मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड १| अध्याय २२ खंड १ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ खंड १ - अध्याय २२ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत मुद्गलवरप्रदानम् Translation - भाषांतर श्रीगणेशाला नमः । सूत म्हणती तें मुद्गलमुनी । गणेशवचन ऐकूनी । भक्तिभावपूर्ण मनीं । प्रणिपात करुन प्राथिती तया ॥१॥पूर्ण मानस होतें । गणेशासी म्हणती ते । कां लोभ दाविसी मातें । ढूढें वरदान मज नको ॥२॥मज कांही न्यून नसत । परी तुझा आग्रह असत । म्हणोनि मी वर मागत । दृढ भक्ति देई तुझी ॥३॥ती भक्ति राहो अखंडित । संपूर्ण प्रेमपूर्ण मम मनांत । जेथें जेथें असेन जगांत । तेथें गणेशा तव ध्यान॥४॥मुद्गलाचें वचन ऐकून । संतोष पावला गजानन । म्हणे माझी भक्ति अन्यून । अचल संपूर्ण तव चित्तांत ॥५॥सदैव राहील निश्चित । तुजसम नसे भाग्यवंत । कोणीही या त्रैलोक्यांत । माझ्या भक्तींत रममाण ॥६॥ती भक्ति नवविधा असत । विप्रा तुझिया चित्तांत । रसदायिका एकच वसत । दहावा प्रकार त्यांत नसे ॥७॥श्रवण कीर्तन पादसेवन । अर्चन वंदन दास्य उपासन । सख्य देहनिवेदन । ऐसी नवविधा भक्ति असे ॥८॥नवचिन्हांकित सांगेन । भक्ति महिमा तुज पावन । तेणेंच जनांस भक्ति लाभून । कल्याण त्यांचें होईल ॥९॥माझ्या गुणांचें श्रवण । ऐकल्यावरी त्यांचें मनन । त्यानंतर तत्सम आचार करुन । अनुभव प्रत्यक्ष प्रत्यक्ष लाभेल ॥१०॥रसोत्पतींचा अनुभव घेऊन । नंतर करावें गुणांचें श्रवण । तेणें जंतू होय पावन । अनन्य रस अनुभवितां ॥११॥दुसरें कांहीं ऐकण्यास । जेव्हां न रुचे मनास । तेव्हां श्रवणात्मिका भक्तीस । संपूर्णता प्राप्त होते ॥१२॥ऐशा भक्ताच्या कानांत । मी वसतों अविरत । त्याच्या भक्तीने मुग्ध होत । ऐसी जाण श्रवणभक्ती ॥१३॥माझ्या गुणांचे कीर्तन । सदैव रसदायक करितां मन । अन्य कीर्तनी भाव न राहून । रसनिर्मिती मनीं होय ॥१४॥तेव्हां कीर्तनात्मिका भक्ति होत । सुसंपूर्ण प्रेमयुक्त । ऐशा भक्ताच्या जिव्हाग्रीं वसत । सदैव मी मुद्गला ॥१५॥तदनंतर स्मरणरुपा भक्ति करीत । माझ्या कार्याची स्मृति सतत । व्रत पूजादिकांत । सावधान सर्वकाळ ॥१६॥ऐशा भक्ताच्या स्मरणीं वसत । भक्ती भोगार्थ मीच सतत । माझे चरणकमल सत्य वाटत । अन्य सारे असत्य त्यासी ॥१७॥माझ्या चरणांचा आश्रय घेत । मुद्गल मुने जो जगांत । पादसेवनरुपी उपजत । भक्ति तेव्हां चित्तांत ॥१८॥त्याच्या आळसरहित देहांत । मी निश्चल राहत । तदनंतर सांगो पांग तो करित । माझें कर्मे प्रेमानें ॥१९॥अर्चनात्मिका भक्ती प्राप्त । ऐशा भावें नरास होत । त्याच्या भक्तिभावें प्रभावित । माझा निवास तेथ होय ॥२०॥वेदादींचा विचार करितां । माझ्या सम दुजा नसतां । मीच श्रेष्ठ हा विचार पटतां । वंदनभक्ति सिद्ध होते ॥२१॥माझाविना ज्याच्या चित्तांत । अन्य कोणीही न प्रतिष्ठित । त्याच्या त्या श्रेष्ठ भावांत । सदैव मीच राहतसे ॥२२॥भक्तिभोक्ता होऊन । अन्यत्र श्रेष्ठत्व दूर करुन । गाणपत्य सांप्रदायीं अभिमान । यथाकाल मी निर्माण करी ॥२३॥गणेश उपासनामार्ग शास्त्रांत । वर्णिला असे अद्भुत । तो जाणून तत्सम होत । गणेशभक्त तदनंतर ॥२४॥स्वभावतः मला भजत । गणेश मी हें मनीं जाणीत । तेव्हां दास्यभक्ती सुफलित । होते निश्चित भक्तिमार्गी ॥२५॥गाणपत्य स्वभावांत । मीच त्यास दृढ करित । दास्यभक्ति तेणें होत । एकनिष्ठा प्रकाशित ॥२६॥जैसे मित्राजवळी गौप्य नसत । ब्राह्यांतर सारे मित्र जाणत । तैसा बाह्यांतरीं दंभहीन होत । माझ्या भजनीं रत सदा ॥२७॥ऐशा भक्ता सख्य प्राप्त । माझें सदैव या जगतांत । गणेश्वर सर्वही जाणित । जें जें माझ्या मनीं असे ॥२८॥सर्वांच्या हृदयीं तो वसत । सर्व भाव तो जाणित । ऐशा विचारें भययुक्त । भक्त न करी अविचार ॥२९॥अनन्यभावें मज भजत । भक्तिलोलुप मी तदा होत । त्याच्या कृतीनें मोहित । मैत्रींत त्याच्या दृढ राहे ॥३०॥पंचधा चित्तभूमी असत । तिचा तेव्हां त्याग करीत । मीच गणेश ऐसा निश्चित । निश्चय जेव्हां होत असे ॥३१॥अहंभाव विहीन होता भक्तिभावाची होय सांगता । तेव्हां अभिन्नता चित्ता । येई ऐसें जाण म्हणे ॥३२॥ऐसी नवविधा भक्ति करित । जो भक्त माझी रसयुक्त । माझ्या रसावांचोन चित्त । क्षणमात्रही तद अन रमे ॥३३॥ऐशी स्थिती होतां प्राप्त । मझा संपूर्ण भक्त होत । त्याच्या मोहें संयुक्त । सदैव राहे त्या जवळी ॥३४॥एक क्षणही त्याचा विरह । होता मम चित्ता होय दाह । धन्य होय तो विदेह । सदैव त्याचें रक्षण करी मी ॥३५॥भक्तीसारखा भाव नसत । मज आवडता जगतांत । भक्तिभावें बद्ध होत । राहतों भक्तहृदयीं मी ॥३६॥नानाविध नर मला भजती । नवविध भक्त जगीं असती । जेथ ज्याची अधिक आसक्ती । त्या भक्तींत थोर तो ॥३७॥ज्या भक्तींत रसोत्पत्ती । अधिक उपजे स्वचित्तीं । त्या भक्तीची मुख्यत्वें प्रचीती । नवविधा भक्तींत जाणावी ॥३८॥ऐशा नवविधा भक्तींत । भक्तराज जे प्रख्यात । त्यांची नावें मी कथित । महाभागा ऐक आता ॥३९॥माझ्या गुणांच्या श्रवणांत । ज्याला अधिक रस वाटत । ऐसा भक्तराज कार्तिकेय प्रख्यात । माझ्या भक्तींत रममाण ॥४०॥सर्व जीवांचा आत्मा असत । सूर्यदेव जो तेजयुक्त । तो माझ्या कीर्तनभक्तींत । अधिक रमला भक्तिभावें ॥४१॥रामचंद्र स्मरणभक्तींत । पार्वती पादसेवनभक्तींत रत । महाविष्णु स्वयं रमत । अर्चनाभक्तींत माझ्या सदा ॥४२॥वंदनभक्ति सर्वभावें करित । भक्तराजेंद्र शंकर अविरत । भक्तिधिप परशुराम होत । दास्यभक्तींत मग्न सदा ॥४३॥सख्यभक्ति चतुर्मुख करित । भक्तांचा जो अग्रणी असत । वैय्यासकी शुकाचार्य प्रख्यात । आत्मानिवेदन भक्ति करी ॥४४॥हे सर्व भक्तराज कथिले । ते सर्वही अंतराय विहीन झाले । तथापि मज ना विसरले । ब्रह्मभूत परी भजती मज ॥४५॥त्या सर्वांचा राजा तूं असत । मुद्गला पूर्णभक्ती स्वभाव युक्त । तूं भजशील मज निश्चित । यत्नपूर्वक सर्वदा ॥४६॥नवविधा भक्तिभावांत । विशेष स्थान तुज प्राप्त । माझा भक्तेश पूर्ण भक्त । आजपासुनी तुज केलें ॥४७॥तुज सम न झाला न होईल । माझा भक्त ऐसा विमल । भक्तीचें बळ अतुल । अधीन तुझ्या मी सर्वदा ॥४८॥तुझ्या शरीरावरुनी वाहत । वारा तोही पावन असत । तुझ्या दृष्टीनें जगतांत । स्पर्शानें पावन होत प्राणी ॥४९॥ब्रह्म बुद्धियुत ते होतील । पीडा त्यांची सर्व निरसेल । ऐसें वरदान अमल । देऊन पावले अंतर्धान ॥५०॥सूत म्हणती ब्रह्मनायक । गणेशभक्तांसी सुखकारक । त्याच्या वचनें मानिती लोक । सर्वश्रेष्ठ मुद्गलासी ॥५१॥मुद्गलाचें चरित्र ऐकेल । अथवा जो हें वाचील । भावभक्तीनें ऐकवील । श्रद्धायुक्त जगीं जो ॥५२॥त्यास सर्व अर्थसिद्धी प्राप्त । अखिल भोगही जगतांत अंतीं ब्रह्ममय तो होत । ऐसी कृपा विघ्नेशाची ॥५३॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुण्डचरिते मुद्गलवरप्रदान नाम द्वाविंशोऽध्यायः समाप्तः ॥ श्रीगजाननार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP