मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड १| अध्याय १५ खंड १ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ खंड १ - अध्याय १५ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत गणेशप्रसन्नभावः Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । सूत म्हणती शिववचन । ऐकून विघ्नेश प्रसन्न । भक्तिभावें तुष्ट होऊन । मधुर स्वरें तें बोलत ॥१॥शंभो महाभागा विमोहित । मायेनें माझ्या वक्रतुंड म्हणत । गणेश मी तपें भावित । पुनर्दर्शन तुज दिलें ॥२॥तुझा वरदाता मीच झालों । तुझ्यापुढे मी प्रकटला । उग्र तपानें संतोषलों । ज्ञानयुक्त तें तुज केलें ॥३॥माझी ही माया सतत । मानवांसी मोहवित । विस्मरण तुलाही होत । म्हणोनि माझ्या रुपाचें ॥४॥ऐसें बोलून दूर करित । शिवाचें मायामोहजाल त्वरित । तेव्हा सर्वही स्मरण होत । गणेशाच्या स्वरुपाचें ॥५॥समस्त आठवून स्तोत्र गात । परी गणेशरुप अंतर्हित । तेव्हां त्याच्या शुभ रुपा ध्यात । हृदयांत तो योगबलें ॥६॥परी त्याचें रुप न दिसत । म्हणोनी व्याकुळ चित्तांत । विष्णु तेव्हा समीप येत । सर्व सांगे शिवासी॥७॥तैसें रुप ना पाहिलें । ऐसें विष्णुही म्हणाले । त्या पांचही देवा न दिसलें । रुप गजराज देवाचें ॥८॥तेणें झाले अति विस्मित । एकत्र येऊन स्तवन गात । पंचदेवकृत स्तोत्र प्रख्यात । अद्भुत सामर्थ्यशाली ॥९॥वक्रतुंडा त्रिनेत्रधरा नमन । चतुर्भुजधरा देवा वंदन । पाशांकुशधरा लंबोदरा अभिवादन । नाभिशेषा एकदंता ॥१०॥महत्रुपा शूर्पकर्णा नमन । सिंदुर अरुन देहा वंदन । रक्तवर्ण धरा सूक्ष्मा आमुचें मन । विनमर झालें महाकाया ॥११॥सिद्धिबुद्धियुता विभूतिसहिता । चिंतामणिधरा आतां । चिंतामणे परेशा अव्यक्ता । परेशा परा प्रणाम हा ॥१२॥मनोवाणी विहीना विघ्नेशा नमन । नानामायाधरा वंदन । मायिका मोहकारणा मन। हेरंबा विनमर तव पदीं ॥१३॥ब्रह्मणां पते निजरुप । दाखवावें निष्पाप । भक्तांसी प्रीतिदायक । सुरुप सर्वनाथा दाखवावें ॥१४॥तुझ्यामुळें सनाथ असत । आम्ही सारे भक्तियुक्त । ऐसें स्तोत्र म्हणतां प्रकटत । तयांपुढे गजानन ॥१५॥त्यासी पाहता प्रणत । भक्तिभावें नमस्कार करित । ढुंढी त्यांना तें सांगत । स्तोत्रें तुमच्या तुष्ट झालों ॥१६॥पंच देवांनो प्रीत । उपजली माझ्या चित्तांत । यांत संशय आजही नसत । वरप्रदान ऐकावें ॥१७॥जो हें स्तोत्र वाचील । तो मज मान्य होईल । त्याचें वांछित पूर्ण होईल । अंतीं मम सायुज्य लाभेल तो ॥१८॥ऐका माझे प्रिय वचन । गर्व न करावा मदधीन । तुम्ही सारे कला अंश म्हणून । लीलेसाठीं निर्मिले मीं ॥१९॥परस्परांशी स्पर्धा करितां । मनांत उपजली भरान्ती तत्त्वता । पूर्ण असोनी अपूर्णता । मुक्ती माझ्या रहस्यज्ञानें ॥२०॥माझ्या रहस्यज्ञानें भावित । सदैव मोहविनिर्मुक्त । माझ्यासम होण्या श्रेष्ठ सुहित । गणेशतत्त्व सदा ध्यावें ॥२१॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुण्डचरिते गणेश प्रसन्नभावो नाम पंचदशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP