मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड १| अध्याय ३ खंड १ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ खंड १ - अध्याय ३ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत पार्वतीदेहत्यागः Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । सूत म्हणे ऐका पावन । स्थिर करोनी चंचलमन । विनायक कथा मनमोहन । सारे तुम्ही मुनिजनहो ॥१॥विघ्नेश भक्ती जे न करिती । विघ्ने तयांसी बाधती । दक्ष स्वसदनीं जाता अती । क्रोधयुक्त मनी झाला ॥२॥बाधे कपाळशूळ जयास । अन्य कांहीं रुचत न त्यास । शिवास शिक्षा करावयास । आसुसलें हृदय दक्षाचें ॥३॥होता मनीं बहु दुःखित । न सुचे विचार चित्तांत । नारदमुनी तेथ अवचित । दिव्यदर्शन ते प्रकटले ॥४॥महातेजस्वी नारदमुनी । दक्ष तयांसी सन्मानी । आसन अर्घ्यपाद्यादी देउनी । पूजी त्यांना यथाविधी ॥५॥कुशलप्रश्न विचारिता । प्रसन्न तो मुनी होता । म्हणे दक्षा सांग आता । तव दुःखाचें कारण ॥६॥प्रजापती तू असता । कोमेजले मुख का तेजोयुक्ता? । काय घडली वार्ता ती सर्वही कथन करी ॥७॥दक्ष तेव्हां नारदांसी सांगत । ऐकावें मनीचे आर्त । सर्वांसमक्ष सभेत । शंकरें अपमान मम केला ॥८॥मी कां झालो दुःखित । म्लान तैसा चिन्ताक्रान्त । हें तुम्हां कथिलें निश्चित । उपाय सांग यावरी ॥९॥शंभु असे दर्पयुक्त । त्याचा गर्व हरावा अवचित । ऐसा माझ्या मनीचा हेत । सिद्धीस कैसा तो जाईल ॥१०॥हे सर्वज्ञा विचक्षणा । पुरवावी मम मनीची कामना । बृहस्पतिथागाची कल्पना । नारद तेव्हां सांगती ॥११॥मनोभावें करी स्तवन । सर्व देवांसी निमंत्रून । केवळ शंभू यज्ञभागहीन । होईल ऐसें करी तूं ॥१२॥देवपंक्तीत बहिष्कृत । यज्ञभागवंचित हीन निंदित । पिशाच्यांचा ईश अदैवत । शंभू तेव्हा ख्यात होय ॥१३॥तू प्रजापतींचा पती । मिळेल तुजला सर्वसंमती । पूर्वी केली तैसी कृती । करिता मनीषा सफल होई ॥१४॥परंपरेनें जें लाभलें ॥ तें सर्व ऐश्वर्य नष्ट जाहलें । ऐसें पाहून चिन्तावले । मन शिवाचें पोळेल ॥१५॥ऐसें आलें माझ्या मनांत । रुचेल तुज जें सांप्रत । तें करी गा तू त्वरित । नारद दक्षा सांगती ॥१६॥ऐसी युक्ती सांगून । नारद गेले निघून । वीणावादनीं रत होउन । ब्रह्मांडमंडळीं योगीश ते ॥१७॥ब्रह्मवेत्ते ते नारदमुनी । उपाय जो कथिला त्यांनी । तो दक्षेही हर्षयुक्त होउनी । सत्यार्थाने मानिला ॥१८॥बृहस्पतिसव करण्यासी । प्रारंभ करी तत्क्षणासी । तेथ निमंत्रून देवादिकांसी । शंभू सोडून सर्वत्रां ॥१९॥आले भगवान विष्णुदेव । तैसेचि नाना अन्य देव । द्विजवर गंधर्वादी सर्व । नाना वाहनीं बैसोनियां ॥२०॥नानातत्वार्थ पारंगत । आले तेथे द्विज बहुत । जावई सपत्नीक कश्यपप्रमुख येत । यज्ञमंडपीं त्या वेळीं ॥२१॥उद्दिष्टास अनुकूल करित । दक्ष परम तें हर्षित । गणनाथविहीन यज्ञ आरंभित । शंकर वर्जित तो यज्ञ ॥२२॥भावीगौरवा कारणें होत । गणेशाची स्मृती मनात । दधीचीप्रमुख शैव समस्त । क्रोधयुक्त ते झाले ॥२३॥दधीची क्रोधवश तेथ म्हणत । दक्षा महाप्राज्ञा ऐक हित । वचन माझे योग्य त्वरित । शंकरहीन यज्ञ नसावा ॥२४॥जैसा प्राणावाचूनी देह । तैसा शंकराविण यज्ञ निःसंदेह । हें वचन ऐकता दाह । दक्षाच्या मनीं होत ॥२५॥रुष्ट होउन दक्ष म्हणत । गर्वोद्धत तो शापविमोहित । ‘दधीची’ तुम्हांस काय ज्ञात । सत्य रुप शिवाचें त्या! ॥२६॥अहो तो शिव अशिव असत । पिशाचांचा अधीश्वर सतत । वर्णाश्रमविहीन आचरत । म्हणोनी यज्ञकम्री अपात्र असे ॥२७॥जेथें साक्षात् लक्ष्मीपती । मांगल्याचे आलय असती । त्या ह्या यज्ञीं न्यूनता कोणती । येणारे तें सांगा मज ॥२८॥लटकें बोलू नका वचन ’ ऐकता दधीची क्रोधायमान । क्रूर त्या दक्षाचें आलपन । पुनरपि म्हणती दक्षाप्रती ॥२९॥‘अरे तूं शिवनिंदा करिसी । अज्ञानें विमोहित भाससी । परी तूं हे न जाणसी । शंकरद्वेषे यज्ञनाश ॥३०॥तुज सिद्धी न लाभेल । वैभव सारे नष्ट होईल । येथले सर्व द्विजादि होती । पाखंडी पापी कलियुगांत ॥३१॥स्वधर्म, हीनता पावून । ते सारे नरकात पडून । विष्णूच्या मोहजालें युक्त होऊन । पाखंदाकारक देव होय ॥३२॥देव ते कलियुगातील । पाखंडां साहाय्य करतील । पाखंडाप्रिय प्राणी होईल । मलयुक्त कलियुगात ॥३३॥शिवहीन ह्या यज्ञांत । केशव मुख्यत्व पावत । स्वयं वेदबाह्य आचरत । कर्म त्यामुळें शापित होय ॥३४॥सर्व देवांचा त्वरित होईल । पराजय हें निःसंशय । सर्व मुनींना पुढे होईल । अपरंपार दुःख जगीं ॥३५॥ऐसी शापवाणी उच्चारित । मग दधीची निघून जात । यज्ञमंडपीचे अन्य शैवही त्वरित । तेही जाती त्याच्यामागे ॥३६॥गौतम गालव वामदेव ऋषिजन । मार्कंडेय अगस्ती आदी सुजन । परमधार्मिक ते सांगून वचन । वेदबाह्य यज्ञ पाहू नये ॥३७॥ऐसा यज्ञ करुन नये । त्यात भागही घेऊ नये । ऐकता देवतांच्या मनात ये । संभरम भावना त्या वेळी ॥३८॥तेव्हा जे अन्य मुनिजन । तैसेची देवगण पावन । त्यांचें सांत्वन करुन । विष्णु बैसवी त्या सर्वांसी ॥३९॥स्वयं उचित स्थानीं बसत । शिवहीन मंडपीं दक्षप्रेरित । विष्णूवरी विश्वास ठेवित । देव ऋषिगण संमोहानें ॥४०॥यज्ञ पाहण्या उत्सुक असत । भृगु आदि मुनी यज्ञारंभ करित । यथाविधि यथाभाग लाभत । देवतांना यज्ञाहुती ॥४१॥इकडे यज्ञ ऐसा होत । तिकडे नारद कैलासी जात । पार्वतीसह शंबूस नमित । भाविक तो नमर होवोनी ॥४२॥कलहप्रिय नारद असत । सतीस संबोधून म्हणत । दक्षयज्ञीं तुझे नसत । आगमन कां ते नकळे मला ॥४३॥तेथें महोत्सव चाललासे । यज्ञ सोहळा थोर विलसे । महोत्सवीं रमला असे । देव मुनींचा समुदाय ॥४४॥तुझ्या भगिनी पतिसमवेत । तेथे पाहिल्या अतिमुदित । देवी, तुम्हीं कां न गेलात । ऐश्या त्या मंगल यज्ञोत्सवीं ॥४५॥पित्याच्या घरीं जाण्यास । मुलीस का लागे निमंत्रणास । तेथ मानापमान कासयास । आपण मनीं धरावा? ॥४६॥जरी विसरला बोलाविण्यास । मुलीनें न मानावा तरी रोष । जावें त्वरित पितृकार्यास । संशय मनांत धरु नये ॥४७॥ऐसें सांगू निया वचन । नारद गेले निघून । मनांत कुतूहल निर्मून । मौज बघण्या उत्कंठित ॥४८॥सतीच्या मानसी ऐसे भरवून । नारद गेले कळ लावून । तेव्हां ती अत्यंत खिन्न । मनांत दुःख फार करी ॥४९॥शंकरास वंदून । हृदयीं विषण्ण होऊन । सती करी शिवस्तवन । नीलकंठा नमन तुला ॥५०॥शंकरा तुला माझें वंदन । शिवा सगुणा मृडा निर्गृणा नमन । ऐकावें माझें प्रार्थनावचन । वडिलांच्या यज्ञीं जाऊया ॥५१॥पित्याच्या घरी होत । यज्ञोत्सव थोर उत्साहयुक्त । हे विभो मी मनी वांछित । तुम्हांसवे तेथ जावे ॥५२॥ऐसें ऐकून सतीचें वचन । शंभू आश्चर्ये म्हणे वचन । काय बोलसी गे अभिमान । तुज कैसा वाटेना? ॥५३॥माझा द्वेष्टा तुझा पिता । निमंत्रण मज नसतां । मी तेथ यज्ञीं येतां । अपमान माझा होईल ॥५४॥म्हणोनी मी तेथ न जावें । विपरीत अवघें टाळावें । अधिक काय तुज सांगावें । महामाया स्वयं तू ॥५५॥मी मायिक संशयातीत । तूची होई कार्यरत । देव मुनींसी निर्मी त्वरित । यथेंचि आपण यज्ञ करुं ॥५६॥परी हें शंबूचें वचन । सती न मानी खिन्न मन । दुःखें म्हणे तुम्हांवाचुन । एकटी मी जाऊ का? ॥५७॥आज्ञा द्या एकटी जाण्यास । करुं नका हो माझा विरस । वडिलांच्या यज्ञोत्सवास । पहावें ऐशी मनीषा ॥५८॥तेव्हां शंभू कांही न बोलत । मौन हीच ती संमती मानित । परिणामाचा विचार न करित । निघाली सती माहेरासी ॥५९॥पाहून शंकरां आश्चर्य वाटत । मानसीं तो होत विस्मित । जें होणार तें होवो म्हणत । विमान पाठवी शक्तीसाठीं ॥६०॥विमानीं आरुढ होत । सती आकाशमार्गे जात । पित्याच्या घरी पोहचत । सन्मान करिती बंधुजन ॥६१॥मातापिता हर्षभरित । सतीचा सत्कार तें करित । संतोषून स्वतनप्रेत । दक्ष तेव्हा सांगतसे ॥६२॥हे महाभागे तू आलीस । यज्ञशोभा वाढविलीस । ऐकुनी त्या पितृवचनास । सती म्हणे दुःखार्ता ॥६३॥बाबा, तुमच्या यज्ञात । मी आल्यानें शोभा येत । येथें आलें अनाहूत । म्हणोनि उपहास का ऐसा? ॥६४॥तुमच्या यज्ञमंडपात । आगंतुक आले मी धावत । आपण रुष्ट कां आम्हांप्रत । तें समजेना मजलागी ॥६५॥तेव्हां दक्ष म्हणे रागावून । ऐक बाळे लक्ष देऊन । माझाचि दोष ह्यात महान । म्हणोनि दिली तुज शंभूतें ॥६६॥भस्म होऊन मानसाला । तुज दिली पिशाच्चराजाला । वडिलांच्या पूर्ण केला बोला । घोर अन्याय घडला तो ॥६७॥वर्षभरष्ट तो शिव असे । वृथा ईश्वरपद मिरवित असे । त्याच्या दोषास्तव निमंत्रण नसे । तुलाहि बाळ मम यज्ञीं ॥६८॥परी तूं आलिस हें बरें मानितों । ये मजजवळी स्वागत करितों । सूत ऋषींना वर्णन करितो । ऐका सतीची मनोव्यथा ॥६९॥शिवींनदा ऐकून । क्रोधें संतप्त सतीचें मन । यज्ञमंदिरा अवलोकून । सती म्हणे पित्यासि तैं ॥७०॥रुद्रभाग नसे ज्यांत । ऐसा यज्ञ पाहून संतप्त । म्हणे ताता काय हें अघटित । वेदबाह्य कर्म आचरिलें?॥७१॥रुद्रभागविण यज्ञ निष्फळ । तू शिवनिंदा करतोसी खळ । तूच निःसंशय अशिव निर्बळ । माझे बोल सत्य जाण ॥७२॥शिव हे ब्रह दोन अक्षरी । निर्गूण निराकार खरोखरी । पिता नव्हे वाटतोसी वैरी । मानसी दुःख बहु वाटे ॥७३॥हे पित्या तव देहापासुन । माझा देह झाला उत्पन्न । शिवनिंदक तूं म्हणून । त्यागीन क्षणीं या देहासी ॥७४॥ऐसें वचन बोलून । ध्यानें हृदयीं शिवासि स्मरुन । मनांत चिंतन त्याचें करुन । उडी घातली यज्ञाग्नींत ॥७५॥पुन्हा एकदा होई शक्ती । हिमालयाची सुता पार्वती । शिवध्यानपरायणा मिळवी ती । शिव हाची पती पुन्हां ॥७६॥घोरतप तिनें आचारिलें । सुतीव्र व्रतही पाळिलें । मन आत्मवश ठेविलें । म्हणोनि लाभला शंभू पती ॥७७॥प्रेमविहवला सती लाभला । शिवपत्नीचे पद पुन्हा पुनित । पुनरपी त्यांचें मिलन होत । दिव्यानंद सर्वांसी ॥७८॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रेमन्मौद्गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुंडचरिते सतीदेहत्यागो नाम तृतीयोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP