मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड १| अध्याय ३२ खंड १ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ खंड १ - अध्याय ३२ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत वक्रतुंड्प्रादुर्भावः Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । मुद्गल म्हणती दक्षा ऐकावें। महाप्राज्ञा कार्य बरवें । देवांचे जें स्वभावें । संक्षेपें मी तुज सांगतों ॥१॥दत्तात्रेय मुनि गेल्यावर । शंकर मानसीं करिती संचार । गणेशाचा मंत्र थोर । त्याचा जप करीन मी ॥२॥नंतर गणेशाचें हृदयीं चिंतन । करुन ब्रह्मदिकां म्हणती वचन । विष्णु सर्व देव तापसांनो । ऋषींनो वचन ऐकावें ॥३॥हितकारक दुःखनाशक । दत्तात्रेयें कथिलें तारक । एकाक्षर व्रत जें अमोलिक । करुन विघ्नपा तोषवावें ॥४॥शंभूचें वचन ऐकून । मुनी देवनायक प्रसन्नमन । वाहवा सुंदर हा विचार पावन । ऐसे उद्गार काढिती ॥५॥तदनंतर एकाक्षरमंत्रें उपासिलें । त्या सर्वांनी गणेशा स्थापिलें । देव मुनींनीं वंदिलें । आदरपूर्वक सर्वनायका ॥६॥कोणी पद्मासन घालून बैसले । कोणी विरासन घातलें । कोणी स्वस्तिकासनीं विराजले । नाना आसनीं ऐसे स्थित ॥७॥कोणी निराहार राहिले । कोणी पानें खाऊन जगले । कोणी वायु भक्षण केलें । अन्य करिती प्राणायाम ॥८॥पाणी पिऊन कोणी राहती । पादांगुष्ठाकडे पाहती । कोणी दॄढासनीं बसती । कोणी मानसपूजामग्न ॥९॥कोणी विविध फुलांनी पूजिती । कोणी प्रदक्षिणा घालिती । ऐसें नानाविध आचरती । व्रतप्रकार सकल देव ॥१०॥ऐंश्यापरी तप करिती । विधिपूर्वक मंत्र जपिती । एक चित्तें आराधिती । नमरपणे भक्तिपूर्ण ॥११॥एक हजार वर्षे तप आचरिलें । दिव्य एकनिष्ठ तेव्हा भलें । तेणें वक्रतुंड प्रसन्न झाले । महातेजस्वी प्रतापवंत ॥१२॥देवऋषींच्या पुढें प्रकटत । ब्रह्ममय देव वेदस्तुत । तेजाचा पुंज तो विलसत । निर्गूण असुनी सगुण झाला ॥१३॥सिंहवाहन गजवक्त्र दिसत । शूर्पकर्ण महोदर चतुर्बाहुयुक्त । पाशांकुश वरद अभयकर धृत । वामांगी सिंद्धी उभी त्याच्या ॥१४॥दक्षिणांगी बुद्धी विलसत । नाभीवरी शेषनाग रुळत । मुकुट कुंडल कटकान्वित । चिंतामणी त्याच्या वक्षावरी ॥१५॥सर्पायज्ञोपवीत युक्त । नानाभूषणें शोभिवंत । महातेजें जो प्रज्वलित । करांत क्रीडाकमल होतें ॥१६॥त्याचें तें रुप अपरिचित । म्हणोनि देव विप्र भयभीत । काय हें तेज अद्भुत । प्रकटलें सम प्रलयाग्नीच्या ॥१७॥हा गणराज येथ आला । कीं भावी प्रळयकाल दैवें निर्मिला । ऐसा तर्ककुतुर्क चालला । देवमुनींच्या चित्तांत ॥१८॥तेव्हा मेघगंभीर वचन । बोलिला वक्रतुंड गजानन । देवांनो मुनिगणहो प्रसन्न । मीच तो गणेश्वर प्रकटलों ॥१९॥ज्याचें ध्यान करता अविरत । तपप्रभावें मंत्रराज जपत । तेणें परितुष्ट मी मुदितचित्त वर द्यावया आलों तुम्हां ॥२०॥मुद्गल सांगती दक्षासी । ऐकुनी वक्रतुंडवचनासी । विनम्र भावें प्रणाम त्यासी । हर्ष निर्भर सारे करिती ॥२१॥अमरगण ऋषिगण प्रार्थिती । सौम्यरुप दाखवा आम्हांप्रती । या दुर्धर तेजें विहवल चित्तीं । वक्रतुंडा आम्ही सर्व ॥२२॥त्यांची प्रार्थना ऐकून होत । गणेश प्रभू सौम्य तेजयुक्त । तेणे चर्मचक्षूंनी सुखें पाहत । मुनिजत देव सारे तया ॥२३॥ती सौम्य मूर्ती पाहती । प्रणाम करुन म्हणती । प्रभू धन्य धन्य आम्ही जगतीं । तुमचे दर्शन आज झालें ॥२४॥स्नेहभावें तदनंतर । अर्पितो सारे षोडशोपचार । यथाविधि ते महेश्वर । मंगल स्तवन त्याचें गाती ॥२५॥करांजली जोडून विनमर । ते सर्वही भक्तिनम्र कंधर । आनंदाश्रू नयनीं सुखकर । रोमांचयुक्त अंगे त्यांची ॥२६॥त्याच्या दर्शनें महोत्सव वाटत । यथाज्ञान यथान्याय पूजन करित । वक्रतुंडास महाओजस्वी देवास । स्तोत्र पूजा अर्पिती ॥२७॥शंभुरुपा आम्ही नमितों । विष्णुरुपा तुला वंदितो । सूर्यरुपा तुला ध्यातों । शक्तिमया तुला ॥२८॥वक्रतुंडा तुला नमन । गजवक्त्रा तुला वंदन । एकदंता देवा चिंतन । सर्वाधिपते सदा करितों ॥२९॥निर्गुणासी निस्तपासी । चतुर्बाहुधरा तुजसी । सिंहवाहना नागपते नाभिबंधासी । अनंतासी नमन आमुचें ॥३०॥अपारा दुर्लक्ष्या पाशांकुशधरा । नागयज्ञोपवीतधरा । वरद अभयकरा सिद्धिबुद्धिवरा । ब्रह्मभूता ब्रह्मदायका ॥३१॥दैत्यदानवावरुपा देवरुपधरा । पक्षिस्वरुपा शुकरुपधरा । ग्रहनक्षत्ररुपा ईश्वरा । नमन लतावृक्ष स्वरुपा ॥३२॥पर्वता सरितासागररुपा नमन । जलजंतुस्वरुपा तुज प्रणाम । सर्परुपा तुला वंदन । चौरांयशी लक्ष योनि संस्था ॥३३॥चराचरमया अभिवादन । नानाप्रभेदपरासी वंदन । कर्माकर्मरुपा नमन । विकर्मपर देवासी ॥३४॥ज्ञानयोगासी स्वात्मरुपधरासी । स्वसंवेद्यरुपा योगमयासी । नाना आधारप्रधारासी शब्दब्रह्ममया नमन ॥३५॥मायारुपधारकासी मायामयासी मायाहीनासी । मायिका मोहदात्यासी । सर्वकारासी वंदन ॥३६॥स्थूल सूक्ष्मादि भेदासी । भेदाभेदमया भेदहीनासी । अनंतपारा भक्तां वरदात्यासी । भक्तसंरक्षका प्रणाम ॥३७॥नमो नमः परेशाला । अव्ययाला गणेशाला योगाधीशा गजानना तुला । पुनःपुन्हा नमस्कार ॥३८॥षडंग वेदही जेथ थकले । ज्याची पूर्ण स्तुती करुन न शकले । तेथ आमुचें बळ तें कसलें । गणेशा तुझ्या स्तुतिगानीं ॥३९॥वक्रतुंडस्वरुपा तुझें स्तोत्र । रचण्यासी आम्ही न पात्र । परी भक्तिभावें सुपात्र । तुझ्या कृपेनें जगी होऊं ॥४०॥मायादुःख सर्वांच्या मनांत । ज्ञानकारक ब्रह्म निर्मित । म्हणोनी ज्ञानहीन वक्त्र म्हणत । ब्रह्मां बुधजन संकेते ॥४१॥माया ब्रह्मतुंडाचा योग होत । योगशांती उपजे पुनीत । योग्यांच्या हृदयीं जी संस्थित । तिचा महिमा अगम्य असे ॥४२॥माया तुझें देह स्वरुप । ब्रह्म तें वस्त्र आत्मरुप । उभयतांचा योग होतां स्वरुप । वक्रतुंड प्रकटतसे ॥४३॥त्या वक्रतुंडा तुज पाहिलें । साक्षात् योगमया मन धालें । धन्य आम्हीं गणाध्यक्षा स्तविलें । प्रणत तुमच्या चरणांवरी ॥४४॥धन्य जन्म धन्य नयन । धन्य संपदा तैसेंचि ज्ञान । धन्य सप आमुचें पावन । ज्यांनी गजानना पाहिले ॥४५॥प्रसन्न देवेशा जरी अससी । आम्हां शुभद वर देसी । तरी तुझ्या पदांबुजी दृढ भक्तीसी । देई आम्हां सर्वकाळ ॥४६॥तूं चिंतिला अर्थ देसी । म्हणोनि करितों पार्थनेसी । मत्सरासुराच्या विनाशाची । करी सत्वर वक्रतुंडा ॥४७॥प्रभो हें सारें जगा पीडित । विघ्नपा तो असुर गांजित । महाबला दैत्या मारावें त्वरित । उपकारास्तव सर्वांच्या ॥४८॥ऐसी स्तुती प्रार्थना करुन । तैसेंचि त्यासी पूजन । त्याच्या पुढें साष्टांग नमन । देव ऋषि सर्व करिती ॥४९॥त्यांना उठवून वरती । वक्रतुंड साक्षात् सांगती । तुमचें हें स्तोत्र जगतीं । सर्वसिद्धिप्रद होईल ॥५०॥ईप्सित अर्थ प्राप्त होईल । भुक्तिमुक्ती यानें लाभेल । जो हें स्तोत्र वाचील । भक्तियुक्त मनानें ॥५१॥तुमच्या भक्तियोगें प्रसन्न । करीन मत्सरासुराचें हनन । तुमचें दुःख दैन्य दूर करीन । आश्वासन हें माझें ॥५२॥पंचभूतमय जग त्रिगुण असत । ब्रह्मांड अष्ट आवरणें युक्त । त्या आठ आवरणीं वसत । देव सर्वही मानव ॥५३॥नाग चराचर विश्व त्यांत । त्यापासुनी मत्सरासी भय नसत । म्हणोनी मत्सरा नाश वाटत । अतीव कठिण असंभव ॥५४॥परी द्विजांनो हित करीन । प्रिय तुमचें देवहो प्रसन्न । यांत संशया नसे स्थान । वक्रतुंडाचें वचन हें ॥५५॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमनौद्गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुण्डचरिते वक्रतुण्डप्रादुर्भावी नाम द्वात्रिंशोऽध्यायः समाप्तः ॥ श्रीगजाननार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP