मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड १| अध्याय १९ खंड १ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ खंड १ - अध्याय १९ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अंगिरामुद्गलसंवादसमाप्तिः Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । देवदूतांचे वचन ऐकून । मुद्गलमुनी जें बोललें वचन । सूत सांगती शौनकालागुन । सर्वमुनींसमवेत ॥१॥देवदूता बुद्धिपूर्वक ऐकलें । जें सर्व तूं मज सांगितलें । पुनरपि विचारितों मनीं आले । प्रश्न सूता महामनें ॥२॥स्वर्गी तीन दोष असती । ते दोष कोठें नसती । तें सांगावें मजप्रती । मनस्ताप कुठें नसे ॥३॥मानव मोदभरे राहती । चिन्तारहित सुखें निवसती । देवदूत तेव्हां म्हणते । सांगतो सविस्तर ऐकावें ॥४॥निष्काम कर्मे ब्रह्मलोक प्राप्त । वैकुंठ शिवलोक सौरशाक्त । परी तेही दोषयुक्त । असती लोक निःसंशय ॥५॥परी ब्रह्मभूयपद दोषहीन । विचारी मुद्गल तें ऐकून । मान लववून विनमर मन । म्हणे तेव्हा भक्ति भावें ॥६॥मुद्गल विचारी देवदूतास । कैसे पावे निर्दोष लोकास । तें सारें विनमरास । मजला सर्वही सांगावें ॥७॥उपकारपर तूं असत । म्हणोनि तत्त्वता विचारित । देवदूत तेव्हां सांगत । पृथ्वी असे कर्मभूमी ॥८॥धर्म कर्म काम मोक्षादि लाभत । परी ब्रह्मभूयत्व न प्राप्त । ऐसें ऐकता मुद्गल मनांत । निश्चय करुनी सांगती ॥९॥दूता तुज मी नमन करित । रम्य तुझें वाक्य असत । परी न मी येत स्वर्गांत । एकलाची जाई तूं ॥१०॥जेथ हृदयीं संतापसंयुक्त । पुनः पतनाचें भय वाटत । ऐशा स्वर्गीं जाण्यांत । मोद न मजला तिळभरी ॥११॥मी ब्रह्माची इच्छा करित । स्वर्गेच्छा नसे मनांत । हें ऐकून मुद्गलासी देवदूत । म्हणे भाग्यहीन तूं अससी ॥१२॥तूं स्वर्गाचें अभिनंदन । मुनिसत्तमा न करिसी अप्रसन्न । स्वर्गेच्छा न करी ऐसा नंदन । कोण मानवाचा असे? ॥१३॥उग्र तपाचरणें दानानें । स्वर्ग लाभे यज्ञ केल्यानें । नाना पुण्यादिक साधनें । सत्कर्म फळ जें महान ॥१४॥सर्व मनुज इच्छा करिती । लाभावी सौख्यप्रद स्वर्गप्राप्ती । तो स्वर्ग मिळता तुजप्रती । महामूढा तूं नाकारिसी कां? ॥१५॥तूं ज्ञानहीन मज वाटसी । स्वर्गाची इच्छा न धरिसी । ऐसे पुनः पुन्हा वदे त्यासी । देवदूत त्या वेळीं ॥१६॥तेव्हां मुद्गल स्नेहसंयुक्त । हास्यपूर्ण वदनें म्हणत । अरे प्राज्ञा तू मोहवित । किमर्थ मजला सांगावें ॥१७॥हा देह बंधनात्मक असत । त्या देहा स्वर्गीं सुख लाभत । स्वर्ग तो मुक्तिदाता नसत । पंडितजनांचे मत ऐसें ॥१८॥तापत्रय असती स्वर्गांत । दूतोत्तमा जें तापयुक्त । तें कदापि न वांछित । अध्यात्म विद्यावंत नर ॥१९॥महाभाग दूता तूं जाई परत । प्रणाम सांग माझा विनत । बृहस्पति आदी इंद्र देवांप्रत । सांग मुनी आला नाहीं ॥२०॥ऐसे सांगून दूतास । मी गेलों अग्निशाळेस । दूतही परतला उदास । आश्रमीं मीही विचारमग्न ॥२१॥ब्रह्मवेदाची नाना रुपें असत । ऐसे विधि सांगत । त्याचें प्रमाण काय होत । साधनीय तीं कशीं ॥२२॥पूर्णभावाचें नसता ज्ञान । मी भ्रान्त निःसंशय उन्मन । म्हणून अंगिरसाश्रमीं गमन । त्वरित करीन मी आतां ॥२३॥योगिश्रेष्ठ महामुनीस ज्ञात । वेदज्ञान उत्तम जगांत । तो शब्दब्रह्मांत निष्णात । परब्रह्मीं तन्मय ॥२४॥तो आमुचा मूळ पुरुष असत । साक्षात् ब्रह्म शरीरक होत । ऐसा निश्चय करुनि मनांत । गेलों अंणिरसांकडे ॥२५॥त्यांचा आश्रम पाहिला । सर्वभूतां अभयप्रद जो जाहला । तेथ ना उष्ण ना शीताला । क्रोधकामां अवकाश ॥२६॥मत्सरादिक तेथ नसत । अवृष्टी अतिवृष्टी न संभवत । अकालीं मरण प्रलुप्त । ग्रहादींची पीडा नसे ॥२७॥तेथ ना राक्षसांचे भय । सर्वशांतिप्रद अभय । पूर्णतायुत सुखमय । तापसांना हितावह ॥२८॥सुपुण्ययोगें मी प्रवेशत । तेथ नाना मुनिवृन्द पहात । वेदघोषे निनादित । बटू जेथ संचरती ॥२९॥अग्निहोत्रादींनी युक्त । बहुविध पक्ष्यांनी निनादित । वृक्ष वेली समायुक्त । नाना पुष्पफळें समृद्ध ॥३०॥तेथ अनेक सरोवरें होतीं । ज्यांत हंस कारंडव विलसती । बहुविध पक्षिगण करिती । छाया ज्यावरी ऐसें जळ ॥३१॥अमृतासम सुमधुर निर्मळ जळ ज्यांत मकर । कुमुदादी कमळे सुंदर । गुंजारवें हृद्य भ्रमरांच्या ॥३२॥सिंह वाघ हत्ती उंदिर । गाई सर्व प्राणी निर्वर । जेथ राहती सुखें निर्भर । ऐसा आश्रम पाहिला ॥३३॥महाभाग, तो आश्रम पाहून । हर्षयुक्त मनीं होऊन । विस्मित पुनः पुन्हा निरखून । अद्भुत दृश्य तेथील ॥३४॥कुशासनीं तेथ बैसला । साक्षात् अन्य सूर्य जो भासला । स्वतेजें दीप्यमान चमकला । पाहिला मुनि अंगिरस ॥३५॥नानाविध सिद्धांनी वृत । योगिजन ज्या वंदित । मुनिवृन्द प्रणाम करित । ब्रह्मविद्या शिष्यां शिकवी जो ॥३६॥यथार्थ ज्ञान सर्वां देत । त्यांसी मी घातलें दंडवत । जोडून ओंजळ भक्तिभावयुत । उभा राहिलो तें सान्निध ॥३७॥तुमच्या गोत्रांत जन्मलों । मुद्गल नामें ज्ञात झालों । मुनिसत्तमा दर्शना आलों । ब्रह्मदायका तुमच्या मीं ॥३८॥माझें वचन ऐकून । बोलला मुनि तो प्रसन्न । बाळा तूं आलास पवित्र मन । राही माझ्या सान्निघ्यांत ॥३९॥अविघ्नभावयुक्त । तप आचरिलें तूं अविरत । म्हणोनी माझ्या दर्शना येत । सत्पुत्रा तूं निःसंशय ॥४०॥मुनींचे वचन ऐकलें । मन माझें आनंदलें । आश्रमीं मी वास्तव्य केलें । बहुकाळ बुद्धिमंतांच्या त्या ॥४१॥एके दिवशीं उत्तम अवसर । पुढयात होते मुनि समग्र । तेव्हां अंगिरसां पुढती विचार । माझ्या मनींचा मांडिला ॥४२॥महायोगिया स्वामी जाणावें । करुणानिधी रहस्य बरवें । जीवित साफल्य लाभावें । ऐसी इच्छा मानसीं ॥४३॥आमुचा तैसा सर्वांचा असत । एक आश्रय तूं जगांत । म्हणोनी शरण भक्तयुक्त । आलों तुज अनन्यभावें ॥४४॥सूत सांगती मुनिजनांस । प्रार्थना ऐकून मुद्गलास । अंगिरस म्हणती करुनि स्मितास । हर्षभरित होऊनी ॥४५॥बाळा तूं काय इच्छिसी । तें महाद्युते सांग मजसी । मंत्रकर्ता पुराणाचार्य अससी । सांग सत्वरी प्रश्न तुझा ॥४६॥मुद्गले तेव्हां विचारित । ब्रह्म नानाभाव समन्वित । कथिलें असे वेदांत । काय प्रमाण त्या जाणावं ॥४७॥ब्रह्मभूय व्हावें ऐसें वांछित । जन तें कैसे उपासित । हें सांगावें मज साद्यन्त । प्रार्थना ही मनोभावें ॥४८॥अंगिरा म्हणती पुत्रा सांगेन । वेदांतांत जें कथिलें पावन । नाना ब्रह्मनिरुपण । ब्रह्म लाभार्थ क्रमानें ॥४९॥अन्न हें ब्रह्म जाणावें । ऐसें जें वाक्य कथिलें । तेथ अन्न उपाधियुक्त जाणलें । अन्नकोश विवरणीं ॥५०॥प्राण ब्रह्म ऐसे कथित । प्राण कोश संदर्भांत । तदनंतर मन ब्रह्म सांगत । मनःकोशमय व्याख्यानीं ॥५१॥विज्ञानें हेचि ब्रह्म उक्त । विज्ञानकोश संदर्भांत । आनंद ब्रह्म समतानंद कोशांत । चैतन्य ही ब्रह्म असे ॥५२॥जे महाकारणधारक असत । तें चैतन्य ब्रह्म असत । बिंदुही ब्रह्म उक्त । तद्ज्ञान ज्ञानदेहमय ॥५३॥चिद् ब्रह्म समाख्यात । सोऽहं मात्रात्मक पुनीत । बोध हाची ब्रह्म म्हणत । वेदांत स्वयं उत्थानपर ॥५४॥सांख्य ब्रह्म ऐसें कथित । विदेहधारक शास्त्रांत । कर्म तैसें ज्ञान वेदांत । कथिले ऐसें बहुविध ॥५५॥ब्रह्म सम जाणावें । नंदनात्मक जें बरवें । अव्यक्त सहज चिंतावें । नेतिरुपक ताता तूं ॥५६॥शक्ति ब्रह्म ऐसे उक्त । असद्रुप प्रकाशक होत । सूर्य ब्रह्म आत्मरुप युक्त । ऐसें रहस्य जाणावें ॥५७॥विष्णु ब्रह्म उभयधारक । शिव ब्रह्म निर्मोह प्रकाशक । स्वानंद ब्रह्म संयोगकारक । निर्वृत्ति ब्रह्म अयोगपर ॥५८॥ऐसें नाना प्रकारें कथिलें । वेदादींत ब्रह्म भलें । ब्रह्मवादज्ञ मुनींस झालें । तथ्य प्रमाण ज्ञात त्याचें ॥५९॥बृंहति तैसें बृंहयति । म्हणोनी ब्रह्म ही श्रुति उक्ती । जे महान सर्वव्यापक जगती । तें ब्रह्मभूत तत्त्व जाणावें ॥६०॥अनादि आत्मचिदादियुक्त । ऐसें ब्रह्म असे कथित । तेंच पैम उपाधियुक्त । योगीजन उपासिती ॥६१॥ब्रह्म तें ब्रह्म जाणावें । योगानें तें प्राप्त करावें । म्हणौनी कर्मज्ञानादींचे आघवें । मंथन त्याच्या लाभार्थ ॥६२॥तेंच ब्रह्म प्रत्यक्ष असत । ब्रह्मणस्पतिवाचक जगांत । विविध ब्रह्मांचे ब्रह्म विख्यात । वेदस्मृति सुभाषित ॥६३॥स्वयं वाढत इतरा वाढवित । बृहधातूचा अर्थ व्यापक असत । गण शब्द ऐसा प्रकीर्तित । समूहवाचक गण धातू ॥६४॥ज्ञाते ऐसे सांगती । बाह्यांतरादिकां गण म्हणती । अभेदयोगें तत्प्राप्ती । योगीजनां सर्वदा ॥६५॥अन्नांचे भेद बहुत । बाह्यांतर विभावित । तेव गणशब्दें ज्ञात । ऐसें विबुधीं जाणावें ॥६६॥त्यांचा स्वामी गणेशान । तोच ब्रह्मणस्पति शोभन । महाभागा त्याचेच करी भजन । ब्रह्मभूयत्वा कारणें ॥६७॥त्या ब्रह्मणस्पतीचे जगांत । अवतार भेद असत । ज्ञानादि ब्रह्मनामें युक्त । गणेश हाची परब्रह्म ॥६८॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुण्डचरिते अंगिरामुद्गलसंवादो नामैकोन्विंशतितमोऽध्याय समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP