मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड १| अध्याय २३ खंड १ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ खंड १ - अध्याय २३ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत मत्सरासुरतपोवर्णनम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । दक्ष प्रजापति मुद्गला म्हणत । धन्य तूं योगिराज असत । माझ्या महद्भाग्यें संप्राप्त । दर्शन भक्तराजेंद्रा तुझें ॥१॥आठ अवतार गणराजाचे ख्यात । ते विस्तारें सांगा मजप्रत । महामुने दैत्यांचा इतिहास समस्त । युद्धभागासह सांगा ॥२॥ऐसे महादैत्य पूर्वीं न ऐकिले । कुठेंही म्हणोनी विस्मित झाले । मन माझें आसुसलें । कथा त्यांची ऐकावया ॥३॥मुद्गल म्हणती सांगेन । कथा ती पापनाशिनी महान । तुझ्या भावभक्तीनें मन । प्रभावित मम झालें ॥४॥गणनाथ प्रमोदिनी कथा सांगेन । प्रथम ऐक चरित्र गहन । वक्रतुण्डाचे पुण्यपावन । मत्सरासुर ज्यांत जिंकिला ॥५॥ज्या दिनीं इंद्रासि प्राप्त । इंद्रपद जाहलें सर्वोचित । त्या दिवशीं महोत्साह करित । प्रतिवर्षी महामुने ॥६॥एकदां अमरावतींत । देवेंद्र उत्सवांत । मंगलासनीं विराजित । सर्वजन त्या पूजिती ॥७॥देव गंधर्व अप्सरा नाग । यक्ष मुनींद्र राक्षस उरग । स्कंदनंदी महाभाग । पार्वतीसह शंकरही ॥८॥सर्व भूतगणही आले । लक्ष्मीसहित विष्णु विराजले । विष्वकसेन गणें केलें । वेदसहित प्रजापतीही ॥९॥भानू सर्व ग्रहांसहित । अग्नि धर्मराज वरुण येत । कुबेर आदित्य मनू येत । वसूरुद्र विद्याधर ॥१०॥साध्यदेव विश्वेदेव । अश्विनीकुमार शेषनागादी सर्व । बहुत जमले महोत्सव । शतक्रतूच्या दरबारीं ॥११॥तेथ कथा चालल्या नाना । आनंदविती सर्वांच्या मना । मुनी भावसंयुक्त पुरातना । गोष्टी तेव्हां सांगती ॥१२॥अप्सरा नृत्य करिती । गंधर्व ललित गायन करिती । हाहा हुहू आदि गाण गाती । तैसेचि नारद तुंबरु ॥१३॥विविध वाद्यें वाजत होतीं । चारण स्तुतिगीतें गाती । सर्व जन हृष्ट पुष्ट असती । परम हर्षित देवललना ॥१४॥तेथ रंभा नृत्यादी करित । अभिनव हावभाव युक्त । ती कंदुक क्रीडासक्त । सभेंत नाचे इतस्ततः ॥१५॥इंद्रानें तिज पाहिलें । त्याचें मन कामासकत झालें । मंजुळ नृत्यानें मोहलें । कर्तव्य विसरला सुरेश्वर ॥१६॥सत्वर उत्सव संपवित । तेव्हा सर्व स्वस्थळीं जात । यथोचित्त संमानित । हर्षभरित चित्तानें ॥१७॥रंभेसी तेव्हां निमंत्रून । वनांत गेला तिज घेऊन । एकला तेथ एकांत पाहून । रममाण झाला रंभेसह ॥१८॥वृक्ष नाना परिमलयुक्त । जे होते पूर्ण प्रफुल्लित । निर्मल जलप्रवाह वाहत । त्यांत सुवर्ण कमळें शोभती ॥१९॥भरमर गुंजारव करिती । नाना रंगांची वस्त्रें होतीं । कामोद्दीपक गोष्टी किती । तेथ होत वनांतरी ॥२०॥रंभेसह क्रीडा करित । वज्रधारी तो कामासक्त । बहुत काळ परी ना तृप्त । मन त्याचें जाहलें ॥२१॥तूप घालिता अग्नींत । अग्नी अधिकाचि प्रज्वलित होत । तैसा कामाग्नी वाढत । सहवासांत रंभेच्या ॥२२॥तेथ दुर्वास मुनी येत । स्वेच्छेनें जो विहार करित । त्यास पाहून झाला लज्जित । देवराज विनमर होई ॥२३॥रंभेसी दूर लोटून । दुर्वासातें विनीत मन । वंदन करी हात जोडून । तेव्हां ऐसें जाहलें ॥२४॥इंद्रास सोडून त्या स्थितींत । मुनिसत्तम निघून जात । अतिविव्हल गात्रें होउनी त्वरित । इंद्रवीर्य गळून पडलें ॥२५॥देवशत्रूंचा हननकर्ता । ऐसी विकल स्थिती होता । लज्जित मानसीं तत्त्वता । तेव्हां अद्भुत एक घडलें ॥२६॥इंद्राचें वीर्य भूमीवर पडत । तेथ दैत्य एक जन्मत । त्यासी पाहून इंद्र निंदित । आपुल्या कामतिरेकास ॥२७॥आपुलें घर सोडिलें । रंभेसही त्यानें त्यागिलें । देवांचें अखिल राज्य नाकारिलें । स्वतःस निंदी पुनःपुन्हा ॥२८॥अहो धिक्कार माझा रंगात । झालों जो मी स्खलित । असुरांसम अति चंचल चित्त । माझे कैसें जाहलें? ॥२९॥देवांगना स्वर्वेश्यादिमोहित । माझें मन अखंडित । धिक्कार असो साधु निंदित । जीवन माझें सारें असे ॥३०॥माझ्या कुकर्मांच्या दोषांचें फल । पुढें मजला मिळेल । ऐसें विचारी स्वचित्तांत त्या वेळ । निंदूनिया स्वतःसी ॥३१॥पुढे स्वधर्मीं संस्थित । वृत्रहन्ता इंद्र राज्य करित । पुनरपि स्वकर्तव्यीं रत । परी विघ्न उभें ठालें ॥३२॥इंद्रेवीर्यापासून जन्मला । भूमींत जो असुर वाढला । स्तनपानादी देऊन रक्षिला । पृथ्वी मातेनें त्याला ॥३३॥दुसर्या हिमालयासम वाढला । तो असुर महाबळें युक्त झाला । आजानुबाहू दीर्घाक्ष जाहला । रक्तवर्ण क्रूरकर्मा ॥३४॥प्रज्वलित अग्नीसम । मत्सर ऐसें ठेविलें नाम । भूमीनें त्यासी अनुपम । त्याचिया स्वभावानुरुप ॥३५॥पाच वर्षे त्यास होती । तेव्हां धरित्री झाली करिती । मौंजीबंधन त्याचें अतिप्रीती । ब्राह्मणणासी बोलावून ॥३६॥मत्म्सर वेदादिक शिकण्यास । गुरुसन्निध जाई रहाण्यास । आर्जवयुक्त श्रवणास । करी तेव्हां गुरुपदेशाचें ॥३७॥अल्प समयांत पारंगत । झाला तो वेदादींत । तेव्हां दुर्बुद्धीच्या सुतेसमवेत । विवाह लावितो तयाचा ॥३८॥मदकरा नामक ती विलासिनी । सर्व अवयव शोभिनी चतुर सर्वकार्यांत विषयवर्धिनी । भामिनी ती मत्सरपत्नी ॥३९॥एके दिवशीं मनांत । दुरात्माच्या विचार येत । विपुल तप आचरुन समस्त । ब्रह्मांड जिंकावें स्वओजानें ॥४०॥म्हणोनि तो शुक्राचार्यास भेटत । पंचाक्षरी विद्या शिकत । त्या विद्येनें तप आचरित । शंबूस तोषवी भक्तीनं ॥४१॥पुष्पपल्लवें शोभिवंत । ऐशिया निर्जन वनांत । कंदमूल फुलांनी युक्त । जलपूर्ण जागीं तप केलें ॥४२॥दिव्य वर्ष सहस्त्रपर्यंत । जो निराहार राहून तप करित । पंचाक्षर मंत्र जपत । हृदयीं ध्यान सदाशिवाचें ॥४३॥पाशुपती दीक्षा घेत । शंकरासी तो तोषवित । त्याच्या उग्र तपें क्षुभित । देव जाहले आसमंती ॥४४॥तयाच्या प्रदीप्त तेजापुढती । सूर्याचा प्रकाश मंद अती । अग्नीची उष्णता त्यापुढती । मंदावली सत्वर ॥४५॥सर्व भूतें आकुल होत । ऋषिगणांसह शरण जात । देव सारे शंकराप्रत । रक्षण जगदीश्वरा करी ॥४६॥ऐसी प्रार्थना ते करिती । मत्सराच्या तपा घाबरती । शंकर पार्वती सह ते जाती । आपुल्या गणांसमवेत ॥४७॥आपला भक्त महा अदभुत । होता ज्या देशांत । अस्थित्वचासमायुक्त । श्वासमात्रे जो जीवित ॥४८॥त्यांच्या जीर्ण अंगावर । वारुळ वाढले अनिवार । संतुष्ट जाहले हर । ऐशा भक्ता पाहून ॥४९॥मत्सराचें महा उग्र तप पहात । देव सारे तें विस्मित । ऋषीही पाहून आश्चर्यचकित । महाभागा त्या पाहून ॥५०॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुण्डचरिते मत्सरासुरतपोवर्णनं नाम त्रयोविंशतितमोऽध्यायः समाप्तः ॥ श्रीगजाननार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP