मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड १| अध्याय ३१ खंड १ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ खंड १ - अध्याय ३१ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत दत्तात्रेयसंगमः Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । मुद्गल दक्षासी सांगती । दैत्यें काय केलें त्या पुढती । ब्रह्मांडाधिपती जगती । मत्सर झाला स्वप्रतापें ॥१॥सुंदरप्रियासी कैलासाधिपती । विजयप्रियासी वैकुंठाचा पती । प्रल्हादी सत्यलोकेश स्थिती । विरोचनासी माहेंद्रेश ॥२॥ऐशियापरी तो मत्सर राजेश । दैत्यांसी करी स्वर्गाधीश । स्वयं भूमीवर जाउनी दैत्येश । मत्सरावासक नगर निर्मी ॥३॥त्रैलोक्य सर्व वश केलें । आपुल्या तेजें देवांसि जिंकिलें । देवेंद्र शिवादींस बंदीत ठेविलें । मत्सरासुरें स्वगृहीं ॥४॥एके दिवशीं हर्षयुक्त । दैत्येश शिवासीं बोलावित । मधुर वाक्यें संबोधित । मत्सरासुर त्या वेळीं ॥५॥ऐक शंभो महाभागा । उगाच कां करिसी त्रागा । माझी आज्ञा पाळून जगा । दाखवि विनमरता आपुली ॥६॥ऐसें जरीं तूं करशील । तरी मज प्रिय होशील । देवेंद्रासह जाण्या गृहीं असेल । अनुज्ञा माझी तुम्हांसी ॥७॥ऐसें बोलून दैत्येंद्र सोडित । देवांसहित हर्षसंयुत । तेव्हां शंकरासी वाटत । बहुत विषाद मानसीं ॥८॥काळ पाहता अनुचित । घेऊनि आपुल्या सवें देव समस्त । पर्वत गुहांचा आश्रय घेत । चिंतातुर महादेव ॥९॥विष्णु प्रमुख देव गुहांत । भयभीत ऐसे निवसत । दिवस जाती चिंतेत । देव असुनी दीन झाले ॥१०॥दैत्यराज तो पृथ्वीवर । धर्माचें खंडण करी असुर । माजला सर्वत्र हाहाकार । कोणी त्राता दिसेना ॥११॥देवांच्या प्रतिमा फेकित । जळांमध्ये तो अविनीत । दैत्य जाहले मदोन्मत्त । धर्म न्याय न उरला ॥१२॥जेथें जेथें पहावें आसमंतांत । तेथें तेथें मत्सराच्या प्रतिमा दिसत । देशोंदेशीं गावोंगावीं जात । अधिकारी या कामांसीं ॥१३॥घरोघरीं ज्या होत्य संस्थित । देवांच्या प्रतिमा अति पुनीत । त्या फोडून टाकती जळांत । ऐसा अधर्म करिती ते ॥१४॥मत्सराचे पुतळे वनवून । तैसीच चित्रें रंगवून । देती घरोघर नेऊन । ह्यांची पूजा करा म्हणती ॥१५॥ऐसा त्रास त्रिभुवनास । देती सुदारुण दैत्य सोल्हास । ब्राह्मणां बोलाऊनी ताडण्यास । करी मत्सर दुष्ट भावें ॥१६॥त्यांना आज्ञा देत मत्सर । यज्ञांत म्हणावे माझे मंत्र । गायत्रीचा जप थोर । माझें नाव घालूनि करावा ॥१७॥अग्निहोत्रादिक कर्म करावें । परि मलाचि ईश्वर मानावें । ब्राह्मणांचा देव मी ऐसे भजावें । मग मी प्रसन्न होईन ॥१८॥माझी सदैव स्तुति गाईल । माझ्या चरणांची सेवा करील । त्यांसि दुर्लभ कांहीं नसेल । आश्वासन हें असें माझें ॥१९॥धनधान्यादि सर्व देईन । स्वर्ग भोगादि मानसन्मान । सारे जग माझ्या अधीन । यात संशय कांहीं नसे ॥२०॥माझे आवडते जे दैत्य असत । त्यांसी भोजनादींनी तोषवित । तेणें तो माझाही प्रिय होत । पुरवीन वांछित तयाचें ॥२१॥ऐसा तो मत्सरयुक्त मत्सर । धर्मखंडण करी सर्वत्र । अपात्र जाहले पात्र । दुष्टांसि सुष्टत्व लाभलें ॥२२॥तेव्हां कांही ऋषिगण जाती । दक्षा ऐशा वनांप्रति । जेथ व्याघ्रादींची वसती । निर्जन म्हणुनी सुखकारी ॥२३॥तेथ ते धर्मपरायण मुनी । रमल अध्यात्मचिंतनीं । असुरांच्या ध्यानींमनीं । नव्हतें तें वसति स्थान ॥२४॥परी इकदॆ मुनि वसत । अन्य जे देह रक्षणीं आसक्य । वर्णाश्रम धर्म सोडित । जन सगळे कुसंगतीनें ॥२५॥यजन याजन बंद झालें । आपुले स्वधर्म विसरले । असुरांच्या भयें त्यागिले । सद्गुण सारे लोकांनीं ॥२६॥स्वाहा स्वधा वषटकार । यांचा अभाव सर्वत्र । उघड करिती वर्णसंकर । राजाज्ञेनें लोक तदा ॥२७॥अन्यायास म्हणती न्याय । धर्म सारा विलया जाय । मत्सर स्तुतीवाचुनु उपाय । अन्य नव्हता लोकांना ॥२८॥ऐसी पापवृद्धि झाली । जेणें सर्वत्र पसरली । राजाज्ञा हीच झाली । देवाज्ञेच्या समान ॥२९॥देव गण अरण्यांत । होते उपोषण-पीडित । विचारास्तव सभा घेत । गुप्तपणें ते सारे ॥३०॥मत्सराचा विनाश व्हावा । ऐसा उपाय सुचावा । म्हणोनि परस्परांच विचार घ्यावा । परी कांहीं सुचेना तयांसि ॥३१॥त्या वेळीं तेथ येत । दत्तात्रेय योगी महंत । साक्षात् ब्रह्ममय जो असत । सोडिला ज्यानें आपपर भाव ॥३२॥बालभावें ते विहरत । जडबुद्धी सम वागत । पिशाच्चांसम भटकत । नग्न मलिन ऐशा रुपीं ॥३३॥उन्मत्तासम तो फिरत । भय त्यांसी नव्हतें माहित । अत्रींचा तो प्रिय सुत । गणराजाचा परम भक्त ॥३४॥त्यांस पाहून देवसंघ उठत । आदरें प्रणाम सर्व करित । पूजा त्याची शास्त्रोक्त । कार्यसिद्धीस्तव करिती ॥३५॥कोणी देव पाय चेपिती । कोणी त्यांसी वारा घालिती । कोणी मधुर फळें अर्पिती । आदरपूर्वक भोजनासी ॥३६॥कोणी देव विचारिती सत्वरीं । सर्वांच्या होती चिंता उरीं । शंभु विष्णुही विनमर झाले ॥३७॥शिव म्हणती दत्तात्रेयासी । स्वामी तूं द्वंद्वहीन अससी । नित्य आनंदांत राहसी । स्वकीय-पर हा भाव नसे ॥३८॥तथापि जनवत्सल तूं अससी । गणेशाची भक्ती करिसी । साक्षात् गणपति अससी । महायोगी भक्तवर ॥३९॥जरी स्थितप्रज्ञ अससी । तरी परदुःखे तू द्रवसी । उपाधि रहित तूं सांगसी । दुःख-नाशाचा उपाय ॥४०॥म्हणून आम्हीं तुज प्रार्थित । स्थानभरष्ट मत्सर-पीडित । पशुसम वनीं राहत । निराहार निस्तेज ॥४१॥धर्मलोपें, मनीं दुःखित । स्वामी मरणार होतो निश्चित । परी पूर्व पुण्याईनें प्राप्त । आज तुमचें दर्शन ॥४२॥आतां दुःखादि सरेल । स्वातंत्र्य आम्हांसी मिळेल । वर्णाश्रम धर्म होईल । सुस्थापित सर्वत्र ॥४३॥ऐसी आशा आमुच्या मनांत । झाली असे पल्लवित । मत्सर दैत्याचा नाश होत । ऐसा उपाय सांगावा ॥४४॥त्या असुरानें सारें जग । केलें दुःखमय युग । एकाचा दोषयोग । दुःख कारण बहुतांसी ॥४५॥उपाधिरहित जो योगी । तो दोष दूर करी जगीं । धर्म न्यायाच्या संयोगी । सुखदायक सर्वांसी ॥४६॥म्हणोनि योगीश रक्षावें । सारे सुखी करावे । करुणायुक्त तुम्हीं व्हावें । साधन सांगा झणीं ॥४७॥मुद्गल म्हणती शिववचन । ऐसें दीनपर ऐकून । दत्तात्रेय देत आश्वासन । शिवा शंकरा जगन्नाथासी ॥४८॥शंकरा तूं साक्षात् ईश्वर । तुझ्या अधीन हें जग सर्व । काय सांगू मी युक्ति कर्तव्य सार । महामते तुजपुढें मी?॥४९॥परी देवेशा मी मानित । तुझी आज्ञा भावयुक्त । सांगेन तुज उपाय त्वरित । जेणें शाश्वत सुखलाभ ॥५०॥शंभो तुझिया हृदयांत । मत्सर झाला होता जागृत । मी ईश्वर जगतांत । माझ्या अधीन जग सारें ॥५१॥माझ्यासम त्रिभुवनांत । श्रेष्ठ कोणीही नसत । ऐसा जो महा असुर हृदयांत । मत्सर नामा तुझ्या असे ॥५२॥त्याचा योगमार्गें याग करी । इर्षा सर्वही दूर करी । श्रेष्ठता अन्यत्र पाहून उरीं । सदैव जी तुला वाटे ॥५३॥ती दूर करण्या आचर । गणेशाचें तप उग्र । मीही जपला होता एकाक्षर । गणेशमंत्र कल्याणकर ॥५४॥एकाक्षर विधानें झालें प्राप्त । गणेश अर्द्वैत चिरशाश्वत । गणाधीश आणिक मी असत । अभिन्न ऐसें मानावें ॥५५॥म्हणोनि योगमार्गानें पूजावा । गणेश सर्व सिद्धिदाता चिंतावा । एकाक्षर विधानें आराधावा । यत्नपूर्वक तूं सदा ॥५६॥हृदयांतील मत्सर त्यागावा । नंतर त्याच नाश करावा । योगाचा आश्रय तूं घ्यावा । जेणें समर्थ होशील ॥५७॥ऐसें सांगून महादेवासी । यदृच्छया जात अन्य स्थानासी । मुनिश्रेष्ठ तो जगतासी । गणेशसेवेचा आदर्श ॥५८॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुंडचरिते दत्तात्रेयसंगमो नामैकात्रिंशोऽध्याय समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP