों हजारों जीं चालत । देवदैत्य सैन्यांत ॥२५॥त्या द्वंद्वांची गणना असंभव । कितेकांचे गेले जीव । अग्नि वायू अस्त्रादिक अभिनव । फेकिती ते परस्परांवरी ॥२६॥त्या दारुण युद्धांत । त्रिभुवन होई कंपित । रक्ताच्या महानद्या वाहत । अहोरात्र सात दिवस ॥२७॥परी देव अथवा असुर । कोणी न घेती हार । शंकरादि कुपित फार । होतो मनीं देवगण ॥२८॥करिती हल्ला बलयुक्त । मूर्च्छित दैत्य असंख्यात । कोणी पळती दशदिशांत । दैत्य व्याकुळ जाहले ॥२९॥सुंदरप्रिय पडला मूर्च्छित । मूतप्राय कितीक होत । विष्णु आदि देव सोडित । महा अस्त्रें असुरांवरी ॥३०॥ऐसी विकल स्थिती पाहत । तेव्हां मत्सर स्वतः येत । महाघोर नाद करित । ब्रह्मांड कापलें त्या नादें ॥३१॥धनुष्याचा टंकार करित । तेणें सुर झाले भयभीत । शत्रुसैन्यावरी वर्षिता बाणांचा ओघ सुदारुण ॥३२॥त्याच्या बाणें बलवत्तर । मर्दित झाले सुरवर । कांही मेले कांहीं फार । विद्ध घायाळ जाहले ॥३३॥कांहीं पडले मूर्च्छित । पंच बाणांनी छातीवर प्रहत । सेनानी कार्तिकेय तेव्हां पडत । धरापृष्ठीं बेसावध ॥३४॥अग्नीस सात बाणांनी । नंदीस दहा शरांनीं । दैत्येद्रें ताडितां झणीं । पडले ते रणभूमीवर ॥३५॥दहा बाणांनीं वीरभद्रास । नंतर आठांनी सवित्यास । सात शरें चंद्रास । अनिला नऊ बाणांनी ॥३६॥कालाग्नि रुद्रास आठ बाणांनी । महाकाळीस दहा नाराचांनी । गणपा भृंगिमुख्यास पाच पाच शरांनीं । कुबेरासी दहा शरें ॥३७॥ब्रह्मयास शंभर बाणांनी । प्रलयाग्निसम तेजस्वी मानी । सर्वांसी दारुण शरांनीं । विद्ध केलें मत्सरासुरें ॥३८॥सार्यांसीं भूवरी पाडविले । ऐसें अद्भुत कर्म केलें । तें पाहून सरसावले । विष्णु तेव्हां युद्धांत ॥३९॥सहस्त्र बाणांची वृष्टी । करिती तेणें असुर कष्टी । तेव्हा तो असुर क्रोधदृष्टी । सोडी शंभर बाण सत्वर ॥४०॥त्या बाणांनी विष्णू पडत । तें पाहून शंकर उठत । त्रिशूळाने दैत्यांसी हाणित । परी त्रिशूळ निष्फल तें ॥४१॥शंकरही भूमीवर पडत । तेव्हां पाश टाकी मत्सर त्वरित । पशुसम ओढून घेत । आपुल्या सन्निध तयासी ॥४२॥शंभूस पकडून म्हणत । महाबाहू तो मदोन्मत्त । अतुलबळ कोणतें मजप्रत । दिधलें सदाशिवा सांगावें ॥४३॥तूं कर्मबळें समर्थ अससी । कर्मप्रभावेंच मजसी । जगदीश्वरता मिळाली ऐसी । अभिमान तुझा वृथा असे ॥४४॥क्रमाक्रमानें पकडिलें । मत्सरें विष्णु मुख्य देव थोरले । कैलासशिखरावरी रमले । सारे दैत्य तदनंतर ॥४५॥सर्व पूज्यतम होऊन । मत्सर चित्तीं परम प्रसन्न । नाना कौतुकयुक्त भोग भोगून । मदोन्मत आनंदला ॥४६॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे । प्रथमे खण्डे वक्रतुण्ड चरिते शिवादिपराजयोनाम त्रिंशोऽध्याय समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP