मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड १| अध्याय २४ खंड १ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ खंड १ - अध्याय २४ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत मत्सरासुरतपोवर्णनम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । मुद्गल सांगती मत्सरासुरास । शंभुभक्ता उग्रतपसास । शंकर बोध करिती दानवेंद्रास । महाबळीस त्या समयीं ॥१॥अरे मत्सरा ऊठ त्वरित । माग वर जो मनोवांछित । तुझ्या उग्र तपानें मी चितांत । संतुष्ट तुझ्या भक्तीनें ॥२॥धन्य तापसोत्तमा तुझे धैर्य । देहभावातीत केलेंस कार्य । दृढ भवतीनें शरीर मर्त्य । केलेंस अमर व्रताचरणी ॥३॥आतां क्लेश सोड, तप तुझे झालें । सिद्ध संपूर्ण चांगलें । जें जें दुर्लभही तूं इच्छिलें । तें तें सारें मी देईन ॥४॥शिवाचें वचन ऐकून । मत्सरासुर जागृत होऊन । डोळे उघडी ध्यान सोडून । पुढें पाही शंकरासी ॥५॥शंकरदर्शनमात्रें होत । मत्सुरासुर सत्तायुक्त । उठून त्यासी वंदित । विनमर प्रेमें विव्हल तो ॥६॥तो महाबुद्धो म्हणत । कल्याणकारका शिवाप्रत । भक्तांचा कल्पवृक्ष जो असत । पार्वतीसहित परम प्रभू ॥७॥मत्सरासुर म्हणे धन्य वंश । धन्य माझा जन्मविशेष । धन्य संपत्ति ज्ञानवकाश । संपत्ति शास्त्र सारें धन्य ॥८॥धन्य माझीं मातापितरें । धन्य प्रभू तप सारें । मुनींसही दुर्लभ खरें । ऐसें पाहिलें तुझें रुप ॥९॥मुनी जें रुप न जाणती । ध्यानशाली योगी न पाहतीं । ऐसें रुप कथिती वेद स्मृती । सदाशिवाचें रुप सदा ॥१०॥ऐशा सदाशिवा तुज पाहिलें । मी प्रत्यक्ष आज पूजिलें । मन माझें मोहरलें । अवर्णनीय आनंद ॥११॥ऐसें बोलून नमस्कार करित । हर्षभरें शंकरासी पूजित । भक्तिभावं समन्वित । ऋषि देवांसहित तेव्हां ॥१२॥यथाविधि पूजिलें शंकरास । नमरतेनें करी दंडवत । जमिनीवरुनी उठत । साष्टांण नमन करुनीया ॥१३॥नंतर जोडून करांजली । शंकराची स्तुति गायिली । ती जणतीं प्रसिद्ध झाली । मत्सरविरचिता शिवस्तुती ॥१४॥शंकरा शिवा त्रिदशेशा वंदन । निर्गुणा गुणेशा सर्वगुणा नमन । अपारा पिनाकधरा चिंतन । करितो तुझें महादेवा ॥१५॥महेशा सर्वाधिपते नमस्कार । उमाकांता भक्तसंरक्षणा कर । भक्तिप्रिया देवा तूं उदार । सर्पहारा नमन तुला ॥१६॥वृषभध्वजा नंदीश वाहना । त्रिशूलधारका भस्मरागलेपना । व्याघ्रांबरधरा पावना । भालचंद्रा नमन तुला ॥१७॥पंचवक्त्रा शंभू तुजसी । दश बाहुधरा त्रिनेत्रासी । जटाजूटधरा गंगाधरासी । गिरिशा माझें वंदन तुज ॥१८॥कपालिन गजचर्मधरासी । सदा ब्रह्ममयासी । ब्रह्मप्रदायिने निराधारासी । नित्यासि माझें वंदन ॥१९॥सुयोगिपतीस अपार गुणधरास । नमन रुद्रा पुनःपुन्हा तुम्हांस । महादेवा काय वर्णू महिम्यास । वेदही कुंठित जेथ झाले ॥२०॥ऐसी स्तुति गाऊन नमन । केलें मत्सरानें उन्मन । शिव त्यासी पुनरपि बोले वचन । सुव्रता वर माग आतां ॥२१॥हें स्तोत्र तूं रचिलेलें । मजला अत्यंत आवडलें । वाचक श्रोतयांसी होईल भलें । सर्व कामपूरक सदा ॥२२॥विद्या दीर्घायुसुख लाभेल । राज्य पुत्रपौत्रादिक मिळेल । भुक्तिमुक्तीही प्राप्त होईल । जो स्तवील मज हया स्तोत्रानें ॥२३॥ऐसें शिववचन ऐकत । तेव्हां मत्सर हर्ष भरित । विनयावनत होऊन म्हणत । भक्तवरप्रदा शंकरासी ॥२४॥जर देवेशा तोषलासी । मजला वर देऊं इच्छिसी । तरी अभय असावें मजसी । सर्वत्र भक्ती दे तुझी ॥२५॥जें जें पंचभूतात्मक असत । त्रिगुणांनी सुविराजित । त्या त्यापासून मला जगांत । मरण न यावें सदाशिवा ॥२६॥शंभो मज आरोग्यादि समायुक्त । ऐश्वर्य देई तूं शाश्वत । ब्रह्मांडाचें राज्य समस्त । सदाशिवा दे निश्चित मला ॥२७॥मुद्गल सांगती ऐकून । वचन त्याचें शिव विस्मितमन । तैसेचि देव आणिक ऋषिजन । आश्चर्यमग्न तें झालें ॥२८॥मत्सरें हें काय मागितलें । यापुढें संकट हें ओढवलें । परी उग्र तपानें तोषले । शिवशंकर त्यास म्हणती ॥२९॥दैत्या जें जें तुझें प्रार्थित । तें तें सर्व लाभेल निश्चित । सुदुर्लभ परी मी सारें देत । उग्र तपें संतुष्ट तुझ्या मी ॥३०॥मुद्गल मुनी पुढें सांगती । मत्सर परतला स्वगृहाप्रती । सुदुर्लभ वर मिळतां चित्तीं ॥ प्रहर्षित तो जाहला ॥३१॥आनंदवी तो सर्वांस । आपुल्या मित्रांसी मातेस । तैसेचि आपुल्या कलत्रांस । आनंद पसरे सर्वत्र गृहीं ॥३२॥मान्यवर त्यासी मान देती । नाना भोग उपलब्ध असती । सुहृदांसी सुखदायक अती । सुखोपभोग भोगितसे ॥३३॥मदकरेपासून त्यास होत । कालांतराने दोन सुत । पित्यासम तेजस्वी कांतियुक्त । वीर्यशाली मनोहर ॥३४॥सुंदरप्रिय ज्येष्ठ सुताचें नांव । विषयप्रिय कनिष्ठाचें अभिनव । ठेवून त्यांना वैभव । दिधलें अपार मत्सरासुरें ॥३५॥एकदां मत्सरासुर जात । आपुल्या सासर्याच्या घराप्रत । तेथ जमले होते समस्त । नानाविध दैत्यगण ॥३६॥ते दैत्य त्यासी म्हणती । कां स्वस्थ बैसलास जगतीं । महातेजा तुम्हांप्रती । विनंती आमुची एक असे ॥३७॥तुमच्या वश आम्ही सर्व । हरुं या देवादिकांचा गर्व । असुरेशा जिंकूया स्वर्गापवर्ग । सकल ब्रह्मांड सत्वरीं ॥३८॥मत्सर प्रभो तुमच्यासम नसत । वीर समस्त ब्रह्मांडांत । शिववरदानें निर्भय जगांत । महासुरेंद्रा अतां तुम्ही ॥३९॥आज्ञा द्यावी क्षणांत जातों । देवांसी जिंकूनि येतो । शस्त्रास्त्रांनी त्यांसी मारितों । स्वर्गभोग आपण भोगूं ॥४०॥दैत्यांचें तें वचन ऐकून । मत्सरासुर म्हणे हें मान्य । तुमचें हितकारक वचन । परम उत्तम वाटतसे ॥४१॥माझ्याहीं हेंच चित्तांत । दानवांनो सदैव स्फुरत । परी माझी माता निवारित । काय करुं मी अगतिक ॥४२॥इंद्र तुझा पिता असत । बाळा देव पूज्य तुज वासवांसहित । धर्मानें वाग निश्चित । जेणें इह परत्र कल्याण ॥४३॥मत्सरासुराचें तें वचन ऐकून । दैत्य त्या सांगती वचन । धर्मकरण सारें बाधक दुर्मन । अखिलही तें त्याज्य असे ॥४४॥ऐका मत्सरेशा वृत्तांत । स्वधर्मज जो पराभूत । संशय तुमचा दूर करील त्वरित । इतिहास त्याचा ह्या क्षणीं ॥४५॥शिववीर्यापासून उपजत । जलंधर असुर जो प्रख्यात । त्यानें जिंकिले युद्धांत । देव सर्वही शंभूसहित ॥४६॥पार्वतीस पाहून तो मोहित । पत्नी आपुली करुं पहात । तिला पकडण्या उद्यत । जाहला होता त्या वेळीं ॥४७॥ऐसे बहुत दैत्य संजात । मत्सरा असुरेंद्रा जगांत । जेथ देव मान्यता पावत । तेथ दैत्यांचा अपमान ॥४८॥दैत्य मान्यता पावती । तेथें देव दूषित होती । देवेंद्र देवादिक असती । सतत शत्रू दैत्यांचे ॥४९॥म्हणोनि त्यजावें संदेहासी । महाबला जिंकावें देवांसी । त्यागा आपुल्या पृथ्वीमातेसी । मुनिदेवांची सहायक जी ॥५०॥येथ आमुच्या सन्निध रहावें । परतोनी स्वगृहा न जावें । समस्त त्रैलोक्य जिंकावें । महाभागा जें उचित असे ॥५१॥त्यांचें वचन ऐकून । हितकारक तेंचि मानून । मत्सरें माता पृथ्वीस त्यागून । अहितकारक तेंचि केलें ॥५२॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुंडचरिते मत्सरासुरसमागमो नाम चतुर्विशतितमोऽध्यायः समाप्तः ॥ श्रीगजाननार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP